गिफ्ट तिलापिया माशांची वैशिष्ट्ये – कृषि उद्योग तिलापिया मासेपालन व्यवसाय माहिती

गिफ्ट तिलापिया मासेपालन कृषि उद्योग व्यवसाय माहिती

२१ व्या शतकातील “फूड फिश” मानला जातो तसेच तो ‘मत्स्य-चिकन’ म्हणूनही लोकप्रिय आहे. तिलापियाचे जागतिक उत्पादन ४.० दशलक्ष टन असून त्याचे अंदाजे मूल्य ३ अब्ज डॉलर्स आहे.

FAO च्या अंदाजानुसार, सन २०३० पर्यंत तिलापियाचे जागतिक उत्पादन ७.३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. चीन, इजिप्त, फिलिपाईन्स, ब्राझिल, धायलंड आणि बांगलादेश या देशामध्ये तिलापियाने अन्नसुरक्षा कार्यक्रमात भरीव योगदान दिले आहे.

तिलापिया ही एक अशी खात्रीशीर मत्स्य प्रजाती आहे की जी विशेषत: वाढत्या लोकसंख्येच्या आणि स्वस्त प्रथिनाच्या अन्न सुरक्षेसाठीचा पर्याय म्हणून आपले स्थान निश्चित करू शकेल. गिफ्ट तिलापिया

जवळजवळ ३० वर्षापासून सुधारित होत आहे आणि त्यातील सुधारणा अजूनही सुरू आहेत.

विकसनशील देशांमध्ये GIFT तिलापिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकलिंग गिफ्ट तिलापिया माशाला मोठी मागणी आणि मूल्य असून संपूर्ण जगात सर्वात जास्त

मत्स्यसंवर्धन केला जाणारा हा मासा आहे.

गिफ्ट तिलापिया माशांची वैशिष्ट्ये

 1. सर्व प्रकारचे पूरक खाद्य खातो. कृत्रिम खाद्याला उत्तम प्रतिसाद.
 2. पाण्यातील किंवा वातावरणातील बदलांस सहनशील.६ ते ७ महिन्याच्या कमी संवर्धन कालावधीत सरासरी ६५० ग्रॅम वाढ.
 3. २०० ग्रॅम वजनाचा मासा सुद्धा विक्रीला.
 4. मत्स्यबीज संचयन घनता देखील जास्त ठेवता येते.
 5. बारमाही तलावात दोन वेळा तिलापिया जातीच्या माशांचे संवर्धन करणे शक्‍य आहे.
 6. अन्य कोणत्याही मत्स्य जातींपेक्षा झपाट्याने वाढ होते.
 7. चांगली रोग प्रतिकारक क्षमता व जगणुकीचे प्रमाण जास्त असते.
 8. माशांची चव अतिशय उत्तम आणि काट्याचे प्रमाण अत्यल्प.
 9. जिवंत स्थितीत बाजारात नेता येतो. त्यामुळे चांगला दर मिळतो.

केंद्र शासनाच्या २०२० च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार गिफ्ट तिलापिया संवर्धनासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठीचा परवाना (लायसन्स) मिळवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून

अटी व निकष खलील प्रमाणे आहेत.-तिलापिया मासेपालन 

 • तिलपिया संवर्धन करण्यापूर्वी मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य यांची परवानगी घेणे आवश्यक असते, यासाठी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्‍त मत्स्यव्यवसाय या कार्यालयाशी संपर्क साधावा.
 • ज्या शेतकऱ्यांनी आपली मत्स्यशेती मत्स्यव्यवसाय विभागात नोंदणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना तिलपिया संवर्धन करण्याची परवानगी देण्यात येते.
 • जगा पूर क्षेत्रामध्ये नसावी तसेच नैसर्गिक पाण्याचा सोतांपासून लांब असावी.
 • २०२० च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही आकाराच्या
See also  ऋषि सुनक यांचा जीवन परिचय - Biography of Rishi Sunak in Marathi

तळ्यात तिलापिया संवर्धन करण्यास परवानगी आहे.

 • Reticulating aqua system RAS
 • पिंजरा संवर्धन – CAGE CULTURE
 • कुंपण पद्धतीचे संवर्धन =PEN CULTURE आणि
 • बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी -BFT

 

वाचा -गांडूळ खत आणि व्हर्मीवॉश चे फायदे: Benefits of Organic fertilizers-vermiwash in marathi

या मध्ये देखील परवानगी दिली आहे. (या आधी २०११ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तलावाचे क्षेत्र किमान १ एकर व कमाल १० एकर असणे आणि खोली किमान पाच फूट बंधनकारक होते).

 • संवर्धन तलावामध्ये १० ग्राम पेक्षा जास्त वजनाचे मत्स्य बीज तसेच संवर्धन प्रणालीमध्ये कमीतकमी ३० ग्रॅम वजनाचे मत्स्य बीज संचयन करणे आवश्यक आहे.
 • पूर्ण तळ्याभोवती कुंपण म्हणजेच फेन्सिंग तसेच पक्ष्यांपासून बचावासाठी बर्ड नेट असणे बंधनकारक आहे.
 • पाण्याची गुणक्‍त्ता तपासण्यासाठी स्वतःची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
 • तळ्यातून सोडलेले पाणी किंवा एकही मासा तलावाच्या बाहेर अथवा नैसर्गिक स्रोतांमध्ये न जाण्याची व्यवस्था असणे बंधनकारक आहे.
 • दैनंदिन सर्व नोंदी ठेवणे आवश्यक उदा. दिलेले खाद्य, पाण्याची गुणवत्ता, माशांचे ठरावीक कालावधीत वजन इत्यादी.
 • कोणत्याही संवर्धन तलावातून जिवंत मत्स्य बीज किंवा विक्रीस परवानगी नाही.

संवर्धनातील महत्त्वाच्या बाबी :

तिलापिया संवर्धन हे विविध संवर्धन प्रणालीमध्ये जसे की मातीचा तलाव, कॉक्रीट टाकी, सुपर एअरेटेड तलाव, रेसवेज,  पिंजरा संवर्धन,आणि बायोफ्लॉक टेक्नॉंलॉजी यामध्ये करता येते. याच बरोबर याचे संवर्धन विविध व्यवस्थापन रणनीतीमध्ये जसे की विस्तृत संवर्धन, अर्ध-सधन संवर्धन किंवा सधन संवर्धन तसेच गोड्या पाण्यात आणि खारट पाण्यामध्येही करता येते.

नर्सरी पालन

१.५ ते २.० सें.मी. तिलापिया मत्स्यबीज ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीसाठी संगोपन तलावामध्ये (किंवा हापामध्ये) बोटूकली होईपर्यंत ठेवावे. जास्तीत जास्त मासे जगविण्यासाठी व उत्पादन वाढीचे प्रमाण निर्देशित करण्यासाठी नर्सरीपालन पद्धतींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यानंतर ही बोटुकली त्यांच्या वजनांनुसार वर्गीकृत करून संवर्धन तलावात स्थानांतरित करावे

१) तलावाची निवड

सवधंनासाठी कोणतेही बारमाही गोडे पाणी असलेले तळे किंवा टाकी वापरावी. तळ्याची किंवा टाकीची खोली सर्वसाधारणपणे १.५ ते २.० मीटर एवढी असावी. मत्स्यवळ्याची निवड करताना त्या तळ्यातील बांध मजबूत बांधलेले असावेत जेणेकरुन पाणी टिकून राहील. प्रत्येक तळ्याला एक इनलेट आणि एक आउटलेट कितद्ध दिशेने असावेत जेणेकरून पाण्याची देवाणघेवाण होऊ शकेल.

See also  कोण आहे हा पाण्यावर तरंगणारा बाबा? हिंगोलीत यांच्या विषयी एवढी चर्चा का होत आहे? - Viral Video of Hingoli Baba

२) पाण्यातील तणांचे निर्मूलन

तलावातील तण हे माशांसाठी हानिकारक असते. असे तण सूर्यप्रकाश ललावाच्या मध्यापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण करतात. ज्यामुळे नैसर्गिक प्लवंग (खाद्य) निर्मिती कमी होते. असे तण माशांना फिरण्यासाठी आणि जाळे ओढण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे तलावातील तणांचे निर्मूलन करणे गरजेचे असते. असे तण हाताने काढून किंवा तलाव पूर्णपणे सुकवून नष्ट करता येते.

३) भक्षक आणि नको असलेल्या माशांचे निर्मूलन

भक्षक किंवा नको असलेल्या मासे थेट माशांच्या छोट्या पिल्लांचा खाद्य म्हणून करतात. याशिवाय ते अन्न , जागा आणि ऑक्सिजनसाठी संवर्धित प्रजातीबरोबर स्पर्धा करतात. म्हणूनच, अशा माशांचे निर्मूल

करण्याआधी गिफ्ट तिलापिया मत्स्यबीजाची साठवण करणे अनिवार्य आहे. तलावातील पाणी पूर्णपणे सुकवून किंवा महुआ ऑईल केक (महुआची पेंड) वापरून भक्षक माशांचा नाश करता येतो.

४) तलावामध्ये चुन्याचा वापर

सर्वसाधारणपणे २०० ते ३०० किलो चुना एक हेक्‍टर क्षेत्रफळ आणि एक मीटर खोली असलेल्या तलावामध्ये वापरतात. चुना वापरण्याच्या २ ते ३ दिवस आधी खताचा वापर केल्याने तलावाची उत्पादकता आणि पाष्यातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

५) तलावामध्ये खतांचा वापर :

तलावातील पाण्याची नैसर्गिक उत्पादकता. सेंट्रिय व असेंद्रीय रासायनिक खतांचा वापराने वाढते. तलावातील पाणी गुणक्‍्ता, तापमान, ललावाच्या पोचक घटकांनुसार खतांची मात्रा बदलते. सेंद्रिय खत जसे की शेणखत याचे प्रमाण १० हजार कि.ग्रॅ. / हेक्टर आणि असेंद्रीय खतांमध्ये युरिया २५ कि ग्रॅ./हेक्टर आणि सिग्राल सुपर फॉस्फेट २० कि.बरॅ./हेक्‍टर साधारणपणे प्रत्येक महिन्यात वापरावे.

६) अनुकूलन क्रिया आणि संचयन अंमलबजावणी :

मत्स्यवीज संचयन करण्यापूर्वी माशांची संख्या, सरासरी वैयक्तिक कडन, एकूण वजन यांची नोंद करून घ्यावी. मत्स्यवीज संचयनाच्या दरण्यान माशांना कमीत कमी ताण देणे आवश्यक आहे. म्हणून, सर्व

टप्प्यांचे मत्स्यबीज काळजीपूर्वक हाताळले पाहिजे आणि नवीन हवामानाशी किं वा परिस्थितीशी रुळण्याची क्रिया पूर्ण करूनच मासे तलावात सोडले पाहिजेत. या कृतीमध्ये गुंतवलेल्या वेळेमुळे मरतुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. केंद्र शासनाच्या २०११ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गिफ्ट तिलापियाची संचयन घनता कमाल ५ नग/चौरस मीटर इतकी असावी.

See also  गोत्र म्हणजे काय? गोत्राचे प्रकार तसेच महत्व काय आहे? -What is gotra? What is its importance?

७) खाद्य आणि आहार

मत्स्य-तळ्यामध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या खाद्यापेक्षा जास्त खाद्य मत्स्यबीजाला आवश्यक असते. तरंगणाऱ्या स्वरूपातील कृत्रिम खाद्य त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. खाद्यामुळे तळ्यातील

पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही व मत्स्यबीजांच्या जगणुकीचे प्रमाण अधिक मिळेल याची काळजी घ्यावी. तिलापिया जवळपास सर्व प्रकारचे पूरक खाद्य खातो, परंतु कृत्रिम खाद्याला अतिशय उत्तम प्रतिसाद देतो.

८) पाणी गुणवत्ता व्यवस्थापन

तिलपिया संवर्धन तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करणे माशांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच उत्कृष्ट वाढ, माशांचा टप्पा, प्रकाश संश्लेषण, जैविक घटक आणि माशांची जगणूक वाढवण्यासाठी इष्टतम पातळीवर मापदंडांचे पालन करणे आवश्यक आहे.

पाण्यातील विरघळलेली ऑक्सिजन पातळी (प्राणवायू), तापमान, सामु, पारदर्शकता इत्यादी पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडांचे रोजच्या-रोज परीक्षण केले पाहिजेत. अमोनियाची पातळी साप्ताहिक अवकाशाने किंवा जर मासे खाच कमी खात असतील तर त्या कालावधीत तपासावी.

नियंत्रित आणि उत्तम आहाराने, जेव्हा गरज असेल तेव्हा पाणी बदलण्याने आणि माश्यांची संचयन घनता  जास्त असताना यांत्रिक पद्धतीने वायू प्रदान करून हे सर्व पाण्यातील घटक नियंत्रित इष्टतम पातळीवर राखून ठेवता येतात.

ऑक्सिजन पातळी ४ ते ६ पीपीएम, पाण्याचे तापमान २८ ते ३० अंश.  ., पीएच ७.५ ते ८.५, पारदर्शकता २० ते ३० सें.मी. आणि अपोनिया ०.२ पीपीएम आवश्यक आहे.

९) नमुना आणि आरोग्य देखरेख

माशांची वाढ आणि आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी माशांचे नियमित नमुने घेणे आवश्यक असते. नर्सरी टप्प्यात सापाहिक तपासणीआणि संवर्धन पद्धतीच्या टप्प्यात पंधरवड्यात तपासणी केली पाहिजे.

खाद्याची माया ही माश्यांच्या वाढीनुसार समायोजित केली जाऊ शकते. तलावामध्ये दर १५ दिवसांनी जाळे मारून नमुने घेऊन माशांचे आरोग्य तपासणे आवश्यक आहे.

शरीराच्या पृष्ठभागावर जर परजीवी असल्यास स्वरित बाहेर काढावेत. जर एखादा मासा रोगग्रस्त झाला असेल किंवा मेला असेल तर त्याला लगेच बाहेर काढले पाहिजे.

१० ) माशांची तलावातून/टंकमधून काढणी

प्रत्स्यबीज संचयन केल्यानंतर साधारणतः ६ ते ८ महिन्यामध्ये तिलापियाचे क्जन ८००ते ९६६ ग्रॅम पर्यंत सहजरीत्या होते. ही जिवंत माशांना बाजारात चांगला दर मिळतो आणि तिलापिया जिवंत स्थितीत बाजारात नेता येतो. याव्यतिरिक्त तिलपिवा माशाला कमी वजनातही मागणी असल्यामुळे त्याच्या वजनांनुसार त्याला दर आहे.

संदर्भ – शेतकरी मासिक महाराष्ट्र शासन