ड्रोन म्हणजे काय ? प्रकार व उपयोग- Drone information in Marathi

ड्रोन कॅमेरा म्हणजे काय आणि तो कसा बनवला जातो ? -Drone information in Marathi

काही वर्षांपूर्वी रोल चे कॅमेरा होते.त्यानंतर रोल व्यतिरिक्त कॅमेरा आला ,त्यानंतर मोबाईल मधे कॅमेरा सिस्टीम अॅड् झाली. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी मधे नवनवीन शोध लागत आहेत.आता चांगल्या प्रतीचे शूटिंग करण्यासाठी आणि वरून आकाशातून जमिनीवर सुरू असलेल्या समारोहाचे शूटिंग करण्यासाठी किंवा मिल्ट्री सर्व्हिस मध्ये कामी येण्यासाठी ड्रोन ची निर्मिती करण्यात आली.आणि आता विविध क्षेत्रात ड्रोन चा काय उपयोग करता येईल त्यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.
आपण जेव्हा कोणाच्याही लग्नात जातो ,तेव्हा आपल्याला त्या लग्नाचे ड्रोन च्या सहाय्याने शूटिंग केलेले दिसते.क्वचितच अस लग्न सोहळा किंवा इतर समारोप पार पडला जातो,ज्यात ड्रोन कॅमेरा चां वापर केला जात नसेल.
तुम्हाला ड्रोन कॅमेरा बद्दल माहिती माहित आहे;परंतु ड्रोन कॅमेरा कसा बनवला जातो याबद्दल माहिती आहे का ? आपण या लेखामध्ये ड्रोन कॅमेरा ,ड्रोन तंत्रज्ञान याबद्दल थोडी बेसिक माहिती पाहणार आहोत.
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, ड्रोन कॅमेरा हा एक प्रकारे रोबोटच आहे ,जो की मानवा द्वारे नियंत्रित केला जातो. ड्रोन कॅमेरा हेलिकॉप्टर प्रमाणे हवेत उडवला जातो आणि जमिनी वरील दृश्याचे शूटिंग योग्य रीतीने केले जाते ,त्यामुळे याला आपण ‘उडता रोबोट ‘ देखील म्हणू शकतो.

ड्रोन कॅमेरा खूप ठिकाणी शूटिंग करण्यासाठी कामी येतो ,परंतु महत्वाचे म्हणजे आकाशातून पृथ्वीवरील दृश्याचे किंवा सोहळ्याचे शूटिंग करण्यासाठी कोणतीही प्रकारची हाणी न होता उत्तम रित्या शूटिंग व्हावी या करता ही ड्रोन कॅमेरा ची निर्मिती करण्यात आली.हा उडवलेला ड्रोन कॅमेरा मानवा द्वारे नियंत्रित केला जातो.

ड्रोन म्हणजे

ड्रोन ला UAV म्हणजे unmanned Aerial vehicles kinwa Dynamic Remotely Operated Navigation Equipment असे देखील म्हणले जाते.सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ड्रोन हा उडण्यास सक्षम असलेला रोबोट आहे.आणि हा रोबोट रिमोट कंट्रोल द्वारे मानव नियंत्रित करू शकतो.
ड्रोन ला अशा ठिकाणी ही सेट केले जाते ,जिथे मानव पोहोचणे अशक्य आहे. ड्रोन २४ तास त्या ठिकाणचे जिथे तो सेट केला आहे त्याचे पर्यवेक्षण करू शकतो आणि तुम्ही ड्रोन ला सतत ७ दिवसही कोणत्याही ठिकाणचे पर्यवेक्षण करण्यासाठी सेट करू शकता.काही लोक ड्रोन ला आकाशाचां डोळा देखील म्हणतात.

क्वाडकॅप्टर म्हणजे काय –

क्वाडकॉप्टर ही एक प्रसिद्ध ड्रोन डिझाईन आहे .ही काही ड्रोन ची नवीन डिझाईन नाहीये ही डिझाईन १९२० सालि पहिल्यांदा उडवण्यात आली होती,परंतु त्या काळच्या टेक्नॉलॉजी च्या अभावामुळे परिणामकारक असे शूटिंग होत नव्हते. परंतु बदलत्या टेक्नॉलॉजी मुळे जसे की ,सेन्सर ,कॅमेरा मुळे क्वाडकॉप्टर डिझाईन चा वापर लोक जास्त करू लागलें.
प्रत्येकी ड्रों न चे चार प्रोपेलर असतात.

ड्रोन कशा पद्धतीने बनवले जातात ?

१) Chasis – हा ड्रोन चा मूलभूत अंग असतो आणि हे chasis डिझाईन करताना त्याच्या strength ची विशिष्ठ काळजी घेतली जाते.
२) प्रॉपेलर –ड्रोन वरती किती वजन बसावे किंवा ड्रोन ची गती किती असावी हे ह्या प्रोपेलर वरती आधारित असते.जेवढेे उंचीला मोठे प्रोपेलर असतात तेवढा तो ड्रोन जास्त वजन उचलू शकतो,परंतु ह्या मोठ्या उंचीच्या प्रोपेलर ची गती नियंत्रित करण्यासाठी जास्त कालावधी लागतो.छोटी उंची असलेले प्रोपेलर कमी वजनाच्या वस्तू उचलू शकतो आणि ह्या छोट्या उंचीच्या प्रोपेलर ची गती कंट्रोल करण्यासाठी कमी कालावधी लागतो.
३) मोटर – प्रत्येक प्रोपेलर वरती एक मोटर लावलेली असते आणि त्या मोटरची रेटिंग kv युनिट्स वरून दिली जाते.
४) इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर – हे प्रत्येक मोटारला कंट्रोल करंट प्रदान करते ,जेणेकरून गती प्राप्त होईल.
५) फ्लाईट कंट्रोलर – हे ते कॉम्प्युटर प्रोग्राम असते जे की येणाऱ्या सिग्नल जो की पायलोट द्वारे पाठवले असते आणि हे फ्लाईट कंट्रोलर हे सिग्नल ESC ला पाठवते.
६) रेडिओ रिसिवर – हे पायलो ट द्वारे आलेल्या सिग्नल ला रिसिव्ह करतात.
७) बॅटरी – साधारण ड्रोन लिथियम पॉलिमर बॅटरी च वापर केला जातो.

ड्रोन चे प्रकार –

तसे तर ड्रोन चे खूप प्रकार आहे; परंतु मुख्यतः त्याचे दोन प्रकार पडतात ,ते खालील्रमाणे :
रोटरी ड्रोन – रोटरी ड्रोन चे पण काही प्रकार आहेत.
१) सिंगल रोटर – ह्या प्रकारामध्ये फक्त एकच रोटर असतो
२) ट्राय कॉप्टर – ह्या मधे चार वेगवगळ्या प्रकारचे ताकदवर मोटर असतात आणि तीन कंट्रोलर ,चार गायरो आणि एक sarvo मोटर असते.
३) Quadcopter – ह्यामध्ये चार वेगवेगळ्या रोटर ब्लेडस चा वापर केला जातो.ह्यामध्ये दोन मोटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरतात आणि दोन मोटर घड्याळाच्या काट्याच्या विरूद्ध दिशेने फिरतात.
४) Hexacopter – ह्यामध्ये ६ मोटर ब्लेड चा वापर केला जातो.ह्यामध्ये तीन मोटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि तीन मोटर घड्याळाच्या काट्याच्या विरूद्ध दिशेने फिरतात.
५) Octacopter – ह्यामध्ये आठ मोटर ब्लेड चा आणि आठ प्रोपेलर चां वापर केला जातो.

ड्रोन कसे आकाशात उडवले जातात ?

महागतले चांगल्या प्रतीचे ड्रोन साधारण तीस मिनिटे आकाशात उडू शकतात ,तसेच स्वस्तातले कमी प्रतीचे ड्रोन साधारण पाच ते दहा मिनिटे आकाशात उडू शकतात.
ड्रोन किती वेळा पर्यंत आकाशात उडू शकतो त्याची काही कारणे :
१) बॅटरी – जेवढ्या चांगल्या प्रतीची बॅटरी असेल तेवढा जास्त वेळ ड्रोन आकाशात उडू शकतो.बॅटरी वापरेल तशी त्याची क्षमता कमी होत जाते आणि ती हळू हळू बिघडू लागते.lithium च्या बॅटरी चां बॅकअप जास्त असतो.
२) ड्रोन चे वजन – तुमचा ड्रोन किती वजनाचा आहे ? तुमच्या ड्रोन मधे केवढे प्रोपेलर आणि मोटर बस्वलेत ,ह्यावर देखील तुमचा ड्रोन किती वेळ आकाशात उडू शकतो हे आधारित असते.

ड्रोन चे फायदे कोणकोणते आहेत ?

१) शेतीमध्ये परागन साठी देखील ड्रोन चा वापर केला जातो.
ड्रोन चे फायदे कोणकोणते आहेत ?
२) खूप साऱ्या रिसर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन मधे ड्रोन चा वापर केला जातो.
३) ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी देखील ड्रोन चा वापर केला जातो.
४) मिलिटरी सर्व्हिस मधे देखील ड्रोन चा वापर केला जातो.
५) हवामान तपासण्यासाठी देखील ड्रोन चा वापर केला जातो.
६) वरून आकाशातून फोटोग्राफी करण्यासाठीं देखील ड्रोन चा वापर केला जातो.
७) खेळाच्या सामन्याच्या प्रक्षेपनासाठी देखील ड्रोन चां वापर केला जातो.

Leave a Comment