पैसे चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेत ? काय करावे?

 पैसे चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेत ? काय करावे?

 आज आपण प्रत्येक जण कँश पेमेंट करण्यापेक्षा गुगल पे,फोन पे इत्यादी आँनलाईन माध्यमांचा वापर करून आज डिजीटल पेमेंट करणे अधिक पसंद करत असतो.कारण याने आपला वेळही वाचतो आणि लवकर व्यवहारही पुर्ण होत असतो.

पण कधी कधी आपल्याकडुन आँनलाईन एखाद्याला पैसे पाठवत असताना अकाऊंट नंबर टाईप करत असताना एखादा आकडा चुकल्यामुळे चुकीच्या अकाऊंटवर पैसे पाठवले जात असतात.

 

अशावेळी आपण ह्या एका गोष्टीमुळे फार चिंतीत होऊन जात असतो.की आपले पैसे आता चुकीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर झाले आहेत आता ते परत कसे मिळवायचे?आपले पैसे आपल्याला परत मिळतील का नाही?

 

म्हणुन आपल्या ह्या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी आपण काय करायला हवे?आपले पैसे परत मिळविण्यासाठी कोणते ठोस पाऊल उचलायला हवे?हे आजच्या लेखातुन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

 

चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास काय करावे?

मित्रांनो आजचे युग हे संपुर्ण डिजीटल युग झाले आहे.त्यामुळे आता पहिलेसारखे आपल्याला कोणाचे पैसे देण्यासाठी किंवा आपल्या खात्यातुन इतर कोणाच्या खात्यात पैसे पाठविण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता आपल्याला पडत नाही.

कारण आज आँनलाईन व्यवहाराची अशी अनेक माध्यमे तयार झालेली आहेत ज्याचा वापर करून आपण पैशांची देवाण घेवाण कुठेही जा ये न करता  एकाठिकाणी बसुन सुदधा अगदी आरामात करू शकतो.

गुगल पे,फोन पे,भीम अँप इत्यादी ह्या अशा अँप्स आहेत ज्यांच्याद्वारे आपण घरबसल्या पैशांचा मोठयात मोठा व्यवहार रोज पार पाडु शकतो.

पण आँनलाईन पैसे पाठवत असताना कधी कधी आपल्याकडुन चुकुन एखाद्या चुकीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जात असतात.

याला कारण असते की आपण खाते क्रमांक टाईप करताना घाईगडबडीत काही चुका करत असतो जसे की एक शुन्यच्या ठिकाणी दोन शून्य एकच्या ठिकाणी 11 अशी छोटी मोठी चुक आपल्याकडुन कधी कधी होऊन जात असते.ज्याचे परिणामस्वरूप ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याच्या खात्यात न जाता कोणा भलत्याच तिसरया व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर होऊन जात असतात.

See also  ज्यांचा मोबाईल नंबर पोस्ट खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यातील व्यवहार आता बंद केले जाणार - Post office update 2023 link mobile number with post office account in Marathi

अशावेळी आपण घाबरून जाऊ नये तसेच निराश देखील होऊ नये कारण आपण ज्या खाते क्रमांकावर पैसे पाठविले आहेत त्या क्रमांकाचे कोणाचे खातेच अस्तित्वात नसेल तर आपल्याला घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही कारण त्या क्रमांकाचे कोणतेही खातेच नसल्यामुळे आपले पैसे कुठे सेंडच होणार नाही.आणि शेवटी ट्रान्झँक्शन फेल असे येते.

पण आपण ज्या बँक खात्यात चुकुन पैसे ट्रान्सफर केले आहे ते बँक खाते अस्तित्वात असेल तर अशा वेळी ज्या बँक खात्यात आपले पैसे सेंड झाले आहे त्या खातेदाराचे बँक अकाऊंट आणि आपले बँक अकाऊंट एकाच बँकेत असेल तर आपण याबाबद बँकेला सुचित करून आपले पैसे सहजपणे परत मिळवू शकतो.

आपले पैसे ज्याच्या खात्यात गेले आहे त्याचे अकाऊंट आणि आपले अकाऊंट एकाच बँकेत असेल तर आपण पुढील कारवाही करू शकतो.

 

  • बँकेशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची तक्रार करू शकतो.बँकेशी संपर्क साधण्यासाठी आपण त्यांना बँकेच्या आँफिशिअल ईमेलवर ईमेल करू शकतो.किंवा त्यांना फोन करून झालेल्या प्रकाराविषयी कळवू शकतो.नाहीतर आपण थेट बँकेत जाऊन देखील बँक मँनेजरशी याबाबद बोलू शकतो.
  • पण बँकेत गेल्यावर आपल्याला काही कायदेशीर कारवाई असते जी पुर्ण करावी लागत असते.
  • सर्वप्रथम ज्या अकाऊंटवर चुकुन आपले पैसे पाठवले गेले आहेत त्या बँक अकाऊंटची डिटेल आपल्याला बँकेत द्यावी लागते.आपल्याकडुन किती पैसे त्या खात्यात पाठवले गेले आहेत?कधी आणि कोणत्या तारखेला पाठवले गेले आहेत ते देखील सांगावे लागते.
  • आणि पुराव्यासाठी ज्या खात्यावर आपले पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या खात्यावर पैसे पाठवल्यानंतर आपण ट्रान्झँक्शन पुर्ण झाल्याची जी डिटेल आपल्याला दिसत असते ती आपण बँकेत पुराव्यासाठी दाखवू शकतो.
  • सोबत आपल्याला एक लिखित अर्ज देखील करावा लागत असतो.चुकुन एका खात्यात पैसे पाठविले गेले आहेत ते आपल्याला वापस हवे आहेत असा अर्ज आपल्याला बँकेत द्यावा लागतो.
  • मग बँक त्या खातेदाराला याबाबत कळवून आपले पैसे आपल्याला पुन्हा मिळवून देत असते.
See also  कँश फ्लो स्टेटमेंट विषयी माहीती Cash flow statement information in Marathi

 

पण त्याच ठिकाणी त्या खातेधारकाचे बँक अकाऊंट इतर बँकेत असेल तर आपल्याला ज्या बँकेत त्या खातेदाराचे अकाऊंट आहे त्या बँकेत जाऊन याची तक्रार करावी लागते.

 

चुकुन आपल्या बँकेत अमुक खाते असलेल्या अकाऊंटला विशिष्ट रक्कम विशिष्ट तारखेला पाठविली गेली आहे आणि ते आपल्याला वापस हवे आहेत.असा तक्रार अर्ज करावा.

 

बँकेला आपल्यावर विश्वास बसावा यासाठी आपण ट्रान्झँक्शन प्रूफ देखील दाखवू शकतो.मग बँकेकडून त्या खातेदाराला सुचित करण्यात येईल की एका विशिष्ट बँक खात्यावरून आपल्या खात्यात चुकुन पैसे पाठवले गेले आहे कृपया आपण ते वापस करावे.मग आपल्याला आपले पैसे मिळुन जातील.

 

आणि खुप विनंती करूनही आपले पैसे देण्यास समोरची व्यक्ती नकार देत असेल तर अशावेळी आपण त्या व्यक्तीवर पोलिसात तक्रार करून कायदेशीर कारवाई देखील करू शकतो.

 

आँनलाईन पैसे पाठवत असताना आपण खालील काळजी घ्यायला हवी :

 1) ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचा अकाऊंट नंबर आय एफ एससी कोड नीट बघुन व्यवस्थित टाईप करावा.अकाऊंट नंबर टाईप करत असताना घाईगडबड करू नये.

 2)पैसे सेंड करण्याआधी पुन्हा एकदा टाईप केलेला अकाऊंट नंबर चेक करून घ्यावा.मगच फायनल कनफरमेशन करून पैसे सेंड करावे.

अशा पदधतीने आपण चुकुन एखाद्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यावर आपण काय करायला हवे जेणेकरून आपले पैसे आपल्याला वापस मिळतील ह्या सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.