हिंदू धर्मात मोहीनी एकादशीचे महत्त्व काय आहे?

हिंदू धर्मात मोहीनी एकादशीचे महत्त्व काय आहे?

आज १ मे मोहीनी एकादशीचा दिवस आहे वैशाख महिन्यामध्ये येणारया शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवसाला मोहीनी एकादशी असे म्हटले जाते.

हिंदू धर्मातील सर्व धार्मिक सण तसेच उत्सवांमध्ये सर्व एकादशी तिथींमध्ये मोहीनी एकादशीला एक विशेष व्रताचा दर्जा देण्यात आला आहे.

मोहीनी एकादशी
मोहीनी एकादशी

हिंदू दिनदर्शिकेत सांगितल्या प्रमाणे १ मे २०२३ रोजी मोहीनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे.अणि मोहीनी एकादशीचा उपवास केला जाईल.

हिंदू पंचांग मध्ये असे सांगितले आहे की एकादशी तिथीचा आरंभ ३० एप्रिल रोजी रात्री ८ वाजुन २९ मिनिटांनी होणार आहे तर १ मे रोजी रात्री १० वाजुन ९ मिनिटांनी ही तिथी संपुष्टात येणार आहे.

मोहीनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची मोहीनी ह्या स्वरुपामध्ये पुजा करण्यात येत असते.हया दिवशी भाविक भक्तजण मोठ्या श्रद्धेने भक्तीभावाने भगवान विष्णू यांच्या मोहीनी अवताराची पूजा करत असतात.

असे म्हटले जाते की मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास ठेवल्याने भगवान विष्णू यांच्या मोहीनी अवताराचे पुजा अर्चा केल्याने आपणास आपल्या सर्व जुन्या पाप कुकर्म दुखांपासुन मुक्ती प्राप्त होत असते.आपणास सर्व प्रकारच्या मोहांपासुन मुक्ती प्राप्त मिळुन मोक्ष प्राप्त होतो असे देखील धर्मशास्त्रात सांगितले गेले आहे.

मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास ठेवल्याने आपणास आपल्या कार्यक्षेत्रात यशप्राप्ती होते.आपल्या सर्व शत्रुंवर आपण मात करतो.

ह्या दिवशी व्रत उपवास करणारया व्यक्तीला भरपूर धन वैभव ऐश्वर्य प्राप्त होते.

ज्योतिष शास्त्रानुसार हे एकादशीचे व्रत सर्व एकादशी व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते.असे सांगितले जाते की ह्याच दिवशी भगवान विष्णू यांनी मोहीनीचा अवतार धारण करत दैत्यांचा वध केला होता.

ह्या एकादशीला मोहीनी एकादशी हेच नाव का पडले?

धर्मग्रंथामध्ये असे सांगितले गेले आहे की जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातील अमृत कळस बाहेर पडला होता तेव्हा देव अणि दानव या दोघांमध्ये अमृत प्राशन करण्यावरून वादविवाद सुरू झाले.

See also  बाबा वंगा कोण आहे? | Who is Baba Vanga?

जो हे अमृत प्राशन करेल त्याला अमरत्व लाभणार होते.

तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णू यांच्या कडे मदतीसाठी धाव घेतली.तेव्हा देत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी अणि देवतांना अमृत प्राशन करता यावे यासाठी भगवान विष्णू यांनी एक सुंदर स्त्रीचा अवतार धारण केला ज्याला मोहीनी अवतार असे म्हटले जाते.

भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या ह्या मोहीनी अवतारामुळेच देवतांना अमृत प्राशन करता आले होते.

ज्या दिवशी भगवान विष्णू यांनी हा मोहीनी अवतार धारण केला त्या दिवशी वैशाख महिन्यातील एकादशीची तिथी होती.म्हणुन हा दिवस विष्णुच्या मोहीनी अवतारामुळे मोहीनी एकादशी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

ह्या दिवशी भगवान विष्णू यांच्या मोहीनी अवताराची पुजा अर्चा केली जाते.