लहान मुलांमधील न्यूमोनिया – कारणें, लक्षणे व उपचार – डॉ.जि.एम.पाटील – नवजात शिशु तज्ञ

लहान मुलांमधील न्यूमोनिया – कारणें, लक्षणे व उपचार –

0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळणारा हा एक प्राणघातक आजार आहे.भारतात दर मिनिटाला 1बालक ह्या आजाराने दगावतो म्हणून याबाबत समाजजागृती अत्यंत गरजेची आहे. आपण या बाबत सविस्तर माहिती घेऊयात , एक जबाबदार व जागृत पालक म्हणून आपल्याला लहान मुलांमधील न्यूमोनिया बाबत मूलभूत माहिती असणे  उपयोगी ठरत.

कारणें- लहान मुलांमधील न्यूमोनिया

 • जिवाणू ;
 • विषाणू;प्रामुख्याने इन्फ्लुएन्झा वायरस ;
 • फंगस;अटीपीकल जसे मायकोप्लेसम
 • तसेच अचानक ठसका लागल्यास असपिरॅशन न्यूमोनिया

लक्षणे: लहान मुलांमधील न्यूमोनिया

 • तीव्र ताप;
 • भूक मंदावणे;
 • मूल सुस्तावते;
 • खोकला घशात खरखरने  शिट्टीसारखा आवाज येणे ;
 • लहान बाळ दूध पित नाही;
 • कण्हने तसेच जास्त जंतुसंसर्ग असल्यास बाळाचे नखे ओठ निळे पडतात.

जागतिकआरोग्य संघटनेने यासाठी तीन प्रकारात याचे विभाजन केले आहे 1

 • साधा न्युमोनिया – यात घरी डॉक्टरांनी सांगितलेले औषधी वेळेवर देऊन व नियमित तपासणी करून बाळास बरे करू शकतो.
 • मध्यम न्युमोनिया – यात औषधोपचारासोबत बालरोगतज्ज्ञ यांच्या निगराणीमध्ये उपचार करता येतो
 • तीव्र न्युमोनिया – यामध्ये लक्षणे गंभीर असलेने बालकांना रुग्णालयात भरती करणे गरजेचे असते .गरज वाटल्यास मुलांना ऑक्सीजन ,सलाईन, वाफ इ उपचार देतात.

वेळीच उपचार घेतल्यास 99टक्के मुलांना आपण वाचवू शकतो.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे पालकांना बालकांचा श्वसन दर माहीत असल्यास लवकर निदान व उपचार करता येतो.

 • 0 ते3 महिने दर मिनिटाला 60 पेक्षा जास्त;
 • 3 महिने 1वर्ष दार मिनिटाला 50 पेक्षा जास्त
 • 1ते5 वर्षे 40 पेक्षाजास्त असेल तर त्वरित

बालरोगतज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा.

 • प्रतिबंध:विशेषतः हिवाळ्यात मुलांना उलन चे स्वेटर वापरावे ;
 • ओले कपडे त्वरित बदलवणे;द्रव पदार्थ जास्त द्यावे जेणे करून डीहायड्रेशन होणार नाही.
 • 1वर्षे आतील बालकांना बॉटल फीड देऊ नये,वाटी चमचा वापरावा.
 • सुरक्षित वाफ द्यावी .
 • आले मध तुळस यांचे चाटण देऊ शकता.
 • 6महिन्याच्या आतील बालकांना निव्वळ स्तनपान करावे.
 • लसीकरण- या आजाराच्या प्रतिबंध व्हावा म्हणून न्यूमोकॉकल लस आता सर्व उपकेंद्रे ;आरोग्य केंद्र:ग्रामीण रुग्णालयात व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्धआहे.
 • दीड ;अडीच;साडेतीन महिने व दीड वर्षाला बूस्टर असे डोस द्यावे
 • याबरोबर लसीकरण वेळापत्रकानुसार न चुकता सर्व लसीकरण केल्यास आपण न्यूमोनिया सारख्या जीवघेण्या आजारापासून बालकांना सुरक्षित करून सदृढ व निरोगी भारत निर्माण करू या.
 • जर बालकास 1वर्षापर्यंत एकही न्यूमोकॉकल लास दिली नसेल तर 1वर्षाला पहिला व 2 वर्षे पूर्ण झाल्यावर दुसरा असे दोन डोस द्यावे
 • 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुलास एकही न्यूमोकॉकल डोस दिला गेला नसेल तर आपण एक डोस नक्की घ्यावा.कारण 5 वर्ष आतील बालकांची प्रतिकारशक्ती कमी असते व आजाराचा धोका जास्त असतो.
 • न्यूमोनिया झालेल्या बालकास गर्दीत नेणे टाळा.
 • भरपूर विश्रांती व वेळेवर औषधोपचार घ्यावा.वैयक्तिक स्वच्छता तसेच स्वच्छ हात धुण्याची सवय मुलांना लावावी.
 • पोषक आहार ज्यामध्ये प्रथिने ;कर्बोदके ;जीवनसत्त्वे आहेत ते द्यावे ;मुलास पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नये.
See also  हायपर ग्लायसेमिया म्हणजे काय?Hyperglycemia information in Marathi

अतिसार प्रमुख कारण, लक्षणं व उपचार – डॉ जि एम पाटील

वाचा – समतोल आहार

लेखक –


डॉ जि एम पाटील
नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ - Pediatrician 
अमळनेर जि जळगाव 
पत्ता - Address- ग्रामीण रुग्णालय ,
स्वामी नारायण मंदिर मागे , 
LIC ऑफिस जवळ अमळनेर
Rural Hospital, Amalner 
Address: 
Behind Swaminarayan Temple, 
Near LIC Office,
Amalner, Maharashtra 425401