श्री बैठकीची सुरुवात कशी झाली? श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

श्री बैठकीची सुरुवात कशी झाली? श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

आतापर्यंत संताने जेवढेही अध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती केली अभंग भारूडे रचली किर्तने केली त्यामुळे सामाजिक प्रबोधन घडुन आले.

आता संतांनी रचलेल्या ह्याच अभंगाचे निरूपण करण्याचे काम निरूपणकार करत असतात.निरूपणकार संतांनी रचलेल्या अभंग भारूडे ग्रंथ यातील विचारांना समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात.

यातुन समाजात प्रबोधन घडुन यावे समाजापरयत संताचे चांगले विचार पोहचावे या मुख्य हेतु यामागचा असतो.

ज्याप्रमाणे किर्तनकार आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असतात कीर्तनातून अभंगाचे सार संतांचे अनमोल विचार समाजासमोर मांडत असतात.हेच कार्य श्री बैठक मध्ये देखील करण्यात येत असते.

श्री बैठकीतुन सुदधा हेच संतांनी रचलेले ग्रंथ अभंग भारूडे यातील विचार यातील सार समाजापर्यत पोहचवले जात असते.

आजच्या लेखात आपण श्री बैठकीची सुरुवात कशी झाली याचे सुरूवातीचे स्वरूप कसे होते हे जाणुन घेणार आहोत.

श्री बैठक म्हणजे काय?

श्री बैठक ही एक सामाजिक सेवा आहे.हया सेवेंतर्गत समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोध ग्रंथाचे समाजात निरूपण केले जाते.समाजातील‌ लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य केले जाते.

श्री बैठकीची सुरुवात कशी झालीश्री बैठकीचे स्वरूप कसे असते
श्री बैठकीची सुरुवात कशी झाली?श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

श्री बैठकीची सुरुवात ही अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली होती.नानासाहेब यांनी ८ आॅक्टोंबर १९४३ रोजी दसरा ह्या सणाच्या शुभ मुहूर्तावर ह्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी हे कार्य केले तेव्हा त्यांच्यासोबत बैठकीत फक्त सात व्यक्ती होते असे सांगितले जाते.

अणि आज बघायला गेले तर ह्या श्री बैठकीच्या सभासदांची याच्या परिवाराची एकूण संख्या २० लाखाच्या आसपास आहे.

ज्येष्ठ निरूपणकार पदमश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे १५ अनमोल विचार 

श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

श्री बैठक ही आठवड्यातून एकदा भरवली जाते.हया बैठकीचा कालावधी किमान दोन ते तीन तास इतका असतो.

ही बैठक कुठल्याही एका विशिष्ट वयोगटातील व्यक्तींसाठी नसुन सर्व वयोगटातील व्यक्तींना ह्या बैठकीत सामिल होता येते.श्री बैठकीत वयोवृद्ध व्यक्तींसोबत तरूणांचा देखील समावेश असलेला आपणास पाहावयास मिळतो.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आपणास कुठलेही शुल्क देखील आकारले जात नसते.

श्री बैठकीतुन संत समर्थ रामदास यांनी लेखन केलेल्या दासबोध ग्रंथाचे सर्व श्रोत्यांना समजेल अशा साध्या अणि सोप्या भाषेत निरूपण केले जाते.

ह्या बैठकीचे उद्दिष्ट सामाजिक प्रबोधन करणे लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे सांगणे अणि त्यासाठी समर्थ रामदास यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे हा आहे.

कोण होते नानासाहेब धर्माधिकारी?

नानासाहेब धर्माधिकारी हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील होते.नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अणि आता हाच गौरव त्यांच्या मुलाला अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील प्राप्त झाला आहे.

नानासाहेब धर्माधिकारी यांनीच श्री बैठकीची सुरुवात केली होती.नानासाहेब हेच श्री बैठकीचे संस्थापक अध्यक्ष होते.

नानासाहेब धर्माधिकारी हे अध्यात्मिक साहित्यातुन मोफत समाजसेवेचे कार्य करणारे भारतीय अध्यात्मिक गुरू होते.नानासाहेब धर्माधिकारी यांना समाजसुधारक म्हणून ओळखले जायचे.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या अनुयायांसमवेत तीर्थयात्रा पुर्ण केल्यानंतर नानासाहेब यांनी श्री समर्थ प्रासादिक आधारभुत सेवा समितीची स्थापना केली.

दासबोध ग्रंथाचे लेखक समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान जगातील कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम त्यांनी केले.

आज नानासाहेब यांच्या मृत्यूनंतर आपला वडिलांचा वारसा जपत हीच श्री बैठकीची परंपरा पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी हे करीत आहेत.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ह्या कार्यात त्यांना मदत करण्याचे काम अप्पासाहेब यांचे पुत्र सचिन धर्माधिकारी हे करीत आहेत.

आज ही श्री बैठक भारतासमवेत परदेशात देखील सिंगापूर लंडन आॅस्ट्रेलिया यूएई इराण नायजेरिया अशा विविध देशांत भरवली जात आहे