सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31 ऑक्टोबर – सरदार वल्लभभाई पटेल माहिती

सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी

सरदार वल्लभभाई पटेल हे एक सामाजिक व राजकीय नेते होते.त्यांचे संपूर्ण नाव वल्लभाई झवेरभाई भाई पटेल असे होत.सरदार वल्लभाई पटेल यांना भारताचा पोलादी पुरूष म्हणुन देखील आपण सर्व जण ओळखतो.ए

आजच्या लेखात आपण ह्याच पोलादी पुरूष तसेच भारताचे स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभाई पटेल यांच्याविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्म कधी आणि केव्हा झाला?

सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात मधील नडियाद येथे एका हिंदू कुटुंबामध्ये झाला.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या आईचे नाव काय होते?

 सरदार वल्लभाई पटेल यांच्या आईचे नाव लाडबा असे होते.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव काय होते?

सरदार वल्लभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई असे होते.

सरदार वल्लभाई पटेल यांचे बालपण : सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी

वल्लभभाई यांचा जन्मा घरात झाल्या कारणाने त्यांची जन्मतारीख ज्ञात नव्हती परंतु त्यांनी ज्या वेळेस मॅट्रिक्स चे शिक्षण घेत असताना त्यांनी आपली जन्मतारीख 31 ऑक्टोबर अशी लिहिली होती, वल्लभभाई हे आपल्या आई-वडिलांचे चौथे अपत्य होते. वल्लभ भाई पटेल यांचे वडील झवेरभाई खेडा जिल्ह्यातील करमसद गावचे रहिवासी होते ते आपल्या कुटुंबासह तिथे राहायचे. बालपणी वल्लभभाई पटेल हे आपल्या वडिलांना कामांमध्ये मदत करायचे.

सरदार वल्लभाई पटेल यांचा विवाह कोणाशी झाला होता?

 

वयाच्या 18 व्या वर्षी 1891 मध्ये जवळच्या गावातील बारा-तेरा वर्षाच्या झवेरबा नावाच्या मुलीशी झाला होता.त्यानंतर त्यांनी गोध्रा येथे आपल्या पत्नी झवेरबा यांच्यासोबत वैवाहिक जीवनाची म्हणजे संसाराची सुरुवात केली.

सरदार वल्लभाई पटेल यांचे शिक्षण सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी

  • सरदार वल्लभाई पटेल मॅट्रिकची परीक्षा वयाच्या बाविसाव्या वर्षी उत्तीर्ण झाले.सरदार वल्लभाई पटेल हे एक महान स्वतंत्रता सेनानी होते.
  • त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण व वकिलीचे शिक्षण अतिशय कष्टाने इतरांचे पुस्तके घेऊन आपल्या कुटुंबापासून लांब राहून पूर्ण केले, शिवाय जिल्हाधिकारी होण्याच्या परीक्षेचा अभ्यास देखील त्यांनी घरूनच केला, सरदार वल्लभाई पटेल हे अभ्यासात इतके हुशार होते त्यांना या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळाले व ते उत्तीर्ण झाले, त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी लंडनला जाऊन आपली बॅरिस्टर ही पदवी मिळवली.
  • सरदार वल्लभभाई पटेल हे लहानपणापासूनच खूप कष्टाळू तसेच खूप मेहनती होते.
See also  रक्षाबंधन निबंध अणि भाषण - Raksha Bandhan essay and speech in Marathi

सरदार वल्लभाई पटेल यांना एकुण किती अपत्ये होती?

सरदार वल्लभाई पटेल व त्यांची पत्नी यांना दोन अपत्यप्राप्ती झाली एकाचे नाव मनिबेन तसेच दुसऱ्याचे नाव डायाभाई असे होते.

सरदार वल्लभाई पटेल यांची वकिली आणि राजकीय प्रवास :

  • सरदार पटेल हे आपली बॅरिस्टरी पूर्ण करून आल्यानंतर गुजरात येतील अहमदाबाद येथे वकिलीच्या पेशात कार्यरत झाले.
  • सरदार वल्लभाई पटेल वकिलीत कार्यरत असताना त्यांचे कौशल्य व त्यांची कामाची आवड पाहून त्यांना ब्रिटिश सरकारने कित्येक मोठ्या पदासाठी कार्यरत व्हावे म्हणून कित्येक वेळा आग्रह केला.
  • कित्येक चांगल्या संधींसाठी आमंत्रित केले परंतु पटेल यांना ब्रिटिश शासनाचा नोकरशाही सारखा एकही कायदा अजिबातच पसंत नव्हता व तसेच ते ब्रिटिश सरकारचे कट्टर विरोधक होते त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारकडून आलेला एकही प्रस्ताव स्वीकार केला नाही.

आपल्या समाजासाठी तसेच देशासाठी काहीतरी करावे असे वाटायचे व त्यांना राजकारणात देखील खुप रुची होती त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन देशाचे नेतृत्व करण्याचे ठरवले. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री तसेच उपप्रधानमंत्री देखील होते.

सरदार वल्लभाई पटेल यांचे अतुट देशप्रेम :

सरदार वल्लभाई पटेल यांना आपल्या पत्नीचे निधन झाल्याचे कळाल्यानंतर देखील वकीलीचे काम करत राहिले त्यांच्या पत्नी या कॅन्सर या आजाराने पीडित असल्याने त्यांचा वल्लभभाई पटेल यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही त्यांच्या निधनाने त्यांचा संसार मात्र थांबला असला तरीही त्यांनी देशासाठी भरपूर मोठे कार्य केले.

आपल्या वैयक्तिक जीवनाचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या कामावर होऊ दिला नाही ते तितक्याच जिद्दीने व जोमाने आपले वकिली चे कार्य करत राहिले व देशासाठी काहीतरी करायचे हे स्वप्न डोळ्यात घेऊन आयुष्याचा लढा देण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले, 1909 साली त्यांच्या पत्नी यांचे निधन झाले.

सरदार वल्लभाई पटेल यांनी देशासाठी दिलेले योगदान : सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी

     वल्लभाई पटेल हे वकिली करत असताना त्यांची ओळख महात्मा गांधी यांच्याशी झाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गुजरात येथे पहिल्यांदा सर्व खेड्यातील लोकांना एकत्रित करून इंग्रजी अत्याचारांविरोधात विरोधात सत्याग्रह केला, या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरात मधील एका प्रभावशाली नेत्याच्या रूपात होऊ लागली.

See also  CSS म्हणजे काय ? उपयोग आणि प्रकार - CSS information in Marathi

पटेल यांना भारताचे लोहपुरुष असेदेखील म्हणायचे, पटेल यांनी भारताच्या स्वतंत्रतेच्या संघर्षामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच स्वतंत्रता मिळाल्यानंतर देखील सर्वांना एकजूट एकत्रित करण्यासाठी महत्वाची योगदान दिले.

वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होते, तसेच त्यांचा भारत छोडो आंदोलनात महत्त्वपूर्ण सहभाग होता. वल्लभभाई पटेल यांनी पाकिस्तानातून आलेल्या तसेच पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्यांनी निवासितांच्या मदतीसाठी खूप कार्य केले. पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्काचे समर्थक होते, भारताची एकता व अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सरदार वल्लभाई पटेल यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा असलेला प्रभाव :

   सरदार वल्लभभाई पटेल हे अहमदाबाद येथे यशस्वी बॅरिस्टर म्हणून काम करत असताना, सोबत असते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले, या काळात वल्लभाई पटेल गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते गांधीजींच्या एका व्याख्यानात यांनी सहभाग घेतला होता त्यावेळी, त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांना अतिशय प्रभावित झाले. पुढे त्यांनी गांधीजींच्या विचारावर चालण्याचा व त्यांचा अनुयायी बनवून राहण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला व ते गांधीजींच्या विचारांवर चालू लागले त्यांच्या प्रमाणे विचार करू लागले त्यांच्यासोबत अनेक चळवळीत सहभाग घेऊ लागले व त्यांनी गांधीवादी सिद्धांतावर चालून हळूहळू त्यांनी राजकारणाचा हिस्सा झाले.

सरदार वल्लभाई पटेल यांनी भारतपाकिस्तान फाळणी दरम्यान दिलेले महत्वपुर्ण योगदान : सरदार वल्लभभाई पटेल जयंती मराठी

  • सरदार वल्लभभाई पाटील यांचा त्यांनी भारत व पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यातून निर्माण झालेल्या हिंसाचारा नंतर शांती स्थापनेसाठी देखील महत्वाचे कार्य केले. सरदार वल्लभाई पटेल यांनी हिंदुस्थानातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून घेतले व हेच पटेल यांचे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य म्हणून ओळखले जाते. त्यांनी मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सर्व लोकांना एकत्रित करून मनुष्य बळाचा वापर करून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली व त्यामुळेच त्यांना भारताचे लोहपुरूष म्हणून देखील ओळखले जाते.
  • सरदार वल्लभाई पटेल यांचा आज जन्मदिवस भारतीय सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे.
  • राष्ट्र उभारणीत त्यांचे महत्त्वाचे व मोलाचे योगदान आहे. सरदार वल्लभाई पटेल यांना संपूर्ण भारतात आज ओळखले जाते ते त्यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे अपार कष्टामुळे त्यांनी एक नेते म्हणूनच नाही तर एक जनतेचा रक्षक म्हणून कार्य केले .
  • कोणताही विचार न करता अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत देखील त्यांनी हार न मानता गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालून त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करून देशाच्या नेतृत्वा साठी सहभाग दिला त्यामुळे आज संपूर्ण जगात तसेच त्यांना सरदार अशी पदवी दिली.
See also  वाचण्यासाठी काही सर्वोत्तम कादंबऱ्या - Best Novels To Read

सरदार वल्लभाई पटेल यांच्यावर लिहिलेली पुस्तके कोणकोणती?

  • सरदार वल्लभाई पटेल यांच्यावर आत्तापर्यत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • पोलादी राष्ट्रपुरुष अरुण करमरकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालय तर्फे चेतना पुरस्कार प्रदान झाला आहे त्याचबरोबर, महामानव सरदार पटेल, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, सरदार पटेल असे अनेक पुस्तके त्यांच्या नावाने प्रकाशित झाले आहेत त्यात त्यांच्या जीवन चरित्राचा संपूर्ण प्रवास प्रत्येक लेखकाने अत्यंत चांगल्या ओळीत व शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे

सरदार वल्लभाई पटेल यांचे निधन कधी आणि केव्हा झाले?

सरदार वल्लभाई पटेल यांच्यासारखा नेता युगपुरुष भारताला लाभला हे आपले भाग्यच, सगळ्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत राहतात तसेच ते ही एक सामान्य पुरुष होते.

सामान्य लोकांसारखे ते देखील कोणाचे तरी मूल होते पती होते त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडून समाजासाठी देखील मोठे योगदान दिले.

आजच्या जगात हे होणे शक्य नाही संपूर्ण जग हे आज अशा नेत्यांच्या सहभागाने अपार कष्टाने व स्वातंत्र्यासाठी दिवस आणि रात्र जगणाऱ्या व त्यांच्या हालचालीने चळवळीने निर्माण झालेले भारत देश आज इतका पुढे गेला आहे ते फक्त सरदार वल्लभाई पटेल, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या कष्टामुळे ज्यांनी अहोरात्र कष्ट करून आज हे जे काही निर्माण केले आहे.

त्यामुळे आपण चांगले आयुष्य जगू शकतो नाहीतर आज पण आपण ब्रिटीशांचा त्या हुकुमशाही वर त्यांनी केलेला अत्याचारांविरोधात कधीही जिंकू शकलो नसतो.

सरदार वल्लभाई पटेल प्रतिष्ठान सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावाने समाज भूषण पुरस्कार देते. सरदार वल्लभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष व सरदार या नावाने आज देखील ओळखले जाते.

त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केलेला आहे अशा प्रकारे देशासाठी सतत झगडत असणाऱ्या सरदार वल्लभाई पटेल या महापुरुषाचे 15 डिसेंबर 1950 रोजी निधन झाले.

देशासाठी त्यांना जेवढे काय करता आले ते सर्व त्यांनी केले अखिल शेवटच्या श्वासापर्यंत म्हणूनच आज देशात भारतात  त्यांच्या कार्याचे त्यांच्या विचारांचे आजही लोक अनुकरण करतात.अशा या महापुरुषाला कोटी कोटी धन्यवाद.