पब्लिक वायफाय वापरताना घ्यावयाची काळजी ? Public WIFI precautions Marathi

Public hotspot कींवा सार्वजनिक  इंटरनेट म्हणजे काय ?

Public hotspot कींवा सार्वजनिक  इंटरनेट सेवा देणारी जागा , ही अशी ठराविक ठिकाण असतात जिथं येणाऱ्या लोकांना  मर्यादित  इंटरनेट सुविधा मोफत दिली जाते.  ठिकाणं जशी की मॉल्स, रेल्वे स्टेशन, पुस्तकालय व विमानतळ इत्यादी.

तुम्ही जर एस टी स्टँडवर किंवा कोणत्याही पब्लिक प्लेस वर जाऊन आपला वायफाय चालू केल तर तुम्हाला बरीच वायफाय कनेक्शन दिसतील.त्यातील बऱ्याच वायफाय कनेक्शन ला पासवर्ड असतो आणि काहीच वायफाय फ्री टू युज साठी असतात.

फ्री टू युज असणाऱ्या वायफाय ला आपण कनेक्ट करतो आणि फ्री इंटरनेट सेवेचा आनंद घेतो;परन्तु फ्री वायफाय ला कनेक्ट होणे आपल्याला कोड्यात पाडू शकते.आपण पब्लिक वायफाय वापरताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

एक अशीच घटना ओमकार सोबत घडली होती.ऑफिसच्या एका कामानिमित्त ओमकार रेल्वे स्थानकावर गेला होता.कामानिमित्त त्याला बाहेर गावी जायचे होते.तो रेल्वे स्थानकावर  रेल्वेची वाट बघत बसला होता,तेव्हा त्याच्या डोक्यात एक आयडिया आली,तो म्हणाला आपण मोकळाच बसलो आहे तर वायफाय चालू करून फ्री वायफाय शी कनेक्ट होऊन सोशल मीडिया चा वापर करूया.त्याने फ्री वायफाय ला कनेक्ट केलेही आणि 15 मिनिटे फ्री इंटरनेट वापरलेही;परन्तु 15 मिनिटाने त्याला त्याच्या अकाउंट मधील 20,000 रुपये कट झाल्याचा मेसेज आला.तो मेसेज पाहून त्याला खूप मोठा धक्काच बसला.

त्याने कनेक्ट केलेल्या फ्री वायफाय मुळे त्याचा मोबाईल हॅक झाला आणि  त्याच्या अकाउंद मधील 20,000 रुपये कट झाले.आजकाल तर रेस्टॉरंट पासून ते एअरपोर्ट पर्यन्त फ्री वायफाय कनेक्शन उपलब्ध झाले आहे.बऱ्याच ठिकाणी फ्री वायफाय कनेक्शन जोडल्यामुळे माणसे या फ्री वायफाय सेवेचा लाभ उचलायला जातात आणि हॅकर च्या जाळ्यात अडकतात.आपण फ्री पब्लिक वायफाय ला कनेक्ट होण्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती  आपण लेखात पाहणार आहोत.

See also  भगवान विश्वकर्मा यांनी जयंती -Vishwakarma Divas in Marathi

पब्लिक वायफाय म्हणजे नक्की काय ? Public WIFI precautions Marathi

  • हे सार्वजनिक ठिकाणी बसवलेले हॉटस्पॉट (मर्यादित इंटरनेट सुविधा मोफत ) असतात.तुम्ही जसे सहजरित्या ह्या हॉटस्पॉट ला कनेक्ट होता,तसेच सहजरित्या या हॉटस्पॉट च्या राउटर ला तुमच्या डिव्हिअस ची माहिती समजते.
  • परन्तु काही वेळा तुमच्या डिव्हिअस मधील माहिती तिसराच व्यक्ती रीड करतो.ह्या इंटरनेट कनेक्शन ने तुम्ही जर मोबाईल वरती बँकेचे अकाउंट ची अँप ओपन केली तर तुमच्या बँकेच्या अकाउंट ची डिटेल त्या हॅकर ला समजते आणि तो हॅकर तुमचे अकाउंट खाली करू शकतो.जर तो वायफाय एनक्रिप्टड नेटवर्क असेल तर तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो.
  • एनक्रिप्टड नेटवर्क – एनक्रिप्शन म्हणजे तुम्ही जो वायफाय कनेक्ट केला आहे त्या वायफाय ला तुमच्या डिव्हिअस ची माहिती सिक्रेट स्वरूपात दिली जाते आणि तुमच्या डिव्हिअस ची माहिती थर्ड पार्टी मधील व्यक्ती पाहू शकत नाही.
  • काही हॅकर्स काय करतात की,नामांकित हॉटेल्स,रेस्टॉरंट च्या नावाने वेगळे नाव आपल्या हॉटस्पॉट ला देतात.आपण त्याच्या जाळ्यात अडकून नामांकित हॉटेल्स चा वायफाय समजून कनेक्ट व्हायला जातो आणि हॅकर्स च्या जाळ्यात अडकतो.

अशा फ्रॉड केसेस पासून कसे वाचावे ?

  • सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी आपण पब्लिक स्पेसेस मध्ये फ्री वायफाय चा युज करण्यासाठी वि.पी.एन चा वापर केला पाहिजे.
  • VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क.आजकाल भरपूर लोक VPN चा वापर करतात.VPN तुमच्या मोबाईल मधील प्रायव्हसी ला सुरक्षित ठेवते,डाउनलोड स्पीड वाढवते .तुम्हाला गुगल वरती भरपूर पेड VPN मिळतील.ज्याचा वापर करून तुम्ही सायबर क्राईम पासून वाचू शकतो.काही फ्री VPN देणारे सॉफ्टवेअर देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत;परन्तु फ्री VPN वरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही.

सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी ठाळाव्यात किंवा  केल्या नाही पाहिजेत ? Public WIFI precautions Marathi

  • आपल्या वायफाय कनेक्शन मध्ये ऑटो कनेक्ट ऑप्शन बंद करायला हवा.
  • तुम्ही जेव्हा पब्लिक वायफाय चा वापर मदत असाल तेव्हा बॅंक अकाउंट डिटेल असणारी अँप किंवा जीमेल उघडू नका.
  • जेव्हा तुम्ही इंटरनेट वापरत नसाल तेव्हा वायफाय बंद करा.
  • पासवर्ड नसणाऱ्या कोणत्याच हॉटस्पॉट ला कनेक्ट नका होऊ.
See also  भारतीय राज्यघटना (Indian Constitution In Marathi) - जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य

सायबर क्राईम पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत ?

  • आपल्या डिव्हिअस मध्ये फाईल शेरिंग डेसेबल करा.
  • हॉटेल्स मधील वायफाय ला कनेक्ट होण्यापूर्वी त्या हॉटेल मधील कर्मचाऱ्याला त्या हॉटेल च्या वायफाय चा पासवर्ड विचारा आणि मगच कनेक्ट व्हा.
  • फक्त HTTPS असणाऱ्या वेबसाईटचा वापर करा.
  • इंटरनेट वापर केल्यानंतर अकाउंट लॉग ऑफ करा.

 

इंटरनेट आणि आपण