मधमाशा पालन योजना (पोकरा अंतर्गत) -Bee keeping

                                         

अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार व आर्थिकदृष्ट्या कमकुवत ,असणाऱ्या लोकांना मधमाशापालनातून -Bee keeping मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होवू शकतो , ही योजना  ही अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे करता राबविण्यात येत आहे त्यात त्यांना -७५ टक्के अर्थसहाय्य मंजूर होवू शकते तसेच २ ते ५  हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना  -६५ टक्के अर्थसहाय्य मंजूर .                                        

खर्चाचा मापदंड- 

 • 50 मधुमक्षिका संच पेक्षा जास्त नाही- रु.100000
 • 50 स्टैंडर्ड मधुमक्षिका पेटी-रु.100000
 • मध काढणी यंत्र व फुड ग्रेड मध कंटेनर-रु.20000
 • एकुण 220000 रु.खर्च                    
 • शेतकऱ्यांनी  https//dbt.mahapocra.gov.in या वेबसाइट वर आवश्यक कागदपत्रे सहित ऑनलाईन नोंदणी करू शकतात .     

खरेदी बाबत- 

 • पुर्व संमती मिळाल्या नंतर लाभार्थी ने मधुमक्षिका व इतर बाबीं ची खरेदी एक महिन्याच्या आत करावी
 • खरेदी समितीच्या उपस्थितीत करावी. जसे सरपंच ,उपसरपंच, ग्राम कृषी संजीवनी समिती सदस्यां पैकी 1 महिला सदस्य, कृषी मित्र/कृषी ताई  हे सदस्य असतात. तर कृषी सहाय्यक हे सचिव असतात.     
See also  सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक अणि मुख्य व्यवस्थापक पदाच्या २५० जागांसाठी भरती सुरू - Central bank of india recruitment 2023 in Marathi

अनुदान मिळणे साठी- 

 • लाभार्थीने  ऑनलाईन अनुदान मागणी करता उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे संपर्क साधावा .
 • सोबत खरेदी च्या मुळ प्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने सेल्फ अटेस्ट करुन ऑनलाईन भरावे .
 • एका कुटुंबं तिल एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ
 • मधुमक्षिका पालन प्रशिक्षण घेणे आवश्यक.
 • किमान 3 वर्ष मधुमक्षिका पालन कारणे आवश्यक.

शेतीला पुरक मधुमक्षिका पालन व्यवसाय शेतकऱ्यांना अधिक उत्पन मिळवून देवू शकतो.

मधमाशा स्व:त करता अन्न मिळवत असताना निसर्गाची व शेतकर्‍याची ही प्रत्यक्षपणे मधाच्या रूपाने आणि अप्रत्यक्षपणे पिकांच्या फुलोऱ्यातील परागर्सिचना करता मदत करतात.

आरोग्य बाबत जागृगता वाढता असताना व  आयुर्वेदाचा प्रसार वाढत असल्याने मधाची मागणी येणाऱ्या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

मधपसून तयार उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे फायदेशिर ठरेल.

अधिक उत्पन्न करता योग्य  नियोजन म्हत्वाचे आहे  तसेच  रोजगार निर्मीतीला वाव ग्रामीण भागातील बेरोजगारि एक चांगला पर्याय आहे  

मधमाशा Bee keeping पालनाचे फायदे:

 • शुद्ध मधाचे व  शुद्ध मेणाचे उत्पादन.
 • मधचा औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये बनवताना वापर होतो
 • मधमाशा पालनाचे त स्पर्धा कमी आहे शेती, फळबाग आणि भाजीपाला ह्या व्यवसायला जोडून करता येतो
 • निसर्ग संतुलन आणि संवर्धनत परागीभवन द्वारे  मधमाशा मोठ योगदान करत असतात

मधुमक्षिका पालनासाठी पूर्तता –

 • जात – मधुमक्षिका पालनात मधमाशा ची योग्य जातीची निवड खूप म्हत्वाची आहे
 • वनस्पतीं–  उपयुक्त पराग, मकरंद देणाऱ्या व फुलोऱ्याचे सातत्य असणार्‍या वनस्पति
 • प्रशिक्षण – मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक तंत्र.
 • बाजारपेठे– मध आणि मेण विक्रीसाठी लागणारी बाजारपेठ
 • तंत्रज्ञान- मधपेटय़ा आणि मधयंत्र हाताळण्याची योग्य माहिती .

साहित्य – मधमाशापालन –Bee keeping उद्योगासाठी

मधूपेटी : योग्य मधुपेटीची गरज

मध काढणी यंत्र : ममध भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी हे यंत्र उपयोगीपटाशी

(हाईप टूल) : लोखंडी पट्टी वसाहततपासणीचे करता

See also  सीआर पीएफ काॅनस्टेबल भरती - CRPF constable recruitment 2023

ध्रुमक- धूर करण्यासाठी उपयोगी पडते ,. धुरामुळे मधमाशा सभ्रमात पडतात व वसाहीतीची पाहणी करणे सोपे. चाकू;

पाकपात्र – अल्युमिनीयम भांडे साखरेचा पाक देण्याकरता उपयोग.

मेणपत्रे – पोकळ्या बांधण्यात वेळ व श्रम वाया  न जाता मधमाशांची वाढ लवकर होण्याकरता असे मेणपत्रे बसविल्याने वसाहतीची वाढ जलद होते व मधाचे उत्पादनही वाढू शकते

.राणीपिंजरा : मधमाशांची नैसर्गिक वसाहती पकडतेवेळी राणीमाशीला राणी पिंजराचा उपयोग होतो.

 •  

मधमाशाच्या प्रजाती : चार महत्वाच्या प्रजाती आहेत

 • दगडी माशी (अँपीस डॉरसाटा) – ५०-८० किलो/ प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध – उत्तम
 • लहान माशी (अँपीस फ्लोरिआ) -२००-९०० ग्रॅम / प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध -कमी उत्पन्न
 • भारतीय माशी (अँपीस सेराना इंडिका) -६-८ किलो/ प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध
 • युरोपियन पाशी (अँपीस मेलीफेरा) या मधमाशांब्रारे दर वसाहती मागे सरासरी २५-४० किलो असते.

पोळयांची उभारणी Bee keeping set

 • 2-3 किलोमीटर परिसरात दुसरी व्यावसायिक मधमाशापालन प्रकल्प नसावा
 • जागा हवेशीर, मोकळी , स्वछ्य,पाण्याचा उत्तम निचरा होणरी जमिनील प्राधान्य द्यावे
 • मकरंद, परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी.
 • सकाळी व संध्याकाळी सौम्य सूर्यप्रकाश येईल अशी जागेला प्राधान्य द्यावे
 • तसेच कडक उन्हपासून  पासून पोळ्यांचे संरक्षण करने आवश्यक
 • मधमाशा पेटीत ठेवतांना चारही पायाखाली पाण्याने भरलेली पेटी (ऑन्टवेल्स्‌) ठेवावी म्हणजे मुंग्या पेटीत जाण्याप्सून रोखता येतील.
 • शक्यतो वसाहतीचे तोंड पूर्व दिशेला ठेवावे .
 • साखर कारखाना , गढूळ पाणी. रसयनिक प्रकल्प ,रेल्वे रूळ, पाळीव व अन्य प्राणी, रस्ते,विजेचे खांब ह्या पासून वसाहतींना  दूर ठेवावे.

मधमाशामुळे लाभ होणारी पिके

 • नगदी पिके : कापूस
 • तेलबिया : मोहरी, तीळ, कराळ, सूर्यफूल इ.
 • फळभाज्या : वांगी, भेंडी, मिरची, काकडी, भोपळा,
 • टोमॅटो, दुधी भोपळा, कारले इ.
 • डाळी तूर, मूग, उडीद, मटकी इ.

मधमाशांचे खाद्य व मधाची काढणी तंत्र  :

bee keeping

 

 • मधमाशा मकरंद व पराग यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असतात.
 • फुलातील मकरदं गोळा करून मधमाशा मध तयार करतात.
 • यशस्वी मधमाशी पालनासाठी हा फुलोरा जवळ-जवळ वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 • पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे त्या भागातील मधमाशांना धुरांने  दूर करावे आणि पोळी काळजीपूर्वक कापून घ्यावीत.
 • मधाची काढणी शक्‍यतो दोन मुख्य फुलोऱ्याच्या मोसमांच्या दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर, अनुक्रमे ऑक्टोंबर-नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जुनमध्ये काढणे शक्य होते. ‘
 • मधाचे पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते.
See also  यंदाची तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता -Talathi bharti latest update in Marathi

मधाचे फायदे :

 • उर्जावान बनवणारे एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक.
 • उत्तम अन्टीबायोटिक आणि अँन्टीसेप्टीक,स्नायुंना बळकटी देणारे.
 • यकृत व पोटाच्या आजारावर खोकला, कफ, दमा या विकारांवर उपयोगी
 • वजन कमी करण्या करता ही मदत होते . थकवा घालवून कार्यशक्ती वाढवण्यास मदत .
 • सौंदर्य प्रसाधनामध्ये  बनवण्यात उपयोगी

किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण:

 • खेळती हवा आवाश्यक -पेटीतील हवा योग्य प्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे.
 • फारच आर्थिक नुकसान दिसल्यास च किटकनाशकांचा योग्य त्या ठिकाणीच वापर करावा.
 • सूर्यास्ता नंतर फवारणी करावी.
 • किटकनाशकां पासून मधधमाशांना हानी होणार नाहीह्याची खबरदारी घ्यावी .
 • पेटी च्या आजू बाजूला फवारणी करू नये. शक्‍य होत नसेल तर पेट्या फवारणीच्या ठिकाणापासून कमीत कमी २ ते ३ कि.मी. अंतरावर नेवून ठेवाव्यात.

सेंद्रिय शेती

अधिक माहिती साठी- https://nbb.gov.in/objective.htm

2 thoughts on “मधमाशा पालन योजना (पोकरा अंतर्गत) -Bee keeping”

Comments are closed.