बौद्ध धम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्व – Buddha Dhamma and poornima

बौदध धम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्व

आषाढ पौर्णिमा ही वर्षातील सर्वात महत्वाची पौर्णिमा मानली जाते.कारण ह्या दिवशी गौतम बुद्ध यांच्या जीवणात अनेक महत्वाच्या घटना घडुन आल्या होत्या.

आषाढ पौर्णिमेला गुरू पौर्णिमा तसेच वर्षावासाचा प्रथम दिन असे देखील संबोधिले जाते.

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी बौदध धम्मामधील पवित्र वर्षावासाचा आरंभ होतो.

आषाढ पौर्णिमा कधी येते?

आषाढ पौर्णिमा ही जुलै महिन्यात येत असते.

2022 मध्ये आषाढ पौर्णिमा कधी आहे?

2022 मध्ये आषाढ पौर्णिमा 13 जुलै रोजी आहे.

बौदध धम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्व –

आषाढ पौर्णिमा ही पुढील काही महत्वाच्या बाबींमुळे बौदध धम्मात महत्वपूर्ण मानण्यात येते.

● आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी गौतम बुद्ध यांनी वाराणसी जवळच्या सारनाथ येथील पंचवर्गीय भिक्खुंस धम्म शिकविला होता अणि धम्म चक्र परिवर्तन घडवून आणले होते.

● धम्म चक्र परिवर्तन सुत्राची शिकवण प्राप्त करून झाल्यानंतर कौंटिण्य हे भिक्खु हे पहिले अरहंत झाले.

● ज्या जागेवर गौतम बुद्ध यांनी मनुष्य जातीला प्रथमत धम्म शिकविला होता त्याच जागेवर धम्यक स्तुपची उभारणी देखील करण्यात आली आहे.

● आषाढ पौर्णिमेलाच गौतम बुद्ध यांनी त्यांचे वय २९ असताना परीवर्ज्या घेतली होती.आपल्या घराचा त्याग केला.ज्याला महाभिनिष्क्रमण असे संबोधित केले जाते.

● आषाढ़ा पौर्णिमेलाच गौतम बुद्ध यांनी त्यांचा पहिला वर्षावास सारनाथ येथे पंचवग्य भिक्खुंसोबत केला होता.दरवर्षी ह्याच पौर्णिमेला भिक्खुंचा तीन वर्षीय वर्षावास आरंभित होतो.या कालावधीत भिक्खु हे विहारात आपले वास्तव्य करीत असतात.धम्म प्रचारासाठी या काळात ते दुर अंतरावरील क्षेत्रात जात नसतात.कारण या कालावधीत आधी बौदध भिक्खुंना धम्माचा प्रसार करण्यासाठी भटकंती प्रवास करावा लागायचा.एका गावात एकाच भिक्खुने जायचे एक दिवसापेक्षा जास्त थांबायचे नाही असा नियम होता.पण आषाढ पौर्णिमेत पावसामुळे भिक्खुंना प्रवास करणे कठिन जाऊ लागले विहाराची सोय न झाल्यास वृक्षाखाली थांबावा लागायचे म्हणुन ह्या कालावधीत भिक्खुंनी एका ठिकाणी वास्तव करून उपासकांना धम्म शिकवावा अशी आज्ञा गौतम बुद्ध यांनी सर्व भिक्खुंना दिली.

See also  कृष्ण जन्माष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती निबंध - Krishna Janmashtami Essay In Marathi

● म्हणुन ह्या वर्षावासाच्या काळात सर्व भिक्खु विहारात आश्रय घेतात कारण ह्या वर्षावासाच्या कालावधीत एकाच ठिकाणी वास्तव्य करावे असे गौतम बुद्ध यांनी सर्व भिक्खुंना सुचित केले होते.वर्षावासाच्या काळात सर्व भिक्खु एकाच ठिकाणी आश्रय घेत असतात.अणि त्यांच्या आजुबाजुच्या परिसरातील उपासक हे त्यांना सोयी सुविधा पुरविण्याचे काम करतात.अणि भिक्खु हे ह्या उपासकांना धम्म शिकवत असतात.

● आषाढ पौर्णिमेलाच गौतम बुद्ध यांनी सारीपुत्रास अधिधम्म शिकविण्यास आरंभ केला होता.म्हणुन अनेक बौदध देशांत याचदिवशी अधिधम्म शिकविण्यास आरंभ केला जात असतो.

● आषाढ पौर्णिमेच्याच दिवशी पहिल्या बुदध संगीतीचा राजगृह येथे आरंभ झाला होता.

● याच आषाढ पौर्णिमेच्या दिनी महामायेच्या उदरामधुन भविष्यातील बुदधांची गर्भधारणा घडुन आली होती.भगवान बुदध अणि त्यांचा धम्म ह्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये वर्णन देखील करण्यात आले आहे.हे वर्णन बाबासाहेबांनी पुढील प्रमाणे केले आहे :

शाक्य लोकामध्ये दरवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक सण पाळण्याची प्रथा परंपरा होती.म्हणुन सगळे शाक्य लोक राजघराण्यातील लोक हा उत्सव साजरा करायचे.हा महोत्सव तब्बल सात दिवसांसाठी साजरा करण्यात यायचा.

एकदा महामायेने हा सण मोठया थाटात,फुलांची माळ तसेच इतर सुगंधीत वस्तुंचा वापर करून पण मद्यानादी उत्तेजक वस्तु म्हणजेच मादक पदार्थाचे सेवण न करता यांना वज्य करून साजरा करायचे ठरवले.

ह्या उत्सवाच्या सातव्या दिनी महामाया पहाटेच उठली.सुगंधी पाण्याने तिने स्नान केले.दान धर्म म्हणुन चार लक्ष मोहरांचे तिने देणगी म्हणुन वाटणी केली.मौल्यवान दागदागिने घालुन तिने साज शृंगार केला.

तिच्या आवडीत्या पदार्थाचे सेवण देखील केले.अणि व्रताचरण करून झोपण्यासाठी ती कौशल्याने सजविलेल्या शयन मंदिरात गेली.

अणि त्याच रात्री शुदधोधन अणि मायामाया यांचे मिलन होऊन महामायेला गर्भसंभव झाला.पलंगावर निद्रेत असताना तिला एक स्वप्न पडले.

स्वप्रामध्ये महामायेला असे दिसुन आले की चतुर्दिपपालांनी आपणास झोपेत असताना मंचकासोबत उचलले.अणि हिमालयाच्या माथ्यावर नेत महामायेला नेत ते एका भव्य शाल वृक्षाखाली तिला ठेवून ते कडेला उभे राहिले.

See also  भारतातील पहिल्या वाॅटर मेट्रो प्रकल्पा विषयी माहिती -India first water Metro project information in Marathi

यानंतर चतुर्दिपपालांच्या स्त्रिया महामायेजवळ आल्या अणि त्यांनी तिला सुगंधी द्रव्यांनी अशा प्रकारे सजविले की जणु एखाद्या दिव्य शक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.

मग सुमेध नामक एक बोधीसत्व महामायेसमोर प्रकट होतो.मला माझा अंतिम जन्म पृथ्वीवर घ्यायचा आहे.तुम्ही माझी माता बनणार का?महामाया आनंदीत होऊन होय म्हणाली.

वर्षावासाच्या कालावधीत भिक्खुंनी काय करायला हवे?

अधिकतम वेळ वर्षावासाच्या कालावधीत समाधीचा अभ्यास करायला हवा.अष्टांगिक मार्गाचे पालन करायला हवे.भिक्खुंनी सकाळी अणि संध्याकाळी उपासकांना धम्म शिकवायला हवा.भिक्खुंचा धम्म मार्गातील प्रगतीसाठी वर्षावास हा एक उत्तम कालावधी मानला जातो.