Vitamin K – आरोग्यासाठी महत्त्व, गरज आणि स्रोत – Importance of vitamin k

आरोग्यासाठी महत्त्व, गरज आणि स्रोत – Importance of vitamin k

शरीरासाठी खूप महत्वाचा आहे व्हिटॅमिन के –
व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात.इतर व्हिटॅमिन प्रमाणे व्हिटॅमिन के देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो आणि व्हिटॅमिन के शरीरामध्ये रक्ताच्या घट्ट होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
मानव शरीर हे एक यंत्रा सारखे आहे ,जसे की यंत्राला चांगले चालण्यासाठी मशीन चा वापर केला जातो तसेच शरीर रुपी यंत्राला योग्यरित्या चालण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते.नियमित व्यायाम आणि योग्य आहार आपल्याला निरोगी जीवन जगण्यास मदत करतो.
शरीरामध्ये व्हिटॅमिन ,प्रोटीन ,कार्बोहाइड्रेट चे प्रमाण योग्य प्रमाणात असेल तर आपण निरोगी राहू शकतो.

आपण या लेखामध्ये अशाच एका vitamin बद्दल म्हणजे व्हिटॅमिन के बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

  1. हृदय आणि हाडांच्या मजबुतीसाठी – हे vitamin कॅल्शियम ला हाडापासून बाहेर ठेवण्याचे काम करते.याचबरोबर रुद्याच्या झटक्या पासून हे vitamin आपल्याला लांब ठेवते.
  2. एवढेच नाही तर हे vitamin इंजीपी नावाच्या प्रोटीन बनवण्यासाठी देखील कामी येते.हे इंजिपी प्रोटीन दात , हाडे आणि कर्टिलज मधे उपलब्ध असते.
  3. हे vitamin k आपल्या शरीरातील रक्ताला घट्ट होण्यासाठी मदत करते ,ह्या व्हिटॅमिन के चे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झाले आणि चुकून आपल्या त्वचेला ब्लेड लागले तर पातळ रक्त खूप प्रमाणात बाहेर पडेल ,असे जर झाले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते ,त्यामुळे रक्त घट्ट करण्यासाठी व्हिटॅमिन के हे महत्वाची भूमिका बजावते.
  4. युरीन प्रोटीन चे उत्पादन करण्यासाठी व्हिटॅमिन के ची गरज असते आणि ह्या व्हिटॅमिन के मुळे मुतखडा बरा होऊ शकतो.हे vitamin k मुतखडा कमी करण्यामध्ये मदत करतो.
See also  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of the NPS Scheme In Marathi

एका दिवसामध्ये केवढे व्हिटॅमिन ग्रहण केले पाहिजे ?

तुम्हाला व्हिटॅमिन के च्या कमतरतेची चिंता करणे गरजेचे नाही ,कारण व्हिटॅमिन के ची कमतरता ही काही मोठी समस्या नाहीये.परंतु तुम्हाला योग्य प्रमाणात व्हिटॅमिन के चे सेवन करणे गरजेचे आहे.त्यामुळे व्हिटॅमिन के च्या पदार्थाना आपल्या आहारामध्ये सामील केले पाहिजे आणि त्या पदार्थांचे नियमित सेवन केले पाहिजे.माणसाने प्रती दिवसाला ८० मायक्रो ग्राम व्हिटॅमिन के आणि स्त्रीने प्रती दिवसाला ७० मायक्रो ग्राम व्हिटॅमिन के चे सेवन केले पाहिजे.

शरीरामध्ये व्हिटॅमिन के कमी होण्याची लक्षणे खालीलप्रमाने :

१) जखम झाल्यानंतर पातळ रक्त येणे.
२) लघवी करताना लघवी द्वारे रक्त येणे.
३) नाकातून रक्त वाहणे.
४) स्त्रियांमध्ये मासिक पाळी आल्यानंतर जास्त त्रास होणे.
तुमच्या शरीरामधे व्हिटॅमिन के ची कमतरता पडली आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यावर लवकर उपचार केला नाही तर ,तुम्हाला एन्मिया सारखा आजार होऊ शकतो.या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही दररोज च्या आहारामध्ये व्हिटॅमिन के चे सेवन केले पाहिजे.

स्रोत – vitamin k

  • आतड्यांमध्ये असणारे जिवाणू शरीरातील निम्म्या पेक्षा जास्त व्हिटॅमिन के चा पुरवठा करतात.महत्वाची गोष्ट ही की तुम्ही तुमच्या आहारामध्ये व्हिटॅमिन के चा समावेश केला पाहिजे आणि नियमित व्हिटॅमिन के चे सेवन केले पाहिजे.
  • हे vitamin k हिरव्या भाज्या ,पनीर ,कोबी,पालक ची भाजी ,सोयाबीन ,आणि ग्रीन टी मधे असते ,तुम्ही दिलेल्या गोष्टींचे नियमित सेवन केले तर तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन के चे प्रमाण नियंत्रित राहील.
  • आपले शरीर फक्त आहारा द्वारे व्हिटॅमिन के शरीरात घेऊ शकते.ह्यामुळे तुम्ही तुमच्या नियमित आहारा मधे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे.
  • व्हिटॅमिन के शरीरातील हाडांना मजबूत करण्या बरोबर आपली रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यामधे मदत करतात.त्यामुळे कोरोना सारख्या आजारापासून वाचण्यासाठी आपण व्हिटॅमिन के युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
  • एक महत्वाची गोष्ट ही की व्हिटॅमिन के चे सेवन चरबी असणाऱ्या माणसांमध्ये देखील महत्वाचे असते.तुम्हाला जर चरबी आहे ,तर तुम्ही शक्य तितका मांसाहार टाळला पाहिजे आणि शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.
  • आपण नियमित व्यायाम आणि चांगल्या आहाराचे सेवन केल्याने निरोगी आणि आनंदी राहू शकतो
See also  महाराष्ट्राच्या सुपुत्राला आले वीरमरण -Indian Army lost Subedar Ajay Shantaram Dhagale