सीआर पीएफ काॅनस्टेबल भरती – CRPF constable recruitment 2023

सीआर पीएफ काॅनस्टेबल भरती – CRPF constable recruitment 2023 in Marathi

जे उमेदवार दहावी बारावी उत्तीर्ण झाले आहेत अणि सरकारी नोकरी करु इच्छित आहे तसेच सरकारी नोकरीचा शोध घेत आहे अशा सर्व उमेदवारांसाठी एक महत्वाची सुचना आहे.

गृहमंत्रालयाने नुकतेच एक नोटीफिकेशन जारी केले आहे ज्यात असे सांगितले आहे की केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये म्हणजेच (central reserve police force) तर्फे लवकरच १.३० लाख इतक्या जीडी काॅन्स्टेबल पदासाठी भरती केली जात आहे.

या जीडी काॅन्स्टेबल पदासाठी पुरुष तसेच महिला उमेदवारांना देखील भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

ह्या नोटीफिकेशन मध्ये असे देखील सांगितले आहे की फक्त लेव्हल तीन पदासाठी यात सरळ भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की नुकतेच गृह मंत्रालयाने एक अधिसुचना म्हणजेच नोटीफिकेशन जारी केले आहे ज्यात असे स्पष्टपणे नमुद केले आहे की केंद्रीय राखीव पोलीस दलात जीडी काॅन्स्टेबल पदाच्या १,२९,९२९ इतक्या पदांची लवकरच भरती केली जाणार आहे.

या भरतीमध्ये महिला अणि पुरूष दोघे अर्ज करू शकतील महिलांसाठी यात ४,४६७ जागांसाठी भरती केली जाईल तर पुरूष उमेदवारांमध्ये १,२५,२६२ इतक्या पदांची भरती करण्यात येणार आहे.

पण यात असे देखील नमुद केले आहे की जीडी काॅन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी किमान दहा टक्के जागा ह्या भुतपुर्व् अग्नीवीरांकरीता राखीव ठेवण्यात येणार आहे.

भरतीसाठी अर्ज करायला ठेवण्यात आलेली शैक्षणिक पात्रतेच्या काही अटी –

ज्या उमेदवारांना गृहमंत्रालयाकडुन नोटीफिकेशन जारी करण्यात आलेल्या जीडी काॅन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे त्यांनी केंद्र तसेच राज्य सरकार इत्यादी पैकी मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही एका संस्था किंवा बोर्डातुन किमान दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

See also  सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणजे काय?सायबर सिक्युरिटी एक्सपर्टचे काम काय असते?सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कसे बनावे?how to become cyber security experts in Marathi

जे उमेदवार माजी लष्करी कर्मचारी आहेत अशा उमेदवारांसाठी समतुल्य सैन्य पात्रता असणे आवश्यक असणार आहे.

इतर पात्रतेच्या अटी –

ह्या भरतीसाठी फक्त भारतीय नागरिकाला अर्ज करता येणार आहे नेपाळ तसेच भुतान मधील उमेदवारांना ह्या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

ह्या भरतीसाठी ज्या माजी अग्नीवीरांनी अर्ज केला आहे त्यांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी बंधनकारक असणार आहे.

CRPF constable recruitment 2023 वयोमर्यादा अट –

जीडी काॅन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अर्ज करायला किमान वयोमर्यादा १८ अणि कमाल वयोमर्यादा २३ इतकी ठेवण्यात आलेली आहे.म्हणजे फक्त अठरा ते तेवीस वयोगटातील उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

पण जे आरक्षित गट आहे एससी एसटी त्यांना ह्या भरतीसाठी अर्ज करायला शासकीय नियमानुसार वयोमर्यादा मध्ये इतरांपेक्षा पाच वर्षे जास्त सुट दिली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.

ओबीसी गटातील उमेदवारांसाठी तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाईल?

जीडी काॅन्स्टेबल पदासाठी होत असलेल्या ह्या भरतीमध्ये सर्व पात्र उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा,शारीरिक कार्यक्षमता चाचणी,मेडिकल टेस्ट ह्या तीन गोष्टींच्या आधारावर केली जाणार आहे.

ज्या पात्र उमेदवारांची ह्या जीडी काॅन्स्टेबल पदासाठी केल्या जात असलेल्या भरती करीता अंतिम निवड केली जाईल त्यांचा प्रोबेशन पिरिअड हा दोन वर्षे इतका ठेवण्यात येणार आहे.

CRPF constable recruitment 2023 किती वेतन दिले जाणार आहे?

ज्या पात्र उमेदवारांची ह्या भरती दरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना जीडी काॅन्स्टेबल पदावर नियुक्ती झाल्यावर पे मॅट्रिक्स आधारावर २१७०० ते ६९१०० इतके मासिक वेतन प्रदान करण्यात येणार आहे.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल कुठलीही अधिकृत सुचना अद्याप शासनाने दिलेली नाहीये.

गृहमंत्रालयाकडुन लवकरच ह्या भरतीसाठी अर्ज करायला कधीपासून आरंभ होईल भरतीसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे हे सर्व उमेदवारांना सीआर पीएफच्या आॅफिशिअल वेबसाईटवर crpf.gov.in अधिकृतरित्या कळविण्यात येणार आहे.

See also  प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०२२ विषयी माहीती - PMEGP Loan Scheme 2022 Information In Marathi