थकवा येण्याची लक्षण, कारणे आणि त्यावरील उपाय – Fatigue causes, what can we do about it ?

थकवा येण्याची लक्षण, कारणे उपाय Fatigue causes, what can we do about it ?

 आज आपल्यातील खुप जणांना वारंवार थकवा येत असतो.आणि वारंवार थकवा जाणवत असल्यामुळे आपल्याला आपल्या हातात घेतलेले कार्य देखील पुर्ण करता येत नसते.याचसाठी आपण आजचे काम करणे उद्यावर टाळत असतो.

कारण आपले शरीरात इतका थकवा आणि मरगळ निर्माण होत असते की कोणतेच काम करण्यासाठी आपल्या अंगात उर्जा राहिलेली नाहीये असे आपल्याला सतत जाणवत असते.

आणि ही एका दिवसाची समस्या नसते तर रोज आपल्यासोबत असे घडत असते की जेव्हा आपण सकाळी उठुन अंघोळ वगैरे करुन फ्रेश होऊन कामाला सुरूवात करत असतो.

तेव्हा दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला शरीरात थकवा,मरगळ जाणवत असते.असे आपल्यासोबत रोज का घडते आहे?हाच प्रश्न आपल्याला नेहमी उदभवत असतो. Fatigue causes, what can we do about it ?

म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्याला वारंवार थकवा का येतो त्याची कारणे समजुन घेणार आहोत सोबतच त्यावर आपण काय उपाययोजना करायला हवी हे देखील जाणुन घेणार आहोत.

थकवा येण्याची कारणे कोणकोणती आहेत?आणि त्यावर आपण काय उपाय करायला हवेत?

 आपल्याला थकवा येण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नसते यामागे विविध कारणे असु शकतात.म्हणुन आपण आपल्याला थकवा येण्यास ज्या गोष्टी कारणीभुत असतात आपण आधी त्या कमी करायला हव्यात.

सोबतच आपला थकवा कमी व्हावा यासाठी आपण आपल्या आहारात देखील आवश्यक तो बदल करायला हवा.याने आपला थकवा कमी होण्यास मदत होत असते.

चला तर मग जाणुन घेऊया थकवा येण्याची कारणे कोणकोणती आहेत.

 

आपल्याला थकवा येण्यामागे पुढील कारणे असु शकतात:

1) रात्री झोप पुर्ण न होणे :

2) नियमित पुरेसा व्यायाम आणि कसरत न करणे :

3) आहारामध्ये पोषकतत्वांची कमतरता असणे :

4) अतिप्रमाणात व्यायाम करणे किंवा इतर शारीरीक श्रम करणे :

5) डिहायड्रेशन :

6)वाढता तणाव,चिंता आणि नैराश्य :

7) अधिक साखरयुक्त पदार्थाचे सेवण करणे :

8) मादक पदार्थांचे सेवन तसेच चहा काँफीचे अतिसेवण करणे:

 

1)रात्री झोप पुर्ण होणे :

See also  अरूण गांधी कोण होते? Mahatma Gandhi grandson Arun Gandhi information in Marathi

डाँक्टरांचे देखील असे सांगणे आहे की आपण कमीत कमी 7 ते 8 तास झोप ही घ्यायलाच हवी.पण आपण रात्रभर टिव्ही पाहत बसतो.

किंवा मोबाईलवर रात्रभर चँट करत बसतो.ज्याने आपली झोप पुर्ण होत नसते.आणि सकाळी आपल्याला अनफ्रेश वाटते काम करताना आळस येत असतो तसेच थकवा देखील जाणवत असतो.

याचसोबत रात्री टेंशनमध्ये झोप पुर्ण न झाल्याने व रात्री टेंशनमध्ये विचार करता करता मेंदु खुप अतिप्रमाणात थकुन गेल्याने देखील आपल्याला थकवा जाणवत असतो.

उपाय :

 • रात्री झोप पुर्ण व्हावी यासाठी आपण रात्री अपरात्रीपर्यत टिव्ही बघत बसणे,मोबाईलवर चँट करत बसणे टाळायला हवे आणि रात्री लवकर झोपायला हवे याने आपली झोप पुर्ण होते आणि दुसरयादिवशी आपल्याला अनफ्रेश वाटत नसते तसेच थकवा आणि आळस देखील जाणवत नसतो.
 • रात्री कोणताही विचार न करता टेंशन न घेता आपण शांतपणे झोपायला हवे जेणे आपला मेंदु सकाळपर्यत शांत होऊन जात असल्याने आपल्याला जोमाने न थकता काम करता येते.

 

2) नियमित पुरेसा व्यायाम आणि कसरत करणे : आपल्याला जर आपले शरीर उत्साही,आनंदी निरोगी आणि स्फुर्तीशील ठेवायचे असेल तर आपण रोज सकाळी कमीत कमी 15 ते 20 मिनिट

व्यायाम करायलाच हवा.

कारण व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया देखील चांगली राहत असते.आणि आपल्या शरीरातील सर्व पेशी देखील व्यवस्थित कार्य करत असतात.

ज्याने आपण रोज दिवसभर काम करताना उत्साही आणि आनंद राहत असतो.पण नियमित पुरेसा व्यायाम तसेच कसरत न केल्याने आपल्या शरीराला शारीरीक मेहनत अणि कसरतीची सवय नसते.

 

ज्या परिणाम स्वरूप आपण कोणतेही शारीरीक मेहनत तसेच कसरतीचे काम करावयास घेतले तर ते करताना आपले शरीर आणि मेंदु लगेच थकुन आपण लगेच दमुन जातो किंवा आपल्याला थकवा येत असतो.

उपाय :

 • आपले शरीर फिझीकल अँक्टिव्हिटी करताना स्फुर्तीशील असावे यासाठी आपण रोज सकाळी कमीत कमी 10 ते 15 मिनिट व्यायाम करायला हवा.
 • याने आपल्या शरीराला मेहनत आणि कसरतीची सवय लागत असते आणि कोणतेही काम करताना आपण लगेच दमुन तसेच थकुन जात नसतो आणि उत्साही तसेच आनंदी राहत असतो.म्हणुन आपण नेहमी रोज सकाळी पुरेसा व्यायाम तसेच कसरत करायला हवी.
See also  आरोग्यासाठी भुईमूग - Health benefits of in Groundnut

 

3) आहारामध्ये पोषकतत्वांची कमतरता असणे :

 आहारामध्ये पोषणतत्वांचा समावेश न केल्यामुळे देखील आपले शरीर लवकर थकत असते.कारण आपण जे अन्न सेवन करतो त्यातुन आपल्याला आपल्या शरीरास आवश्यक असलेली प्रोटीन,व्हिटँमिन,मिनरल्स,कँल्शिअम पोटँशिअम इत्यादी पोषकतत्वे प्राप्त होत असतात.

 

ज्याने आपले शरीराची वाढ ही व्यवस्थित होते.आणि आपल्या शरीरात भरपुर उर्जा आणि उत्साह राहत असतो.पण आपण ही सर्व पोषकतत्वे आहारातुन सेवन न करता फास्ट फुड तसेच इतर तळलेल्या पदार्थाचे सेवन करत असतो आणि हे सर्व पदार्थ जड असल्याने आपले शरीर जड पडत असते आणि ह्याच कारणाने कोणतेही काम करताना आपल्याला लवकर थकवा येत असतो.

उपाय :

 • आपण आपल्या आहारामध्ये व्हिटँमिन,प्रोटीन,मिनरल्स,कँल्शिअम इत्यादी सर्व पौष्टिक तत्वांचा समावेश असलेल्या आहाराचा समावेश करायला हवा.आणि अधिक फास्टफुड तेलगट अन्नपदार्थ वगैरे खाणे टाळायला हवे.

 

4) अतिप्रमाणात व्यायाम करणे किंवा इतर शारीरीक श्रम करणे :

 आपल्या शरीराला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा मानवत नसतो मग तो अतिरेक पोषकतत्वांचे सेवण करण्याचा असो किंवा व्यायाम तसेच कसरत करण्याचा असो.

 

जशी जेवण करण्याबाबद आपल्या शरीराची एक मर्यादा असते तशीच व्यायाम करण्याबाबद देखील आपल्या शरीराची एक मर्यादा असते आणि त्यापलीकडे जाऊन आपण कसरत तसेच व्यायाम केला तर अशा परिस्थितीत अति कसरतीमुळे देखील आपले शरीर लवकर थकत असते.

उपाय :

 • रोज आपल्या शरीराला मानवेल एवढाच व्यायाम तसेच कसरत आपण करायला हवी.शरीरावर अधिक प्रमाणात ताण देऊ नये.

 

5) डिहायड्रेशन :

 आपण पुरेशा प्रमाणात पाणी न पिल्याने देखील डिहायड्रेशनची समस्या निर्माण होत असते.

जसजशी आपल्या वयात वाढ होते तसतसे आपण पाणी पिण्याचे प्रमाण कमी करत असतो ज्याचे परिणामस्वरूप आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उदभवत असते.आणि शरीराला थकवा जाणवत असतो.

उपाय :

 • आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणुन आपण रोज पुरेशा प्रमाणात पाणी पित राहायला हवे.तसेच बाहेर जाताना देखील पाण्याची बा़ँटल जवळ बाळगायला हवी.
See also  जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये -World Earth day quotes and slogan in Marathi

 

6) वाढता तणाव,चिंता आणि नैराश्य :

 जेव्हा आपल्या शरीरात अधिक तणाव चिंता आणि नैराश्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढत असतात तेव्हा आपल्या शरीरातील उर्जा मेंदुची उर्जा ही कमी कमी होत जात असते.आणि आपण नैराश्यात राहिल्याने आपल्याला कोणतेही कार्य पुर्ण करण्यासाठी शरीरात पाहिजे तेवढी उर्जा ही जाणवत नसल्याने आपल्याला लगेच थकवा तसेच मरगळ येत असते.

उपाय :

 • आपण नेहमी तणावमुक्त आणि आनंदी राहायला हवे
 • तणावमुक्त होण्यासाठी आपण रोज मेडिटेशन करायला हवे.आणि सकारात्मक विचार करायला हवा.
 • तसेच नैराश्यातुन बाहेर पडण्यासाठी महापुरुषांवर महान व्यक्तींवर लिहिलेली प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करायला हवे.लेख वाचायला हवेत.तसेच मोटिव्हेशनल व्हिडिओ बघायला हवेत कारण याने देखील आपले नैराश्य काही प्रमाणात दूर होत असते.

7)अधिक साखरयुक्त पदार्थाचे सेवण करणे :

 अधिक साखरयुक्त पदार्थाचे आपण सेवन केले तर आपल्याला मरगळ तसेच थकवा येत असतो.

उपाय :

अधिक साखरयुक्त पदार्थाचे आपण सेवन केल्याने  आपल्याला मरगळ तसेच थकवा जाणवत असतो म्हणुन आपण अधिक साखरेचे प्रमाण असलेले अन्नपदार्थ खाणे देखील टाळायला हवे.

 

8) मादक पदार्थाचे सेवन तसेच चहा काँफीचे अति सेवन करणे :

 दारू सिगारेट विडी यासारख्या मादक पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या मेंदु आणि शरीराला हानी पोहचत असते.आपले शारीरीक आणि मानसिक स्वास्थय चांगले राहत नसते.ज्यामुळे देखील आपली झोप पुर्ण होत नसते.आणि मग दुसरया दिवशी आपल्याला थकवा जाणवत असतो.

किंवा रात्री जास्त चहा किंवा काँफीचे सेवन केल्याने देखील आपली झोप पुर्ण होत नसते.कारण चहा आणि काँफीमध्ये काही असे घटक असतात ज्याने आपल्या डोळयावरची झोप उडुन जात असते.

 आणि आपण रात्री उशिरापर्यत जागे राहत असतो आणि मग रात्री लेट झोपल्याने आणि सकाळी लवकर उठल्याने आपल्याला झोप पुर्ण न झाल्याने डोक जड पडत असते तसेच दिवसभर थकवा देखील जाणवत असतो.

उपाय :

 • कुठल्याही अंमली तसेच मादक पदार्थाचे सेवण करू नये.
 • दिवसा अधिक चहा काँफी घेणे टाळावे तसेच रात्री झोपण्याच्या वेळी चहा तसेच काँफी पिणे देखील टाळायला हवे.