पहिली जागतिक बौदध शिखर परिषद 2023 चे स्वरुप कसे असणार आहे. – First Global Buddhist Summit 2023 Information In Marathi

पहिली जागतिक बौदध शिखर परिषद 2023 चे स्वरुप कसे असणार आहे. – First Global Buddhist Summit 2023 Information In Marathi

20 एप्रिल 2023 रोजी पहिले जागतिक बौदध शिखर परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या बौदध शिखर परिषदचे उद्घाटन केले जाणार आहे.

First Global Buddhist Summit 2023 Information In Marathi
First Global Buddhist Summit 2023 Information In Marathi

ही जागतिक बौदध शिखर परिषद दोन दिवसांसाठी म्हणजे 20 एप्रिल अणि 21 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.

सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या जागतिक बौदध शिखर परिषदचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या जागतिक बौदध शिखर परिषदेत ३० पेक्षा अधिक देशातील,जगभरातील विदवान व्यक्ती प्रतिनिधी नेते अणि बौदध धर्मातील प्रमुख अनुयायी देखील सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ह्या पहिल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील जागतिक बौदध शिखर परिषदचे आयोजन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केले जात आहे.

ह्या जागतिक बौदध शिखर परिषदेमध्ये खालील दिलेल्या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

  • बौदध धर्म अणि शांती
  • बौद्ध धर्म पर्यावरणीय संकट आरोग्य आणि टिकाऊपणा स्थिरता
  • नालंदा बौदध परंपरेचे जतन तसेच संरक्षण
  • बौद्ध धर्म तीर्थक्षेत्र जिवंत वारसा आणि बौद्ध अवशेष

वरील दिलेल्या काही महत्त्वाच्या विषयांवर ह्या जागतिक बौदध शिखर परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे.

जागतिक बौदध शिखर परिषदेच्या आयोजनाचा मुख्य हेतु काय आहे?

बौद्ध विदवान व्यक्ती आणि बौदध धर्मगुरू यांच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवर मंच स्थापित करण्यासाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी २० एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान ही जागतिक बौदध शिखर परिषद भरवली जात आहे.

तसेच,२० एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान भरवल्या जात असलेल्या हया जागतिक शिखर परिषदेदवारे भारताला बौद्ध धर्मात चिन्हांकित करण्यात येणार आहे कारण बौद्ध धर्माचा जन्म हा आपल्या भारत देशामध्ये झाला होता.

See also  आमच्या पप्पांनी गणपती आणला Lyrics - Aamchya Pappani Ganapati Aanla Lyrics In Marathi

हया जागतिक शिखर परिषदेदवारे भारत देश इतर देशांसोबत असलेल्या आपल्या सांस्कृतिक अणि राजनैतिक संबंधांमध्ये वाढ करणार आहे असे देखील सांगितले जाते आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुरोगामी भारताला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात आपला इतिहास स्मरणात ठेवण्यासाठी आणि हा आनंद साजरा करण्यासाठी सरकारने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ आॅगस्ट २०२३ पर्यंत संपुर्ण देशात साजरा केला जाणार आहे.

ह्या आयोजित केल्या जात असलेल्या जागतिक शिखर परिषदेत जागतिक पातळीवरील प्रश्नांवर बौदध धर्माच्या दृष्टीकोनातुन चर्चा केली जाणार आहे असे सांगितले जाते आहे.

ह्या दोन दिवसांसाठी आयोजित केल्या जात असलेल्या जागतिक बौदध शिखर परिषदेत व्हिएतनाम बौदध संघाचे थीच ट्राई क्वांग अणि प्रोफेसर राॅबट गुरमैन हे प्रमुख वक्ताच्या भुमिकेत असणार आहे.