शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठी अपडेट
शैक्षणिक शुल्कावर देखील कराची आकारणी
इतर सर्व ठिकाणांसोबत आता शाळा महाविद्यालयांमध्ये देखील शैक्षणिक शुल्कावर कर आकारला जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाने आपले एक सरक्युलर जारी केले आहे.ज्यात शैक्षणिक शुल्कावर विद्यार्थ्यांना कर आकारला गेला आहे.
हा कर सुमारे १७ ते १८ टक्के इतका आकारण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांदवारे सांगितले जात आहे.हया परिपत्रकात असे नमुद केले आहे की विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक शुल्कांवर १७ ते १८ टक्के इतक्या कराची आकारणी केली जात आहे.
ह्या खळबळजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.आता शाळा महाविद्यालयात आकारल्या जात असलेल्या शैक्षणिक शुल्कांवर देखील आम्हाला कर भरावा लागणार का?असा सवाल ह्या घटनेमुळे सर्वांच्या मनात निर्माण व्हायला लागला आहे.
अणि गोंडवाना विद्यापीठ हे गा्मीण भागात वसलेले विद्यापीठ आहे जिथे सर्व ग्रामीण तसेच आदिवासी भागातील विद्यार्थी अधिक शिक्षण घेताना दिसुन येतात.
ह्या विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च करण्यासाठी ससेहोलपट होते.
अशातच जीएसटीचा पडलेला हा अतिरीक्त आर्थिक भार त्यांना सहन होणार का हा एक महत्वाचा विषय आहे.