होळी २०२३ कधी आहे
हिंदू दिनदर्शिकेनुसार होळीचा सण भारतात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये साजरा होणारा हा सण आजकाल भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही साजरा केला जातो जसे: पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा आणि युरोप. आज या लेखात आम्ही तुम्हाला होळी दहनाचा शुभ काळ, इतिहास, महत्त्व आणि शुभेच्छांबद्दल सांगणार आहोत.
उत्सवाचे नाव | होळी २०२३ |
धार्मिक अनुयायी | हिंदू (आजकाल सर्व धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात) |
वस्तुनिष्ठ | धार्मिक निष्ठा, उत्सव आणि मनोरंजन |
तारीख | फाल्गुन महिन्याची पौर्णिमा |
2023 मध्ये कोणत्या तारखेला होळी आहे | ८ मार्च २०२३ |
होळी २०२३ कधी आहे, तारीख आणि शुभ वेळ काय आहे
होळी २०२३ यावेळी ८ मार्च २०२३ रोजी आहे आणि होळी दहनचा शुभ मुहूर्त ७ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत असेल, बाकी तुम्ही तुमच्या जवळच्या पंडितांकडून आधिक माहिती घेऊ शकता
होळीचा इतिहास | मराठीमध्ये होळीचा इतिहास
एकेकाळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याने पृथ्वीचे राज्य जिंकले होते.
हिरण्यकश्यप राजा इतका अहंकारी होता की त्याने आपल्या राज्यात असे सांगितले की फक्त त्याचीच पूजा सर्वांनी करायची दुसरा कोणाची पूजा करण्यास सक्त मनाई होती. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद ही गोष्ट मानत नव्हता. प्रल्हाद फक्त नारायण देव यांची पूजा करत होता हे हिरण्यकश्यपला बिलकूल आवडले नव्हते. हिरण्यकश्यप ने प्रल्हाद ला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नेहमी विष्णू देव त्याला वाचवून घ्यायचे.
नंतर हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकाला सांगितले की प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसायला. कारण की होलिकाला वरदान होते की तिला अग्नीमध्ये काही होत नव्हते. विश्वासघाताने होलिकाने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला. आख्यायिका अशी आहे की होलिकाला या अशुभ इच्छेमुळे प्राण गमवावे लागले.
कारण की होलिकाला माहीत नव्हते की तिने फक्त एकटीने अग्निप्रवेश केल्यावरच ते वरदान काम करत होते. प्रल्हाद नारायण देवाचे नामस्मरण करत असताना सुखरूप अग्नीच्या बाहेर आला. त्यामुळे होळीला होलिका हे नाव पडले. म्हणून आपण होलिकादहन सण साजरा करतो कारण की वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण होलिका दहन सण साजरा करतो.
होळी हा सण का साजरा केला जातो
प्राचीन काळापासून संपूर्ण भारतात रंगांचा सण साजरा केला जातो. मुळात हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव साजरा करणारा कृषी सण होता. हे हिवाळ्यातील उदासपणा दूर करण्याचे आणि वसंत ऋतूच्या जिवंतपणाचा आनंद घेण्याचा सन होय. होलिकादहन सण साजरा करतो कारण की वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण होलिका दहन सण साजरा करतो.
होळी हा सण कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये खेळला जातो
होळी हा सण देशभरामध्ये साजरा केला जातो तरीपण काही राज्यांमध्ये हा खूप आधीपासून हा सण प्रचलित आहे.
महाराष्ट्र,पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, बंगाल, मनिपुर, केरळ, बिहार, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
होळी हा सण विविध राज्यांमध्ये कोणत्या नावाने साजरा केला जातो आपण खालील प्रमाणे बघू शकता.
गोवा | शिग्मो |
पंजाब | होला मोहल्ला |
केरळ | मंजाल कुली |
बिहार | फागुवा |
उत्तराखंड | खडी होली- कुमाऊ |
उत्तर प्रदेश | लाठमार होली- बरसाना |
बंगाल | बसंत उत्सव, दोल जत्रा |
मणिपूर | याओसांग |
आसाम | फाकुवा |