१४६ वाक्यप्रचार त्यांचा अर्थ अणि वाक्यात उपयोग -marathi vakprachar

१४६ वाक्यप्रचार त्यांचा अर्थ अणि वाक्यात उपयोग

१)गराडा पडणे -घेराव पडणे,भोवती जमणे

-सचिनला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातला.

२)कबुल करणे -मान्य करणे

रोहितने तो खोटे बोलतो आहे याची कबुली पोलिसांसमोर केली.

३) प्रचिती येणे – अनुभव येणे

आपण चांगले काम केल्यास देव सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो याची प्रचिती आज मला आली.

४) नकार देणे – नाही म्हणने

आईने अमृताला टीव्ही बघण्यास नकार दिला.

५) वणवण करणे – फिरणे, भटकंती करणे

गावात पाण्याची सोय नसल्याने शांता बाईंना पाण्यासाठी वणवण करावी लागली.

६) बाचाबाची होणे -शाब्दिक भांडण होणे

राहुल अणि दिनेश या दोघांमध्ये खेळा दरम्यान बाचाबाची झाली.

७) दिलासा मिळणे – धीर प्राप्त होणे

परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने अर्णवला दिलासा मिळाला.

८) जाहीर करणे – सर्वांना सांगणे

निबंध स्पर्धेत समीरचा पहिला नंबर आला असे मुख्याध्यापकांनी जाहीर केले.

९) टाके घालणे -शिवणे,हातशिलाई करणे

रामरावांनी आपल्या फाटलेल्या सदरयाला टाके घातले.

१०) खजील होणे – शरम वाटणे

राहुलचे खोटे बोलणे सरांनी पकडल्याने तो खजिल झाला.

११) फस्त करणे -खाऊन टाकणे

शेतात घुसलेल्या बिबट्याने सर्व गायी म्हशी बकरया फस्त करून टाकल्या.

१२) हस्तगत करणे -ताबा मिळवणे

चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केला.

१३) स्वैर हिंडणे – मोकाट फिरणे

शाळा बुडवून राहुन टवाळक्या करत रस्त्यावर मोकाट फिरत होता.

१४) भान हरपणे – गुंग होणे

क्रिकेट खेळताना समीरचे भान हरपले.

१५) डोळे दिपणे -आनंदाने डोळे चमकणे

मुलाला प्राप्त झालेले यश पाहुन आईवडिलांचे डोळे दिपले.

१६) वकिली करणे – समर्थन करणे

बहिणीने भावाची वकिली आई वडिलांसमोर केली.

१७) ये जा करणे – येणे जाणे करणे

अरूप नेहमी काॅलेजहुन बसनेच ये जा करतो.

१८) डोळे ओले होणे – रडणे

लहान मुलावर जोरात ओरडल्याने त्याचे डोळे ओले झाले.

१९) हताश होणे – निराश होणे

शेतात पेरलेले बियाणे उगवले नाही म्हणून शेतकरी हताश झाला.

२०) आनंदाचा वर्षाव होणे -खुप आनंद होणे

परीक्षेत यश प्राप्त करत परत आलेल्या शर्वरीवर आईने आनंदाचा वर्षाव केला.

२१) चक्कर मारणे – इकडुन तिकडे फिरणे

रमेश सुरेशच्या घराभोवती चक्कर मारत होता.

२२) खंत वाटणे – वाईट दुखणे

खुप अभ्यास करूनही परीक्षेत कमी गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली.

२३) नकारार्थी मान हलवणे – नाही म्हणने

साखर खाल्ली का विचारताच राजुने आईसमोर नकारार्थी मान हलवली.

२४) क्षमा मागणे – माफी मागणे

आजीबाईला सायकलचा धक्का लागल्याने मी त्यांची माफी मागितली.

२५) हातभार लावणे -मदत मिळणे,मदत प्राप्त होणे

गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी हातभार लावला.

२६) धुम ठोकणे -जोरात पळुन जाणे

पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात करताच सर्व जमावाने धुम ठोकली.

२७) प्रस्ताव समोर येणे -योजनाबदध मांडणी करणे

पुरग्रस्तांसाठी सहायता निधी उभारण्याचा सरकारने प्रस्ताव समोर आणला.

२८) मनाई असणे – बंदी असणे

पावसामुळे लोकांना घराबाहेर पडण्यास हवामान खात्याने मनाई केली.

२९) निंदा करणे – टिका करणे

खोटे बोलल्याने अमीतची सर्वत्र निंदा करण्यात आली.

३०) आश्वासन देणे – हमी देणे

राहुलने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचे आश्वासन दिले.

३१) मन वळवणे -एखादया कामासाठी मन तयार करणे

नोकरी करण्यासाठी अखेरीस आईने मुलाचे मन वळवले.

३२) नात्यातील वीण गहिरी असणे -घटट नाते असणे

नेहा अणि आरूषी या दोघींमधील नात्याची वीण गहिरी होती.

३३) भास होणे – भ्रम होणे

घरात एकटे बसलेल्या स्मिताला घरात कोणीतरी असल्याचा भास झाला.

३४) खंड पडणे – मध्येच थांबणे

आशिष कधीही त्याच्या व्यायामात खंड पडु देत नाही.

३५) लुप्त होणे – नाहीसे होणे

सध्या एकत्र कुटुंब पद्धती घराघरांतून नाहीशी होत चालली आहे.

३६) ताव मारणे – भरपुर खाणे

कालपासून उपाशी असलेल्या उमेशने जेवायला बसताच भाकरीवर ताव मारला.

३७) विळखा घालणे – चहुबाजूंनी गच्च आवळणे

रात्री चोरी करण्यास आलेल्या चोराच्या भोवती सर्व जमावाने विळखा घातला.

३८) दाह होणे – आग होणे, जळजळ होणे

See also  विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का? -What is the Right Time for Preparation for Civil services exams

डोळ्यात धुर गेल्याने शामरावांच्या डोळ्यात दाह झाला.

३९) पाय धरणे – शरण जाणे

पैशांसाठी शेतकरयांनी सावकाराचे पाय धरले.

४०) हाणुन पाडणे – निष्फळ करणे, बंद करणे

पोलिसांनी चोरांचा चोरी करण्याचा डाव हाणुन पाडला.

४१) वाट वाकडी करणे – वाट बदलुन दुसरीकडे जाणे

बाईंनी शाळेत न येणारया राधाच्या घराकडे वाट वाकडी केली.

४२) हायसे वाटणे – बरे वाटणे

गोठ्यात लागलेल्या आगीत गायी वासरांना काही झाले नाही हे पाहुन रामरावांना हायसे वाटले.

४३) दुम नसणे – पत्ता नसणे

अमोलने पाळलेल्या कुत्र्याचा बरेच दिवस दुम नव्हता.

४४) निपचित पडणे – हालचाल न करता पडुन राहणे

आजारी गाय निपचित पडलेली होती.

४५) जिवाचा धडा करणे -धीर‌ एकवटणे

मीरा जिवाचा धडा करत एकटीच लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेली.

४६) जीवाचे रान करणे – खुप कष्ट सोसणे

स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी लाखो विद्यार्थी जिवाचे रान करतात.

४७) तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे

मटण पाहताच राहुलच्या तोंडाला पाणी सुटले.

४८) झुंज देणे – लढा देणे

भारतीय सैन्याने शत्रुच्या सैन्याशी झुंज दिली.

४९) फडशा पाडणे – संपवून टाकणे

सर्वांनी मिळून कामाचा फडशा पाडला.

५०) डोळे निवणे – समाधान वाटणे

शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा बघताच माता जिजाऊंचे डोळे निवले.

५१) किंमत ओळखणे – महत्व कळणे

अमरने वेळेची किंमत ओळखली.

५२) गर्क असणे – मग्न राहणे, गुंतुन राहणे

आर्क मिडीज नेहमी आपल्या प्रयोगशाळेत गर्क असायचे.

५३) दाद लागु न देणे – माहीती होऊ न देणे

चोराने आपल्या इतर साथीदारांविषयी पोलिसांना जराही दाद लागु दिली नाही.

५४) जाळ्यात अडकणे- पकडणे,मोहात पाडणे

हॅकर्स दिवसेंदिवस मोबाईल वापरकर्त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून जाळ्यात अडकवत आहे.

५५) दंड थोपटणे -आव्हान देणे

दहशतवाद्यां विरूद्ध लढा देण्यासाठी भारतीय सैन्य दंड थोपटुन मैदानात उभे राहिले.

५६) जोड मिळणे – सहकार्य मिळणे,मदत मिळणे

पतीच्या निधनानंतर राधाबाईला भावाची जोड मिळाली म्हणून ती आपल्या मुलांचा सांभाळ करू शकली.

५७) दवंडी पिटणे – जाहीर करणे, सर्वांना जाहीरपणे सांगणे

लहान मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी शासनाने गावभर दवंडी पिटली.

५८) डोळ्यात अंगार भडकणे – अतोनात संताप येणे

जालियनवाला बाग हत्याकांडामुळे सर्व भारतीयांच्या डोळ्यात अंगार भडकली.

५९) तोंड सुकणे – निस्तेज होणे

बरेच दिवस नोकरी बघण्यासाठी हिंडुनही नोकरी न प्राप्त झाल्याने राहुलचे तोंड सुकले.

६०) डोळे खिळणे – थक्क होऊन एकटक पाहत राहणे

साप अणि मुंगुस यांची लढाई बघुन सर्वांचे डोळे खिळले.

६१) धडकी भरणे – खुप भीती वाटणे

अचानक समोर साप पाहताच रमेशला धडकी भरली.

६२) डोळे झाकुन जाणे – बिनधास्तपणे निश्चिंत होऊन जाणे

लहान मुल आईवडिलांच्या मागुन बिनधास्तपणे डोळे झाकून जातात.

६३) धाव घेणे – मनाच्या ओढीने जाणे

शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून सचिन येणार हे कळताच सर्वांनी तिकडे धाव घेतली.

६४) डोळे विस्फारणे – आश्चर्याने पाहणे

गावाकडुन पहिल्यांदा शहरात गेलेल्या रोहनचे तेथील उंच उमारती पाहुन डोळे विस्फारले.

६५) भंडावून सोडणे -गोंधळुन टाकणे, हैराण करणे

लहान मुले आईवडिलांना अगदी भंडावून सोडतात.

६६) नाद असणे – छंद असणे,खुप आवड असणे

सुमितला नेहमी नृत्य करण्याचा नाद आहे.

६७) पाठ थोपटणे – शाबासकी देणे

परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्याने सर्वांनी माझी पाठ थोपटली.

६८) बस्तान बसवणे -स्थिर होणे जम बसवणे

सर्व भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला आपले दुकान मांडुन आपला जम बसवला.

६९) नाव सोनेरी अक्षरात उमटणे – किर्ती होणे, अजरामर होणे

क्रिकेटच्या जगतात सचिनचे नाव सोनेरी अक्षरात उमटले आहे.

७०) पाय न ठरणे -सतत भटकत राहणे

अर्णवला खेळण्याचे इतके वेड आहे की त्याचा घरामध्ये पायच टिकत नाही.

७१) धारातीर्थी पडणे – युदधात वीरमरण येणे

देशासाठी सीमेवर शत्रुशी लढता लढता अनेक सैनिक धारातीर्थी पडले.

७२) चेहरा पडणे – लाज वाटणे शरम वाटणे

पोलिसांची गाडी बघताच चोरांचा चेहरा पडला.

७३) तोंड देणे – सामना करणे

सुमनने गरिबीला तोंड देत तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

See also  सर्दीवर करावयाचे घरगुती उपाय -Home remedies for cold

७४) छाती दडपणे- भीती वाटणे

प्रचंड मोठा साप पाहुन राहुलची छाती दडपली.

७५) पोपटपंची करणे – अर्थ लक्षात न घेता पाठ केलेले म्हणून दाखवणे

सोहमने सर्व प्रश्नांच्या उत्तरांची पोपटपंची केली.

७६) पाठ देणे – शिकवण देणे

अर्थवला घरातच आईवडिलांनी प्रामाणिक पणाचा पाठ दिला.

७७) मनावर न घेणे – दुर्लक्ष करणे

काही विद्यार्थी परीक्षा जवळ आली तरी अभ्यासाचे मनावर घेत नाहीत.

७८) हसुन पोट दुखणे -खुप खुप हसणे

विदुषकाचे खेळ पाहुन आमचे हसुन पोट दुखले.

७९) मार्ग सापडणे – रस्ता मिळणे

चोराला पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग सापडला.

८०) सोने पिकणे – धान्य उगवणे

रात्रंदिवस केलेल्या कष्टामुळेच शेतात सोने पिकते.

८१) अभय देणे – रक्षणाची तसेच शिक्षा न होऊ देण्याचे आश्वासन तथा खात्री देणे

शिवाजी महाराज आपणास शरण आलेल्या शत्रुला नेहमी अभय देत होते.

८२) घोकंपट्टी करणे – अर्थ समजून न घेता पाठ करणे

अनुपने पाढयांची घोकंपट्टी केली.

८३) उलथून पाडणे -संपुर्ण कोसळुन टाकणे,समुळ नष्ट करणे

चक्रीवादळात सर्व घरे उलथुन पडली.

८४) उखडून टाकणे – उपटुन फेकणे

भारतीय सीमेवर घुसुन आलेल्या घुसखोरांना भारतीय सैन्याने उखडुन टाकले.

८५) घाम जिरवणे – कष्ट करणे

शेतकरी रोज दिवसरात्र शेतात घाम जिरवतात तेव्हा कुठे आपणास अन्न प्राप्त होते.

८६) उर भरून येणे -आनंदाने अभिमानाने गदगदुन येणे

आपल्या मुलाचा फोटो वर्तमानपत्रात पाहुन आईवडिलांचा उर भरून आला.

८७) घात करणे – नाश करणे, नुकसान करणे

फितुरांनी घात केल्याने संभाजी महाराज मोगलांच्या ताब्यात सापडले.

८८) कटाक्ष टाकणे – डोळ्यांच्या कोपरयातुन नजर फिरवणे

शिक्षकांनी एक कटाक्ष टाकताच सर्व वर्गातील विद्यार्थी शांत झाले.

८९) घर चालणे – कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे

वडिलांच्या पेंशनवर राहुलचे घर चालते.

९०) कानोसा घेणे – अंदाज घेणे,चाहुल घेणे

खैरणार आजी नेहमी आपल्या शेजारयांच्या घरात काय चालले आहे याचा कानोसा घेत असतात.

९१) भुवया उंचावणे -आशचर्य किंवा नाराजी व्यक्त करणे

शिक्षकांनी भुवया उंचावल्याने अणि वर्गातील गडबड थांबली.

९२) पित्त खवळणे – खुप राग येणे

आपल्या मुलाने आपल्याशी खोटे बोलल्याने आईवडिलांचे पित्त खवळले.

९३) हुलकावणी देणे – चकवणे,फसवणे

दरोडेखोरांच्या टोळीने पोलिसांना हुलकावणी देत त्यांच्या ताब्यातुन पळ काढला.

९४) मात्रा न चालणे -इलाज न चालणे

औरंगजेबाने मराठयांचे साम्राज्य खुप प्रयत्न केले पण शिवरायांच्या समोर त्याची मात्रा चालली नाही.

९५) पोटाशी धरणे -जवळ घेणे,माया करणे

वडिलांनी रागावल्यावर सुरेश रडायला लागला म्हणून आईने त्याला पोटाशी धरले.

९६) सैरावैरा पळणे -वाट मिळेल तिकडे घाबरत पळत सुटणे

पोलिसांची गाडी येताच दरोडेखोर वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळत सुटले.

९७) माग काढणे – शोध घेणे

पोलिसांनी दिवसरात्र चौकशी करत चोराचा माग काढला.

९८) वतन राखणे – जमिनीची जपणुक करणे

धोंडीबाने जीवापाड वतन राखले पण सावकाराने ते त्याच्यापासून लुबाडले.

९९) हात जोडणे – नमस्कार करणे

अतुल रोज सकाळी अंघोळ वगैरे झाल्यावर देवापुढे हात जोडतो.

१००) रात्रंदिवस घाम गाळणे -दिवसरात्र खुप कष्ट करणे

शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून शेतात घाम गाळतो.

१०१) धाबे दणाणने – खुप भीती वाटणे

अचानक समोर बिबट्या दिसताच माझे धाबे दणाणले.

१०२) पोटात घाबरा पडणे – खुप घाबरणे

अचानक नदीला आलेला भयंकर पुर बघुन नेहाच्या पोटात घाबरा पडला.

१०३) पायाखालची जमीन हादरणे -भीतीने सुचेनासे होणे

आपल्या मुलावर वीज कोसळुन तो दगावला हे ऐकताच शामरावांच्या पायाखालची जमीन सरकली.

१०४) प्रसंगावधान राखणे-तत्परतेने निर्णय घेणे

संकटकाळी प्रसंगावधान राखणे अधिक फायदेशीर ठरते.

१०५) काळजात धस्स होणे -खुप घाबरणे

अंगनात खेळत असलेल्या बाळ अचानक दिसेनासे झाले अणि आईच्या काळजात धस्स झाले.

१०६) भेदरलेल्या नजरेने पाहणे – घाबरलेल्या नजरेने पाहणे

वाड्याला लागलेल्या भयंकर आगीकडे लोक भेदरलेल्या नजरेने बघत होते.

१०७) डोळे पाणावणे – डोळ्यात अश्रु येणे

खुप दिवसांनी मुलाला बघितल्यावर आईवडिलांचे डोळे पाणावले.

१०८) प्रसंगाचे गांभिर्य जाणने -परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे

प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेऊन पुरग्रस्तांना शासनाने मदत केली.

See also  राजु श्रीवास्तव विषयी माहीती - Raju Srivastav Information In Marathi

१०९) मार्गी लावणे -नीट व्यवस्थित करणे

वडिलांनी घरी आलेल्या पाहुण्यांचा आदरसत्कार केला अणि त्यांना मार्गी लावले.

११०) ठावठिकाणा नसणे – पत्ता न सापडणे

आज पावसाचा कुठलाही ठावठिकाणा नाहीये.

१११) ध्यान लावणे – डोळे मिटून एकाग्र होणे

जंगलात संत ध्यान लावून तपस्या करीत बसले होते.

११२) निरूत्तर होणे -उत्तर न सुचणे

शिक्षकांनी प्रश्न विचारताच सर्व विद्यार्थी निरूत्तर झाले.

११३) गुजरान करणे – पोट भरणे

हमाली काम करून रामुकाका आपले गुजरान करतात.

११४) आत्मसात करणे – मिळवणे

गौरीने चित्रकलेच्या सोबत नृत्यकला देखील आत्मसात केली आहे.

११५) सहभागी होणे – सामील होणे

स्वच्छता अभियानात सर्व गावचे लोक सहभागी झाले.

११६) गौरव करणे- सन्मान करणे

निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या दिपकचा मुख्याध्यापकांनी गौरव केला.

११७) तल्लीन होणे – गुंग होणे

पुस्तक वाचन करताना सुहास नेहमी तल्लीन होऊन जातो.

११८) तहानभूक हरपणे – तहानभूक विसरणे

वाचन करताना बाबासाहेब आंबेडकर त्यांची तहानभूक हरपून जायचे.

११९) वाहवा मांडणे – स्तुती करणे

धावण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या सुहासची सगळयांनी वाहवा केली.

१२०) दाह होणे – आग आग तसेच जळजळ होणे

जखमेवर मलम लावताना शरीराचा दाह होतो.

१२१) सार्थकी लागणे- धन्यता पावणे

मुलगा शिकुन मोठा अधिकारी झाल्याने आईवडिलांच्या कष्टाचे सार्थक झाले.

१२२) गणती करणे – मोजणी करणे

शिक्षकांनी वर्गात येताच उपस्थित विद्यार्थ्यांची गणती केली.

१२३) प्रफुल्लित होणे -आनंदीत होणे

सकाळच्या ताज्या हवेत सर्वांचे मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते.

१२४) आनंदाने उडणे – खुप आनंद होणे

स्वताचा फोटो वर्तमानपत्रात छापून आलेला पाहुन रमेश आनंदाने उडायला लागला.

१२५) भारी वाटणे -वेगळे व चांगले वाटणे

कधीही विमानाने प्रवास न केलेल्या अमृताला अचानक विमानाने प्रवास करायला मिळाल्याने भारी वाटले.

१२६) कंबर धरणे – कंबर दुखणे

उसातील दारे धरल्यामुळे जनाईची कंबर धरली.

१२७) चिटपाखरू असणे -नीरव व शांतता असणे

उन्हाळ्यात दुपारच्या वेळी शहरात चिटपाखरू नसते.

१२८) झेंडु फूटणे-भीतीमुळे तोंडाला फेस येणे

खुप मोठा साप पाहिल्याने अमितच्या तोंडात झेंडु फुटला.

१२९) दिलासा मिळणे – धीर मिळणे

पुरात घर वाहून गेलेल्या लोकांना शासनाने आर्थिक मदत केल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला.

१३०) कणखर बनणे- काटक बनने

दररोज सकाळी व्यायाम केल्याने आपले शरीर कणखर बनते.

१३१) ओढाताण होणे – कष्टदायक धावपळ होणे

शेतातील काम अणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यात राहुलची खूप ओढाताण होते.

१३२) गराडा पडणे – घेराव पडणे

गावात पुढारी येताच त्यांच्याभोवती गावातील लोकांचा गराडा पडला.

१३३) समजुत काढणे – गैरसमज दूर करणे

राहुलने मनोजच्या मनातील गैरसमज दूर करत समजुन काढली.

१३४) फवारा सोडणे -पाण्याचे तुषार सोडणे

गाडी धुण्यासाठी राघवने गाडीवर पाण्याचा फवारा सोडला.

१३५) तत्पर असणे – तयार असणे

पोलिस नागरीकांची मदत करायला सदैव तत्पर असतात.

१३६) पळ काढणे – लगेच निघून जाणे

कोणीतरी येत आहे याची चाहूल लागताच मांजरीने पळ काढला.

१३७) तोंडावर हसु फुटणे -पटकन हसु येणे

विदुषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसु फुटले.

१३८) ऐट मिरवणे – रूबाब करणे

दिवाळीत नवीन कपडे परिधान करून मदन ऐट मिरवत होता.

१३९) हेवा वाटणे – मत्सर वाटणे

समीरचे सुंदर अक्षर पाहुन नेहाला हेवा वाटला.

१४०) तोंडात बोट घालणे – नवल वाटणे

दुसरीत शिकणारया मुलीला संगणक हाताळताना बघून आजोबांनी तोंडात बोट घातले.

१४१) कानांमध्ये वारे भरणे -हुरळुन जाणे

आईला बघताच बाळाने कानांमध्ये वारे भरल्यासारखी झेप घेतली.

१४२) हुरळून जाणे – मनातुन आनंदी होणे

शिक्षकांनी प्रणवच्या अभ्यासाची स्तुती करताच तो हुरळुन गेला.

१४३) सगळीकडे फिरणे -इकडे तिकडे फिरणे

सुनील कोकणात गेल्यावर गावात सगळीकडे फिरतो.

१४४) रान पायाखाली घालणे – सगळीकडे फिरणे

आपली हरवलेल्या गायीला शोधून काढण्यासाठी सोहमने रान पायाखाली घातले.

१४५) तहानभूक विसरणे -मग्न होणे

वाचन करताना सुहास तहानभूक विसरतो.

१४६) हुरूप येणे – उत्साह येणे

सकाळी सकाळी चहा पिल्यावर सर्वांना दिवसभर काम करण्यास हुरूप येतो.

2 thoughts on “१४६ वाक्यप्रचार त्यांचा अर्थ अणि वाक्यात उपयोग -marathi vakprachar”

Comments are closed.