सर्दीवर करावयाचे घरगुती उपाय -Home remedies for cold

सर्दीवर घरगुती उपाय -Home remedies for cold

आपल्याला प्रत्येकालाच सर्दी तसेच खोकला ह्या दोन समस्या नेहमी जाणवत असतात.आणि ही एक सर्व जगातील व्यक्तींची प्रमुख समस्या आहे.

कधी कधी आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये सर्दीचा त्रास होत असतो तर कधी कधी उन्हाळयाच्या दिवसांमध्ये देखील आपल्याला ही समस्या जाणवत असते.

याला कारणीभुत आपल्या आजुबाजुच्या हवामानामध्ये अचानक झालेला बदल तसेच आजुबाजुचे प्रदुषित वातावरण किंवा अधिक थंड पदार्थांचे सेवन करणे यांपैकी कुठलेही एक कारण असु शकते.

आणि ह्यावर आपण घरबसल्या नैसर्गिक पदधतीने घरगुती उपचार करून देखील बरे होऊ शकतो.

आज आपण आजच्या लेखात हेच जाणून घेणार आहोत की सर्दीवर घरगुती पदधतीने उपचार करून ती कशी बरी केली जाऊ शकते आणि त्यासाठी आपण कोणकोणते घरगुती तसेच आयुवैदिक उपाय करू शकतो.

सर्दीवर कोणकोणते घरगुती उपाय आपण करायला हवे?(home remedies for cold)

सर्दी झाल्यावर पुढील घरगुती उपाय करून आपण सर्दीपासुन आराम प्राप्त करू शकतो-

  1. मधाचे सेवण :

  2. गरम पाण्याच्या गुळण्या तसेच गरम पाण्याची वाफ :

  3. मध आणि आल्याचा चहा :

  4. पुदिना:

  5.  दुध आणि हळद :Home remedies for cold

  6. निलगिरीचे तेल :

  7.  लसुण :

  8. तुळस :

  9.  गाजर :

1)मधाचे सेवण :

मित्रांनो आपल्या सर्वानाच माहीत असेल की मधामध्ये anti viral आणि anti bactorial हे अधिक प्रमाणात असते.म्हणुन मधाला नैसर्गिक औषधाचा दर्जा देखील दिला जातो.

ज्या व्यक्तीला सर्दी तसेच खोकला झाला असेल त्याने दिवसातुन दोन तीन वेळा रोज एक चमच मधाच्या रसाचे सेवन करायला हवे.याने सर्दी तसेच खोकल्यापासुन आपल्याला त्वरीत आराम मिळत असतो.

पण एका गोष्टीचे विशेष ध्यान आपण ठेवायला हवे की जर आपणास डायबेटिस वगैरेचा त्रास असेल तर आधी आपण डाँक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच मधाचे सेवण करावे.

See also  भारताचा राष्टीय ध्वज विषयी माहीती - रंग ,इतिहास व आचारसंहिता- India national flag information in Marathi

2) गरम पाण्याच्या गुळण्या तसेच गरम पाण्याची वाफ :

जर आपणास सर्दी झाली असेल तर आपण गरम पाण्याच्या गुळण्या करायला हव्यात.याचसोबत आपण गरम पाण्याची वाफ देखील घेऊ शकतो.याने आपल्याला खुप आराम मिळत असतो.

आणि समजा सर्दीमुळे आपला घसा बसला असेल किंवा दुखत असल्यास आपण गरम पाण्यामध्ये मीठ मिसळुन त्याच पाण्याच्या गुळण्या करायला हव्यात.

याचसोबत सर्दीमुळे जर आपले नाक चोंदले गेले असेल किंवा दोघे नाकपुडया बंद झाल्या असतील तर आपण त्यात गरम पाण्याची वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते.
याने आपल्या शरीरात जमा झालेला सर्व कफ बाहेर पडत असतो.याने आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होत नसतो.सोबत याने आपल्या घशातील खवखव देखील कमी होत असते.

3) मध आणि आल्याचा चहा :

अद्रकमध्ये anti viral आणि anti flimflammed ही गुणधर्मे असतात.

ज्याने आपला दुखणारा घसा,छातीमध्ये होत असलेली जळजळ तसेच डोकेदुखीपासुन आपणास आराम मिळत असतो.आणि ह्याने सर्दीचा पसार करणारे विषाणु देखील नष्ट होत असतात.

सर्दीत आपण मध आणि आल्याचा चहा करून पिला तर आपल्याला खुप आराम प्राप्त होतो.

मध आणि अद्रकचा चहा तयार करायला आधी आपण एक कप पाणी घ्यायला हवे.त्यात अद्रकचे तुकडे आणि मध मिक्स करून घ्यावे.

मग गँसवर पाणी गरम करून घ्यावे.आणि मग पाणी बरयापैकी गरम झाल्यावर किसलेले अदरक त्यात मिक्स करून घ्यावे.आणि दोन तीन मिनिट ते पाणी उकळत ठेवावे.यानंतर ते पाणी गाळुन घ्यायचे आणि गार व्हायला ठेवून द्यावे.आणि मग ते थंड झाल्यावर त्यात मधाचा रस मिक्स करून घ्यावा.यानंतर आपला मध आणि आल्याचा चहा तयार झालेला आपणास दिसुन येईल.

सर्दीमध्ये मध आणि आल्याचा चहा आपण दिवसातुन किमान दोन वेळा घेणे अधिक फायदेशीर ठरते.

4)पुदिना:

पुदिनाचा चहा जर आपण दिवसातुन दोन वेळेस पिला तर आपल्या घशाला आराम मिळत असतो.घशातील जळजळ कमी होत असते.

See also  चॅटबॉट म्हणजे काय ? What is chatbots in Marathi

5) दुध हळदीचे सेवण :

जर आपण गरम दुधामध्ये हळद मिक्स करून पिले तर आपल्याला सर्दी आणि खोकला या दोघांमध्ये आराम प्राप्त होत असतो.हा उपाय लहानांपासुन तर मोठयांपर्यत सर्वाना लागु होतो.

रोज रात्री झोपायच्या अगोदर एक ग्लास कोमट तापवलेल्या दुधात जर आपण हळद मिसळुन प्यायलो तर सर्दी खोकल्यापासुन आपल्याला लवकरच काही दिवसांत मुक्ती मिळत असते.

6) निलगिरीचे तेल :

निलगिरीचे तेल हे आपला नाकातील श्वास मार्ग स्वच्छ करायचे काम करते.

जर आपण खोबरयाचे तेल आणि olive oil मध्ये निलगिरीच्या तेलाचे थेंब मिसळुन छातीवर मसाज केली तर याने आपली छाती हलकी होत असते आणि आपल्याला श्र्वास घ्यायला येत असलेली अडचण देखील दुर होते.

आपण गरम पाणीमध्ये निलगिरीचे तेल ओतुन त्याने वाफ जर घेतली तर त्याने देखील आपल्याला आराम प्राप्त होत असतो.

पण हे करून देखील बर वाटत नसेल आराम मिळत नसेल तर आपण एकदा डाँक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.

7) लसुन :

मित्रांनो लसणामध्ये एलिसीन नावाचा एक घटक असतो.जो anti bactorial,anti viral आणि anti fungul असतो.

जर आपण लसुनच्या तीन चार कळया तुपात भाजुन खाल्लया तर आपल्याला सर्दी खोकल्यापासुन आराम मिळत असतो.

सर्दी खोकला हा लसुणामुळे लवकर बरा होण्यास मदत होत असते.

8) तुळस :

तुळस ही एक फार गुणकारी औषधी वनस्पती म्हणुन ओळखली जाते.

एक कप गरम पाण्यात जर आपण तुळशीची तीन।चार पाने टाकली आणि त्यात थोडे अदरकचे तुकडे मिसळले आणि ते उकळुन त्याचा काढा तयार करून पिला तर आपणास सर्दी खोकल्यापासुन आराम मिळत असतो.

9) गाजर :

गाजराचा रस हा सर्दी खोकला आणि डोळयांसाठी फार उपयुक्त ठरत असतो.आपण गाजर हे कच्चे खाऊ शकतो किंवा त्याचा रस तसेच हलवा बनवून देखील सेवण करू शकतो.

सर्दीवर करावयाचे इतर घरगुती तसेच आयुर्वैदिक उपाय –

See also  एच-सी-एलचा काय फुलफाँर्म काय होतो?- HCL Full Form In Marathi

1)चिकन सुप :

चिकन सुप हे सर्दी आणि खोकला या दोघांवरही फार उपयुक्त ठरत असते.चिकन सुप पिल्याने आपल्या शरीराला उर्जा प्राप्त होत असते.तसेच हे आपल्या शरीरातील nutrifil ह्या घटकाला कमी करत असते.ज्याने सर्दी खोकला असलेल्या ठिकाणी याचा लगेच आपणास परिणाम जाणवत असतो.आणि आपणास आराम प्राप्त होत असतो.

2) मसाला टी :

जर आपण मसाला टीमध्ये तुळस,अद्रक, तसेच काळी मिरी मिसळुन ते पिले तर आपणास खुपच लाभ होत असतो.कारण या तिघांमध्ये औषधीय गुण समाविष्ट असतात.

3) अळशीच्या बीया :

सर्दी आणि खोकल्यावर अळशीची बिया हा देखील एक चांगला उपाय आहे.

यासाठी आपण सर्वात आधी अळशीच्या बिया पाण्यामध्ये व्यवस्थित उकळुन घ्यायच्या.आणि मग ते पाणी गार करून घ्यायचे आणि त्यात लिंबुचा रस आणि मध घालून प्यायचे याने आपली सर्दी लवकर बरी होत असते.