प्लेटलेट्स माहिती – How to increase platelet count
प्लेटलेट्स म्हणजे नेमकी काय असते?याचे महत्व काय असते?हा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला नेहमी उदभवत असतो.
आजच्या लेखात आपण आपल्या ह्याच प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत
प्लेटलेट्स म्हणजे काय?
हिमोग्लोबीन आणि प्लाझ्मा या दोघांप्रमाणेच प्लेटलेट्स हा देखील आपल्या रक्तातील एक महत्वपुर्ण घटक मानला जातो.
- प्लेटलेट्स हे रक्त पातळ होऊ न देणे तसेच रक्तवाहिन्यांना जर काही ईजा झाली तर अशा परिस्थितीत अधिक रक्तस्राव होऊ न देणे इत्यादी कामे करत असते.
- आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या प्लेटलेट्स दिसायला पण एखाद्या प्लेटप्रमाणेच असतात.म्हणुनच यांना शास्त्रज्ञांनी देखील प्लेटलेट्स असेच नाव दिले आहे.
- या पेशींसाठी वैद्यकीय भाषेमध्ये थोम्ब्रोसाईट ह्या संज्ञेचा वापर करण्यात आला आहे.आपल्या रक्तात प्रामुख्याने तीन पेशी आढळुन येत असतात.
- लाल पेशी(RBC),पांढरया पेशी(WBC),तंतुकणिका(platelets) या सर्वामध्ये आपल्या रक्तात प्लेटलेट्सची संख्या सर्वात जास्त असते.
- प्लेटलेट्स ह्या मोठया हाडांतील रक्तमज्जेत(red bone marrow) असलेल्या mega cariosities ह्या पेशींपासुन तयार होत असतात.आणि ह्या प्लेटलेट्सचे रक्तामधील आयुष्य सर्वसाधारणत: पाच ते नऊ दिवस एवढया कालावधीसाठीचे असते.
प्लेटलेट्सची कार्ये कोणकोणती असतात?
- आपल्या रक्तवाहिन्यांमधुन जे रक्त वाहत असते ते प्रवाही राहणे खुप गरजेचे असते.आँक्सिजनचे वहन हे प्रमुख कार्य रक्तातुनच होत असते.तसेच रक्त हे आपल्या मानवी शरीरातील विविध अवयवांचे पेशीस्तरावर पोषण करण्याचे काम करत असते.
- जेव्हा आपणास एखादी ईजा,जखम तसेच दुखापत होते तेव्हा तेव्हा अशा परिस्थितीत रक्तवाहिन्यांमधुन रक्त अधिक जास्त वाहुन गेल्यास जिवितहानी देखील होण्याची दाट संभावना असते.
- अशा परिस्थितीत जखमी जागी फायबर आणि प्लेटलेट्स एकत्र येत असतात.आणि रक्तप्रवाह खंडित करत असतात.हेच एक कारण आहे की ज्यामुळे प्लेटलेट्सला मानवी शरीराचे कवचकुंडल म्हणुन देखील संबोधिले जाते.
मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या किती असते?
मानवी शरीरात प्लेटलेट्सची सर्वसाधारणत: मात्रा ही दीड लाख ते साडेचार लाख इतकी असते.आणि ह्याच ठिकाणी ह्या संख्येच्या प्रमाणात अधिकता निर्माण झाली तर रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिनींमधील रक्तप्रवाहास अडथळा येत असतो.
आणि याचमुळे आपणास हार्ट अटँक,स्ट्रोक असे विकार जडत असतात.हात तसेच पायांमधील रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण झाल्यावर शरीराचा तो अवयव तो भाग बधीर पडुन निकामी देखील होण्याची शक्यता असते.
याचसोबत प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यावर रक्तस्राव अधिक जास्त होतो.आपल्या नाकातुन,थुंकीतुन आणि हिरडीतुन देखील रक्त निघत असते.
प्लेटलेट्स कमी होण्याची कारणे कोणकोणती असतात?
● डेंगुचा किंवा मलेरियाचा ताप येणे
● एखादा अनुवांशिक आजार असणे
● केमोथेरपी
● अल्कोहोलचे सेवण
डेंगु तसेच मलेरियाच्या तापामध्ये प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होत असते.त्यामुळे दोन दिवस ताप आल्यावर तसेच ह्या रोगांची लक्षणे आपणास आढळुन आल्यास तत्काळ वैदयकीय सल्ला घेऊन आपले ब्लड टेस्ट करून घ्यायला हवी.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यावर कोणकोणती काळजी आपण घ्यायला हवी?
● लसुन खाणे टाळावे
● अधिक कसरतीचा व्यायाम करू नये
● जास्त दगदग करून घेऊ नये
● दात घासताना ब्रश लागणार नही याची काळजी घेणे
● अँस्प्रिन,कोल्डडँगसारख्या औषधांचे सेवण करू नये
● सुरी तसेच कातरीचा वापर काळजीपुर्वक करणे
● बदधकोष्ठतेचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे.
● वैदयकीय तज्ञांचा तसेच चिकित्सकांचा सल्ला घेणे.
प्लेटलेट्स कमी झाल्यास आपल्याला त्या बाहेरून घ्याव्या लागत असतात.इतर कुठलाही उपाय यावर अजुन खात्रीशीरपणे सांगता येईल असे सिदध झालेले नहीये.
प्लेटलेट्ससाठी कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन औषधे देखील नसतात.पौष्टिक आहाराचे सेवन करूनच आपण प्लेटलेट्सचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकतो.
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला काय म्हणतात?
शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीस थ्रोम्बोसायटोपेनिया असे संबोधले जात असते.
कुठल्याही निरोगी व्यक्तीच्या शरीरातील प्लेटलेट्सची मात्रा १५०हजार ते ४५० हजार इतके असते.पण जेव्हा हे काऊंट दीडशे हजार मायक्रोलीटर पेक्षा खाली येत असते.तेव्हा यास लो प्लेटलेट्स असे म्हटले जाते.
काही विशिष्ट प्रकारच्या मेडिसिन,अनुवांशिक रोग,कर्करोग,केमोथेरपी उपचार,अल्कोहोलचे अधिक सेवण करणे अशा परिस्थितीत किंवा डेंगु मलेरिया तसेच चिकनगुनियाचा ताप आल्यावर देखील ब्लड प्लेटलेट्स कमी होत असतात.
प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन?
जे व्यक्ती आपल्या शरीरातील कमी होत असलेल्या प्लेटलेट्समुळे चिंतीत असतील ते कारण आपण आपल्या आहारात काही पौष्टिक पदार्थ समाविष्ट करून नँचरली आपल्या शरीरातील ब्लड प्लेटलेट्स वाढवू शकतो.
जर आपणास नैसर्गिक पदधतीने प्लेटलेट्स वाढवायचे असतील तर आपण पुढील पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.
१)पपई
२) गुळवेल
३) आवळा
४) भोपळा
५) पालक
६) नारळाचे पाणी
७) बीट
१)पपई :पपईचे फळ आणि त्याच्या झाडाची पाने आपल्या रक्तात कमी असलेल्या प्लेटलेट्स वाढवायचे काम करत असतात.
२००९ मध्ये शास्त्रज्ञांनी एक सर्वे केला होता ज्यात असे आढळुन आले होते की डेंग्यु ह्या आजारामुळे रक्तातील कमी होत असलेले प्लेटलेट्सच्या संख्येत पपईच्या पानाचे सेवण केल्याने वाढ होत असते.
हेच पपईचे पान आपण चहामध्ये पाण्यात उकळुन देखील घेऊ शकतो याची चव ही ग्रीन टी सारखी लागत असते.
२) गुळवेल :
गुळवेलपासुन बनवण्यात आलेले ज्युस हे ब्लड प्लेटलेट्स वाढवायला साहाय्य करत असते.ज्या रूग्णाला डेंगु झाला असेल अशा रूग्णाने आपले प्लेटलेट्स वाढवायला याचे सेवन करायला हवे.
याने रोगप्रतिकारक्षमतेत देखील वाढ होत असते.
दोन चमच गुळवेल हे एक चमचा मधाबरोबर दिवसातुन दोनदा घेणे किंवा आपण गुळवेलची काडी ही रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायला हवी.आणि सकाळी हेच पाणी गाळुन घ्यावे.
वरील उपायाने प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होत असते.गूळवेल सत्व हे कोणत्याही आयुर्वैदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होत असते.
३) आवळा :
आवळयामध्ये विपुल प्रमाणात व्हीटँमिन सी उपलब्ध असते जे आपले प्लेटलेट्स वाढवण्यास आणि शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करत असते.म्हणुन आपल्या प्लेटलेट्स वाढवायला आवळा हा एक चांगला आयुर्वैदिक उपचार ठरू शकतो.
आपण दररोज सकाळी अनाशापोटी तीन ते चार आवळयांचे सेवण करायला हवे.दोन चमचे आवळयाच्या ज्युसमध्ये मध मिसळुन देखील आपण हे घेऊ शकतो.
४) भोपळा :
भोपळयाने कमी प्लेटलेट्स काऊंटमध्ये सुधार करत असतो.भोपळयामध्ये व्हिटँमिन ए असते ज्याने प्लेटलेट्सची वाढ होत असते.
भोपळा हा आपल्या कोशिकांमध्ये उत्पन्न होत असलेल्या प्रोटीन्सला नियंत्रित करण्याचे काम करतो.ज्याने प्लेटलेट्सचा स्तर वाढत असतो.
भोपळयाच्या अर्धा ग्लास भरेल ज्युसमध्ये दोन चमचे मध टाकावे आणि तेच दिवसातुन दोनदा घ्यावे याने आपल्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढत असते.
५) पालक :
पालकमध्ये व्हिटँमिन के असते.आणि कमी प्लेटलेट्स आजारावर उपचार करायला याचा वापर केला जात असतो.योग्य पदधतीने ब्लड क्वाटिंग होण्यासाठी व्हिटँमिन के गरजेचे असते.जास्त प्रमाणात होणारा ब्लीडिंगचा धोका पालकमुळे कमी होत असतो.
आपण दोन कप पाणी घ्यावे आणि त्यात चार ते पाच ताजी पालकची पाने उकळुन घ्यावीत.मग उकळलेले पाणी थंड झाल्यावर यात अर्धा ग्लास टमाटयाचा रस टाकावा.आणि हे सर्व मिश्रण दिवसातुन दोन किंवा तीनदा घ्यावे.
किंवा आपण याशिवाय पालकचे सेवन भाजी,सुप,सँलेड इत्यादी स्वरूपात देखील करू शकतो.
६) नारळाचे पाणी :
शरीरातील ब्लड प्लेटलेट्स वाढवायला नारळपाणी खुप फायदेशीर ठरत असते.नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईटसचे अधिक प्रमाण असते.
आणि हे पाणी खनिजांचा देखील एक उत्तम स्रोत मानले जाते.हे आपल्या शरीरातील ब्लड प्लेटची उणीव भरून काढण्यास मदत करते.
७) बीट :
बीटचे सेवण केल्याने प्लेटलेट्स वाढत असतात.यात नैसर्गिक अँण्टीआँक्सीडंट आणि हेमोस्टँटिक असतात त्यामुळे बीटचे सेवण केल्याने काही दिवसातच प्लेटलेट्सच्या काऊंटमध्ये वाढ होत असते.तसेच आपली रोगप्रतिकारकक्षमता देखील वाढत असते.
आपण दोन ते तीन चमचा बीट हे एक ग्लास गाजरच्या रशामध्ये मिसळुन त्याचे सेवण करावे याने ब्लड प्लेटलेट्सची संख्या एकदम फास्ट वाढत असते.