कमी वेतन असताना देखील जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी? -How To Save More Money With Low Income  

कमी वेतनजास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी?How To Save More Money With Low Income  

आज पैशांची बचत करणे हे आपल्या प्रत्येकासाठी खुप महत्वाचे असते.कारण आज आपण पैशांची बचत केली तर तेच पैसे भविष्यात आपल्याला काही अडचण आल्यावर कामी येत असतात.म्हणुन आपण आपल्या पैशांची बचत ही करायलाच हवी.

पण काही जणांचे म्हणने असे असते की माझी कमाईच कमी आहे मग अशा परिस्थितीत मी बचत कशी करू शकणार?कारण आलेली सर्व कमाई माझी महिन्याभराच्या घरखर्चासाठी तसेच घरातील इतर आवश्यक वस्तु तसेच इतर बाबींची खरेदी करण्यासाठी खर्च होत असते.

अशा परिस्थितीत माझ्या हातात काहीच पैसे शिल्लक उरत नाही मग मी माझ्या पैशांची बचत तसेच गुंतवणुक कशी करू अशी खुप जणांची तक्रार असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्याला कमी वेतन प्राप्त होत असताना देखील आपण आपल्या पैशांची जास्तीत जास्त बचत कशी करू शकतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

आपण आपल्या पैशांची बचत का करायला हवी?

 आज आपल्या जीवणात येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो.आज चांगले दिवस आहे तर भविष्यात वाईट दिवस देखील आपल्यावर येत असतात.कारण सुख दुख,अडीअडचण,समस्या ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.

अशा परिस्थितीत आपण बचत केलेले पैसेच आपल्याला कामी येत असतात.म्हणुन असे म्हटले जाते की आज आपण पैसे वाचवले तर उद्या तेच बचत केलेले पैसे आपल्याला वाचवतील.आणि ही एकदम खरी गोष्ट आहे.

कारण समजा आपल्याला अचानक एखादी हाँस्पिटल तसेच फायनान्शिअल इमरजन्सी आली घरात अडीअडीचण आली आणि आपल्याला तिथे पैशांची नितांत गरज असेल तेव्हा हेच आपले बाजुला काढुन ठेवलेले बचतीचे पैसे आपल्याला तेव्हा कामी येत असतात.

See also  फ्रीलांसिंग ची संपूर्ण माहिती, पैसे कसे कमवावे ? - Freelancing meaning Marathi

म्हणुन आपण अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी फायनान्शिअल तसेच हाँस्पिटल इमरजन्सीसाठी पैशांची बचत ही करायलाच हवी.

 कमी वेतन मिळत असताना देखील आपण जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी?

 आज कमी तसेच जास्त पैसे देखील कमवित असलेल्या प्रत्त्येक नोकरदार व्यक्तीची ही एकच समस्या तसेच तक्रार असते की मला नोकरी करून खुप मर्यादित तसेच कमी वेतन मिळते.मग अशा परिस्थितीत मी महिन्याचा सर्व घरखर्च भागवून देखील एवढया कमी वेतनात पैशांची बचत कशी करावी?

चला तर मग जाणुन घेऊया कमी वेतन मिळत असताना देखील आपण जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करू शकतो.आणि त्याच बचत केलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणुक कशी करू शकतो?

कमी वेतनात देखील जास्तीत जास्त पैशांची बचत करण्यासाठी उपाय पुढीलप्रमाणे आहेत :

 1) आधी बचत करावी मग खर्च करावा :

2) शाँपिंगला जाण्याअगोदर सर्व आवश्यक वस्तुंची  एक यादी तयार करावी :

3) विचार करून खर्च करावा आणि अनावश्यक वस्तुंवर खर्च करणे टाळावे :

4) आपली गरज आणि हौस यातील मुख्य फरक समजून घ्यायला हवा  :

5) luxurious वस्तुंची खरेदी करणे बंद करावे :

6) आपल्या सर्व खर्चाची नोंद ठेवावी :

7) कोणत्याही वस्तुची alternate वस्तु शोधावी :

8) tax saving करावी :

9) automatic saving system चा वापर करावा

10) cash चे सर्व खर्च करावा

1) आधी बचत करावी मग खर्च करावा :

 कमी वेतन असताना देखील जास्तीत जास्त पैशांची बचत करण्याचा पहिला उपाय आहे वेतन हातात आल्यावर आधी आपण बचत करावयाची रक्कम बाजुला काढुन घ्यायला हवी.मग त्यातुन उरलेले बाकीचे पैसे खर्च करायला हवे.ह्या नियमाचे काटेकोरपणे आपण पालन करायला हवे.याने आपले खुप पैशांची बचत होते.

 

2) शाँपिंगला जाण्याअगोदर सर्व आवश्यक वस्तुंची  एक यादी तयार करावी :

 शाँपिंगला तसेच खरेदीला गेल्यावर आपल्याला जी आकर्षक वस्तु दिसते ती आपण खरेदी करत असतो.भलेही मग आपल्याला त्या वस्तुची मुळात आवश्यकता असो किंवा नसो.त्यामुळे आपण शाँपिंगला जाण्याअगोदर आपल्याला लागत असलेल्या महत्वाच्या वस्तुंची एक यादी तयार करायला हवी.आणि मग ठरवलेल्या यादी प्रमाणेच खरेदी करायला हवी.याने आपण अनावश्यक वस्तुंची खरेदी करत नाही ज्याने आपल्या पैशांची चांगली बचत होते.

See also  म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक - Difference between direct plan and regular plan in mutual fund

3) विचार करून खर्च करावा आणि अनावश्यक वस्तुंवर खर्च करणे टाळावे :

 कधीही कोणत्त्याही ठिकाणी पैसे खर्च करत असताना आपण एकदा स्वताला विचारायला हवे की खरच माझ्यासाठी हा खर्च करणे गरजेचे आहे का आणि जर आपल्याला होय असे उत्तर मिळत असेल तर आपण तिथे खर्च करावा अन्यथा अनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यात आपले पैसे खर्च करणे टाळायला हवे.याने देखील आपल्या खर्चावर नियंत्रण येऊन आपल्या पैशांची बचत होत असते.

4) आपली गरज आणि हौस यातील मुख्य फरक समजून घ्यायला हवा  :

 आपण जेव्हाही कोणतीही वस्तु खरेदी करत असतो तेव्हा आपण स्वताला काही प्रश्न विचारायला हवे जसे की ही वस्तु खरेदी करणे माझ्यासाठी गरजेचे आहे का?

ही वस्तु खरेदी न करीता मी राहु शकतो?

याने आपल्याला आपण जी वस्तु खरेदी करतो आहे ती आपली गरज आहे का हौस हे लगेच कळुन जात असते.आणि आपण गरजेच्याच महत्वपुर्ण वस्तुंचीच खरेदी करत असतो ज्याने आपला अनावश्यक खर्च टळुन पैशांची बरीच बचत होत असते.

5) luxurious वस्तुंची खरेदी करणे बंद करावे :

 गरज नसताना आपण फक्त लोकांसमोर शो आँफ करण्यासाठी एखादी कार तसेच बाईक,कपडे इत्यादी चैन चंगळीच्या luxurious वस्तुंची खरेदी करत असतो.

याने आपल्याला त्याचा उपयोग तर काही एवढा होत असतो पण त्याचा अनावश्यक खर्च आपल्याला करावा लागत असतो.

उदा कारचे लोन फेडणे,बाईकचे लोन फेडणे,त्यांच्या पेट्रोल डिझेलचा खर्च,त्यांचा हप्ता फेडणे मेंटेनन्सचा रिपेअरींगचा खर्च इत्यादी.

म्हणुन आपण चैन चंगळीच्या वस्तुंवर गरज नसताना खर्च करणे टाळायला हवे याने आपले पैसे वाचतात आणि तेच पैसे मग आपण बँकेत एफडी वगैरे काढुन सेव्ह करू शकतो.

6) आपल्या सर्व खर्चाची नोंद ठेवावी :

आपण आपल्या सर्व खर्चाची नोंद ठेवायला हवी येणे आपला खर्च किती आवश्यक ठिकाणी होतो आहे? तसेच किती अनावश्यक ठिकाणी होतो आहे?हे आपल्या लक्षात येत असते.आणि मग आपण तो खर्च करणे बंद करू शकतो.ज्याने आपल्या बर्याच पैशांची बचत होत असते.

See also  सोशल मीडिया मार्केटिंग - Social media marketing information in Marathi

7) कोणत्याही वस्तुची alternate वस्तु शोधावी :

 आपण जेव्हाही एखादी वस्तु खरेदी करत असतो तेव्हा आपण तिची alternate वस्तु देखील उपलब्ध आहे का याचा तपास करायला हवा.

म्हणजेच समजा आपण एखादा हेडफोन खरेदी करतो आहे जो हजार रूपयाचा आहे पण त्याच ठिकाणी अजुन एक हेडफोन त्या दुकानात दोनशे रूपयात उपलब्ध आहे जो तसाच उत्तम हेडफोन आहे आणि त्याचा आवाज देखील चांगला आहे तर आपण तो दोनशे रूपयाचा हेडफोन खरेदी करायला कारण त्यात आपल्याला पैसेही कमी लागता आहे आणि काँलिटी पण चांगली उपलब्ध होत आहे.याने आपले बरेच पैसे वाचत असतात.

8) tax saving करावी :

 

आपण आपला जास्तीत जास्त tax save व्हावा यासाठी आपल्या पैशांची PPF,ETF अशा विविध टँक्स सेव्हिंग फंडमध्ये देखील गुंतवणुक करायला हवी.

याने आपला भरपुर टँक्स सेव्ह होतो.शिवाय पैशांची गुंतवणुक केल्याने चांगला रिटर्न देखील भविष्यात मिळत असतो.

9) automatic saving system चा वापर करावा

 आपण आपले एक आँटोमँटिक फंड सेव्हिंग सिस्टम तयार करायला हवी.जेणेकरून दर महिन्याच्या अखेरीस आपल्या वेतनामधून आपल्याला न कळता एक विशिष्ट रक्कम आपल्या आँटोमँटिक सेव्हिंग फंडमध्ये सिस्टमद्वारे ट्रान्सफर होत असते.याने आपल्या नकळत आपल्या पैशांची बचत होत असते.

10) cash चे सर्व खर्च करावा :

 मानवी मानसिकता ही अशी आहे की आपण जेव्हा एखादी वस्तु खरेदी करून तिचे डिजीटली क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट करत असतो.तेव्हा आपल्याला खर्च करायला काहीच वाटत नसते कारण तो खर्च आपल्या डोळयाआड होत असतो.

पण तोच खर्च जर आपण कँशमध्ये केला तर आपल्या हातातुन पैसे जात असल्याने आपण त्या पैशांचा खर्च गरजेपुरताच आणि आवश्यक तिथेच करत असतो.कारण आपल्या हातातुन दुसरीकडे पैसे गेलेले कोणालाच नको असते प्रत्येकाला पैशांची आवक हवी असते जावक नाही.त्यामुळे हा देखील एक चांगला पर्याय आहे आपल्या पैशांची बचत करण्याचा.