आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? International family day 2023 in Marathi

आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस का साजरा केला जातो?ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?international family day 2023 in Marathi

दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस हा जागतिक पातळीवर साजरा केला जात असतो.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कुटुंबाचे महत्व काय आहे कुटुंबाची जागा काय असते हे सांगणारा पटवून देणारा हा दिवस आहे.

आपल्या समवेत आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील तर आपण जीवनातील आलेल्या मोठमोठ्या संकटांना अडीअडचणींना वादळांना देखील तोंड देऊ शकतो.त्यांना सहजपणे ठामपणे सामोरे जावू शकतो.

कुटुंबाशिवाय ह्या जगात प्रत्येकाचे जीवन हे रिक्त अपुर्ण अणि रसहीन आहे.आयुष्यात प्राप्त केलेल्या लहानापासून ते मोठमोठ्या यशाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याकडे एक छोटेसे का होईना कुटुंब असणे फार आवश्यक आहे.कारण कुटुंबाविना माणुस अधुरा आहे.

विभक्त कुटुंब एकाकी जीवन पदधती ही सध्याची प्रचलित समस्या अणि सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

म्हणुनच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस दरवर्षी साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

आज प्रत्येकाला आम्ही दोघे अणि आमची दोघे अशी विभक्त कुटुंब पद्धती अधिक आवडते.आज कोणालाही एकत्र अणि मोठे कुटुंबात राहायला फारसे आवडत नाही.

समाजातील ह्या अशाच गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मोठ्या उत्साहात जोमाने साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्राच्या 1994 मध्ये घेतलेल्या एका सभेमध्ये 15 मे हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती.तेव्हापासुन दरवर्षी 15 मे रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो.

जगभरातील लोकांना आपल्या परिवारासमवेत जोडुन ठेवणे कुटुंबाशी संबंधित गोष्टी बद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा ह्या दिवसाचा मुख्य हेतु आहे.

परिवारातील सर्व सभासदांना एकत्रितपणे जोडुन ठेवणे जेणेकरून परिवारात प्रेम अणि ऐक्याची भावना टिकुन राहील.कुठल्याही कारणामुळे परिवारात दुरावा निर्माण होणार नाही.याची विशेष काळजी घेण्यासाठी हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो.

See also  चालु घडामोडी मराठी - 18 मे 2022 Current affairs in Marathi

सर्वांना एकत्र कुटुंबाचे महत्व समजावून सांगणे,कुटूंब संस्थेस अधिक बळकट बनविणे हा आहे.

मानवाची सुरूवात ही खरया अर्थाने आदीमानवापासुन झाली होती.यानंतर मानव हा समुह करून राहु लागला.यानंतर जसजशी त्याला समज आली तो कुटुंबास आरंभ करू लागला अणि आपल्या कुटुंबासहित राहु लागला.

लाल आकृती सोबत हिरवे वर्तुळाचा आकार हे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाचे प्रतीक चिन्ह मानले जाते.यात हदय अणि घरे यासारख्या प्रतिमा समाविष्ट आहे.

अनेक भारतीय कुटुंबांमध्ये पितृसत्ताक संयुक्त कुटुंब पदधतीला विशेष महत्त्व आहे.यात एका कुटुंबात घरात तीन चार पिढ्या एकत्रितपणे राहत असतात.