चालु घडामोडी मराठी – 18 मे 2022 Current affairs in Marathi

18  मे 2022 चालु आणि ताज्या घडामोडी  Current affair in Marathi

  1)छत्तीसगढ बनले जुनी पेंशन योजना पुनसर्चयित करणारे भारतातील पहिले राज्य

 नुकतेच छत्तीसगढ हे राज्य हे जुनी पेंशन योजना पुनसर्चयित करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

ही जुनी पेंशन योजना पुनसर्चयित करण्याचे उददिष्ट हे सेवानिवृत्त कर्मचारींना खात्रीशीर उत्पन्न प्राप्त करून देणे हे आहे.

ही जुनी पेंशन योजना 1 एप्रिल 2022 पासुन लागु केली जाणार आहे.

 

2) आज 18 मे रोजी साजरा करण्यात येणार जागतिक एडस लस दिन

 आज बुधवारी 18 मे 2022 रोजी जगभरात जागतिक एडस लस दिन साजरा करण्यात येणार आहे.

हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट हे एडससारख्या दुर्धर आजारावर लसी शोधुन काढलेल्या शास्त्रज्ञ संशोधकांचे आभार व्यक्त करणे हे आहे.

 

3) फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत रिलायन्स ही भारतीय कंपनी अव्वल स्थानी

 

फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत रिलायन्स ही भारतीय कंपनी टाँप भारतीय कंपनी 2022 मध्ये भारतातील कंपनींमध्ये नुकतीच अव्वल स्थानी आलेली आहे.

 • ग्लोबल रँकिंगमध्ये रिलायन्स ही कंपनी 53 व्या क्रमांकावर आहे.
 • आणि फोर्ब्सच्या ग्लोबल 200 च्या यादीत संपुर्ण जगभरात बर्कशायर हाथवे ही कंपनी अव्वल स्थानी आलेली आहे.

4) ईस्रोने केली मानव रेटेड एच एस 200 साँलिड राँकेट बुस्टरची यशस्वीपणे चाचणी

 

ईस्रोने ह्या संशोधन संस्थेने नुकतीच मानव रेटेड एच एस 200 साँलिड राँकेट बुस्टरची यशस्वीपणे चाचणी केली आहे.

 • ईस्रो ही एक अंतराळ संशोधन संस्था आहे जिचे संस्थापक विक्रम साराभाई आहेत.
 • आणि ह्या अंतराळ संशोधन संस्थेची स्थापणा ही 15 आँगस्ट 1969 रोजी करण्यात आली होती.आणि ह्या अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्य कार्यालय बंगळुर येथे आहे.

 

5) एनटीपीसीने सुरू केले मुलगी सक्षमीकरण अभियान

नुकतेच एनटीपीसीने मुलगी सक्षमीकरण हे अभियान सुरू केले आहे.

6) भारतीय सैन्याकडुन माणिपुर राज्यात गरीब विदयार्थ्यासाठी कोचिंग सेंटर उघडले जाणार

नुकतेच भारतीय सैन्याने मणिपुर ह्या राज्यात राहत असलेल्या आर्थिकदृष्टया दुर्बल गरीब मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरीता अशा विदयार्थ्यांसाठी भारतीय लष्कराकडुन कोचिंग सेंटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्यात भारतीय लष्कराकडुन सर्व गरीब मुलांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाणार आहे.

 • भारतीय सैन्यात कमांडर आँफ चीफ हे भारताचे राष्टपती हेच असतात.सध्याचे भारतीय सैन्याचे कमांडर आँफ चीफ रामनाथ कोविंद हे आहेत(भारताचे १४ वे राष्टपती).भारतीय सैन्याच्या सध्याच्या सेनाप्रमुखपदी जनरल मनोज पांडे हे आहेत.आणि उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजु हे आहेत.
 • भारतात आर्मी दिवस 15 जानेवारी रोजी साजरा केला जात असतो.

7) भारतात 16 मे रोजी साजरा करण्यात आला राष्टीय डेंगु दिन

See also  चालु घडामोडी मराठी 8 मे २०२३- Current Affairs in Marathi

भारतात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील 16 मे रोजी राष्टीय डेंगु दिन साजरा करण्यात आला आहे.

 • हा दिवस पाळण्याचा उपक्रम आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडुन राबविण्यात आला आहे.
 • हा दिवस साजरा करण्याचे प्रमुख उददिष्ट डेंगु आणि त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाय काढुन याविषयी देशात जागृती निर्माण करणे हा आहे.
 • डेंगु ह्या रोगाचा प्रसार हा एडीस आणि इजिप्ती ह्या मादी डासांच्या चावण्याने होत असतो.

 

8) माँरगन स्टँनलेकडुन एफ वाय 23 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.6 टक्के दर्शवण्यात आला

नुकताच माँरगन स्टँनलेकडुन एफ वाय 23(financial year 2023) साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 7.6 टक्के इतका दर्शवण्यात आला आहे.

 • आरबीआयकडुन देखील भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज2 टक्के इतका व्यक्त केला आहे. तर हाच अंदाज वल्ड बँकेने 8 टक्के इतका वर्तविला आहे.

 

9) गुगल ट्रान्सलेटने आपल्या लँग्वेज ट्रान्सलेट टुल्समध्ये जोडल्या नवीन 8 भारतीय भाषा

गुगल ट्रान्सलेट ह्या लँग्वेज ट्रान्सलेट अँपने आपल्या अँप गुगल ट्रान्सलेटच्या टुल्समध्ये आणखी 8 भारतीय भाषा जोडल्या आहेत.

 • यात आसामी,संस्कृत,भोजपुरी,कोकणी,डोंगरी,मणिपुरी,मिझो,मैथीली इत्यादीं भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

10) स्वीगी कंपनीने विकत घेतले डायन आऊट

स्वीगी ह्या कंपनीने अज्ञात रकमेसाठी नुकतेच डायन आऊट ह्या टेबल रिझर्वेशन प्लँफार्मला खरेदी केले आहे.

 • डायन आऊट हा प्लँटफाँर्म शहरातील यूझर्सला रेस्टाँरंट शोधायला आणि तिथे टेबल बुक करायला साहाय्य करत असतो.

11) 14 मे रोजी साजरा करण्यात आला जागतिक प्रवासी पक्षी दिन

नुकताच 14 मे रोजी जागतिक प्रवासी पक्षी दिवस हा साजरा करण्यात आला आहे.

 

 • हा दिवस 2006 पासुन सुरू केला गेला आहे.आणि दरवर्षी वर्षात दोनदा(14 मे तसेच 8 आँक्टोंबर) हा दिवस साजरा केला जातो.
 • हा दिवस साजरा करण्याचे उददिष्ट म्हणजे पक्षांच्या अशा बरयाच प्रजाती असतात ज्या वेगवेगळया वातावरणात आणि वेगवेगळया ठिकाणी जात असतात.अशा पक्षांच्या संरक्षणाकरीता आणि त्यांना एक चांगले वातावरण प्राप्त करून देण्याकरीता हा दिवस साजरा केला जातो.

12) शेख मोहम्मद बिन जायाद अल नायान बनले यूएई चे नवीन राष्टपती

नुकतेच शेख मोहम्मद बिन जायाद अल नायान हे यूएई चे नवीन राष्टपती बनले आहेत.

 • यूएईचे आधीचे राष्टपती खलिफा बिन जायाद अल नायान हे होते.परंतु यांचे निधन झाल्याकारणाने शेख मोहम्मद बिन जायाद अल नायान यांची युएईच्या नवीन राष्टपतीपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • यूएई ह्या देशाची राजधानी अबुधाबी ही आहे. इथले चलन हे युएई दिरहम हे आहे.

 

13) गृहमंत्रालयाने केली 21 मे ला दहशतवाद विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्याची घोषणा

नुकतेच गृहमंत्रालयाने 21 मे ह्या दिवसाला दहशतवाद विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्याची घोषणा केली आहे.

 • गृहमंत्रालयाचे सध्याचे मंत्री अमीत शहा हे आहेत.
See also  IBPS LIC ADO Mains प्रवेशपत्र २०२३ जारी असे करा डाउनलोड । IBPS LIC ADO Mains admit card 2023 Download

 

14) स्वाती धिंग्रा यांची बँक आँफ इंग्लंडच्या व्याजदर निर्धारण समितीच्या बाहय सदस्यपदी नियुक्ती

नुकतीच स्वाती धिंग्रा यांची बँक आँफ इंग्लंडच्या व्याजदर निर्धारण समितीच्या बाहय सदस्यपदावर  नियुक्ती केली गेली आहे.

 • ह्या समितीवर नियुक्ती होत असलेल्या स्वाती धिंग्रा ह्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती देखील बनल्या आहेत.
 • बँक आँफ इंग्लंड ही एक युकेची बँक आहे.जिची स्थापणा 27 जुलै 1694 मध्ये करण्यात आली होती.ह्या बँकेची स्थापणा इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम याने केली होती.

15) गीता गोपीनाथ यांची आय एम एफ च्या डेप्युटी मँनेजिंग डायरेक्टरपदी नियुक्ती

 

नुकतीच काही दिवसांपुर्वी गीता गोपीनाथ यांची आय एम एफ च्या डेप्युटी मँनेजिंग डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

16) 17 मे रोजी साजरा करण्यात आला जागतिक उच्च रक्तदाब दिन

नुकताच जगभरात 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन हा साजरा करण्यात आला आहे.

 • प्रथमता हा दिवस 2005 मध्ये साजरा करण्यात आला होता.

17) आज 18 मे रोजी साजरा करण्यात येणार आंतरराष्टीय संग्रहालय दिन

आज 18 मे रोजी आंतरराष्टीय संग्रहालय दिवस साजरा केला जाणार आहे.

 • 1977 पासुन हा दिवस साजरा केला जात आहे इंटरनँशनल काऊंसिल आँफ म्युझियमने हा दिवस साजरा करण्याची संकल्पणा मांडली होती.
 • यादिवशी जगभरातील जनतेला संग्रहालयाबददल माहीती देण्यात येत असते.ह्या वर्षाची आंतरराष्टीय संग्रहालय दिनाची थीम ही पावर आँफ म्युझियम ही आहे.

 

18) वाळवंटीकरणाविरूदध लढा देण्यासाठी सीओपी 15 सत्रात भुपेंद्र यादव यांनी केले भारताचे प्रतिनिधित्व

वाळवंटीकरणाविरूदध लढा देण्यासाठी भरवल्या गेलेल्या सीओपी 15 2022 सत्रात भुपेंद्र यादव यांनी भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

 • भूपेंद्र यादव हे भारताचे केंद्रिय मंत्री आहेत.

19) 16 मे रोजी साजरा करण्यात आला आंतरराष्टीय प्रकाश दिन

 

नुकताच 16 मे रोजी आंतरराष्टीय प्रकाश दिन हा साजरा करण्यात आला आहे.

 • हा दिवस संयुक्त राष्ट संघटनेकडुन दरवर्षी 16 मे रोजी साजरा केला जात असतो.

 

 • विज्ञान,तंत्रज्ञान कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील प्रकाशावर आधारीत तंत्रज्ञानाच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी तसेच याविषयी जनतेत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो.

20) 16 मे रोजी साजरा करण्यात आला आंतरराष्टीय शांततेमध्ये एकत्र राहण्याचा दिवस

नुकताच 16 मे रोजी आंतरराष्टीय शांततेमध्ये एकत्र राहण्याचा दिवस(international day of living together in peace) साजरा करण्यात आला आहे.

 • लोकांना शांततापुर्ण पदधतीने एकत्र राहण्यासाठी प्रोत्साहित करणे हाच हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतु आहे.

 

 • संयुक्त राष्ट सभेने हा दिवस 2017 पासुन साजरा करण्यास प्रारंभ केला होता.
See also  दिनविशेष 13 मे 2033- Dinvishesh 13 May 2023

 

21) अण्णा कबाले डुबा यांना एस्टर्न गार्जियन नर्सिग 2022 ह्या पुररस्काराने सन्मानित करण्यात आले

 

अण्णा कबाले डुबा यांना एस्टर्न गार्जियन नर्सिग 2022 ह्या पुररस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

 • अण्णा कबाले डुबा ह्या एक केनियन नर्स आहेत.ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 • हा अवाँर्ड देण्याचे मुख्य उददिष्ट जागतिक स्तरावर आरोग्य सेवा वितरण प्रणालीमध्ये असलेले परिचारीकांचे योगदान अधोरेखित करणे हे आहे.

 

22)आज17 मे रोजी साजरा करण्यात येणार जागतिक दुरसंचार आणि माहीती सोसायटी दिन

 

आज 17 मे रोजी जागतिक दुरसंचार आणि माहीती सोसायटी दिन साजरा करण्यात येणार आहे.

 • ह्या वर्षीची याची थीम डिजीटल टेक्नाँलाँजी फाँर ओल्डर पर्सन अँण्ड हेल्थी एजिंग ही आहे.

23) हिंदी भाषेचे संवर्धन करण्यासाठी भारताने युएनमध्ये दिले आठ लाख अमेरिकन डाँलर्सचे योगदान

नुकतेच हिंदी भाषेचे संवर्धन करण्यासाठी भारताने युएन मध्ये आठ लाख अमेरिकन डाँलर्सचे योगदान दिले आहे.

 • भारत सराकारकडुन संयुक्त राष्टात हिंदी भाषेचा वापर अधिक केला जावा असा प्रयत्न देखील चालू आहे याचसाठी भारताने आपले हे अमुल्य योगदान दिले आहे.

 

24) राष्टीय शोध यंत्रणेच्या अतिरीक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती

नुकतीच राष्टीय शोध यंत्रणेच्या अतिरीक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 • याआधी अतुलचंद्र कुलकर्णी हे मुंबई गुन्हेशाखेचे सह आयुक्त तसेच एटीएस आणि सीआयडीचे प्रमुख देखील होते.

25) राष्टपतींच्या हस्ते 13 जवानांना शौर्य चक्राने करण्यात आले सन्मानित

 

नुकतेच राष्टपतींच्या हस्ते एकुण 13 जवानांना शोर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

 • यात मरणोत्तर हा सन्मान एकुण सहा जवानांना देण्यात आला आहे.

 

26) कोविड वाँरिअर ह्या पुस्तकाचे उदधव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन

नुकतेच कोविड वाँरिअर ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

 • कोविड वाँरियर ह्या पुस्तकाचे लेखन मिनाज मर्चट यांनी केले आहे.

 

 • इक्बाल सिंह यांनी कोविड कालावधीत मुंबईत जी मोहीम राबवली होती यावर हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.

27) युकेमध्ये मंकी पाँक्सच्या रूग्णांची करण्यात आली नोंद

 

नुकतीच युके ह्या देशामध्ये मंकी पाँक्सच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 • मंकी पाँक्स हा एक प्राण्यांमधुन माणसात पसरणारा आजार आहे.याचा पहिला रूग्ण 1970 मध्ये कांगो येथे आढळुन आला होता.
 • आणि who ने दिलेल्या नवीन माहीतीनुसार हा रोग आता सध्या एकुण 15 देशांमध्ये पसरला आहे.

 

28) एनसीआरटीसीला प्राप्त झाली भारतातील पहिली रँपिड ट्रान्झिट सिस्टम ट्रेन

नुकतीच एनसीआरटीसीला भारतातील पहिली रँपिड ट्रान्झिट सिस्टम ट्रेन प्राप्त झाली आहे.

 • दिल्ली ते मेरठ स्टेशन या दरम्यान ही ट्रेन धावणार आहे.

Leave a Comment