Table of Contents
लॉजिकल रिजनिंग म्हणजे काय? Logical reasoning in Marathi-
Logical reasoning हा एक असा विषय घटक आहे ज्याचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होत असतो.प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा तसेच सेट नेट यासारख्या परिक्षांमध्ये logical reasoning वर हमखास प्रश्न विचारले जात असतात.
याच्यामागे परिक्षकांचा हा मुळ हेतु असतो की आपण ज्या परिक्षार्थीला अधिकारी पद देणार आहोत त्याची वैचारिक पातळी किती खोल अणि तीक्ष्ण आहे.त्याची तार्किक क्षमता कशी आहे?किती खोल आहे हे पडताळुन बघण्यासाठी अशा पदधतीचे प्रश्न प्रत्येक competitive exam मध्ये प्रामुख्याने विचारले जात असतात.
कारण logical reasoning मध्ये आपल्याला असे काही logical प्रश्न विचारले जात असतात.ज्याच्यानेआपल्या तार्किक क्षमतेततही वाढ होते.अणि याने आपल्या तार्किक क्षमतेचा विकास होत असतो.
म्हणुन आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या विषयावर समजुन घेणार आहोत.logical reasoning म्हणजे काय?त्याचे प्रकार किती व कोणकोणते?logical reasoning वर आधारीत प्रश्न कसे सोडवायचे असतात?आपली logical reasoning skill कशी वाढवायची?logical reasoning मध्ये कशाप्रकारच्या प्रश्नांचा समावेश होत असतो?logical reasoning question सोडविण्याचे फायदे कोणकोणते असतात इत्यादी सर्व काही आपण आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.
- Logical reasoning म्हणजे काय?
- Logical reasoning चे प्रश्न किती अणि कोणकोणत्या प्रकारचे असतात?
- Logical reasoning वर आधारीत प्रश्न कसे सोडवायचे?तसेच आपण आपली logical reasoning skill कशी वाढवायची?
- Logical reasoning मध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो?
- Logical reasoning चे फायदे कोणकोणते?
- अंतिम निष्कर्ष :-
Logical reasoning म्हणजे काय?
Logical reasoning म्हणजे तार्किक अभियोग्यता क्षमता होय.ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये अशा प्रश्नांचा समावेश केला जात असतो.ज्यांच्यामुळे आपली तार्किक क्षमता ओळखली जात असते.अणि असे प्रश्न सातत्याने सोडविल्याने आपली तार्किक क्षमता वाढत असते तसेच तिला चालना देखील मिळत असते.
अणि हाच एक मुख्य उददेश्य असतो ज्यामुळे एमपीएससी,युपीएससी,सेट,नेट सारख्या स्पर्धात्मक परिक्षांमध्ये अशा पदधतीचे प्रश्न विचारले जात असतात.विदयार्थ्यांच्या तार्किक क्षमतेचा विकास होणे अणि त्यांच्या तार्किक क्षमतेत वाढ होणे हाच हेतु या सगळयांमागे असतो.
Logical reasoning चे प्रश्न किती अणि कोणकोणत्या प्रकारचे असतात ?
- Logical reasoning चे प्रश्न हे मौखिक व अमौखिक verbal तसेच non verbal ह्या दोन प्रकारचे असतात.
- 1)मौखिक – Verbal question
- 2) अमौखिक – non verbal question
1)Verbal
मौखिक – Verbal प्रकारचे प्रश्न जे असतात त्यामध्ये कोणतीही समस्या तसेच संकल्पणा ही शब्दांमध्ये व्यक्त केली जात असते.म्हणजेच आपण एखादा दिलेला मजकुर किंवा परिच्छेद आधी वाचायचा असतो मग तो नीट व्यवस्थित समजुन घ्यायचा असतो.अणि मग त्यातील कोणत्यातरी एक अचुक पर्यायाची निवड आपल्याला यात करावी लागत असते.
अणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कोणतीही संकल्पणा असो किंवा समस्या असो ती प्रतिमेच्या किंवा एखाद्या आकृतीच्या स्वरुपामध्येच मांडली जात असते.अणि त्यात जे पर्याय दिलेले असतात त्यापैकी एक योग्य पर्याय विदयार्थ्यांनी निवडायचा असतो.पण त्याआधी ती समस्या तसेच संकल्पणा देखील विदयार्थ्यांनी समजुन घेणे फार गरजेचे असते.
2) अमौखिक non verbal question-
Non verbal प्रकारचे प्रश्न असतात त्यामध्ये कोणतीही समस्या तसेच संकल्पणा ही आकृती तसेच एखाद्या प्रतिमेच्या रूपात मांडलेली असते.म्हणजेच दिलेली आकृती तसेच प्रतिमेचा आधार घेऊन कोणतीही समस्या यात समजुन घ्यायची असते अणि मग ती नीट समजुन झाल्यावर त्यातुन एक अचुक पर्याय निवडायचा असतो.
Logical reasoning वर आधारीत प्रश्न कसे सोडवायचे?आपण आपली logical reasoning skill कशी वाढवायची?
परिक्षेत विचारले गेलेले Logical reasoning वर आधारीत प्रश्न सोडवायला आधी आपण त्याची घरी दररोज प्रँक्टिस करणे गरजेचे असते.त्यासाठी आपण माँक टेस्ट सोडवू शकतो.ज्याने आपल्याला परिक्षेत logical reasoning वरील प्रश्न सोडविण्यास अडचण येणार नाही.तसेच logical reasoning वर आधारीत.
सराव प्रश्न सोडविण्याचा सराव आपण करू शकतो.
यात कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परिक्षेसाठी विचारले जाणारे logical reasoning वर आधारीत प्रश्न संग्रहित करून आपण ते रोज सोडविण्याची प्रँक्टिस देखील करू शकतो.फक्त सर्व प्रश्न सोडविताना आपल्याला एका वेळेच्या मर्यादेत राहून ते सोडवायचे असतात हे आपण लक्षात घ्यायला हवे.यासाठी आपण कंप्युटर टेस्ट देण्याचा अधिक सराव करायला हवा.याने आपल्याला वेळेत कोणताही प्रश्न सोडविण्याची सवय लागेल.
Logical reasoning मध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो?
Logical reasoning मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे मुख्यकरून फँक्टस,आर्ग्युमेंट वर आधारीत,क्रिटीकल रिजनिंग तसेच स्टेटमेंट वर आधारीत अशा प्रकारचे प्रश्न असतात.म्हणजेच logical reasoning मध्ये आपल्याला वेगवेगळया प्रकारचे प्रश्न संकल्पणा तसेच समस्या योग्य विकल्प निवडुन सोडवायच्या असतात.
Logical reasoning चे फायदे कोणकोणते? -Logical reasoning in Marathi
- Logical reasoning वर आधारीत प्रश्न सोडविल्याने आपल्या तार्किक अणि बौदधिक क्षमतेत वाढ होत असते.आपल्या विचार करण्याच्या तर्क वितर्क करण्याच्या क्षमतेत वाढ होत असते.शिवाय असे प्रश्न सोडविल्याने आपल्या बुदधीला देखील चालना मिळत असते.
- Logical reasoning वर आधारीत प्रश्न सोडविल्याने आपल्या वैचारिक पातळीत देखील वाढ होत असते.
- एकाच गोष्टीकडे परिस्थितीकडे वेगवेगळया पदधतीने बघण्याची अणि त्यातुन योग्य तो तर्क वितर्क काढण्याची सवय आपल्याला याने जडत असते.
अंतिम निष्कर्ष :
अशा प्रकारे आज आपण आजच्या लेखातुन Logical reasoning म्हणजे काय?Logical reasoning चे प्रश्न किती अणि कोणकोणत्या प्रकारचे असतात?Logical reasoning वर आधारीत प्रश्न कसे सोडवायचे?तसेच आपण आपली logical reasoning skill कशी वाढवायची?Logical reasoning मध्ये कशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो?Logical reasoning चे फायदे कोणकोणते असतात?इत्यादीविषयी जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी सदर लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा खासकरून स्पर्धा परिक्षेची तसेच इतर कोणत्याही आँनलाईन परिक्षेची तयारी करत असलेल्या विदयार्थ्यांपर्यत सदर माहीती नक्की जास्तीत जास्त पोहचवण्याचा प्रयत्न करा.
Very nice and helpfull
Thankyou very much ! We are glad to hear that it helped !