महाराष्ट्र शासन वनविभाग भरती – Maharashtra Van Vibhag Bharti 2023 In Marathi

महाराष्ट्र शासन वनविभाग भरती – Maharashtra Van Vibhag Bharti 2023 In Marathi

महाराष्ट्र शासन वनविभागाकडुन एक नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे ज्यात असे दिले आहे की कंत्राटी तत्वावर वनविभागामध्ये काही रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे.

वन विभागामार्फत काढण्यात आलेल्या ह्या भरतीमध्ये पुरूष तसेच महिला उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

सदर भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भरतीसाठी फाॅम भरायला देखील उमेदवारांना कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाहीये.भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.

म्हणुन इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

महाराष्ट्र शासन वनविभाग सदस्य सचिव सह्याद्री राखीव व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या मार्फत एक नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे.

ज्यात त्यांनी अकरा महिन्याच्या करारावर कंत्राटी तत्वावर तीन पदे भरण्यासाठी जाहीरात दिली आहे.

 Maharashtra Van Vibhag Bharti जाहीरात दिलेल्या पहिल्या पदाचे नाव –

१) परिस्थितीकीय तज्ञ –

  • शैक्षणिक पात्रतेच्या अटी –
  • वाईल्ड लाईफ सायन्स/फाॅरेस्ट्री/झू लाॅजी/इकोलाॅजी/बायोलाॅजी/इन्वहरमेंट सायन्स यापैकी कुठल्याही एका विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
  • या पदाच्या भरतीसाठी कॅमेरा ट्रॅपिंग तसेच जी आय एसचे ज्ञान तसेच व्याघ्र प्रकल्पात माॅनिटरींग केलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
  • कामाचे स्वरूप –
See also  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरची भरती सुरू

वन्यजीव संनियंत्रण कामे तसेच वन्यजीव संरक्षण/संगणकीय प्रणाली द्वारे माहीती विश्लेषण करणे/व्याघ्र संवर्धन आराखडा तयार करणे/निसर्ग शिक्षण तसेच प्रशिक्षण देणे प्री अॅग्युमेंटेशन कामात मदत करणे ही सर्व कामे परिस्थितीकीय तज्ञ पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना करावी लागणार आहे.

२) वन्यजीव वैद्यकीय अधिकारी –

  • शैक्षणिक पात्रता –
  • या पदाच्या भरतीसाठी अर्ज करणारया उमेदवाराकडे पशुवैद्यक शास्त्र तसेच पशुसंवर्धन वैद्यकीय पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • अणि वन्यजीव क्षेत्रामध्ये किमान तीन वर्षे काम करण्याचा अनुभव सुदधा असणे आवश्यक आहे.

 Maharashtra Van Vibhag Bharti कामाचे स्वरूप –

वनयजीवांना पशुवैद्यकीय सेवा पुरविणे/मृत झालेल्या वन्यजीवांचे शवविच्छेदन करणे/वन्यजीवांचे रक्षण करणे त्यांचे पुनर्वसन करणे/व्याघ्र प्रकल्पाच्या झालर क्षेत्रामध्ये लसीकरण मोहीम राबविणे/प्री अॅग्युमेंटेशन प्रोग्राम बाबदची कामे/संशोधन करणे प्रशिक्षण देणे.

३) उपजिविका तज्ञ/सामाजिक तज्ञ-

  • शैक्षणिक पात्रता –
  • सामाजिक कार्य शाखेमध्ये बी एस डबलयु पदवी तसेच पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • उपजिविका क्षेत्रात काम करण्याचा किमान दोन वर्षे इतका अनुभव असायला हवा.

 Maharashtra Van Vibhag Bharti कामाचे स्वरूप –

उपजिविका संब़ंधित कामांचे नियोजन करणे/ग्राम परिस्थितीकीय विकास निगडीत कामे करणे/बफर क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी प्रशिक्षण देणे तसेच मार्गदर्शन करणे/बचतगटाच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करणे/स्थानिक युवक तसेच शेतकरी यांच्या करीता रोजगार निर्माण करणे/ग्रामस्तरीय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण संशोधन करणे.

वयोमर्यादा –

या भरतीसाठी वयोमर्यादा २१ ते ३५ वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

 Maharashtra Van Vibhag Bharti भरतीसाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

  • सर्व पात्र उमेदवारांनी भरतीसाठी १४/२/२०२३ पर्यंत लिखित स्वरूपात खाली दिलेल्या पत्यावर आपला अर्ज सादर करायचा आहे.
  • उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड सह्याद्री भवन त्रिमुर्ती काॅलनी आगाशिवनगर पो मलकापुर ता कराड जि सातारा
  • अर्ज सादर करताना अर्जासोबत शैक्षणिक पात्रता अणि अनुभव संबंधित महत्वाच्या कागदपत्रांची सत्य प्रत देखील जोडणे आवश्यक आहे.
See also  बी टु बी अणि बी टु सी मार्केटिंग म्हणजे काय?B2b and b2c marketing information

 Maharashtra Van Vibhag Bharti मुलाखत –

अर्जाची कागदपत्रांची छाननी करून झाल्यावर २२/२/२०२३ रोजी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

भरतीचे इतर नियम अटी जाणुन घेण्यासाठी उमेदवारांनी भरतीचे नोटीफिकेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे.

भरतीचे नोटीफिकेशन Sahyadri Tiger Reserve Kolhapur 03 Bharti 2023