मराठी सुविचार – marathi suvichar

marathi suvicharmarathi suvicharmarathi suvichar

marathi suvichar

 1. राग ही एक अशी शिक्षा आहे ज्यात लोक चुका करत असतात अणि शिक्षा मात्र आपण स्वताला देत असतो.
 2. खोटया सांत्वनेपेक्षा स्पष्टपणे दिलेला नकार कधीही चांगला.
 3. जे घडुन गेले ते आपल्या हातात नसते पण जे घडणार आहे ते नक्कीच आपल्या हातात असते.
 4. जेव्हा नशिब साथ देत नसेल तेव्हा समजावं की आता कर्म करण्याची वेळ आली आहे आता आपल कष्ट आणि व मेहनत आपली साथ देणार.
 5. आपल्या चांगल्या परिस्थितीचा अहंकार करू नका कारण परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत
 6. तुम्ही देण्याची सुरूवात तर करून पहा मग येण्याची सुरूवात आपोआप होईल.मग ते धन असो वा प्रेम
 7. जिंकुन दाखवा !! काही तुमच्या हरण्याची आतुरतेने वाट पाहतायेत
 8. आयुष्यात कायम अपयश पदरी आलेल्यांना विचारा त्यांनाच खर्‍या यशाची किंमत कळत असते.
 9. लोक तुम्हाला महत्व देतायत की तुमच्या चांगल्या वेळेला महत्व देतायत? नक्की विचार करा .
 10. जे कष्ट,मेहनत करतात त्यांच्याकडनच चुक होणार ,मेहनतीला घाबरतात त्यांच पुर्ण आयुष्य दोष शोधण्यातच निघून जाते.
 11. स्वताला इतके व्यस्त ठेवा की नको त्या बाबतीत चिंता करत बसण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ असायला नको
 12. नेहमी स्वताचा विकास करीत राहा कारण गती अणि प्रगती हे तुमच्या जिवंतपणाचे प्रमाण असते.
 13. जगातील सर्वात मोठा अलंकार ही आपली मेहनत असते अणि जगातील सर्वात चांगला साथीदार आपला अनुभव
 14. जेथे प्रयत्नांची पराकाष्टा अधिक असते तिथे नशिबाला देखील झुकावेच लागते.
 15. जर बनायचेच असेल कोणत्याही क्षेत्रातील बेस्ट बना नही तर लोक तुम्हाला गृहित धरायला लागतील.
 16. कोणत्याही क्षेत्रातील अडचणी बघून माघार कधीच घेऊ नका काय सांगता येते ती समस्या सोडवायला देवाने तुमची निवड केलेली असेल.
 17. प्रत्येकाचे चांगले दिवस येत असतात.कारण बदल हे निसर्ग चक्र आहे ,चांगले व वाईट  दोघे दिवस कायम कधीच राहत नसतात .
 18. स्वतावर आत्मविश्वास इतका असावा की मला एखादा रस्ता नक्कीच मिळणार ही स्वतावर खात्री असावी अणि नाहीच मिळाला तर तो मी स्वता निर्माण करणार.
 19. नशिबवान ते नसतात ज्यांना जीवणात सगळेच काही चांगले मिळत असते नशिबवान तर ते असतात ज्यांना जे मिळाले ते त्यालाच चांगले मानून घेत असतात
 20. आपल्या जीवणात येणारी संकटे एकदम हाय वे च्या ट्रँफिक लाल सिग्नल सारखी असतात जी थोडा वेळ संयम पाळगल्यावर आपोआप हिरवी होऊन जातात.
 21. नेहमी स्वताच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहा कारण लोक फक्त उगवत्या सुर्यापुढेच हात जोडत असतात मावळत असलेल्या सुर्याला नाही.
 22. ज्यांची स्वप्र मोठी असतात त्यांची रात्र छोटी अणि दिवस मोठा असतो अणि ज्यांची रात्र मोठी असते त्यांचा दिवस नेहमी छोटा असतो
 23. तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी वेड व्हावेच लागेल कारण इतिहास वेडेच रचतात अणि शहाणे तो वाचतात.
 24. जेव्हा शक्यतेचे प्रमाण वाढत जाते तेव्हा अशक्यतेचे प्रमाण आपोआप कमी होते.
 25. संघर्ष करणारी व्यक्ती नेहमीच ह्या दोन गोष्टी प्राप्त करत असते एक मेहनतीचे फळ अणि समस्येचे समाधान.
 26. राग द्वेष अणि तिरस्कार ही तिघे संथ गतीने परिणाम करणारी विष असतात ज्याचे प्राशन आपण स्वता करत असतो अणि आपल्याला वाटते त्याच्याने कोणी दुसरा मरणार आहे.
 27. गरीबी अणि परिस्थिती आपल्यात अशी कौशल्ये निर्माण करत असते की त्यातून नाजुक शरीराची व्यक्तीही  मोठमोठी संकटे आव्हाने पेलणे शिकुन जात असते.
 28. लढण्याच्या आधी घाबरून गेलात तर तुम्ही मृत्युच्या आधीच मराल
 29. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याच्या चित्रपटाचा नायक असतो फरक फक्त एवढाच की काहींचा चित्रपट गाजतो काहींचा गाजत नाही.
 30. कधीकधी समोरच्यापेक्षा आपले दुख जरी मोठे असले तरी आपले दुख विसरून त्याला आधार देणे त्याक्षणी गरजेचे असते.
 31. जरी सर्व जग तुमच्याविरूदध उभे असेल तरी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा
 32. जेव्हा मनात जिंकण्याची जिद्द असते तेव्हा कितीही मेहनत केली तरी आपल्याला थकवा येत नसतो .
 33. गुडघे टेकायला लागेल हे जग तुमच्यापुढे, फक्त त्यासाठी आधी तुम्ही इतरांपुढे गुडघे टेकणे बंद करणे आवश्यक आहे.
 34. जोपर्यत तुमचा यशाचा प्रवास पुर्ण होत नसतो तोपर्यत कोणालाच तुमच्या कष्टाची जाणीव होत नसते.
 35. एखाद्यासमोर स्वताला सिदध करणे गरजेचे नसते तर त्याच्यापेक्षा उत्तम होऊन दाखवणे गरजेचे असते.
 36. सर्व काही गमविल्यानंतरही तुमच्यात अजून नवीन काही निर्माण करण्याची क्षमता असेल तर समजून जा की तुम्ही ह्या जगात कधीच निराश होऊन बसणार नाही.
 37. ज्यांचा आपल्या मेहनतीवर विश्वास असतो ते नशिबाचा विचार कधीच करत नसतात.
 38. तुम्हीच स्वताला कमजोर समजत असतात नाहीतर तुम्ही जे काही करु शकता ते ह्या जगात इतर कोणीच करू शकत नाही.
 39. लोकांना तुमचे यश बघायचे असते तुम्ही त्याच्यासाठी घेतलेले कष्ट नाही.
 40. कौशल्य तर सगळयांमध्येच असते फरक फक्त एवढाच आहे की कोणाचे कौशल्य दिसत नसते तर कोणाचे दिसत असते.
 41. बुदधीबळाचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो दोघांमध्ये जिंकण्यासाठी संयम हा बाळगावाच लागतो.
 42. पराभव मान्य करुन मरण स्वीकारण्यापेक्षा शेवटच्या श्वासापर्यत लढत राहणे कधीही चांगले.
 43. कोणाला काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगत आहात तुम्हाला स्वतालाच तुमची परिस्थिती बदलावी लागेल
 44. सातत्याने पुढे चालत राहण्यासाठी नेहमी स्वताचा मार्ग स्वताच तयार करीत राहा.
 45. कोणाची गुलामी का सहन करता जर तुमच्याकडे उडण्यासाठी पंख आहेत.
 46. आपल्या समस्येवरील उपाय फक्त आपल्याकडेच असतात लोकांकडे फक्त सल्ले असतात.
 47. जेव्हा चावणारे सुदधा तुम्हाला प्रेमाने गोंजारायला लागतात तेव्हा समजुन जा की वेळ आता तुमची आहे
 48. यश तर बसले आहे संकटाच्या पुढेच पण जर तुम्ही संकटांपासुनच दुर पळणार तर यशापर्यत कसे पोहोचणार
See also  लाईफ गुरु म्हणजे काय ? What Does A Life Coach Do?

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी