राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र –NSC information Marathi

NSC information Marathi

भारतीय कर बचत प्रमाणपत्र National Saving Certificate

हे एक कर बचत गुंतवणूक आहे जे की भारतीय नागरिक डाक विभागातून घेऊ शकतात.एक निश्चित रक्कम आणि कमी रिस्क, जोखीम  ह्यामुळे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे (NSC) ला गुंतवणुकीचा चांगला पर्याय समजला जातो.गुंतवणुक मध्ये आपल्या समोर गुंतवणुकीचे खूप सारे मार्ग आहेत.आपण आपल्या आर्थिक स्थितीवरून कोठे गुंतवणूक करायची हे ठरवू शकतो.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा एक चांगला गुंतवणुकीचा मार्ग आहे.NSC योजनेमध्ये रिस्क ही कमी असते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवरती व्याजदर किती असतो ?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चा व्याज दर आर्थिक मंत्रालायद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या द्वारे बदलत असतो.2011-22 वर्षातील एप्रिल ते जून चा NSC चा व्याजदर 6.8% आहे.मागच्या वर्षीही जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात NSC चा व्याजदर 6.8% होता.

विशेषतः :

 • पहिल्यांदा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही 10 वर्षासाठी आणि 5 वर्षासाठी होती.आता राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना 5 वर्षांसाठी आहे.
 • तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस मधून 5 वर्षासाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना खरेदी करू शकता.
 • आर्थिक मंत्रालयाच्या नियमानुसार व्याजदरात बदल होतो.म्हणजे कधी व्याजदर वाढू शकतो किंवा व्याजदर कमी देखील होऊ शकतो.पण अंदाजे 6% वर फिक्स व्याजदर असतो.
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्ही कमीत कमी 100 Rs गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत आपण तीन लोकांचे जॉइंट खाते उघडू शकतो.आणि ज्याचे वय 10 वर्षाच्या पुढे आहे त्याचेही आपण खाते उघडू शकतो.
 • गुंतवणूकदाराची मृत्यू झाल्यानंतर त्याने फॉर्म भरताना लावलेल्या वारसाला ह्या योजनेचे पैसे मिळतात.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना खरेदी करण्याचे मार्ग : NSC information Marathi

 1. स्वतचे एकट्याचे प्रमाणपत्र – मध्ये एक व्यक्ती  स्वतच तसेच  लहान minor आहे त्याचे NSC योजनेचे खाते उघडू शकतो.
 2. संयुक्त धारक प्रमाणपत्र – ज्यामध्ये NSC मध्ये दोन व्यक्तींचे जॉईंट खाते असते आणि दोघांनाही या योजनेचा समान लाभ होतो.
 3. संयुक्त बी टाईप सर्टिफिकेट – ह्यामध्ये पण दोन व्यक्तींचे जॉईंट खाते असते परंतु ह्या योजनेतून होणारा लाभ एकाच व्यक्तीला होतो.

योग्यता ;

 • भारताचे नागरिक NSC योजनेचा लाभ उचलू शकतात.
 • भारताचे नागरिक नसलेले या योजनेचा लाभ उचलू शकत नाहीत.
 • हिंदू अविभाजीत कुटुंब या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.

NSC गुंतवणुकीचे फायदे :

 • NSC योजना मध्ये जोखीम खूप कमी आहे आणि ह्याच्यावर भारतीय सरकारचे नियंत्रण आहे.
 • ह्यामध्ये उत्तम परतावा मिळत आलेला आहे .
 • ह्यामध्ये गुंतवणुकीची कमीत कमी रक्कम 100 असल्यामुळे सर्व सामान्य माणसे ही ह्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.
 • NSC पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण ती योजना सहजरित्या खरेदी करू शकतो.
 • ही योजना नाबालिक च्या नावावर ही खरेदी केली जाऊ शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यौननेत गुंतवणूक कशी करायची ?

 • आवश्यक डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा.
 • NSC चा फॉर्म भरून पोस्ट ऑफिस मध्ये सबमिट करा.
 • जेवढी तुम्हाला रक्कम गुंतवणूक करायची आहे तेवढी कॅश ने बीपीएम कडे द्या.

NSC योजनेचा फॉर्म भरताना लागणारी कागदपत्रे:

1)     NSC चा फॉर्म

2)     ओळखा पाठवून देणायकरता साईझ फोटो

3)     आधार कार्ड किंवा पॅन कार्ड

4)     मतदान प्रमाण पत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर मिळणारे कर्ज :

1)     केवळ भारतीय नागरिक NSC योजनेवर कर्ज प्राप्त करू शकतात.

2)     काहीच बँकस ह्या योजनेवरती कर्ज देतात.

3)     कर्जाचे व्याजदर हे त्या कर्ज देणाऱ्या बँकेवर्ती अवलंबून असते.

काही महत्वाच्या बाबी – NSC information Marathi

 • आपण एका पोस्ट कार्यालायतून दुसर्‍या कार्यालयात N 32 अर्जाचा वापर करून सहज हस्तांतर करू शकता , दुसर्‍या वव्यक्ति कडे N 34 अर्जाचा वापर करून ही सहज हस्तांतर करता येते
 • लॉक इन कालावधी 5 वर्षाचा असतो परंतु आपण काही म्हत्वाच्या कारणा करता पैसे काढता येतात , मृत्यू किंवा सक्षम अधिकारी कडे अर्ज देवून व कोर्ट ऑर्डर नुसार

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

Leave a Comment