जॉब वेबसाईट्स विषयी माहीती – नोकरी शोधायला नक्की मदत होईल !! Online job search websites

जॉब वेबसाईट्स विषयी माहीती – Online job search websites

आज आपल्याला प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या मुलभुत गरजांची पुर्ती करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.

आणि पैसे कमविण्यासाठी आपल्याला लागत असते एखादे कमाईचे साधन तसेच माध्यम.ज्याच्या आधारे आपण आपल्या मुलभुत गरजांना पुर्ण करू शकतो.तसेच आपला महिन्याचा खर्च भागवू शकतो.

यासाठीच शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपण सगळयात आधी शोधत असतो एक चांगला पगार असलेली नोकरी.आज सर्व जग डिजीटल झाले असल्यामुळे आपल्याला नोकरी मिळविण्यासाठी दिवसभर वणवण भटकण्याची गरज राहिलेली नाहीये.

आज आपण आपल्या शिक्षणानुसार आपल्याला हवी तशी नोकरी आँनलाईन शोधु शकतो.यासाठी आपल्याला फक्त आँनलाईन नोकरी विषयी माहीती देत असलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कोणती नोकरी आपल्यासाठी योग्य हे बघायचे असते आणि त्यासाठी आँनलाईन फाँर्म भरून अर्ज करायचा असतो.

मग आपली निवड झाल्यावर आपली जिथे निवड झाली आहे त्या कंपनीकडुन आपल्याला ईमेल तसेच मोबाईलवर संदेश पाठवला जात असतो.अशी ही आँनलाईन नोकरभरतीची ही सर्व प्रक्रिया असते.

आजच्या लेखातुन आपण काही अशाच टाँप आणि बेस्ट वेबसाईटविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

जिथे आपण घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातुन नोकरीचा शोध घेऊ शकतो.

आँनलाईन जाँब वेबसाईटचे आपल्याला फायदे काय असतात? !! Online job search websites   

आँनलाईन जाँब वेबसाईटद्वारे नोकरीसाठी अर्ज केल्याने आपली नोकरी मिळविण्यासाठी जी धावपळ,दमछाक होत असते ती होत नाही.शिवाय आपला वेळ वाचतो आणि आपल्या उर्जेची देखील बचत होत असते.

आँनलाईन जाँब वेबसाईटद्वारे आपण आपल्याला हवी तशी आपल्या आवडीनुसार,शिक्षणानुसार नोकरी प्राप्त करू शकतो.

See also  करिअर काऊन्सिलिंग म्हणजे काय?करिअर काऊंसिलर कसे बनावे? - What is career counselling

 टाँप आणि बेस्ट जाँब सर्चिग वेबसाईट :

1) नौकरी डाँट काँम :

2) माँस्टर इंडिया डाँट काँम :

3) लिंक्ड इन :

4) ग्लासडोअर :

5) इनडीड :

6) शाइन डाँट काँम :

7) टाइम्स जाँब :

8) गेट वर्क :

9) फ्रेशर्स वल्ड :

10) एम एनसी आँफिशिअल साईट :

1) नौकरी डाँट काँम :

नौकरी डाँट काँम ही एक भारतातील टाँप जाँब वेबसाईटसपैकी एक वेबसाईट आहे जिथे आपण आपल्या कला कौशल्य अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य असे काम निवडु शकतो.

आणि इथे आपल्याला नवनवीन जाँबच्या अपडेटस देखील प्राप्त होत असतात.नौकरी डाँट काँम ह्या वेबसाईटवर कमीत कमी 1 लाख कंपन्या आपल्या कंपनीसाठी रोज इम्पलाँईची भरती ह्या वेबसाईटच्या आधारे करत असतात.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे !! या Online job search websites   नोकरीसाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी कोणतीही फी आपल्याला द्यावी लागत नसते.

2) शाइन डाँट काँम :

शाईन डाँट काँम ही हिंदुस्थान टाइम्स कंपनीद्वारे सुरू केली गेलेली जाँब वेबसाईट आहे.ह्या वेबसाईटवर विविध कंपनीकडुन आपल्याला जाँबची संधी दिली जात असते.

येथे फक्त आपल्याला आपला रिझ्युम अपलोड , बायोडाटा करायचा असतो.मग आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुभवानुसार आपल्याला कोणकोणते जाँब करता येऊ शकतात कोणती नोकरी मिळु शकते हे देखील तिथे दिले जात असते.

इथे पाच लाख पेक्षा अधिक नोकरीसाठी जागा निघत असतात.ह्या वेबसाईटवर 3 करोड पेक्षा अधिक लोक नोकरीसाठी आपली नाव नोंदणी करत असतात.

3) माँस्टर इंडिया डाँट काँम :

माँस्टर इंडिया ही सुदधा भारतातीलच एक महत्वाची जाँब प्रोव्हाईड करणारी वेबसाईट आहे.आणि इथे जाँब देत असलेल्या कंपनींची संख्या पण खुप आहे.

ह्या वेबसाईटवर आपल्याला आंतराराष्टीय स्तरावरील जाँबचे अपडेटस मिळत असतात.ह्या वेबसाईटवरून आपण देशातच नव्हे तर परदेशातील कंपनीतही आपल्यासाठी चांगला जाँब मिळवु शकतो.

4) इनडीड को.इन:

इंडिड को इन ह्या वेबसाईटला आपण जगातील सर्वात मोठी जाँब वेबसाईट म्हणुन ओळखतो.इथे लाखो तसेच करोडो उमेदवार जाँबच्या शोधासाठी भेट देताना आपणास दिसुन येतात.

See also  १० वी पासवर महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी मध्ये अॅप्रेन्टिएस पदासाठी भरती सुरू - MSSDS recruitment 2023 in Marathi

इथे आपण आपल्या लोकेशन अनुभव आणि हव्या असलेल्या वेतनानुसार जाँबसाठी अँप्लाय करू शकतो.

इथे आपल्याला पाहिजे तशा पदधतीने रिझ्युम देखील तयार करण्याची सुविधा दिलेली असते.

5) टाइम्स जाँब :

ही जाँब वेबसाईट टाईम्स ग्रुप तर्फे सुरू करण्यात आलेली आहे.येथे आपल्याला 30 लाखापेक्षा अधिक नोकरीच्या शोधात असलेल्या आपली नाव नोंदणी केलेली दिसुन येते.

ह्या वेबसाईटवर आपल्याला आयटी इंजिनिअरींग,टेक्निकल मिडिया अशा वेगवेगळया क्षेत्रामध्ये कंपन्यांकडून जाँब प्रोव्हाईड केले जातात.

एवढेच नाही तर येथे आपल्याला सरकारी जाँब करण्यासाठी देखील जाँब अपडेटस देऊन सुचित करून संधी उपलब्ध करून दिली जाते.

6) लिंक्ड इन :

लिंक्ड इन ह्या जाँब वेबसाईटवरून आपण जगभरात कुठे आणि कोणती जाँब व्हँकँन्सी निघाली आहे हे जाणुन घेऊ शकतो.तसेच येथे आपण आपल्या लिंक्ड इन प्रोफाईलवरून जाँबसाठी देखील अँप्लाय करू शकतो.येथे कोणकोणत्या मोठमोठया कंपनींमध्ये कोणत्या पोस्टसाठी जाँबसाठी व्हँकँन्सी आहे हे दिले जात असते.

7) ग्लासडोअर :

ही सुदधा एक उत्तम जाँब वेबसाईट आहे जिथे आपण जाँबसाठी सर्च करू शकतो.ह्या जाँब वेबसाईटवर जाँबसाठी आपल्याला सुचित करण्यासाठी ईमेल नोटिफिकेशन देखील पाठवले जाते.इथे वेतन लोकेशन नुसार आपल्यासाठी जाँब सजेस्ट केले जातात.

8) गेट वर्क :

ही देखील एक चांगली जाँब सर्चिग वेबसाईट आहे.जिथे आपण जाँबसाठी सर्च करू शकतो.इथे आपल्याला पाहिजे तो जाँब आपण निवडुन त्यासाठी अँप्लाय करू शकतो.आणि वर्क घेऊ शकतो.

9) फ्रेशर्स वल्ड :

ही एक फ्रेशर्स साठी बनवलेली जाँब सर्चिग वेबसाईट आहे.जिथे शिक्षण पुर्ण नवीनच जाँबच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी विविध कंपन्याकडुन जाँब उपलब्ध करून दिले जातात.

10) एम एनसीच्या आँफिशिअल वेबसाईटस :

एम एनसीच्या देखील आपल्या काही जाँब वेब साईट आहेत जिच्या माध्यमातुन आपण आपल्यासाठी जाँब प्राप्त करू शकतो.येथे आपण नवनवीन आणि आपल्या आवडीनुसार जाँबची निवड करू शकतो

जाँबसाठी काही इतर वेबसाईटस : !! Online job search websites   

  1. अपना :
  2. वर्क इंडिया :
  3. क्वीकर :
See also  ई श्रम कार्ड यादी - 2023 e-shram card list 2023 in Marathi