ऑनलाईन शॉपिंग करताना घ्यावयाची काळजी – online shopping precautions Marathi

online shopping precautions Marathi

ऑनलाईन शॉपिंग करताना घ्यावयाची काळजी

आजच्या डिजिटल युगात घरातील किराणा सामना पासून पासून ते गोळ्या-औषधे सर्व ऑनलाईन पद्धतीने आपण विकत घेवू शकतो .तुम्हाला हव्या त्या वस्तू तुमच्या दारात येतात.पण ते म्हणतात प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली बाजु आणि वाईट बाजू दोन्ही असतात.ऑनलाईन शॉपिंग ची ही एक चांगली बाजू आहे आणि एक वाईट बाजू आहे.ऑनलाईन शॉपिंग च्या चांगल्या बाजूबद्दल तुम्हाला माहीतच असेल,पण ऑनलाईन शॉपिंग च्या वाईट बाजूबद्दल तुम्हाला माहीत आहे का ? आपण या लेखात आपण ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यायला हवी ? याबद्दल सम्पूर्ण माहिती पाहणार आहोत.

काही वेळा तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन शॉपिंग करायला जाता आणि तुमच्या बँकेतील,तुमच्या क्रेडिट कार्ड मधील पैसे जातात.अशी सावध पावलं उचलून , काळजी घेवून  तुम्ही ऑनलाईन शॉपिंग चा आनंद घेऊ शकता.

कार्ड ची माहिती (save) सेव करणे –

  • जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करताना कोणतीही वस्तू ऑर्डर करतो तेव्हा आपण payment debit card पेमेंट डेबिट कार्डने किंवा क्रेडिट कार्डने करण्याचे उचित समजतो.
  • तुम्ही जेव्हा डेबिट कार्डने किंवा क्रेडिट कार्ड ने पेमेंट करता,तेव्हा त्या पेमेंट पेजवर सेव डिटेल्ड म्हणून ऑप्शन असतो.त्यावर जर तुमची चुकून क्लिक झाली किंवा तुम्ही जर सारखे शॉपिंग करताना सारखे डेबिट कार्ड डिटेल टाकण्यापेक्षा एकदा कार्ड डिटेल सेव केली,तर तुमचे डेबिट कार्डमधील पैसे किंवा क्रेडिट कार्डमधील पैसे ऑनलाईन चोरी होऊ शकतात.
  • ऑनलाईन हॅकर तुमची सेव केलेली डिटेल हॅक करून पैसे त्यांच्या अकाउंट वरती ट्रान्सफर करतात.ह्या Fraud पासून वाचण्यासाठी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड डिटेल सेव करायला नको.
See also  बौद्ध धम्मातील आषाढी पौर्णिमेचे महत्व - Buddha Dhamma and poornima

अविश्वासू साईट मधून खरेदी न करणे – buying from fake , unauthentic websites

  • एक प्रोडक्ट देणाऱ्या खूप साऱ्या साईट्स ऑनलाईन उबलब्ध आहेत.(कपडे – Amazon , flipkart तसेच mantra )त्या प्रत्येक साईट मध्ये त्या प्रोडक्ट ची किंमत ही वेगळी असते.एकाच प्रोडक्ट ची किंमत काही ठिकाणी जास्त असते,तर त्याच प्रोडक्ट ची किंमत दुसऱ्या ठिकाणी कमी असते.
  • आपण जिथे स्वस्त वस्तू भेटते,तिथून ऑनलाईन शॉपिंग करतो.आपण हे उदाहरणावरून पाहू.तुम्हाला समजा मोबाईल घ्यायचा आहे आणि तुम्ही तुम्हाला घ्यायचा तो मोबाईल गुगल ला सर्च केला.तर काही ठिकाणी तुमचा मोबाइल 10000 रुपये चा 4000 रुपये ला भेटतोय.
  • आपण या जाळ्यात  अडकतो,अन आपली कार्ड माहिती अनसिक्युर साईट मध्ये देतो.यामध्ये आपले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हॅक होण्याची शक्यता खूप दाट असते.

प्रोडक्ट ची संपूर्ण डिटेल पाहणे – online shopping precautions Marathi

  • जेव्हाही तुम्ही ऑनलाइन प्रोडक्ट ऑर्डर करता,तेव्हा त्याची सम्पूर्ण माहिती बारकाईने पहा.नाहीतर काही वेळा काय होत,आपण अति उत्साहात लवकर बिना प्रोडक्ट डिटेल पाहता प्रोडक्ट ऑर्डर करतो.
  • असेच अजित सोबत झाले.त्याला बूट ऑर्डर करायचा होता.त्याने अति उत्साहात बूट ऑर्डर केला आणि ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतर त्याला समजले की,त्या बुटाची साईझ कमी आहे.
  • त्याने नंतर रिप्लेसमेंट करण्यासाठी प्रोडक्ट वर क्लिक केले तर त्या प्रोडक्ट वर नो-रिप्लेसमेंट होते.त्याच्याकडे पश्चाताप करण्यापेक्षा दुसरा पर्याय न्हवता.तुम्ही ही वस्तू ऑर्डर करताना त्याची संपूर्ण डिटेल पाहा.

उत्पाद बद्दल  दुसर्‍या ग्राहकांचे मत – review नक्की वाचा  –

  • आपण प्रोडक्ट ऑर्डर करताना त्या प्रोडक्ट खालील ग्राहकांचे मत रिविवं पाहणे गरजेचे आहे.काही वेळा काय होत आपण प्रोडक्ट ची माहिती पाहतो आणि प्रोडक्ट वरील रिविवं न पाहता प्रोडक्ट ऑर्डर करतो.
  • रिविवं पाहणे का गरजेचे आहे ? कारण त्यामध्ये लोकांनी त्या प्रॉडक्टचे अनुभव शेअर केलेले असतात.तुम्ही कितीही चांगली डिटेल्स दिलेली वस्तू ऑर्डर केली,पण त्याच्या वापरानंतरच तुम्हाला त्या उत्पादना बद्दल वाईट , चांगल्या बाबी समजतात ,क्वालिटी समजते.त्यामुळे प्रोडक्ट खरेदी करताना त्या प्रोडक्ट च्या खालील रिविवं पाहूनच प्रोडक्ट ऑर्डर करा.
  • काही वेळा काय होतं, तुम्ही जेंव्हा प्रोडक्ट पाहता आणि तुमचा त्यावेळी प्रोडक्ट घेण्याचा विचार बदलतो आणि तुम्ही प्रोडक्ट परत घ्यायचा म्हणून ऍड टू कार्ड मध्ये तो प्रोडक्ट सेव करता.पण जेव्हा तुम्ही काही दिवसांनी  त्या प्रोडक्ट वरती क्लिक करता ,तेव्हा त्या प्रोडक्ट ची किंमत पहिल्यापेक्षा वाढलेली असते.आशा वेळेस प्रोडक्ट ची किंमत कमी होईपर्यंत थांबले पाहिजे.नाहीतर तुम्ही जास्त किमतीत ती प्रोडक्ट खरेदी कराल.
See also  जगातील टॉप १० श्रीमंत शहरांची यादी | List of Top 10 Richest Cities in the World

तुम्ही वरील सावधानी बाळगून ऑनलाईन शॉपिंग चा  आपण आनंद नक्की घेऊ शकता.


SIP KNOWLEDGE

1 thought on “ऑनलाईन शॉपिंग करताना घ्यावयाची काळजी – online shopping precautions Marathi”

Comments are closed.