ओपन मार्केट आँपरेशन म्हणजे काय? – Open market operation information in Marathi

ओपन मार्केट आँपरेशन म्हणजे काय? – Open market operation information in Marathi

मार्केटमध्ये चलनपुरवठयात जेव्हा वाढ होते तेव्हा त्याला कमी करण्यासाठी म्हणजेच नियंत्रित करण्यासाठी आरबीआय गर्वमेंट बाँण्डची विक्री करत असते

आणि मार्केटमध्ये चलन पुरवठयात जेव्हा घट होत असते तेव्हा त्यात वाढ घडवुन आणण्यासाठी आरबीआय गर्वमेंट बाँण्डची खरेदी करते ह्याच संपुर्ण प्रक्रियेस ओपन मार्केट आँपरेशन असे म्हटले जात असते.

OMO चा फुलफाँर्म काय होतो?

OMO चा फुलफाँर्म open market operation असा होतो.

ओपन मार्केट आँपरेशनचे मुख्य उददिष्ट काय असते?

देशाच्या बाजारात जर चलन पुरवठयात वाढ झाली किंवा अचानक त्यात घट झाली तर त्याला नियंत्रित करण्याचे काम ओपन मार्केट आँपरेशन ह्या प्रक्रियेतुन केले जात असते.

यात देशाच्या चलनपुरवठयात खुपच वाढ झाली किंवा घट झाली तर त्याला नियंत्रित करण्यासाठी आरबीआयकडुन गर्वमेंट सिक्युरीटीजची विक्री तसेच खरेदी केली जाते.

चलन पुरवठयात वाढ झाल्यावर त्याच्यावर नियंत्रण आणने का गरजेचे आहे?

जर चलन पुरवठयात वाढ झाली आणि त्यावर नियंत्रण आणण्यात आले नाही तर देशातील महागाई मध्ये वाढ होण्याची शक्यता शकते.

महागाई यामुळे वाढेल की जेवढा अधिक चलन पुरवठा असणार तेवढा अधिक पैसा जनतेकडे राहील आणि खिशात भरपुर पैसे असल्यावर लोकांकडुन बाजारात वस्तुंची मागणी केली जाईल आणि एकदा जर वस्तुंची बाजारात मागणी वाढली तर त्या वस्तुंच्या किंमतीत देखील वाढ होऊ लागेल.

See also  बिहार बोर्ड १०वी टॉपर लिस्ट २०२३ | Bihar Board 10th Topper List 2023 PDF In Marathi, PDF DOWNLOAD

आणि अशा ह्या महागाईला आळा घालण्यासाठी नित्रंत्रणात आणण्यासाठी आरबी आय चलन पुरवठा कमी करत असते.

चलनपुरवठा खुप वाढल्यावर तो कमी करायला आरबीआय काय करते?

चलनपुरवठा कमी करायला आरबी आय काय करते की ओपन मार्केटमध्ये गर्वमेंट बाँण्डची विक्री करते जेणेकरून जेवढे अधिक गवर्मेंट बाँण्ड विकले जातील तेवढा अधिक पैसा आरबीआयकडे जमा होत राहील.आणि चलनपुरवठा देखील कमी होतो.

स्टेरीलायझेशन आँपरेशन कशाला म्हटले जाते?

ओपन मार्केटमध्ये चलनपुरवठा कमी करायला,नियंत्रणात आणायला जेव्हा आरबीआयकडुन गर्वमेंट बाँण्डची विक्री केली जात असते.ह्याच प्रक्रियेला स्टेरीलायझेशन आँपरेशन असे म्हणतात.

चलन पुरवठा खुपच कमी झाल्यावर काय होते?

जर चलन पुरवठा प्रमाणापेक्षा अधिक कमी झाला तर ते देखील देशाच्या आर्थिक विकासात बाधा ठरत असते कारण चलनपुरवठा खुपच कमी झाला तर लोकांकडे खुपच कमी पैसा येईल आणि जवळ खुपच कमी पैसे असल्याने लोक बाजारात जाऊन खरेदी करणार नाही वस्तुंची मागणी करणार नाही.आणि एकदा लोकांकडुन जर वस्तुंच्या मागण्या कमी झाल्या तर वस्तुंच्या किंमती खुपच कमी होणार.ज्याला डिफ्लेशन असे देखील संबोधिले जाते.आणि हे डिफ्लेशन चालुच राहिले तर देशात आर्थित मंदी देखील ओढावू शकते.

चलन पुरवठा खुपच कमी झाल्यावर तो वाढवायला आरबीआय काय करते?

बाजारात चलन पुरवठा कमी झाला तर अशा परिस्थिती मध्ये तो वाढवायला आरबीआय ओपन मार्केटमधुन गर्वमेंट बाँण्डची खरेदी करते.आणि त्यादवारे जास्तीत जास्त पैसे हे मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सोडत असते.

आरबीआयकडुन जेवढे अधिक बाँण्ड खरेदी केले जातात तेवढा अधिक पैसा बाजारात म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेत सोडला जातो.

Leave a Comment