जन समर्थ पोर्टलविषयी माहीती- Jan Samarth portal information in Marathi

जन समर्थ पोर्टलविषयी माहीती- Jan Samarth portal information in Marathi

केंद्र सरकार कडुन जनतेसाठी आरंभित करण्यात आलेल्या विविध योजना आणि कर्जदारांना हवे असलेले कर्ज हे दोघेही एकाच प्लँटफाँर्मवर उपलब्ध करून देता यावे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक आँनलाईन पोर्टल लाँच केले आहे ज्याचे नाव जन समर्थ असे आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच जनसमर्थ पोर्टलविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपणास देखील ह्या पोर्टलचा पुरेपुर लाभ घेता येईल आणि याचे आपणास प्राप्त होणारे फायदे देखील जाणून घेता येतील.

चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया जन समर्थ पोर्टल विषयी अधिक सविस्तरपणे.

जन समर्थ पोर्टल काय आहे?

जन समर्थ हे भारत सरकारकडुन सुरू करण्यात आलेले एक डिजीटल पोर्टल आहे.या पोर्टलदवारे आपणास तेरा क्रेडिट लिंक्ड सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

जन समर्थ पोर्टलचे फायदे कोणकोणते आहेत?

 

जन समर्थ पोर्टलविषयी माहीती- Jan Samarth portal information in Marathi

● ह्या पोर्टलदवारे कुठलाही लाभार्थी कर्जदाराशी थेट संपर्क साधु शकतो.

● या पोर्टलचा वापर करून आपण तेरा सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज घ्यायला आँनलाईन अर्ज करु शकतो.

● सरकारी योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करणे सहज आणि सोप्पे होईल.

See also  शिवम दुबे यांच्या विषयी जाणून घ्यायची 7 महत्वाची तथ्ये 7 important facts about Shivam Dubey in Marathi

● जन समर्थ पोर्टल दवारे आपणास आँनलाईन पदधतीने कर्जासाठी अँप्लाय करता येणार आहे आणि ह्या कर्जाची मंजुरी देखील आपणास आँनलाईनच प्राप्त होणार आहे.

● जन समर्थ पोर्टलचा वापर करून आपण आपल्या कर्जाचे स्टेटस चेक करू शकणार आहे.

● ज्यांना ह्या पोर्टलदवारे कर्जासाठी अँप्लाय करून देखील कर्ज प्रदान करण्यात आले नाहीये असे व्यक्ती यापोर्टलदवारेच आपली तक्रार नोंदवु शकणार आहेत.आणि आपण केलेल्या तक्रारीचा निकाल देखील तीन चार दिवसांतच लागुन जाणार आहे.याने नागरीकांना आपल्या कुठल्याही कर्जविषयक तक्रारीसाठी सरकारी कार्यालयात जाऊन पायपिट करावी लागणार नाही.

● ह्या पोर्टलमुळे कोणत्या योजनेतुन आपणास कर्ज हवे आहे हे आपणास ठरवता येईल तसेच जास्तीत जास्त लोकांना कर्ज प्राप्त होऊन स्वयंरोजगाराचा आरंभ करता येणार आहे.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने सुरू केलेल्या योजना एकाच ठिकाणाहुन लाभार्थीपर्यत सोप्पे आणि सहजरीत्या पोहचतील.

● कर्ज घेणारी व्यक्ती ह्या पोर्टलवरून उपलब्ध असलेल्या कर्जाच्या विविध आँफर बघु शकते आणि त्यातील आपल्या गरजेनुसार कुठल्याही एकाची निवड करू शकते.

जन समर्थ पोर्टल सुरू करण्याचे सरकारचे उददिष्ट कोणते आहे?

नुकतेच भारताचे पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोर्टल सुरू केले आहे ज्याचे नाव जन समर्थ पोर्टल असे आहे.

हे पोर्टल सुरू करण्यामागचा सरकारचा मुख्य हेतु हा देशातील विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या समस्त नागरीकांना सर्व योजना एकाच ठिकाणी सहज आणि सोप्या रीतीने उपलब्ध करून देणे हा आहे.

ह्या पोर्टलदवारे सर्व जोडण्यात आलेल्या योजनांचे कव्हरेज देखील सुनिश्चित केले गेले आहे.

जन समर्थ पोर्टल दवारे कोणाला कर्जासाठी अर्ज करता येणार आहे?

जन समर्थ पोर्टलचा वापर करून कुठलीही व्यक्ती कर्जासाठी अर्ज करू शकते.फक्त यासाठी आधी आपणास आपण कर्जासाठी अँप्लाय करत असलेल्या आपल्या लोन कँटँगरीची पात्रता काय आहे हे बघावे लागेल.आणि त्या पात्रतेत आपण फिट बसतो आहे का नाही हे देखील बघावे लागेल.

See also  राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस २०२३ काय आहे, महत्त्व, इतिहास । National Safe Motherhood Day In Marathi

म्हणजेच आपल्या पात्रतेनुसारच आपण कर्जासाठी अर्ज करू शकतो

जन समर्थ पोर्टलवर सध्या किती कर्ज श्रेण्या उपलब्ध आहेत?

जन समर्थ पोर्टलवर आपणास सध्या एकुण चार कर्जश्रेण्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि प्रत्येक कर्ज श्रेणीत विविध योजना देखील समाविष्ट केल्या आहेत.

यामध्ये शिक्षण,बिझनेस स्टार्ट अप,लिव्हिंग लोन कृषीविषयक मुलभुत सोय सुविधा इत्यादी समाविष्ट आहेत.

कर्जासाठी अर्ज करण्याआधी आपल्याला काही प्रश्न विचारले जात असतात.मग त्याच्या आपण दिलेल्या उत्तरांवरून आपण कोणत्या कर्जासाठी पात्र आहोत हे बघितले जाते.

जन समर्थ पोर्टल दवारे कर्जासाठी अर्ज करायला कोणती महत्वाची कागदपत्रे लागतील?

जन समर्थ पोर्टल दवारे आपण विविध प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करू शकणार आहे.पण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी काही वेगवेगळया डाँक्युमेंटची आवश्यकता आपणास पडणार आहे.

जन समर्थ ह्या पोर्टलवरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी लागत असलेल्या काही महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत हे बघुया.

आधार कार्ड

● वोटर आयडी कार्ड

● पँन कार्ड

● बँकेचे स्टेटमेंट,पासबुक

जन समर्थ पोर्टल दवारे कर्जासाठी केलेल्या अर्जाचे स्टेटस कसे आणि कुठुन चेक करायचे?

● ज्यांनी जन समर्थ पोर्टल दवारे कर्जासाठी अर्ज केलेला असेल ते आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी पोर्टलवर साइन इन करून डँश बोर्डवर देण्यात आलेल्या माय अँप्लीकेशन आँप्शनवर क्लीक करून आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकतात.

जन समर्थ पोर्टलवर आपली नावनोंदणी कशी करायची?

● जनसमर्थ पोर्टलवर आपली नाव नोंदणी करण्यासाठी https://www.jansamarth.in/register ह्या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करून घ्यावी.

● रेजिस्टरेशन साठी आपण आपला मोबाइल नंबर इंटर करायचा.तिथे दिलेला कँप्च्या कोड फिल करून घ्यायचा.मग आपल्या मोबाइल वर एक ओटीपी पाठवला जातो तो तिथे जसाच्या तसा स्क्रीनवर इंटर करून घ्यायचा.

 

ई-श्रम कार्डचे फायदे- E Shram Card Benefits In Marathi