ई-श्रम कार्डचे फायदे- E Shram Card Benefits In Marathi

Table of Contents

श्रम कार्डचे फायदे– E Shram Card Benefits In Marathi

 देशातील असे अनेक मजदुर तसेच कामगार आहेत जे आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवण व्यतीत करत आहे.ज्यामुळे त्यांचा पाहिजे तसा विकास देखील घडुन आलेला आपणास दिसून येत नाही.

आणि अशाच दुर्लक्षित झालेल्या कामगार तसेच मजदुर वर्गाचा सर्वागिण विकास घडवून आणण्यासाठी,केंद्र सरकारने श्रमिक वर्गासाठी सुरू केलेल्या एका विशेष योजनेविषयी म्हणजेच ई श्रम कार्ड विषयी आपण सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

चला तर मग मित्रांनो अधिक वेळ वाया न घालविता आपण ह्या योजनेविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेऊया.

श्रम कार्ड काय आहे? What Is E Shram Card In Marathi

ई श्रम कार्ड ही केंद्र सरकारकडुन सुरू केलेली एक योजना आहे.

जिच्यादवारे असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या काम करत असलेल्या कामगारांपर्यत,मजदुरांपर्यत सामाजिक सुरक्षेची योजना पोहचविणे,त्यांच्या डेटाला राष्टीय स्तरावर एकीकृत करणे,श्रमिकांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणे इत्यादी कार्ये ई श्रम कार्डदवारे पार पाडली जाणार आहे.

 श्रम कार्डचे फायदे किती आहेत आणि कोणकोणते आहेत?- E Shram Card Benefits In Marathi

ई-श्रम कार्डचे काही अत्यंत महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

  • ई श्रम कार्ड हे आपल्या आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहे.
  • असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या काम करत असलेल्या कामगारांपर्यत,मजदुरांपर्यत सामाजिक सुरक्षेची योजना पोहचविणे,त्यांच्या डेटाला राष्टीय स्तरावर एकीकृत करणे हा यामागील सरकारचा प्रमुख हेतु आहे.म्हणजेच याने असंघटित क्षेत्रातील मजदुरांना ह्या योजनेचा पुरेपुर फायदा घेता येणार आहे.
  • ई श्रम कार्ड प्राप्त झाल्यास आपण सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत असतो.
  • ई श्रमवर नोंदणी केल्यानंतर जर समजा आपला अपघात झाला आणि आपण त्यात मृत झालो तर आपल्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणुन दोन लाखापर्यतची नुकसान भरपाई दिली जात असते.आणि समजा आपण अघतातात दगावलो नही पण आपल्याला काही शारीरीक अपंगत्व आले तर अशा परिस्थितीत देखील आपणास एक लाखापर्यत नुकसान भरपाई मिळत असते.
See also  लोकसंख्या वाढीचे कोणते दुष्परिणाम होत असतात? Population explosion effects

श्रम कार्ड ही योजना सरकारने कधी लाँच केली होती?

ई-श्रम कार्ड ही योजना केंद्र सरकारने 2021 मध्ये लाँच केली होती.

श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतु काय आहे?

  • असंघटित क्षेत्रात राहत असलेल्या तसेच तिथे काम करत असलेल्या कामगारांपर्यत,मजदुर वर्गापर्यत सामाजिक सुरक्षेच्या योजना पोहचविणे,तसेच त्यांच्या डेटाला राष्टीय स्तरावर एकीकृत करणे हा ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यायामागील केंद्र सरकारचा प्रमुख हेतु आहे.
  • याचसोबत सर्व कामगार आणि मजदुरांना साठ वय झाल्यानंतर दर महिन्याला 3 हजारापर्यत पेंशन देऊन त्यांना आर्थिक दृष्टया साहाय्य करणे.एखाद्या कामगाराचा यात मृत्यु झाल्यास हेच पेंशन त्याच्या कुटुंबाला मिळत असते
  • असंघटित क्षेत्रातील मजदुर तसेच कामगार वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा सर्वागिन विकास घडवण्याचा प्रयत्न करणे.

श्रम कार्ड ह्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे?

ई श्रम कार्ड ह्या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ भारत देशातील सर्व असंघटित क्षेत्रात कार्य करत असलेल्या श्रमिक वर्गाला म्हणजे कामगार तसेच मजदुर व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ उठवता येणार आहे.

श्रम कार्ड ह्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार नाही?

ईपीएफओ(Employee Provident Fund Organization),ई एस आय एस (Employee State Insurance Corporation) ची मेंबरशीप असणारी कुठलीही व्यक्ती ह्या योजनेसाठी नोंदणी करून हिचा लाभ घेऊ शकत नाही.

श्रम कार्ड ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकतो?

ई श्रम कार्ड ह्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण दोन पदधतीने अर्ज करू शकतो-

1)आँनलाईन पदधतीने :

2) आँफलाईन पदधतीने :

श्रमिक ह्या योजनेची आँफिशिअल वेबसाईट कोणती आहे?

ई श्रमिक ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी देण्यात आलेल्या तिच्या आँफिशिअल वेबसाईटची लिंक कंसामध्ये दिली आहे(Https://Www.Eshram.Gov.In/)

असंघटित क्षेत्रातील श्रमिक वर्गामध्ये कोणकोणाचा समावेश होतो?

 शेतीमध्ये काम करणारे मजदुर तसेच कामगार

  • मासेमारी करणारा मजदुर तसेच कामगार वर्ग
  • पशुपालन व्यवसाय करत असलेले मजदुर तसेच कामगार वर्ग
  • इमारत बांधण्याचे काम करणारे मजदुर कामगार
  • विणकाम करणारे मजदुर
  • वीटभटटीत काम करणारे मजदुर
  • मीलमध्ये काम करणारे कामगार
See also  ६५ हजार जागांसाठी शिक्षक अभियोग्यता जाहिरात - डी एड तसेच बीएड - Maha TAIT Exam 2023

इत्यादी.

श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

 ई श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी लागणारी काही महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-

  • आधार कार्डची झेराँक्स
  • बँकेचे खाते पासबुक
  • रेशन कार्डची झेराँक्स
  • लाईट बीलची झेराँक्स
  • संपर्कासाठी मोबाईल नंबर

श्रमिक कार्ड कसे बनवायचे? 

  • ई श्रमिक कार्ड बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवर जाऊन सर्च बारमध्ये Https://Www.Eshram.Gov.In/ ही श्रमिक योजनेची आँफिशिअल वेबसाईटची लिंक इंटर करावी.
  • आणि मग ई श्रमिक योजनेच्या आँफिशिअल वेबसाईटवर गेल्यावर Registration ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
  • Registration मध्ये आपणास Self Registration चे आँप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करून आपला आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर इंटर करायचा.
  • मोबाईल नंबर फील केल्यानंतर आपल्यासमोर एक कँप्च्या कोड दिसुन येईल तो जसाच्या तसा Enter Capcha मध्ये जाऊन तिथे फिल करून घ्यायचा.ई-श्रमिक कार्ड कसे बनवायचे 2
  • यानंतर आपण ईपीएफओ तसेच Esic चे मेंबर आहोत का असे आपणास स्क्रीनवर विचारले जाईल तिथे आपण No वर क्लीक करून Send Otp वर ओके करावे.
  • मग आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो तो स्क्रीनवर जसाच्या तसा टाईप करून घ्यायचा आणि Submit वर ओके करायचे.
  • यानंतर आपण आपला आधार कार्डचा नंबर इंटर करून सबमीट करायचा असतो.
  • नंतर आपल्यासमोर एक फाँर्म ओपन होत असतो त्यात विचारलेली सर्व माहीती(Education,Bank Details,Personal Details) व्यवस्थित भरून घ्यायची.जसे की आपण आपल्याला लावलेल्या नाँमिनीचे नाव,जन्मतारीख,जेंडर आपली अँड्रेस डिटेल बँक विषयक माहीती इत्यादी फिल करून घ्यायचे.
  • मग सर्व माहीती भरून झाल्यावर सर्व भरलेली माहीती पुन्हा एकदा चेक करून घ्यावी आणि आपण भरलेली सर्व माहीती योग्य आहे याचे कन्फरमेशन देऊन सबमीट बटणावर ओके करायचे.
  • नोंदणी करून झाल्यानंतर आपणास बारा अंकी कोड असलेले एक कार्ड प्राप्त होते ज्याला Account Number असे म्हणतात.
See also  प्लेटलेट्स म्हणजे काय ? कश्या वाढवाव्या - How to increase platelet count Marathi

श्रमिक कार्ड डाऊनलोड कसे करायचे? 

  • वरील सर्व माहीती भरून झाल्यावर आपले तयार झालेले ई श्रमिक कार्ड आपणास स्क्रीनवर दिसुन येत असते.
  • आणि मग आपण स्क्रीनवर उजव्या बाजुला दिलेल्या Download UAN कार्ड ह्या आँप्शनवर क्लीक करावे.आपले ई श्रमिक कार्ड डाऊनलोड होऊन जाईल.

श्रमिक कार्डविषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न

1) श्रमिक कार्ड नाव नोंदणीची अंतिम मुदत काय आहे?

 ई श्रमिक कार्ड नाव नोंदणीची कुठलीही अंतिम मुदत नाहीये.आपण कधीही ई श्रमिक योजनेच्या आँफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपली नाव नोंदणी करू शकतो.

2) श्रमिक कार्ड बनवण्यासाठी आधी काही चार्ज,फी भरावी लागते का?

 ई श्रमिक कार्ड बनवण्यासाठी आपणास कुठलीही चार्ज,फी भरावी लागत नाही.

3) श्रमिक कार्डसाठी विदयार्थी देखील अर्ज करू शकतात का?

 नाही ई श्रमिक कार्डसाठी मजदुरी काम करत नसलेले,कामगार नसलेले आणि फक्त शिक्षण घेत असलेले बिन कमाऊ विदयार्थी अर्ज करू शकत नसतात.

4) श्रमिक कार्डदवारे पेंशन कसे प्राप्त करायचे?

 ई श्रमिक कार्डदवारे पेंशन प्राप्त करण्यासाठी आपणास पंतप्रधान श्रम योगी योजनेत नाव नोंदणी करावी लागते आणि इथे नाव नोंदणी करायला आपल्याकडे ई श्रमिक कार्ड असावे लागते.कारण आपल्याकडे ई श्रमिक कार्ड असेल तर यादवारे आपण Pmsym योजनेसाठी अर्ज करू शकतो.

5) श्रमिक कार्ड योजनेविषयी काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण काय करावे?

 ई श्रमिक कार्ड योजनेविषयी काही शंका असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण 14434 ह्या राष्टीय निशुल्क क्रमांकावर संपर्क साधुन आपल्या शंकांचे निरसन करू शकतो.योग्य ते मार्गदर्शन प्राप्त करू शकतो.

 6) श्रमिक कार्ड ह्या पोर्टलर आत्तापर्यत भारतातील किती व्यक्तींनी नोंद केली आहे?

 ई श्रमिक कार्ड ह्या पोर्टलवर आत्तापर्यत भारतातील 20 कोटीपेक्षा अधिक कामगार तसेच मजदुर वर्गाने आपली नाव नोंदणी केली आहे.असे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने टविट करून सांगितले आहे.

7) श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी कुठल्याही कामगार तसेच मजदुराचे वय किती असणे आवश्यक आहे?

 ई श्रम कार्ड प्राप्त करण्यासाठी भारतातील कुठल्याही कामगार तसेच मजदुराचे वय हे किमान 16 आणि जास्तीत जास्त 59 असणे आवश्यक आहे.

8 thoughts on “ई-श्रम कार्डचे फायदे- E Shram Card Benefits In Marathi”

    • धन्यवाद, आपल्याला या लेखातून उपयुक्त माहिती मिळाली य्या बद्दल आनंद आहे, पुन्हा एकदा धन्यवाद.

  1. खूप छान प्रकारे मराठी वेळ भाषेत विश्लेषण केलेत धन्यवाद अशी प्रखोल माहिती मिळत नाहीय कोठेच खूप खूप आभार

  2. खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

Comments are closed.