ओपीडीचा फुल फाँर्म काय होतो? OPD Full Form In Marathi

ओपीडीचा फुल फाँर्म – OPD Full Form In Marathi

जेव्हा पण आपण एखाद्या हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी जातो किंवा एखाद्या अँडमिट रूग्नाला भेटायला जातो तेव्हा तिथे एक शब्द आपणास नेहमी ऐकायला मिळत असतो.आणि तो शब्द म्हणजे ओपीडी

आपण नेहमी हाँस्पिटल मध्ये पेशंटला ओपीडी डिपार्टमध्ये घेऊन जा.असे काही शब्द ऐकत असतो पण यांचे अर्थ आपणास माहीत नसतात.कारण हा शब्द आपल्यासाठी एकदम नवीन आणि अपरिचित असतो.

आजच्या लेखात आपण ओपीडीविषयी एकदम सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनातील याविषयीच्या सर्व शंका दुर होतील.

चला तर मग जाणून घेऊया ओपीडीविषयी अधिक सविस्तरपणे.

ओपीडीचा फुल फाँर्म काय होतो? OPD Full Form In Marathi

ओपीडीचा फुल फाँर्म Out Patient Department असा होतो.

ओपीडी म्हणजे काय असते?ओपीडी कशाला म्हटले जाते? OPD Meaning In Marathi

  • ओपीडी हा हाँस्पिटलमधलेच एक महत्वाचे क्षेत्र तसेच भाग असतो.ज्याला मराठीत आपण बाह्यरूग्ण क्षेत्र असे देखील म्हणत असतो.
  • जर आपण नीट निरीक्षण केले तर आपणास असे निदर्शनास येईल की प्रत्येक हास्पिटलमध्ये एक ओपीडी डिपार्टमेंट असते.
  • जेथे हाँस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल झालेले रूग्ण आणि हाँस्पिटलमध्ये काम करणारी तेथील स्टाफ हे एकमेकांच्या संपर्कात येत असतात.
  • मित्रांनो कुठल्याही हाँस्पिटलमध्ये गेल्यावर आपण ही एक गोष्ट चांगल्या प्रकारे नोटीस केली असेल की जेव्हा एखादा पेशंट हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी जात असतो.तेव्हा त्याला सगळयात पहिले ओपीडी डिपार्टमध्ये घेऊन जातात.
  • त्यानंतर मग तेथील स्टाफ म्हणजे कर्मचारी वर्ग ठरवत असतो की त्या पेशंटला कोणत्या डिपार्टमध्ये ठेवायचे.
  • साधारणत :ओपीडी डिपार्टमेंट हे कोणत्याही हाँस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरच स्थित असते.
See also  हार्ड काँपी आणि साँफ्ट काँपी मधील फरक - Difference Between Hard Copy And Soft Copy In Marathi

ओपीडी डिपार्टमेंटचे कोणकोणत्या विभागात विभाजन केले जाते?

ओपीडी डिपार्टमेंटचे पुढील काही विभागात विभाजन केले जात असते.

Department Of Neurology

● Department Of Gynecology

● Department Of General Medicine

● Department Of Orthopedics

ओपीडी डिपार्टमध्ये ठेवण्यात आलेल्या कुठल्याही रूग्णावर उपचार करण्याचे त्याची देखरेख करण्याचे काम कोणाचे असते?

ओपीडी डिपार्टमध्ये ठेवण्यात आलेल्या कुठल्याही रूग्णावर उपचार करण्याचे त्याची देखरेख करण्याचे काम त्या हाँस्पिटलमधील नर्स करत असते.आणि समजा त्या रूग्णाची प्रकृती अधिक खालावली तर मग त्याला आयसीयुमध्ये भरती केले जात असते.

ओपीडीच्या सर्विसेस कोणकोणत्या असतात?(OPD Services In Marathi)

ओपीडी डिपार्टमेंटमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या कोणत्याही पेशंटला कोणत्याही प्रकारची शारीरीक स्वास्थयविषयक अडचण येऊ नये यासाठी त्याला पुढीलप्रमाणे अनेक सुख सुविधा पुरवल्या जात असतात.

1) परीक्षा कक्ष(Examination Rooms) :

परीक्षा कक्ष(Examination Rooms ओपीडी डिपार्टमेंटच्या ह्या सेक्टरमध्ये पेशंटला चेक केले जात असते.याने त्याला नेमके काय होते आहे?कसला त्रास होतो आहे?कुठला आजार जडलेला आहे?हे डाँक्टरांच्या लक्षात येत असते.याने डाँक्टरांना त्या पेशंटवर योग्य ते उपचार करता येत असतात.

2) सल्ला मसलत चेंबर(Consultation Chembar) :

ह्या सेक्टरमध्ये तज्ञांकडुन पेशंटला आहार घेण्याबाबद,स्वताच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबद योग्य तो सल्ला मसलत करून त्यावर उपचार केला जात असतो.

3) निदान विभाग(Diagnostic Department) :

निदान विभागात पेशंटचे पुढील वेगवेगळया सर्विसदवारे सँपलचे एकत्रीकरण केले जात असते.

● रेडिओलाँजी

● मायक्रोबायोलाँजी

● पँथाँफिजिओलाँजी

इत्यादी.

4) फार्मसी (Pharmacy) :

फार्मसी ह्या विभागाकडुन रूग्णांना औषधे वगैरे देऊन त्यांच्यावर उपचार केले जात असतात.

फार्मसी विभागाचे काम औषध बनवणे विकणे हे देखील असते.

ओपीडी डिपार्टमेंटचे विभाग किती आणि कोणकोणते आहेत?(Departments Of OPD In Marathi)

ओपीडी डिपार्टमेंटच्या महत्वाच्या विभागांची नावे  –

● कार्डिओ थोरॅसिक सर्जरी

● न्यूरोसर्जरी

● ऑर्थोपेडिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जरी

● जनरल आणि लॅपरोस्कोपी सर्जरी

See also  Lien amount म्हणजे काय ? What is SBI lien amount Marathi information

● नेफरोलॉजी आणि रेनेल ट्रान्सप्लांट सर्जरी

बाह्यरूग्ण कोणाला म्हटले जाते? Outpatient Meaning In Marathi

● बाह्यरुग्ण हा देखील एक रुग्णच असतो पण त्याला 24 तास किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात नाही परंतु तो त्याच्यावर उपचार किंवा निदान केले जाण्यासाठी हाँस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये जात असतो.

आतील रूग्ण कोणाला म्हटले जाते?(Inpatient Meaning In Marathi)

● हा एक असा रूग्ण असतो ज्याला 24 तास किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी तसेच आठवडाभर देखील रुग्णालयातत उपचारासाठी दाखल केले जात असते.

आयपीडीचा फुलफाँर्म काय होतो?(Ipd Full Form In Marathi)

आयपीडीचा फुलफाँर्म Inpatient Department असा होतो.

कुठल्याही हाँस्पिटलमध्ये ओपीडी डिपार्टमेंट अधिक महत्वाचे का असते?

ओपीडी डिपार्टमेंट हे हाँस्पिटलमध्ये उपचारास आलेल्या कोणत्याही पेशंटसाठी खुप महत्वाचे असते.

कारण त्या पेशंटला ओपीडीमध्ये नेल्यानंतर त्याची योग्य ती तपासणी करूनच त्याच्यावर कोणते उपचार केले जावेत हे डाँक्टरांकडुन ठरवले जात असते.

OPD आणि Ipd यादोघांमध्ये कोणता फरक असतो?(Diffrence Between Ipd And OPD In Marathi)

● ओपीडीचा फुल फाँर्म Out Patient Department असा होतो.

आयपीडीचा फुल फाँर्म In Patient Department असा होतो.

● आरोग्य विषयक स्वास्थविषयक कुठलीही समस्या असलेला व्यक्ती जेव्हा निदान आणि उपचारासाठी रुग्णालयात जात असतो परंतु त्याची प्रकृती एवढीही गंभीर नसते की त्याला हाँस्पिटलमध्ये काही दिवस उपचारासाठी अँडमिट करून घेतले जावे.आणि रूग्णालयातच उपचारासाठी काही दिवस ठेवले जावे अशा पेशंटसला उपचारासाठी ओपीडी डिपार्टमेंटमध्ये नेले जाते.

आरोग्य विषयक तसेच स्वास्थविषयक कुठलीही गंभीर समस्या असलेला व्यक्ती जेव्हा निदान आणि उपचारासाठी रुग्णालयात जात असतो तेव्हा त्याची प्रकृती एवढी गंभीर असते की त्याला हाँस्पिटलमध्ये काही दिवस उपचारासाठी अँडमिट करून घेतले जाते.आणि रूग्णालयातच उपचारासाठी काही दिवस ठेवले जात असते अशा पेशंटसला उपचारासाठी आयपीडी डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात येते.

See also  पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये - 65 environment slogans in Marathi