एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल आरटीई प्रवेशाची लाॅटरी – RTE Lottery result date in Marathi

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाईल आरटीई प्रवेशाची लाॅटरी rte lottery result date in Marathi

शिक्षण हक्क कायदा म्हणजे right to information नुसार महाराष्ट्र राज्यातील जेवढयाही खासगी शाळा आहेत त्यामध्ये आर्थिक तसेच दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना 25 टक्के इतक्या राखीव जागा ठेवण्यात येत असतात.

या राखीव जागांवर प्रवेश प्राप्त करण्यासाठी म्हणजेच आरटीआई अंतर्गत पात्र ठरत असलेल्या आपल्या राहत्या घराजवळील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश प्राप्त करून देण्यासाठी पालकांना अर्ज करावा लागत असतो.

आरटीई प्रवेशाची शेवटची तारीख ही 25 मार्च 2023 ही होती.हया आरटीई प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत राज्यामधील सुमारे 8 हजार 828 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 939 जागांकरीता 3 लाख 63 हजार 39 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते.

- RTE Lottery result date in Marathi
RTE Lottery result date in Marathi

राज्यातील सर्व पालक वर्गाचे याच गोष्टीकडे लक्ष लागलेले आहे की आरटीई प्रवेशासाठी लाॅटरी कधी कधी काढली जाईल?

ह्यावेळी आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी उपलब्ध जागेपेक्षा अधिक अर्ज आल्याचे सांगितले जाते आहे.पण यात देखील10 टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज हे बाद केले जात असतात.याला कारण फाॅममध्ये भरली जाणारी अर्धवट चुकीची वारंवार भरलेली एकच माहीती कारणीभूत असते.

नुकत्याच हाती आलेल्या एका अपडेट नुसार असे सांगितले जाते आहे की आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जे अर्ज जमा केले आहेत.त्यांची लाॅटरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढली जाऊ शकते.

राज्यभरातील जेवढ्याही 3 लाख 63 हजार 39 विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी आपले अर्ज दाखल केले होते त्यांच्या अर्जाची चौकशी ही एन आयसीच्या माध्यमातुन केली जात आहे.

ही चौकशी पुर्ण झाल्यानंतर लवकरच एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्या दरम्यान विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जाची ही लाॅटरी जाहीर करण्यात येईल अशी घोषणा प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडुन करण्यात आली आहे.

कशा पद्धतीने लाॅटरी काढली जाणार?

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे की आरटीई अंतर्गत प्रवेश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जे अर्ज दाखल केले आहेत ह्या अर्जाची लाॅटरी शाळा निहाय करण्यात आलेले अर्ज,अणि त्या अर्जांची एकुण संख्या लक्षात घेऊन काढण्यात येणार आहे.

See also  एल आयसी एजंट कसे बनावे How to become lic agent

यात सगळ्यात पहिले १ किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची लाॅटरी काढली जाणार आहे यानंतर १ ते ३ किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी वर्गाची लाॅटरी काढली जाणार आहे.

राज्यस्तरीय पातळीवर एकच लाॅटरी रिझल्ट घोषित केला जाणार आहे.सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेश प्राप्त करण्यासाठी एक नियमित फेरी राबविण्यात येणार आहे.

या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थी वर्गाला प्रवेश प्राप्त करण्यासाठी टप्याटप्याने प्रतीक्षा यादीप्रमाणे ४ फेरया राबविण्यात येणार आहे.

शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज दाखल केले असतील तर अशा वेळी ह्या विद्यार्थ्यांच्या सर्व अर्जाची लाॅटरी सोडत काढली जाते आणि मग त्यानुसार विद्यार्थी वर्गाचे प्रवेश निश्चिती केली जाते.

अणि समजा आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी आलेले अर्ज प्रवेश क्षमतेपेक्षा खुप कमी आले असतील तर अशा परिस्थितीत आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जात असतो.

लाॅटरी दवारे आपल्या पाल्यास प्रवेश मिळाला आहे पालकांना कसे कळणार?

लाॅटरी दवारे आपल्या पाल्यास प्रवेश मिळाला आहे किंवा नाही हे पालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज करताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर एस एम एस पाठवून कळविले जाते.

म्हणून पालकांनी आरटी ई अंतर्गत आपल्या मुलाला शाळेत प्रवेश प्राप्त करून देण्याकरीता अर्ज करताना जो मोबाईल नंबर रेजिस्टर केला होता त्यावर येणारे मॅसेज चेक करत राहायचे आहे.

याचसोबत आरटीई पोर्टलवर जाऊन application wise details ह्या टॅबवर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकायचा आहे यानंतर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे आपणास दिसुन जाईल.

आरटीई प्रवेशासाठी शाळेत निवड झाल्यानंतर शाळेत प्रवेश घेण्यासाठी काय करावे लागेल?

आरटीई प्रवेशासाठी शाळेत आपल्या पाल्याची निवड झाली आहे किंवा नाही हे बघण्यासाठी पालकांनी आरटीई पोर्टलवर जायचे आहे

See also  प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०२२ विषयी माहीती - PMEGP Loan Scheme 2022 Information In Marathi

पोर्टलवर गेल्यावर application wise details ह्या टॅबवर क्लिक करायचे आहे.आपला अर्ज क्रमांक टाकुन आपल्या अर्जाची स्थिती बघुन घ्यायची आहे समजा आपल्या पाल्यास लाॅटरी लागली असेल तर शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी दिलेल्या प्रवेशपत्राची प्रिंट काढुन घ्यायची आहे सोबत हमीपत्राची देखील प्रिंट काढुन घ्यायची आहे.

यानंतर अलाॅटमेंट लेटर मध्ये आपल्या राहत्या विभागातील पडताळणी समितीचा जो अॅडरेस दिला असेल त्या अॅडरेसवर अलाॅटमेंट लेटरची प्रत घेऊन जायचे आहे प्रती सोबत अलाॅटमेंट लेटरवर सांगण्यात आलेली कागदपत्रे देखील जोडायची आहे.

याचसोबत हमी पत्राची प्रिंट घेऊन संबंधित कार्यालयात जाऊन भेट द्यायची आहे.

कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थी तसेच त्यांचे पालक शाळेत वेळेवर हजर न राहिल्यास काय होईल?

कागदपत्रे पडताळणीसाठी येण्याकरीता विद्यार्थी अणि त्यांच्या पालकांना त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर सर्वप्रथम दोन ते तीन संदेश पाठवून कळविले जाते.

यानंतर देखील विद्यार्थी तसेच त्यांचे पालक कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित नाही झाले अणि त्या विद्यार्थीने विहित मुदतीत जाऊन पडताळणी समिती कडे जाऊन त्याचा प्रवेश निश्चित देखील नाही केला तर अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांची जागा रिकामी ठेवली जात असते.

अणि मग त्याच रिक्त जागेवर लाॅटरी दवारे निवड करण्यात आलेल्या वेटिंग लिस्ट मधील एका पात्र विद्यार्थ्यांला प्रवेशाची संधी दिली जाते.

आरटीई २५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आपल्या पाल्यास प्रवेश प्राप्त झाला आहे किंवा नाही हे आपणास तेव्हा कळेल जेव्हा आपणास संदेश पाठविला जाईल की प्रवेशाकरीता आपली निवड झाली आहे किंवा नाही

यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन आपणास प्रवेशाकरीता काही आवश्यक डाॅकयुमेंट जमा करायचे असतात.हे डाॅकयुमेंट जमा केल्यानंतर आपणास जी पावती दिली जाते त्यात आपल्याला प्रवेश मिळाला आहे किंवा नाही हे देखील दिलेले असते.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश प्राप्त झाल्यानंतर वडिलांची बदली झाली दुसरया शहरात राहायला चाललो अशा कुठल्याही कारणाने आपणास शाळा बदलुन मिळत नसते.

See also  डाक विभागात 40,889 पदांसाठी सरकारी नोकरीची संधी | Indian Postal Department Bharti 2023 In Marathi

म्हणून अर्ज करताना अशाच शाळेत प्रवेश प्राप्त करण्यासाठी अर्ज करायला हवा ज्या शाळा असलेल्या शहरात आपण कायमस्वरूपी वास्तव्यास आहे.आपल्या पालकांची नोकरी देखील आहे जेणेकरून वडिलांची बदली झाल्याने अशी कुठलीही समस्या उद्भवणार नाही.