महात्मा बसवेश्वर कोण होते? -Saint Mahatma Shri Basaveshwar
आज २२ एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती.महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज आपण महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी काही महत्वाची माहिती थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
महात्मा बसवेश्वर हे एक आद्य भारतीय समाजसुधारक तसेच युगपुरुष होते.
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म २२ एप्रिल ११०५ मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी ह्या गावामध्ये झाला होता.
वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयेच्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाला असे म्हटले जाते.पण महात्मा बसवेश्वर यांचा जन्म कधी झाला कोठे झाला याबाबत मतभेद देखील असल्याचे आपणास दिसून येते.
महात्मा बसवेश्वर यांचा समाजातील सर्व कर्मठ विधींना प्रथांना विरोध होता.महात्मा बसवेश्वर यांचे वय फक्त आठ असताना त्यांनी मूंज करण्यास नकार देत समाजातील कर्मठ विधींना आपला विरोध दर्शवला.
यानंतर महात्मा बसवेश्वर यांनी घराचा त्याग केला अणि ते कुडलसंगम येथे एका भव्य अध्ययन केंद्रात निघून गेले होते.
कुडलसंगम येथे एका भव्य अध्ययन केंद्रात गेल्यावर त्यांना जात वेदमुनी नावाचे आदर्श गुरू प्राप्त झाले.
तब्बल बारा वर्षे तेथे महात्मा बसवेश्वर यांनी विविध भाषांचा सखोल अभ्यास केला.याचसोबत त्यांनी विविध धर्म अणि तत्वज्ञानांचा देखील अभ्यास केला.
यानंतर महात्मा बसवेश्वर यांचा विवाह घडुन आला.महात्मा बसवेश्वर हे सोलापूर येथील मंगळवेढा येथे सुमारे एकतीस वर्ष वास्तव्यास होते.
महात्मा बसवेश्वर यांनी इथे एका बिजवल नावाच्या राजाकडे कारकुनाची नोकरी देखील केली.आपल्या अथक परिश्रम अणि कामावरील अतुट श्रद्धेमुळे महात्मा बसवेश्वर हे राजाचे कोषाधिकारी बनले.
इथे महात्मा बसवेश्वर वेदशास्त्र,धनुर्विद्या इत्यादी कलेत पारंगत झाले.आपल्या चाणाक्ष बुदधी अणि हुशारीमुळे महात्मा बसवेश्वर हे राज्यातील प्रधान बनले.
सोलापूर येथील मंगळवेढा येथे ३१ वर्षे वास्तव्यास असताना महात्मा बसवेश्वर यांनी वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना देखील केली.
संत बसवेश्वर हे संगमेश्वराचे एक निष्ठावान भक्त होते.बसवेशव्रांनी ज्ञान भक्ती अणि कर्म यांचा उत्तम समन्वय साधला
लिंगायत धर्माच्या प्रसारासाठी महात्मा बसवेश्वर श्रवणबेळकोटा,बसवकल्याण ह्या कर्नाटक मधील प्रदेशात आले होते.इथे त्यांनी लिंगायत धर्माचा विस्तार केला.
महात्मा बसवेश्वर यांनी शिव उपासनेचा पुरस्कार केला जगात शिव हा एकमेव ईश्वर आहे असे त्यांचे मत होते.महात्मा बसवेश्वर हे कुडलसंगम येथील संगमेश्वराचे नितांत साधक होते.
ओम नम शिवाय हा महात्मा बसवेश्वर यांचा आवडता मंत्र होता.
महात्मा बसवेश्वर यांनी जगाला दया,अहिंसा,सत्य,सदाचार,नीती,शील, इत्यादीची शिकवण दिली आपल्या ह्याच विचारांचा समाजात प्रचार प्रसार देखील केला.
याचसोबत महात्मा बसवेश्वर यांनी जगाला एकाच देवाची भक्ती करा,भुतदया बाळगा, सर्वांशी प्रेमाने वागा परोपकार करा ही अनमोल शिकवण आपणास दिली.
संत बसवेश्वर यांनी कर्नाटक राज्यातील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक साहित्यिक इतिहासामध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे.
महात्मा बसवेश्वर यांनीच जगातील पहिली शिवानुभ मंडप अनुभव मंडप ह्या लोकशाही संसदेची स्थापना केली.ही संसद म्हणजे एकुण ७७० पुरूष स्त्री यांचा समावेश असलेली महासभा होत.
महात्मा बसवेश्वर यांनी ह्या मंडपाच्या चर्चेच्या माध्यमातुन सामाजिक जागृतीचे काम केले.बसवेश्वर यांनी मंडपातील ह्याच चर्चा वचनाच्या सवरुपामध्ये लिहुन काढल्या होत्या.
संत बसवेश्वर यांनीच लोकांना विचार स्वातंत्र्याची बंधुभावाची प्रेरणा दिली.संत बसवेश्वर यांनी पुरषांसोबत महिलांना देखील लिंगदीक्षेचा हक्क मिळवून दिला.
सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आधार देत त्यांची सेवा केली.समता हे प्रमुख तत्व मानत संत बसवेश्वर यांनी धर्माचा प्रचार प्रसार केला.
तत्कालीन समाजाला हादरवून सोडेल असा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वर यांच्या पुढाकारामुळेच घडुन आला होता हा विवाह बाराव्या शतकात पार पडला होता.
संत बसवेश्वर यांनी केलेल्या सामाजिक कामगिरीमुळे जनतेने त्यांना विश्वगुरू,विश्व विभुती, महात्मा, क्रांतिकारक वचनकार आद्य समाजसुधारक इत्यादी पदव्या देऊन सन्मानित केले