टीएफ डब्लयु एसचा फुलफाँर्म काय होतो?अर्ज प्रक्रिया व पात्रता , वैशिष्ट्ये – TFWS full form in Marathi

टीएफ डब्लयु एसचा फुलफाँर्म काय होतो?TFWS full form in Marathi

टी एफ डब्लयु एसचा फुलफाँर्म tuition fee waiver scheme असा होत असतो.

टी एफ डब्लयु एस म्हणजे काय TFWS meaning in Marathi

टी एफ डब्लु एस ही एक योजना आहे ज्यात मुलांना शिकवणी शुल्क माफ केले.

ज्या विदयार्थ्यांची आर्थिक परिस्थिति बिकट आहे घरची परिस्थिति एकदम हालाखीची आहे.अणि त्यांचे वार्षिक उत्पन्न देखील खुप कमी आहे अशा गरीब अणि गरजु विदयार्थ्यांसाठी महाराष्ट सरकारने ही योजना सुरू केली आहे.

ह्या योजनेच्या अंतर्गत महाविद्यालयातील टयुशन फी ही आपणास माफ केली जात असते.

महाराष्ट्र सरकारने टीएफडब्लयु एस ही योजना कधी सुरु केली होती?

महाराष्ट सरकारकडुन ही योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती.

टी एफ डब्लयु एस ही टयुशन फी माफी योजना कोणत्या विदयार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती.

टी एफ डब्लयु एस योजना अशा विदयार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली होती ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे.

ह्या योजनेत जे विदयार्थी बसतात त्यांना काँलेजमधील एकुण फी मधील टयुशन फी माफ केली जात असते.

See also  एम बी बी एस फुलफाँर्म - MBBS full form in Marathi

टी एफ डब्लू एस योजनेचे वैशिष्ट्य काय आहे?

● सगळयात महत्वाची बाब म्हणजे ही योजना कुठल्याही एका विशिष्ट राखीव गटासाठी नसुन सर्व जाती पातीच्या विदयार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे म्हणजे ह्या योजनेचा लाभ आर्थिक दृष्टया मागास असलेला कुठल्याही जातीतील विदयार्थी घेऊ शकतो.

● अणि ही योजना सर्व शासकीय,प्रायव्हेट,विना अनुदान प्राप्त काँलेजांना देखील बंधनकारक केली गेली आहे.

● ह्या योजनेकरीता आपणास कँप राउंड मधुन प्रवेश दिला जात असतो.ह्या योजनेची गुणवत्ता यादी देखील वेगळी तयार केली जात असते.

शासकीय इंजिनिअरींग काँलेजामधील 40 ते 45 हजार इतकी असते.प्रायव्हेट इंजिनिअरींग काँलेजमध्ये ही फी किमान 45 हजार ते एक लाख इतकी असते.अशा परिस्थिति मध्ये गरजु हुशार अणि आर्थिक परिस्थिति बिकट असलेल्या गरीब कुटुंबातील विदयार्थ्याला देखील इंजिनिअरींग करता यावी याकरीता AICTE (all india council for technical education) ने योजना सुरू केली आहे.

टी एफ डब्लयु एस योजनेच्या पात्रतेच्या अटी

टी एफ डब्लयु एस योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांपुढे पात्रतेच्या अटी काय ठेवण्यात आल्या आहेत?

टी एफ डब्लयु एस ह्या योजनेसाठी जो उमेदवार अर्ज करेल त्याने पुढील पात्रतेच्या अटी पुर्ण करायला हव्यात.

● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विदयार्थी हा महाराष्टातील रहिवासी असायला हवा.

● विदयार्थ्यांचे त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तरच त्याला ह्या योजनेचा लाभ घेता येईल.

● ह्या योजनेचा ज्याला लाभ घ्यायचा आहे तो विदयार्थी त्या विदयार्थ्याने काँलेज अणि कोर्सचा देण्यात आलेला एक वेगळा टी एफ डब्लयु एस चाँईस कोड निवडायला हवा.हा कोड आपली पसंती दर्शवताना नमुद करणे गरजेचे असते.

● टी एफ डब्लयु एस ह्या स्कीमकरता ज्या जागा भरल्या जात असतात त्या राज्य स्तरीय पातळीवरील असतात.

टी एफ डब्लयु एस ही योजना कोणत्या शैक्षणिक अभ्यासक्रमांवर विदयार्थ्यांसाठी उपलब्ध आहे?

● इंजीनियरिंगची पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी

See also  Brain Rules 12 Principles - बुक समरी मराठीत - Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

● टी एफ डब्लयु एस हे फक्त डिप्लोमा प्रथम वर्ष अणि बी ई प्रथम वर्षसाठी आहे.डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा तसेच डायरेक्ट सेकंड ईयर इंजिनिअरींगसाठी हे नसते.

● हाँटेल मँनेजमेंटचा कोर्स करणारे विदयार्थी तसेच पोस्ट डिप्लोमा करायला आपण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात एकुण किती टक्के जागा सीट ह्या योजनेसाठी राखीव असतात?

जर समजा महाविद्यालयात एखाद्या शाखेसाठी अँडमिशनचे सीट एकुण जागा 60 आहे तर तीन वाढीव जागा वेगळया ह्या योजनेसाठी ठेवल्या जात असतात.

अणि जर हेच सीट 120 असतील तर 6 अणि 180 असेल तर 9 टी एफ डब्लयु एस सीट उपलब्ध असतात.

म्हणजेच एकुण पाच ट़क्के जागा यात उपलब्ध असतात.

टी एफ डब्लयु एस ह्या योजनेची माहीती पुस्तिका कुठून डाऊनलोड करायची?

टी एफ डब्लयु एस ह्या योजनेची माहीती पुस्तिका आपण dtemaharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात.

टीएफ डब्लयु एस योजनेसाठी प्रवेश मिळण्यासाठी अँडमिशन फाँर्म भरताना कुठली काळजी विदयार्थ्यांनी घ्यायला हवी?

टी एफ डब्लयु एस योजनेसाठी फाँर्म भरताना फाँर्ममध्ये जर आपणास विचारले असेल की do you want to apply for tfws scheme तर तिथे फार्ममध्ये आपणास yes करावे लागणार आहे.

टी एफडब्लयु एस साठी yes फक्त ओपन अणि ओबीसी कँटँगरीमधील विदयार्थ्यांनी करावे एससी एससी एसबीसी ह्या कँटँगरीतील विदयार्थ्यांनी yes करू नये कारण ह्या कँटँगरीमधील विदयार्थ्यांना आँलरेडी फी माफ असते.

ज्या विदयाथ्यांनी टी एफ डब्लयु एससाठी yes केले आहे अशा विदयार्थ्यांची मेरीट लिस्ट तयार केली जाते.अणि ह्या लिस्टमधुन टाँपच्या तीन विदयार्थ्यांची निवड टी एफ डब्लयु एससाठी केली जात असते.

आँप्शन फाँर्म भरताना टी एफ डब्लयु एसचे सर्व कोड आधी टाकावे लागतात.

टी एफ डब्लयु एसची स्कीम कधी लागु होते?

कोणत्या काँलेजात टी एफडब्लयु एससाठी अँप्लाय करायचे?

See also  CVV क्रमांक काय आहे? CVV Information in Marathi -CVV Full form

ज्या महाविद्यालयाचा मागील वर्षाच्या इंटेट 60 असेल तर त्या काँलेजच्या अँडमिशनचे किमान पन्नास टक्के इंटेक फुलफिल झाल्यावर ही स्कीम लागु होते.

म्हणुन आपण अँडमिशन घेत असलेल्या विशिष्ट शाखेतील अँडमिशन पन्नास ट्क्के झाले आहे पन्नास टक्के मागील वर्षाच्या सीट भरल्या आहे अशाच काँलेजात आपण टी एफ डब्लयु एससाठी अँप्लाय करावा.

टी एफ डब्लयु एस स्कीमसाठी अर्ज करायला लागणारे डाँक्युमेंटस –

● तहसिलदाराने दिलेला वार्षिक उत्पन्न दाखला ज्यात आपले उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी दाखवलेले असेल.

● जातीचा दाखला

● जात पडताळणी

● इंट्रांस इक्झाममधील स्कोअर कार्ड

● दहावी बारावी मार्कशीट

● ना़ँन क्रिमिलिअर