VPN म्हणजे काय ? मराठी माहिती

VPN म्हणजे काय ? मराठी माहिती

VPN म्हणजे काय ? मराठी माहिती

VPN म्हणजे काय ? मराठी माहिती

आज काल  वृत्तपत्रात टीव्ही चॅनेल्स  वर फेसबुक आणि ट्विटर बाबतच्या प्रायव्हसी पॉलिसीच्या बातम्या आपल्या वाचनात येत असतील.अशात ग्राहकांची खाजगी जीवन, गोपनीयता,, ऑनलाइन प्रायव्हसी बद्दल बरीच चर्चा सुरय.

टेक्निकल , तंत्रज्ञान संगणक बद्दल माहिती असणारे च नाही तर सर्वानाच आपल्या ऑनलाइन लाईफ बद्दल चिंता असते, काही माहिती खाजगी कशी ठेवता येईल ह्या बाबतीत  विचार करताना दिसतात.

VPN काय  आहे?

वर म्हटल्याप्रमाणेजी लोक जी आपल्या सोशल मीडिया लाईफ किंवा ऑनलाइन लाइफ बद्दल सतर्क आणि गंभीर असतात ती नक्कीच VPN चा वापर करत असतात.

हल्ली ह्याचा वापर वाढला असला तरी लोकान ह्यांचा वापर कसा करावा ह्याबतीत तितकंसं महिती उपलब्ध नाही.

VPN- म्हणजे VIRTUAL PRIVATE NETWORK

VPN ला आपण दोन ठिकाण जोडणारा एक सुरक्षित खाजगी मार्ग म्हणू शकू,  जसे बाहेरील कुणी आपल्या खाजगी घरच्या तळघरात काय करतोय हे कुणी पाहू शकत नाही कारण तळघर बांदिस्त आणि खाजगीआहे.

तसेच तांत्रिक भाषेत ही VPN ही अस कनेक्शन , मार्ग किंवा जोडणी असते जे आपल्याला ह्या ऑनलाइन इंटरनेट च्या जगात अधिक संरक्षण   देते,खास करून जर आपण रेल्वे स्टेशन किंवा सिनेमा हॉल किंवा रस्त्यावर वर च इंटरनेट वापरत असाल.आपल्या ऑनलाइन बाबी अधिक secure बनवते.

आपण VPN आपल्या इंटरनेट राऊटर , कॉम्पुटर वर किंवा मोबाईल डिव्हाईस, मोझिला किंवा क्रोम ब्राऊजर मध्ये बसवू शकता , इन्स्टॉल करू शकता.

See also  आर्थिक समावेशन म्हणजे काय?- Financial inclusion meaning in Marathi

VPN नेमकं कसं काम करते?

जेव्हा आपण VPN वापरत नसता तेव्हा आपण शोधत असलेली माहिती कुठल्या संरक्षण शिवाय आपल्या मोबाइल किंवा कॉम्पुटर मधून आपल्याला इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनी च्या सर्व्हरवर जाते आणि तिथून ती सर्व जगभरतल्या सर्व्हर वर फिरत असते. अश्या वेळेस आपला कॉम्पुटर मोबाईल असंरक्षित असतो आणि सतत व्हायरस ऍटॅक ला बळी पडू शकतो,आपल्या ऑनलाइन कामांना ,आपण शोधत असलेलेल्या माहिती ला ट्रॅक केलं जातं, थोडक्यांत आपली टेहळणी सूर असते.

पण,, आपण जर VPN वापरत असाल तर-आपली माहिती बाहेर सर्व्हर वर जाताना ही गोपनीय स्वरूपात किंवा आपण म्हणू या की code भाषेत जाते ,जी भाषा कुणाला ही कळत नाही किंवा समजत नाही.

VPN म्हणजे  काय ? तर हे अगदी सोपं आणि सरळ काम करत. VPN निश्चित करत, आपलया आश्वस्त करते  की आपण मोबाईल किंवा कॉम्पुटर वर जे काही करताय, काय माहिती शोधताय ती बाहेर सर्व्हर वर जाताना एका संरक्षण कवचात बाहेर जावी.(encryption layer)

तसेच आपण इंटरनेट वर काय शोधत आहात ते आपल्याला इंटरनेट देणाऱ्या कंपनी करता सर्व गोपनीय आणि न वाचता येणाऱ्या भाषेत असते.

उदाहरण सहित पाहू या नेमकं VPN कस मदत करते?

समजा तुमी गुगल मध्ये प्रश्न सर्च करायला टाकलात की  what is USB ?  अश्यावेळी आपलं VPN सिस्टीम तात्काळ त्या प्रश्न ला एका कोड स्वरूपात बदल करतो जसे “xdvsh@12$@^^@*^|^^|^^6#7” आणि त्या नंतर च तो प्रश्न आपल्या सर्च इंजिन मध्ये आणि इंटरनेट सेवा देणाऱ्या सर्व्हर्स पोहचून पुढं जगभरात जातो.

आपल्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनी ला माहीत असते का आपण VPN वापरता का?

हो ,त्यांना कॉम्पुटर मधील काही डेटा फाइल्स वरून कळत की तुमी VPN वापरताय पण त्यांना  हे कळत नसते की तुमी काय करताय? नेमकी काय माहिती शोधत आहात.

See also  दैनंदिन जीवणातील वापरली जाणारी सामान्य इंग्रजी प्रश्न उत्तरे - Daily Use Common English Question Answer In Marathi

VPN चा उपयोग कश्या करता होतो?

  • स्वतःची ऑनलाइन निगराणी आणि ठेहळणी पासून बचाव
  • काही वेबसाईट वर दुसऱ्या देशात बंदी असते अश्या साइट्स ओपन करण्याकरता
  • आपल्याला इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीज पासून आपली माहिती गोपनीय ठेवण्याकरता
  • काही ठिकाणी टोरंट्स डाउनलोड केले जातात त्या साठी
  • हॅकर्स आपल्या ऑनलाइन ऍक्टव्हिटीज वर टेहळणी करततात त्यापासून बचाव करण्याकरता
  • आजकाल ज्या स्ट्रीमिंग वेबसिरीज चालतात त्या पाहण्यासाठी

VPN चे काही प्रकार

  • SSL /TLS-  ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी
  • SSH- सिक्युर शेल
  • SSTP- मायक्रोसॉफ्ट सिक्युर सोकेट टनेलिंग प्रोटोकॉल

पण लक्षात घ्या की VPN सिस्टीम कुकीज ब्लॉक नाहीं करू शकत त्यामुळे काही प्रमामात फेसबुक अमेझॉन आपली महिती ट्रक करू शकते.

कुठले VPN वापरावे

सहसा VPN बाबतीत नामांकित, विश्वसनीय  आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या कंपनी कडून च सेवा घ्यावी. उदा. मोझिला आणि ऑपेरा ब्राऊजर च्या स्वतःच्या VPN सर्व्हिसेस तसे फ्री सर्व्हिस देणाऱ्या भरपूर कंपनी च आजकाल पेव फुटलय पण अश्या सर्व्हिस देणाऱ्या पासून दूर राहिलेच योग्य.


Affiliate marketing Books at Amzon



With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,