ब्रँण्ड संकल्पना – माहीती –
ब्रँण्ड हा एक असा शब्द आहे जो आपणास नेहमी टिव्हीवर ऐकायला,वर्तमानपत्रात वाचायला मिळत असतो.
आपण नेहमी कोणाच्या तरी तोंडुन ऐकत असतो की मला स्वताचा ब्रँण्ड तयार करायचा आहे अमुक कंपनीने मार्केटमध्ये स्वताचा एक ब्रँण्ड तयार केला आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच संकल्पणे विषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
Brand म्हणजे काय? What is A Brand in Marathi
ब्रँण्ड ही अमुर्त विपणन किंवा व्यवसाय संकल्पणा असते.जी कुठल्याही ग्राहकाला एखाद्या विशिष्ट कंपनीचे नाव,कंपनीचे प्रोडक्ट,सर्विसेस ओळखायला मदत करत असते.
ब्रँण्ड हा एखाद्या कंपनीचा लोगो,सिम्बाँल,घोषवाक्य डिझाईन,इन्फोग्राफीक्स,कलर,साऊंड किंवा कंपनीचे नाव प्रोडक्ट तसेच सर्विस असु शकते जे त्या कंपनीला तिच्या प्रोडक्ट सर्विसला इतर कंपन्यांपेक्षा एक वेगळी ओळख प्रदान करत असते.
ब्रँण्ड हे फक्त काँर्पारेट युझसाठी नव्हे तर ते सामान्य व्यक्तीसाठी देखील वापरले जात असतात.विशेषकरून रिअँलिटी टेलिव्हीजन तसेच सोशल मिडियाच्या जगात.
ब्रँण्ड हा शब्द कुठल्याही व्यवसाय तसेच बिझनेसच्या मार्केटिंगशी संबंधित आहे.याने लोकांना एखादी विशिष्ट कंपनी तिचे प्रोडक्टस किंवा एखादी व्यक्ती ओळखायला मदत होत असते.
ब्रँण्ड हे अमुर्त असतात.याचा अर्थ आपण त्यांना कुठलाही स्पर्श करू शकत नाही.किंवा त्यांना डोळयांनी पाहु देखील शकत नसतो.
ब्रँण्ड हे कुठल्याही कंपनी तिचे प्रोडक्ट सर्विसेस तसेच व्यक्तीबददलच्या धारणांना आकार देण्यास मदत करीत असतात.
कुठल्याही मार्केटप्लेसमध्ये आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची नावाची(ब्रँण्डची) मार्केटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी,कस्टमरला त्याची ओळख करता यावी यासाठी प्रत्येक ब्रँण्ड हे आयडेंटीटी मार्करचा वापर करत असतात.
ब्रँण्ड हा कुठल्याही कंपनीला तिच्या प्रोडक्ट सर्विसला प्रचंड मुल्य प्रदान करत असतो.त्यांना त्याच उद्योगात इतर प्रतिस्पर्धींपेक्षा अधिक स्पर्धात्मक धार देत असतात.
हेच कारण आहे की आज मार्केटमध्ये अनेक कंपनी,संस्था ट्रेडमार्क प्राप्त करून आपल्या ब्रँण्डसाठी कायदेशीर संरक्षण घेत असतात.
Brand चे मुख्य उददिष्ट काय असते?
मार्केटमध्ये आपली आपल्या कंपनीची व्यवसायाची प्रोडक्ट सर्विसेसची इतर प्रतिस्पर्धींपेक्षा एक वेगळी ओळख निर्माण करणे हे एकमेव उददिष्ट कुठल्याही व्यवसाय उद्योगात ब्रँण्ड तयार करण्यामागचे असते.
तसेच मार्केटमधील उपलब्ध असलेल्या इतर कंपनीच्या
प्रोडक्ट सर्विसमधुन कस्टमरला आपले प्रोडक्ट सर्विस ओळखता यावे हे देखील ब्रँण्डचे मुख्य उददिष्ट असते.
चांगल्या ब्रँण्डची कोणती वैशिष्टये असतात?
चांगल्या ब्रँण्डची पुढील काही वैशिष्टये असतात:
● ब्रँण्डचे नाव असे असायला हवे की ते कोणीही सहज उच्चारू शकेल.ते उच्चारताना कोणीही अडखळणार नाही.
● ब्रँण्डचे नाव असे असावे जे कोणालाही सहज लक्षात ठेवता येईल.
● ब्रँण्डचे नाव हे साधे आणि लहान असायला हवे म्हणजे कस्टमरला ते सहज लक्षात ठेवता येईल आणि ते उच्चारताना जास्त वेळ देखील लागणार नाही चटकन उच्चारता येईल.
● ब्रँण्डमध्येच आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची योग्य आणि अचुक माहीती कस्टमरला मिळायला हवी.
● ब्रँण्डमध्ये जर आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसचा संकेत कस्टमरला मिळत असेल तर हे अधिक चांगले ठरते.
उदा,टाटा,बाटा,गोदरेज इत्यादी.
● ब्रँण्ड असा असायला हवा जो कुठल्याही कस्टमरला पाहता क्षणी चटकन ओळखु येईल.
● अँडव्हरटाईजिंग,प्रमोशन,ब्रँण्डिंग मार्केटिंग इत्यादीसाठी सोयीस्कर असा ब्रँण्ड असायला हवा.
● आपला ब्रँण्ड हा इतर ब्रँण्डपेक्षा वेगळा असायला हवा कारण याने कस्टमरचा कोणताही गोंधळ उडत नसतो.
● ब्रँण्डचे नाव असे असायला हवे की ज्याला कायदेशीर संरक्षण मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही.
Brand ची विशिष्टता काय असते?
● ब्रँण्ड हा कुठल्याही प्रोडक्टचा आयडेंटीटी सिम्बाँल असतो.
● ब्रँण्ड हे कंपनीचे नाव,सिम्बाँल,लोगो,स्लोगन,एखादे चित्र,डिझाईन प्रोडक्ट सर्विस यांपैकी काहीही असु शकते.
● हे कुठल्याही उत्पादनाला मार्केटमधील इतर उत्पादनांपेक्षा युनिक ठरवत असते.
● हे एका उत्पादकाच्या उत्पादनांना इतर उत्पादकांच्या उत्पादनांपासून वेगळे ठरवत असते.
● हे कुठल्याही उत्पादनाची प्रतिमा तसेच व्यक्तीमत्व प्रकट करत असते.
● ही उत्पादनाची स्मरणिका म्हणजे उत्पादनाची आठवण करून देणारे एक चिन्ह असते.
Brand चे फायदे कोणकोणते असतात?
● आपल्या उत्पादनाची मार्केटमध्ये एक कायमची आणि वेगळी ओळख तयार होत असते.
● आपल्या कंपनीचे प्रोडक्ट कस्टमरला चटकन ओळखता येत असतात.कस्टमरमध्ये एक जागृती निर्माण होते.
● आपल्या कंपनीची मार्केटिंग जाहीरात होते.ज्याने व्यवसायात वाढ देखील होत असते.
● आपल्या आधीच्या लाँयल कस्टमरला रिटेन करता येत असते.त्यांचा अधिक विश्वास संपादीत करता येत असतो.
● नवीन कस्टमर आपल्याकडे येत असतात.
● मार्केटमधील आपल्या सर्व कस्टमर्समध्ये आपल्या प्रोडक्टविषयी एक अतुट विश्वास निर्माण होत असतो.
● मार्केटमधील आपल्या इतर प्रतिस्पर्धींना कायमचे बाजुला करता येत असते.
Brand चे किती आणि कोणकोणते प्रकार असतात?
1)निर्माता ब्रँण्ड –
उत्पादक त्याच्या उत्पादनांना जो ब्रँण्ड प्रदान करत असतो त्याला निर्माता तसेच उत्पादकाचा ब्रँण्ड असे म्हणतात.याला नँशनल ब्रँण्ड म्हणून देखील ओळखले जाते.
2) नँशनल ब्रँण्ड :
याला निर्माता ब्रँण्ड असे देखील म्हणतात.जेव्हा एखादा उत्पादक सर्व देशासाठी एकच ब्रँण्ड वापरत असतो तेव्हा त्याला नँशनल ब्रँण्ड असे म्हटले जाते.
लिमका,लक्स,कोलगेट ही नँशनल ब्रँण्डचीच उदाहरणे आहेत.
3) पर्सनल ब्रँण्ड :
जेव्हा एखादा निर्माता तसेच उत्पादक प्रत्येक वस्तु तसेच प्रोडक्ट वर वेगवळया ब्रँण्डचा शिक्का मारत असतो तेव्हा त्याला पर्सनल ब्रँण्ड असे म्हणतात.
सर्फ,व्हिल,एरिअल हे पर्सनल ब्रँण्डचीच उदाहरणे आहेत.
4) फँमिली ब्रँण्ड :
जेव्हा एखादा निर्माता तसेच उत्पादक तो उत्पादीत करत असलेल्या वस्तु तसेच प्रोडक्टचा एकच ब्रँण्ड ठेवत असतो तेव्हा अशा ब्रँण्डला फँमिली ब्रँण्ड असे म्हटले जाते.
उदा,बजाज हा शब्द बजाज ग्रृपने त्यांच्या सर्व उत्पादनांवर वापरलेला आपणास दिसुन येतो.
5) काँपिटेटिव्ह ब्रँण्डस :
जेव्हा विविध प्रकारच्या उत्पादकांनी बनवलेल्या तसेच निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये प्रोडक्टमध्ये गुणवत्ता,किंमत, आकार,प्रकार इत्यादीं कुठल्याही बाबतीत विशेष फरक नसतो, तेव्हा अशा वस्तूंच्या प्रोडक्टसच्या ब्रँडला काँपिटेटिव्ह ब्रँड असे म्हणतात.
6) प्रादेशिक ब्रँण्ड :
जेव्हा एखादा उत्पादक त्याच्या वस्तुंच्या विक्रीकरीता प्रत्येक प्रदेशात नवीन ब्रँण्डचा वापर करत असतो तेव्हा त्याला प्रादेशिक ब्रँण्ड असे म्हणतात.
7) प्रांतीय ब्रँण्ड :
एखाद्या विशिष्ट राज्यामध्ये जो ब्रँण्ड खुप फेमस असतो अशा ब्रँण्डला राज्य तसेच प्रांतीय ब्रँण्ड असे म्हटले जाते.
8) स्थानिक ब्रँण्ड :
फक्त एखाद्या विशिष्ट ठिकाण तसेच शहरात फेमस असलेल्या ब्रँण्डला लोकल म्हणजेच स्थानिक ब्रँण्ड म्हणुन ओळखले जाते.
9) मध्यस्थांचा ब्रँण्ड :
जेव्हा निर्मात्याकडुन त्याच्या उत्पादनांवर कोणत्याही प्रकारची छाप वापरली जात नसते.
तेव्हा अशा परिस्थितीत मोठा घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता त्याच्या ब्रँडचा शिक्का किंवा छाप टाकून त्या उत्पादनांची विक्री करत असतो तेव्हा अशा ब्रँडला मध्यस्थांचा ब्रँण्ड असे म्हणतात.
Brand विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -Brand FAQ
1)ब्रँण्ड अँम्बेसेडर कोणाला म्हणतात?
ब्रँण्ड अँम्बेसेडर हा एक असा व्यक्ती असतो जो कोणत्याही ब्रँडचे उत्पादन लोकांसमोर सादर करत असतो.
तो ज्या कंपनीच्या उत्पादनाचा ब्रँड अँम्बेसेडर आहे त्या कंपनीच्या उत्पादनाची योग्य माहिती देण्याचे काम तो करत असतो आणि त्या बदल्यात ती कंपनी त्या ब्रँण्ड अँम्बेसेडरला आपली ब्रँण्डिंग करण्यासाठी काही ठराविक रक्कम देत असते.
उदा,शाहरूख खान हा बायजु अँपचा ब्रँण्ड अँम्बेसेडर आहे ज्यात तो बायजु अँपविषयी आपणास माहीती देतो.
2) ब्रँण्डिंग काय असते?
ब्रँण्डिंग ही कुठल्याही प्रोडक्ट सर्विसची कस्टमरच्या नजरेत एक वेगळी ओळख,ईमेज तसेच छाप तयार करण्याची प्रक्रिया असते.
3) स्वताचा ब्रँण्ड तयार करणे का गरजेचे असते?
जर आपल्याला आपल्या कुठल्याही उद्योग,व्यवसायात मार्केटमध्ये इतर प्रतिस्पर्धींपेक्षा आपली एक वेगळी ओळख,इमेज,छाप निर्माण करायची असेल तर आपल्यापुढे ब्रँण्ड हा एकमेव पर्याय आहे.
[ultimate_post_list id="38921"]
1 thought on “Brand म्हणजे काय ? What is A Brand in Marathi”
Comments are closed.