एच आर मॅनेजर म्हणजे काय?एच आर मॅनेजरची भुमिका,वेतन अणि जबाबदारी- What is HR manager?HR manager job,roles,salary and responsibilities in Marathi

एच आर मॅनेजर म्हणजे काय?एच आर मॅनेजरची भुमिका,वेतन अणि जबाबदारीWhat is HR manager?HR manager job,roles,salary and responsibilities in Marathi

एच आर मॅनेजरची भुमिका कंपनीत खुप महत्वाची राहत असते.एच आर मॅनेजरचे काम कंपनीला योग्य दिशेने घेऊन जाणे तसेच कंपनीच्या प्रगती घडवून आणने आहे.

आपल्या कंपनीला उच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी प्रत्येक कंपनीचा मालक आपल्या कंपनीत एका एच आर मॅनेजरची नेमणुक करीत असतो.

सर्व भरती संबंधित अॅडमिनिस्ट्रेशन संबंधित सर्व बाबींमध्ये एच आर मॅनेजर हा समाविष्ट राहत असतो.

एच आर मॅनेजर हा कंपनीमध्ये वेगवेगळ्या महत्वपूर्ण भूमिका तसेच जबाबदारी पार पाडत असतो.हया महत्वपूर्ण भुमिका अणि जबाबदारया काय आहेत.हेच आपण आजच्या लेखात थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

What is HR manager

एच आर मॅनेजर कंपनीत कोणत्या महत्वाच्या भूमिका तसेच जबाबदारी पार पाडत असतो?

१) कंपनीच्या स्टाफला मॅनेज करणे -managing company staff

एच आर मॅनेजर हा कंपनीतील सर्व स्टाफला मॅनेज करण्याचे काम करत असतो.

एच आर मॅनेजर हा कंपनीत कामाला असलेल्या सर्व कर्मचारी वर्गासोबत संवाद साधत असतो आणि त्यांना कंपनीत काम करत असताना कोणकोणत्या समस्या निर्माण होत आहेत हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करत असतो.

कंपनीतील प्रत्येक कर्मचारीशी वैयक्तिकरीत्या संवाद साधणे अशक्य असल्याने एच आर मॅनेजर कंपनीमध्ये अकाऊंट टीम,एच आर टीम, डेव्हलपमेंट टीम,आयटी टीम,टेस्टिंग टीम असे काही विभागनिहाय गट तयार करत असतो.

See also  पीक विमा योजना अंतर्गत Crop Insurance -मोबाईल एप्स

ह्या सर्व टीममध्ये काही वरिष्ठ मॅनेजर,रिपोर्टींग मॅनेजर नेमलेले असतात जे एच आर मॅनेजर सोबत संवाद साधत कंपनीच्या स्टाफला कंपनीत काम करताना कोणकोणत्या अडचणी येत आहेत हे सांगण्याचे काम करत असतात.

येणाऱ्या भरतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम काय असायला हवा हे देखील एच आर मॅनेजर ठरवत असतो.

याचसोबत तो कंपनीत काम करणाऱ्या सर्व लोकांची नोंद देखील ठेवत असतो.यात कोणता कर्मचारी किती दिवस कामाला आला होता किती दिवस सुटटीवर होता कोणत्या कर्मचारींना दिवाळीचा बोनस देण्यात आला आहे किंवा नाही देण्यात आला आहे हे बघणे इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात.

आॅफिसमधील वर्क कल्चर नियमांना धोरणांना कर्मचारी वर्गाकडुन व्यवस्थित फाॅलो करण्यात आले आहे की नाही हे बघण्याचे काम देखील एच आर मॅनेजर करतात.

2) नोकरीचे विश्लेषण करणे,नोकरी डिझाईन करणे -job design and job analysis

कंपनीत जेव्हा भरती केली जाते तेव्हा त्यात सर्वप्रथम नोकरीचे विश्लेषण करणे नोकरी डिझाईन करणे ह्या गोष्टी येत असतात.

कंपनीत योग्य उमेदवारांची भरती करण्यासाठी जाॅब डिझाईनिंग केली जाते.ज्याला आपण कामाचे स्वरूप job description असे म्हणू शकतो.

Job description म्हणजे कामाच्या स्वरूपात नोकरीचे प्रोफाइल,नोकरी करत असताना कर्मचारी वर्गाला पार पाडाव्या लागत असलेल्या भुमिका अणि जबाबदारया यांचा समावेश होतो.

तसेच यात कौशल्य,कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता,नोकरीचे ठिकाण,वेतन इत्यादी गोष्टींची आवश्यकतेनुसार नोंद केली जाते.मग ह्या गोष्टी एच आर मॅनेजरच्या माध्यमातून रिक्रुटमेंट टीम सोबत शेअर केल्या जातात.अणि मग त्यावर प्रक्रिया केली जाते.

कंपनीत किती जाॅब व्हॅकेनसी केली जात आहे हे बघणे कंपनीत जाॅब व्हॅकेनसीसाठी जाहीरात तयार करणे,जाहीरात वर्तमानपत्रात देणे हे काम देखील एच आर मॅनेजर करीत असतो.

नोकरीसाठी केलेल्या कोणत्या अर्जाला स्वीकारायचे कोणत्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जावे त्यांची परीक्षा कशी जाणार हे एच आर मॅनेजर ठरवत असतो.

रिक्रुटमेंट प्रक्रियेत कंपनीत काम करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी खुप वेळ लागत असतो.

See also  टीईटी परीक्षेचा निकाल उद्या २४ मार्च रोजी घोषित केला जाणार - TAIT exam result in Marathi

3) कंपनीत काम करण्याची धोरणे तयार करणे- workplace policies

कंपनीमध्ये काम करण्याविषयी काही धोरणे तयार केली जातात ज्याला कंपनी तसेच एच आर पाॅलिसी असे म्हटले जाते.

ह्या धोरणांच्या माध्यमातुन कंपनी आपले वर्क कल्चर कार्यसंस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.हया सर्व तयार करण्यात आलेल्या धोरणांतर्गत एच आर मॅनेजर कंपनीतील कामाच्या ठिकाणाचे व्यवस्थापन करत असतो.

कंपनीची धोरणे,कंपनीचे नियम कंपनीचे कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी कंपनीत नवीन भरती झालेल्या उमेदवारांना समजावून सांगणे हे काम देखील एच आर मॅनेजर करीत असतो.

4) कंपनीतील कर्मचारी वर्गाचे आरोग्य अणि संरक्षणाची जबाबदारी –

कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला जेव्हा आरोग्य सुविधेची आवश्यकता भासते तेव्हा त्याला आरोग्य विषयक सर्व सोयी सुविधा पुरविणे हे देखील एच आर मॅनेजरचे काम असते.

म्हणजे समजा कंपनीत काम करत असताना एखाद्या कर्मचारीची तब्येत बिघडली तर त्याला अॅम्बयुलन्स सेवा देऊन हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करणे.

कंपनी एमरजन्सीसाठी अॅम्बयुलन्स तसेच फायर ब्रिगेडचा संपर्क क्रमांक जवळ ठेवणे.कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाला मेडिकल इन्शुरन्सचा लाभ प्राप्त करून देणे.

5) कर्मचारी वर्गाच्या कामगिरीचे मुल्यांकन करणे –

दरवर्षी कंपनीत काम करत असलेल्या कर्मचारी वर्गाच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे अणि ज्या कर्मचारींनी वर्षभरात चांगली कामगिरी पार पाडली आहे त्यांना योग्य तो रिवाॅर्ड देणे वेतनासोबत अतिरिक्त लाभ प्रदान करणे ही जबाबदारी देखील एच आर मॅनेजरची आहे.

एच आर मॅनेजर म्हणजे काय?एच आर मॅनेजरची भुमिका,वेतन अणि जबाबदारी- What is HR manager?HR manager job,roles,salary and responsibilities in Marathi
एच आर मॅनेजर म्हणजे काय?एच आर मॅनेजरची भुमिका,वेतन अणि जबाबदारी- What is HR manager?HR manager job,roles,salary and responsibilities in Marathi

एच आर मॅनेजर बनण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण कलाकौशल्य असणे आवश्यक आहे?

  1. एच आर मॅनेजर याचे संवाद कौशल्य उत्तम असणे आवश्यक आहे.
  2. एच आर मॅनेजर मध्ये वक्तशीरपणा शिस्त असणे आवश्यक आहे.
  3. एच आर मॅनेजर मध्ये टीम मॅनेजमेंट करण्याचे तसेच कुठलीही समस्या सोडविण्याचे उत्तम कौशल्य त्याच्या अंगी असायला हवे.
  4. एच आर मॅनेजर मध्ये जलद शिकण्याचे तसेच अनुकुली कौशल्य असायला हवे.
See also  कोलगेट स्काँलरशिप 2022 विषयी माहीती -Colgate scholarship information in Marathi

एच आर मॅनेजर बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता –

ज्या उमेदवारांनी एच आर मॅनेजर मध्ये एमबीए केले आहे अणि ज्यांना एच आर मॅनेजर पदावर काम करण्याचा पाच वर्षे पेक्षा अधिक कालावधीचा अनुभव आहे ते कुठल्याही कंपनीत एच आर मॅनेजर पदासाठी अर्ज करू शकतात.

याचसोबत आपण ह्युमन रिसोर्स आॅफ मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री किंवा डिप्लोमा देखील करू शकतो.

एच आर मॅनेजरला वेतन किती प्राप्त होते?

एच आर मॅनेजर म्हणून कंपनीत नोकरीला लागल्यावर सुरूवातीला आपणास ३० हजारांपर्यंत वेतन दिले जाते.

आपल्याला असलेला एच आर मॅनेजर पदावर कामाचा अनुभव,आपली शैक्षणिक पात्रता कला कौशल्य इत्यादी बघुन आपल्या वेतनात वाढ केली जाते.

एच आर मॅनेजमेंट कोर्सेस –

१)पीजी डिप्लोमा इन एच आर मॅनेजमेंट

२) पीजी डिप्लोमा इन एच आर डेव्हलपमेंट

३) एमबीए इन एचआर मॅनेजमेंट

४) डिप्लोमा इन एच आर मॅनेजमेंट

५) एम टेक इन एच आर मॅनेजमेंट

एच आर मॅनेजमेंट कोर्सेस उपलब्ध करून देत असलेल्या भारतातील काही नामांकित संस्था –

१)टाटा इंस्टीटयुट आॅफ सोशल सायन्स मुंबई

२) अॅमिटी स्कुल आॅफ मॅनेजमेंट

३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट