मेक अप आर्टिस्ट कसे बनावे? how to become makeup artist in Marathi

मेक अप आर्टिस्ट कसे बनावे? How to become makeup artist in Marathi

पुरूष असो किंवा महिला आज प्रत्येकाला वाटते की आपण सर्वांपेक्षा अधिक सुंदर दिसावे.याकरीता आज सर्वच जण मेक अप आर्टिस्टची मदत घेताना आपणास दिसून येतात.

मेक अप आर्टिस्ट हे एक असे करीअरचे आॅप्शन आहे ज्यात करीअर करून आपण भरपुर,नाव,पैसा प्रसिद्धी कमवू शकतो.

ज्या़ंना मेक अप करण्याची आवड आहे अशा महिलांसाठी मुलींसाठी हे एक बेस्ट करीअर आॅप्शन ठरू शकते.

मेक अप आर्टिस्ट कोण असते?

मेक अप आर्टिस्ट ही एक अशी प्रोफेशनल पुरूष तसेच महिला व्यक्ती असते जी आपणास आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपली मदत करत असते.

कोणाच्या चेहर्यावर कशा प्रकारचा मेक अप केल्यास ती व्यक्ती अधिक सुंदर दिसेल हे मेक अप आर्टिस्टला उत्तम प्रकारे माहीत असते.

मेक अप आर्टिस्ट हे महिलांसोबत पुरुषांना देखील मेक अप करण्यासाठी मदत करतात.

जेव्हा एखाद्या पुरुष अभिनेता नट पात्राला चित्रपटात तसेच नाटकात एखादी विशिष्ट भुमिका पार पाडायची असते.तेव्हा त्या भुमिकेनुसार आपला लुक दिसण्यासाठी नाटकातील पात्र मेक अप आर्टिस्टला मेक अप करण्यासाठी हायर करीत असतात.

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी आपणास कोणकोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे?

कोणत्या व्यक्तीच्या चेहर्यावर कसा मेक अप चांगला दिसेल याचे मेक अप आर्टिस्ट यांना ज्ञान असणे आवश्यक आहे.

See also  आय आय बी एफ विषयी माहीती,कोर्सेस,परीक्षा पात्रतेच्या अटी- IIBF Information In Marathi

कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी कोणत्या काॅसमेटिकचा वापर करणे अधिक योग्य राहील ह्या सर्व गोष्टींचे नाॅलेज मेक अप आर्टिस्टला असायला हवे.

याचसोबत मेक अप आर्टिस्ट याला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाईलचे नवनवीन लेटेस्ट फॅशनचे देखील नाॅलेज असायला हवे.

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो?

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो?

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी आपणास एक प्रोफेशनल कोर्स करणे फार आवश्यक आहे कारण त्वचा हा आपल्या शरीराचा फार संवेदनशील भाग आहे.

आपल्या एका चुकीने तसेच एक चुकीच्या प्रोडक्टला एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावर वापरल्याने एखाद्या व्यक्तीचा पुर्ण चेहरा देखील खराब होऊ शकतो.

त्यामुळे ह्यासाठी ह्या कामाचा आपणास एक प्रोफेशनल कोर्स करणे अनिवार्य असते.जेणेकरून आपल्यामुळे भविष्यात कोणाच्याही चेहर्याला कुठलीही इजा हानी पोहोचणार नाही.

मेक अप आर्टिस्टचा कोर्स तसेच डिप्लोमा केल्याने आपणास मेक अपशी कोसमेटिक प्रोडक्टशी संबंधित सर्व माहिती असते.

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी आपणास बाजारात अनेक सर्टिफिकेट कोर्स तसेच डिप्लोमा देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मेक अप आर्टिस्टचा डिप्लोमा हा सहा महिने ते एक वर्ष इतक्या कालावधीचा असतो.यात नवनवीन मेक अप सोबत त्वचेशी संबंधित समस्यांवर देखील आपणास गाईडन्स केले जाते.

१२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ह्या कोर्सेससाठी अॅडमिशन घेता येते.मेक अप आर्टिस्टच्या कोर्सेस साठी वयाचे कुठलेही बंधन लादण्यात आलेले नाहीये.

कोर्सेसची फी किती असते?

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोर्सेसची साधारणतः फी १० हजारापासून ८० हजारांपर्यंत इतकी आहे.

कोणत्या संस्था मध्ये कोणत्या प्रकारच्या कोर्सेससाठी किती फी आकारली जाते हे तेथील संस्थानावर देखील काही गोष्टी अवलंबून असते.

मेक अप आर्टिस्ट बनण्यासाठी कोर्स उपलब्ध देणारया भारतातील प्रमुख संस्था –

  • लॅकमे ट्रेनिंग अँकॅडमी
  • पर्ल अकॅडमी
  • व्ही एलसीसी इंस्टीटयुट
  • चीक स्टुडिओ स्कुल आॅफ मेक अप
  • जेडी इंस्टीटयुट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी
See also  टेट परीक्षेचे स्कोअर कार्ड झाले उपलब्ध डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा - TAIT score card download 2023 in Marathi

मेक अप आर्टिस्ट करीता नोकरीच्या संधी –

ज्यांना मेक अप आर्टिस्ट म्हणून काम करण्याचा चांगला अनुभव असेल तर आपण टिव्ही इंडस्ट्री तसेच एखाद्या फिल्म इंडस्ट्री मध्ये देखील काम करू शकता.

टिव्ही फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी अभिनेता यांना आपला मेक अप करण्यासाठी एक मेक अप आर्टिस्ट लागत असतो.

याचसोबत आपण वेगवेगळे टिव्ही चॅनल,प्रोडक्शन हाऊस, फॅशन इंडस्ट्रीमध्ये देखील मेक अप आर्टिस्ट म्हणून काम करू शकतात.

ज्यांना नोकरी करायची नाहीये ते फ्रिलान्स मेक अप आर्टिस्ट म्हणून देखील काम करू शकतात.स्वताचे मेक अप सेंटर सुरू करू शकतात.वेगवेगळया लग्न समारंभात मेक अपचे काम करू शकतात.

मेक अप आर्टिस्टला वेतन किती मिळते?

मेक अप आर्टिस्ट म्हणून नोकरीस सुरुवात केल्यावर सुरूवातीला आपणास १५ ते २० हजार इतके वेतन दिले जाईल.अणि समजा आपल्याला कामाचा उत्तम अनुभव असेल तर ह्यात वाढ देखील केली जाते.

  • मेक अप आर्टिस्टचे काही कोर्सेस –
  • सर्टिफिकेट कोर्स इन मेक अप आर्टिस्ट
  • डिप्लोमा इन ब्युटी थेरपी