वादळे का निर्माण होतात ? Why cyclones occurs in Marathi
पृथ्वीभोवती चक्राकार वारे वाहत असतात मात्र उष्ण कटिबंधातील समुद्रावर खळखळून वाहणारी हवा हवामान अस्थिर बनवते. त्यावेळी चक्राकार वारे वाहण्यास सुरवात होते आणि चक्रीय वादळाची निर्मिती होते. हे सर्व एखाद्या ठिकाणी अत्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर घडते.
चक्रीय वादळे
समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०४ अंश केलव्हीन्स म्हणजे २६ अंश सेल्सिअस इतके वाढल्यास तेथे अत्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. त्यानंतर अत्यंत कमी हवेच्या दाबाभोवती अत्यंत वेगाने चक्राकार वारे वाहतात आणि चक्रीय वादळे तयार होतात. उत्तर गोलार्धात त्यांना हरिकॉन्स किंवा टायफून्स या नावांनी ओळखतात. अशा चक्रीय वादळांचे वारे हे घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरण्याच्या दिशेने वाहतात. दक्षिण गोलार्धातील वादळांना वादळे असे नामकरण केले आहे. दक्षिण गोलार्धातील वारे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे फिरतात हा फरक आहे.
वादळांची निर्मिती प्रक्रिया
वादळाची निर्मिती समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २६ अंश सेल्सिअस वाढल्यास विषुवृत्ताच्या
जवळच्या भागात वादळे निर्माण होतात. सूर्याच्या प्रखर उष्णतेने हवा वेगाने तापते तसेच समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याची तापमानही वाढलेले असते तेव्हा तेथील हवा तापते आणि वरच्या दिशेने वाहते. त्यावेळी समुद्राच्या भागावर पोकळी तयार होते आणि हवेचा दाब कमी होतो.
जेव्हा हवा वरच्या दिशेने जाते तेव्हा मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन जाते. हवा वर थंड होऊन तेथे मोठ्या प्रमाणावर ढग निर्मिती होते. त्या वातावरणात थंड हवा शिरून ढगांमधील जागा व्यापते. मात्र, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे हवा पुन्हा आतील भागातवाकते आणि जोराच्या दाबामुळे पुन्हा वळून वर जोरात फेकली जाते.
अशा प्रकारे फार मोठा वर्तुळाकार परिसर व्यापून ती फिरत रहाते. मात्र, केंद्रबिंदूजवळ वातावरण अतिशय शांत असते. याभोवती हे सर्ववादळ वेगाने वाढत जाते आणि कधीकधी ते २००० किलोमीटर परिसर व्यापते. मोठ्या वादळांची निर्मिती होते आणि त्याच्या मधल्या भागावर मात्र ढग नसतात. त्याला वादळाचा डोळा म्हणतात.
केंद्रबिंदूवर पाऊस होत नाही. कारण त्यावर ढग नसतात. एकदा चक्रीय वादळ तयार झाले की ते त्याहून कमी दाबाच्या दिशेने सरकरण्यास सुरवात होते. त्यास कायमस्वरूपी गरम आणि ओलसर हवेचा पुरवठा होत रहातो. अतिशय शक्तिमान वारे आणि पाऊस ढगांमधून निर्माण होण्याचे चक्र सुरू रहाते.
वादळाच्या डोळ्याभोवती फिरणाऱ्या वाऱ्याचा वेग प्रचंड म्हणजे ताशी २०० किमी. असतो. पूर्ण तयार झालेल्या वादळात २ दशलक्ष टन हवा प्रतिसेकंद वेगाने वरच्या दिशेला फेकली जाते. इतक्या भयानक ताकदीने वादळाची तीब्रता वाढते.
वादळे केव्हा व कोठे निर्माण होतात
उष्ण कटिबंदात वादळे तयार होतात. ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडील भाग, दक्षिणपूर्व आशिया तसेच प्रशांत महासागरातील सागरी बेटांभोवती वादळे निर्माण होतात.अधिक लोकसंख्या असणाऱ्या समुद्रकिनारी चक्रीय वादळांची भीती अधिक
असते. वादळ निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान २६ अंश सेल्सिअस झाल्यास वादळनिर्मिती होते.
वादळे निर्माण होण्याची कारणे
उष्ण हवा समुद्राच्या पृष्ठभागावरून प्रचंड आर्दता घेऊन वरच्या दिशेने वाहते. ती थंड हवेत जाताच वाफेचे ढग बनतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. जेव्हा उष्ण हवा आणि वाफ यांच्या मि गणन मोठ्या प्रमाणात आवाज होऊन वादळाचा जन्म होतो. त्यानंतर तपा आकार प्राप्त करते. अटलांटिकमहासागरातील हरिकॉन्स वादळांची सुरुवात पूर्व दिशेने होते. त्यानंतर तेथील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेने सरकण्यास सुरुवात होते. मोठा
प्रचंड आवाज करीत वादळाची हवा वेगाने वाहण्यास सुरुवात करूनघड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरतात तशी हवा प्रचंड वेगाने वाहते. वादळाचे मोठे रूप याच वीजनिर्मितीतून पुढे होते.
वादळाचे धोके
उष्ण कटिबंधात समुद्रकिनारी राहाणाऱ्या लोकांना वादळाचा धोका प्रचंड असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रचंड
वेगाने वाहणारे शक्तिमान वारे कुंपणे, शेईस, घरे, पत्रे, झाडे, विजेचेखांब उद्ध्वस्त करतात. त्यामुळे प्राण व वित्तहानीही होते. वारे प्रचंड वेगाने समुद्राचे पाणी लाटांच्या रूपाने जमिनीवर ढकलतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांचा परिसर जलमय होतो. वादळाच्या वेळी अतिवृष्टीशी होत असते. त्यातूनच महापुरांची निर्मिती होते. मालमत्ता, शेती यांचे नुकसान होते. रोगराई पसरते.
List of वादळ – 2020-21
- वादळ Yaas
- वादळ Tauktae
- वादळ Nisarga
- वादळ Amphan
- वादळ Kyarr
- वादळ Maha
- वादळ Vayu
- वादळ Hikka
- वादळ Fani
- BOB 03 व वादळ Bulbul
संदर्भ – शेतकरी मासिक