Job Interview : आम्ही तुम्हाला कामावर का घ्यावे ? – Why should we hire you explained in Marathi    

आम्ही आपल्याला नोकरी वर का घ्यावे ?  Why should we hire you explained in Marathi  

जेव्हा आपण जाँबसाठी मुलाखतीला जातो तेव्हा आपण मुलाखतीची पुर्ण तयारी करूनच जात असतो.

  • तसेच ज्या कंपनीत आपण इंटरव्युह देण्यासाठी चाललो आहे.त्या कंपनीविषयी संपुर्ण माहीती देखील आपण प्राप्त करून घेत असतो.
  • आपल्या Educational Qualification विषयी इंटरव्युहत प्रश्न विचारला गेला तर त्याचे काय उत्तर द्यायचे?कसे द्यायचे हे देखील आपण आधीच ठरवून घेत असतो.
  • पण इंटरव्युहमध्ये आपल्याला काही असे प्रश्न विचारले जात असतात.ज्याची आपण आधीपासुन कोणतीही तयारी केली नसते की याबाबद आपण काय उत्तर द्यायचे?आणि आपल्याला काही पुर्वकल्पणा देखील नसते की जाँब इंटरव्युहत आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो?
  • म्हणजेच इंटरव्युत आपल्याला आपल्या शिक्षणाविषयी (Educational Qualification) तर विचारपुस केली जातेच सोबत आपली मानसिक बौदधिक,वैचारीक क्षमता,तणाव हाताळण्याची क्षमता तसेच आपण ज्या जाँबसाठी अँप्लाय करतो आहे त्यासाठी असलेली आपली पात्रता,योग्यता इत्यादी देखील बघितली जात असते.
  • याचसाठी आपल्याला विचारल्या गेलेल्या कोणत्याही प्रश्नाचे नीट विचारविनिमय करून अचुक उत्तरे देणे आणि ते ही समोरच्या म्हणजेच इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीच्या अपेक्षेनुसार ते उत्तर देणे हे आपल्यासाठी फार महत्वाचे ठरत असते.

कारण यावरच आपले जाँबसाठी सिलेक्शन होणार का नाही?हे पुर्णपणे निर्भर असते.म्हणुन आपण नीट विचारविनिमय करूनच इंटरव्युत विचारल्या जात असलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे.

आपण जेव्हा कुठेही एखाद्या जाँब इंटरव्युहसाठी जात असतो.तेव्हा आपल्याला एक प्रश्न तिथे आवर्जुन विचारला जात असतो.

आणि तो प्रश्न आहे आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी (Why Should We Hire You?) आजच्या लेखात आपण ह्याच जाँब इंटरव्युह मध्ये विचारल्या जात असलेल्या महत्वाच्या प्रश्नाचे आपण काय आणि कसे उत्तर द्यायला हवे हे जाणुन घेणार आहोत.

Why Should We Hire You प्रश्न का विचरला जातो ?

कोणत्याही Job Interview मध्ये आम्ही तुम्हाला नोकरीवर का ठेवावे (Why Should We Hire You?) हा प्रश्न नेहमी आपल्याला का विचारला जातो?

 जेव्हा आपण कुठल्याही कंपनीत जाँबसाठी अँप्लाय करत असतो तेव्हा आपली पर्सनँलिटी आणि आपले एज्युकेशन पात्रतेचे निकष पूर्ण केले की आपल्याला आम्ही तुम्हालाच ह्या नोकरीवर का ठेवावे?हा प्रश्न इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तींकडुन आपल्याला फायनली विचारला जात असतो.

हा प्रश्न विचारून इंटरव्युह घेणारा आपला आत्मविश्वास,सकारात्मक दृष्टीकोन जाणुन घ्यायचा असतो तसेच आपल्या करिअरविषयी आपण किती गंभीर आहोत हे देखील त्याला जाणुन घ्यायचे असते.

See also  आर्मी एडीजी गृप सी मुव्हमेंट अंतर्गत विविध 135 पदांसाठी भरती सुरू - Army Adg Group C Movement Recruitment 2023 In Marathi

आणि हा प्रश्न विचारण्यामागचा इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीचे पुढीलप्रमाणे अनेक हेतू असतात आणि तेच आज आपण जाणुन घेणार आहोत.

1)आपल्यामध्ये इतरांपेक्षा असे काय Special गुण तसेच कौशल्य आहे हे जाणुन घेणे :

जेव्हा आपण जाँबसाठी कोणत्याही कंपनीत इंटरव्युह द्यायला जातो तेव्हा इंटरव्युह घेत असलेला प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही प्रश्न विचारत असतो ज्यात हा प्रश्न देखील समाविष्ट असतो की आम्ही आपल्याला नोकरीवर का ठेवावे?

त्याचा हा प्रश्न विचारण्याचा पहिला हेतु असतो तो म्हणजे हे जाणुन घेणे की आपल्यात इतरांपेक्षा असे काय वेगळ वैशिष्टय आहे?

आपल्यात कंपनीला फायदेशीर ठरेल असा कोणता खास गुण तसेच कला कौशल्य आहे की कंपनीने इतर कोणालाही जाँबवर न ठेवता फक्त आपल्यालाच त्या जाँबसाठी,कंपनीतील त्या विशिष्ट पदावर नियुक्त करायला हवे तसेच जाँबवर ठेवायला हवे.

2)आपण ते पद किती काळ व्यवस्थित सांभाळु शकतो हे जाणुन घेणे :

 इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडुन हे देखील जाणुन घ्यायचे असते की जर आपली त्या कंपनीत आपण अँप्लाय केलेल्या त्या विशिष्ट पदासाठी निवड करण्यात आली तर आपण ते पद किती महिने किती वर्ष व्यवस्थित सांभाळु शकतो.

तसेच आपण किती दिवस तो जाँब टिकवून धरु शकतो?त्या जाँबमध्ये असलेले Challenges, Obstacle Responsibility त्यात असलेला Stress आपल्याला व्यवस्थित हाताळता येईल का?हे त्या इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडुन जाणुन घ्यायचे असते.

म्हणजेच आपण शारीरीकदृष्टया, मानसिकदृष्टया(Physically And Mentally) किती त्या जाँबसाठी Prepare आहोत हे त्याला आधी जाणुन घ्यायचे असते.

3) आपण त्या जाँबच्या बाबतीत किती Serious आहात हे जाणुन घेणे :

 कुठल्याही जाँब इंटरव्युत आम्ही आपल्याला नोकरीवर का ठेवावे?हा प्रश्न विचारण्याचे अजुन एक कारण आहे ते म्हणजे आपण ज्या जाँबसाठी अँप्लाय केला आहे त्या जाँबसाठी आपण किती Serious आहोत हे कंपनीला जाणुन घ्यायचे असते.

इथे आपण आपल्याला तो जाँब का करायचा आहे याचे एक Serious आणि Valid Reason देणे गरजेचे असते.

म्हणजे इथे पुढील उत्तरे आपल्याकडुन प्राप्त होणे इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला बिलकुल अपेक्षित नसते:

  1. माझा एक मित्र इथेच ह्या कंपनीत कामाला आहे त्याने माला सांगितलं की ही एक चांगली कंपनी आहे.म्हणुन मी जाँबसाठी आलो आहे.असे उत्तर टाळावी
  2. मी असे ऐकले आहे की तुमच्या कंपनीत काम करण्यासाठी सँलरी तसेच दिवाळीचा बोनस देखील खुप चांगला दिला जातो.
  1. माझी पत्नी तसेच माझी गर्लफ्रेंड सुदधा इथे कामाला आहे म्हणुन मी विचार केला की आपण पण इथेच काम करू म्हणजे संध्याकाळी आम्हाला सोबत घरी जाता येईल.
  2. तुमच्या कंपनीत नोकरी करत असलेल्या वर्कर्सला भरपुर सुटटी दिली जाते
  1. तुमच्या कंपनीतील कँन्टीनमध्ये जेवण खुप चांगले मिळते आणि ते स्वस्त देखील आहे.
  1. माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पदधतीने हे काम तुमच्या कंपनीसाठी इतर कोणीच करू शकणार नाही.
  • वरील प्रमाणे उत्तरे जर आपण आम्ही आपल्याला नोकरीवर का ठेवावे ह्या प्रश्नाची उत्तरे दिली तर इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला लक्षात येईल की तुम्हाला ह्या जाँबमध्ये कुठलाही Seriously Interest नाहीये तुम्ही फक्त Enjoy तसेच टाईमपास म्हणुन ह्या नोकरीसाठी अँप्लाय करत आहात.आणि तुम्ही जास्त Over Confident देखील आहात.
  • म्हणुन उत्तर देताना आपण असे उत्तर द्यायला हवे जसे इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडुन उत्तर हवे असते.
  • जे आपण ज्या जाँबसाठी अँप्लाय केला आहे त्या जाँब प्रोफाईलला मँच करेल.
  • यात आपण त्या जाँब प्रोफाईलसाठी किती योग्य उमेदवार आहोत हे सांगायला हवे.आणि हे एखाद्या उदाहरणासहित पटवून देखील द्यायला हवे.आपण त्या कंपनीसाठी किती मोठा Asset ठरू शकतात हे सांगायला हवे.
See also  आयआरसीटीची एक नवीन उत्तम योजना प्रवास आत्ता करा पैसे नंतर द्या - IRCTC new scheme travel now pay later in Marathi

आपल्या पर्सनँलिटी मधील असा एखादा गुण तसेच कौशल्य जो कंपनीला खुप मोठा फायदा आणि Growth प्राप्त करून देऊ शकतो ते इथे आपण सांगणे अपेक्षित असते.

उदा.Good Communication Skill, Leadership Skill, Sales And Marketing Skill

इत्यादी कंपनीला फायदेशीर ठरेल अशी आपल्या व्यक्तीमत्वातील कोणतीही कला तसेच कौशल्य आपण कंपनीच्या निर्दशनास आणुन देऊ शकतो.

तसेच ती कंपनी ज्या Product तसेच Servicesच्या बाबतीत Specialize असेल त्या आपल्याला माहीत असायला हव्यात जेणेकरून आपण त्यांच्या Product Services मध्ये अजुन काय Improvement आणु शकतो काय Changes,Development करू शकतो हे सांगुन आपण आपले महत्व तसेच त्या जाँब प्रोफाईलविषयीचा आपला Seriousness आणि आपण त्यासाठी किती योग्य कँडिडेट आहोत हे त्या कंपनीला पटवून देऊ शकतो.

4)आपल्याला त्या कंपनीविषयी काही Knowledge आहे का हे जाणुन घेणे :

 कुठल्याही जाँब इंटरव्युत आम्ही तुम्हाला नोकरीवर का ठेवावे हा प्रश्न विचारण्याचे अजून एक कारण असते ते म्हणजे इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला हे जाणुन घ्यायचे असते की आपल्याला त्या कंपनीविषयी आधीपासुन काही माहीती आहे का?त्यांचे Product Services कोणकोणत्या आहेत?त्या कंपनीने कशी Growth केली आहे?तसेच त्याची काही History वगैरे माहीत आहे का?

आपल्याला त्या कंपनीत काम करण्याची खरच आवड आहे का?का आपण कुठलीही आवड नसताना तसेच कंपनीची कुठलीही माहीती नसताना फक्त इंटरव्युह देण्यासाठीच आलो आहोत हे त्या इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला जाणुन घ्यायचे असते.

 थोडक्यात आपण त्या जाँबसाठी किती योग्य आणि फीट उमेदवार आहोत हेच इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला जाणुन घ्यायचे असते.

 Why Should We Hire You ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर

Why Should We Hire You ह्या प्रश्नाचे कोणते योग्य उत्तर प्राप्त होणे कंपनीला आपल्याकडुन अपेक्षित असते?

 Why Should We Hire You ह्या प्रश्नाचे उत्तर देताना आपण असे उत्तर द्यायला हवे ज्यात आपले उत्तर आपण ज्या जाँबसाठी अँप्लाय केला आहे त्या जाँब प्रोफाईलला मँच करेल.

  • यात आपण त्या जाँब प्रोफाईलसाठी किती योग्य आणि फीट उमेदवार आहोत हे सांगणे अपेक्षित असते.आणि हे आपण एखाद्या उदाहरणासहित पटवून देखील देऊ शकतो.आपण त्या कंपनीसाठी किती मोठा Asset ठरू शकतात हे सांगायला हवे असते.
  • आपल्या पर्सनँलिटी मधील असा एखादा गुण तसेच कला कौशल्य जो कंपनीला खुप मोठा फायदा आणि Growth प्राप्त करून देऊ शकतो ते इथे आपण सांगणे अपेक्षित असते.
  • उदा.Good Communication Skill, Leadership Skill, Sales And Marketing Skill
  • इत्यादी कंपनीला फायदेशीर ठरेल अशी आपल्या व्यक्तीमत्वातील कोणतीही कला तसेच कौशल्य आपण कंपनीच्या निर्दशनास आणुन देऊ शकतो.
  • तसेच ती कंपनी ज्या Product तसेच Servicesच्या बाबतीत Specialize असेल त्या आपल्याला माहीत असायला हव्यात जेणेकरून आपण त्यांच्या Product Services मध्ये अजुन काय Improvement आणु शकतो.
  • त्यात काय Changes, Development करू शकतो हे सांगुन आपण आपले महत्व तसेच त्या जाँब प्रोफाईलविषयीचा आपला Seriousness आणि आपण त्यासाठी किती योग्य कँडिडेट आहोत हे त्या कंपनीला उत्तम रीतीने पटवून देऊ शकतो
  • Why Should We Hire You ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी आपण इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीचे पहिले आभार व्यक्त करावे की त्याने आपल्याला आपल्याला नोकरीवर का ठेवावे?याबाबद आपले मनोगत व्यक्त करण्याची एक संधी दिली.
See also  टेलिकाॅलरचे काम काय असते? Job description of tele caller

Job Interview: उत्तरं कसे द्यावे – आपले सामर्थ्य आणि दुर्बलता काय आहेत ? What

 

मग आपण पुढील प्रमाणे उत्तर देऊ शकतो:

उदाहरण

  • मला नवनवीन गोष्टी शिकायला आत्मसात करायला नवनवीन चँलेंजेस स्वीकारायला खुप आवडते कारण याने आपल्या व्यक्तीमत्वाचा अधिकाधिक विकास होत असतो.आणि आपल्या कंपनीत काम करून मला नवनवीन चँलेंजेस फेस करायला मिळतील तसेच आपल्याकडुन खुप काही अजुन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत.जे माझ्या करिअरसाठी खुप उत्तम ठरेल.

 

  • मला आपल्या कंपनीविषयी सर्व माहीती आहे आपण … Product Services कस्टमरला Provide करतात ज्यात कस्टमरने आपले ते Product Services आपल्याकडुन विकत घेण्यासाठी आपण त्या कस्टमरला आधी Conveyances करणे खुप गरजेचे असते.

 

  • आणि माझे Communication Skill उत्तम असल्यामुळे मी कुठल्याही कस्टमरला
  • आपल्या कंपनीचे Product, Services विकत घेण्यासाठी सहज आणि उत्तम रीत्या Conveyence करू शकतो.

 

  • शिवाय आपल्याला याआधी कामाचा अनुभव असेल तर आपण ते ही सांगु शकतो की मला Sales आणि Marketing चा देखील … वर्षाचा चांगला अनुभव आहे.मी अमुक अमुक कंपनीत ह्या पदावर इतके वर्ष कार्यरत होतो.

 

  • आणि मी जर ह्या पदावर काम केले तर आपल्या कंपनीचा अधिकाधिक Sell होईल कस्टमर जास्तीत जास्त आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेतील.आणि आपला जास्तीत जास्त फायदा देखील होईल.म्हणजेच ह्या क्षेत्रातील माझ्या अनुभवाचा,नाँलेजचा आपल्या कंपनीला खुप जास्त फायदा होईल म्हणुन मी स्वताला ह्या जाँबसाठी एक योग्य परफेक्ट उमेदवार मानतो.

 

महत्वाची टीप –Important Tip

(अनुभवी व्यक्तींनी जाँब इंटरव्युहत आपल्याला असलेला त्या क्षेत्रातील अनुभव सांगायला हवा तसेच आपण ह्या फिल्डमध्ये आधी कोणत्या पदावर,किती वर्ष कुठे नोकरीला होतात हे देखील आपण सांगु शकतात.

आणि फ्रेशर्सने आपल्या अंगी असलेल्या अशा हार्ड स्कील,साँफ्ट स्कील जाँब इंटरव्युह मध्ये सांगायला हव्या.ज्या कंपनीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात.कंपनीला Profit आणि Growth प्राप्त करून देऊ शकतात.)

 उपयोगी विडियो why should we hire you –

आशा करतो की आपल्याला कोणत्याही जाँब इंटरव्युव्हत आम्ही तुम्हाला नोकरीवर का ठेवावे?हा प्रश्न आपल्याला का विचारला जातो हे उत्तम पदधतीने कळले असेल तसेच अशा वेळी आपण कसे उत्तर देणे इंटरव्युह घेत असलेल्या व्यक्तीला आपल्याकडुन अपेक्षित असते हे देखील आपणास समजले असेल.

1 thought on “Job Interview : आम्ही तुम्हाला कामावर का घ्यावे ? – Why should we hire you explained in Marathi    ”

Comments are closed.