जागतिक थेलेसेमिया दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? World Thalassemia Day 2023

जागतिक थेलेसेमिया दिवसचे महत्त्व काय आहे? World Thalassemia Day 2023

थॅलेसेमिया हा एक असा आजार विकार आहे जो मुलांना अनुवांशिक रीत्या आपल्या पालकांदवारे संक्रमित होऊन जडत असतो. हया आजारामध्ये रूग्णाच्या शरीरामधील हिमोग्लोबिन खराब होत असते.रूग्णाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण देखील कमी होऊ लागत असते.

World Thalassemia Day 2023

अशा रूग्णामध्ये अॅनिमियाची लक्षणे आपणास दिसून येत असतात.म्हणुन ह्या आजारा विषयी समाजात जागरूकता निर्माण करणे लोकांना रूग्णांना याविषयी माहिती देणे आवश्यक आहे.

याचकरीता दरवर्षी ८ मे रोजी ह्या आजार विकारा विषयी रूग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो.हा दिवस सर्वप्रथम १९९४ मध्ये साजरा करण्यात आला होता.

हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु हा ह्या आजाराविषयी लोकांना माहिती देणे त्यांना ह्या आजाराची जाणीव करून देणे हा आहे.

थेलेसेमियाची समस्या केव्हा निर्माण होते?

जेव्हा महिला किंवा पुरूष यांच्या शरीरातील क्रोमोसम खराब होऊ लागते तेव्हा थेलेसेमियाची समस्या निर्माण होत असते.

ज्यामुळे मानवी शरीरातील निर्माण होत असलेले प्रथिनांच्या साहाय्याने निर्माण होत असलेले हिमोग्लोबिन हे खराब होऊन मानवाच्या शरीरात असलेल्या लाल रक्तपेशी नष्ट होऊ लागतात.

जागतिक रेडक्राॅस दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?

थॅलेसेमिया ह्या आजाराची समस्येची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?

थॅलेसेमिया ह्या आजाराची समस्येची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

  • थकवा तसेच अशक्तपणा जाणवणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • चेहरा कोरडा पडु लागणे
  • कावीळची लक्षणे दिसून येणे
  • शरीरातील लाल रक्तपेशी कमी होणे
  • बाळ आपल्या वयापेक्षा अधिक लहान दिसणे किंवा बाळाची वाढ न होणे त्याची हातापायाची नखे पिवळी पडु लागणे
  • ओटीपोटीत सुज येणे
  • त्वचा पिवळी होऊ लागणे
  • गडद लघवी होणे
See also  पत्नीला प्रभावित कसे करावे?- How to impress wife in Marathi

थॅलेसेमिया आजार जडल्यावर कोणते उपचार केले जातात?

थॅलेसेमिया ह्या आजारावर उपाय म्हणून बाळ जनमण्या आधी त्याची ब्लड टेस्ट तसेच जेनेटिक टेस्ट घेतली जाते.

हा आजार आपल्या मुळे आपल्या जन्मलेल्या मुलाला जडु नये म्हणून लग्न करण्याआधीच दक्षता म्हणून स्त्री अणि पुरूष या दोघांनीही आपल्या रक्ताची तपासणी करून घ्यावी.

गरोदरपणात देखील ही तपासणी करणे आवश्यक आहे.

थेलेसेमिया ही कोणत्या प्रकारची समस्या आहे?

  • थेलेसेमिया ही एक आनुवंशिक म्हणजेच जेनेटिक स्वरूपाची समस्या तसेच आजार आहे.हा आजार बाळाला मुलाला आपल्या पालकांदवारे जडत असतो.
  • थेलेसेमिया झालेल्या रूग्णाच्या शरीरामधील लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते?
  • थेलेसेमिया आजार झालेल्या रूग्णाच्या शरीरामधील लाल रक्तपेशीचे आयुष्य हे फक्त वीस दिवस इतके राहत असते.साधारणत हे लाल रक्तपेशीचे आयुष्य १२० दिवस इतक्या कालावधी साठी असते.
  • पण ह्या लाल रक्तपेशीचे आयुष्य २० दिवस इतके झाल्याने हा आजार जडलेल्या रूग्णाला वरून रक्त चढवावे लागत असते.
  • अशा रूग्णांवर वेळेवर उपचार केले न गेल्याने त्यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.
  • थेलेसेमिया हे दोन प्रकारचे असतात एक सुक्षम असतो आणि एक गंभीर असतो.
  • जेव्हा पती पत्नी मधील एकात दोषपूर्ण गुणसूत्र असतात तेव्हा बाळाला मुलाला आपल्या आई वडिलांच्या दवारे सुक्षम प्रकारचा थेलेसेमिया होत असतो.
  • पण जेव्हा पती पत्नी दोघांमध्ये दोषपूर्ण गुणसूत्र आढळून येतात तेव्हा त्यांच्या जन्म दिलेल्या मुलाला मेजर म्हणजेच गंभीर स्वरूपाचा थेलेसेमिया जडण्याची शक्यता असते.गंभीर स्वरुपाच्या थेलेसेमिया मध्ये बाहेरून भरपुर रक्त चढवण्याची आवश्यकता भासत असते.
  • गंभीर स्वरूपाचा थेलेसेमिया जडलेल्या रूग्णाचा औषधांवर खुप खर्च होत असतो.अणि समजा हा उपचार करण्यासाठी जवळ पुरेसे पैसे नसतील तर उपचारा अभावी रूग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.