चालू घडामोडी – 26 आणि 27 जानेवारी 2022 – Current Affairs Marathi January 2022

Table of Contents

चालु घडामोडी 26 आणि 27 जानेवारी 2022

*25 जानेवारी रोजी साजरा केला गेला राष्टीय पर्यटन दिवस :

25 जानेवारी रोजी राष्टीय पर्यटन दिन साजरा करण्यात आला.

भारत सरकारकडून देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे किती आणि काय महत्व आहे हे समजावून सांगण्यासाठी 25 जानेवारी 2022 हा दिवस राष्टीय पर्यटन दिवस म्हणुन स्थापित केला.

पर्यटनाचे महत्व याची सामाजिक सांस्कृतिक, राजनैतिक मुल्ये,सांस्कृतिक आणि आर्थिक मुल्ये काय आहेत.याविषयी देशात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

पर्यटनाचा प्रचार आणि विकास करण्यासाठी विविध धोरणे आखण्यासाठी पर्यटन मंत्रालय भारतात नोडल एजंसी स्थापित करण्यात आली आहे.

भारत देश जेव्हा स्वातंत्र झाला होता तेव्हा भारतात पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी एक पर्यटन वाहतूक समिती स्थापित करण्यात आली होती.आणि पर्यटन दिवस साजरा करण्यास आरंभ हा 1948 मध्येच करण्यात आला होता.

जगभरात हाच पर्यटन दिवस विश्व पर्यटन दिवस म्हणुन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

ज्याची सुरूवात संयुक्त राष्टाकडुन 1980 मध्ये करण्यात आली होती.जगभरातील लोकांना पर्यटनाचे महत्व कळावे म्हणुन विश्व पर्यटन दिन साजरा केला जातो.

 

*25 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला राष्टीय मतदार दिवस :

 

देशातील मतदार बंधु भागिनींना मतदान करायला प्रोत्साहीत करण्यासाठी दर वर्षी भारतात राष्टीय मतदार दिन हा साजरा केला जात असतो.

See also  गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी का रद्द करण्यात आली आहे? - Adv Gunaratna Sadavarte vakili sanad- Charter Revoked

राष्टीय मतदान दिन हा मतदानाविषयी जनतेत जागृकता निर्माण व्हावी यासाठी दर वर्षी राष्टीय मतदार दिवस साजरा केला जात असतो

ह्या वर्षीच्या राष्टीय मतदार दिनाची थीम ही निवडणुकांना सर्वसमावेशक बनवणे,आणि जनतेत निवडणुकीविषयी साक्षरता निर्माण करणे ही आहे.

भारतातील सगळयात पहिला राष्टीय मतदार दिवस हा 25 जानेवारी 2011 रोजी साजरा करण्यात आला होता.भारतातील निवडणुक आयोगाची स्थापणा 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती.

राजकीय निवडणुक प्रक्रियेत युवा पिढीचा सहभाग वाढावा याचसाठी 2011 मध्ये भारतीय निवडणुक आयोगाच्या स्थापणेच्या दिवशी 25 जानेवारी पासुन राष्टीय मतदार दिवस साजरा केला जाऊ लागला होता.

 

*सीडी आर आय कडुन करण्यात आली ओम नावाची ओमिक्राँन चाचणी किट विकसित :

 

सीडी आर आयने (central drug research institute) कोरोनाच्या नवीन व्हेरीएंटची चाचणी करण्यासाठी ओम नावाची आरटी पीसीआर डायग्रोस्टीक किट विकसित केली आहे.

ओमिक्राँनच्या टेस्टसाठी सरकारी संस्थेकडुन तयार करण्यात आलेले हे प्रथम आणि स्वदेशात तयार करण्यात आलेले तिसरे किट आहे.

याचसारख्या प्रायव्हेट कंपनीकडुन विकसित करण्यात आलेल्या अशा अजुन दोन किट मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.ह्या कीट दोन तासांमध्ये टेस्टचा रिझल्ट देतात.

ओम हे मोठया जनसंख्येसाठी जिनोम सिक्वेन्सिंगवर ओमिक्राँन टाईपसचा जलद शोध घेण्यास सक्षम आहे.
ही किट दोन महिन्यांमध्ये तयार केली गेली आहे आणि हिची किंमत दीडशेच्या आसपास आहे.ही किट आपल्याला अवघ्या दोनच तासांमध्ये टेस्टचा रिझल्ट देणार आहे.

ह्या किटला इंडियन काऊंसिल आँफ मेडिकलकडुन अँप्रूव्हल प्राप्त झाल्यानंतर फेब्रूवारी महिन्याच्या मधल्या काळात लाँच केले जाणार आहे.

 

*उज्जिवन स्माँल फायनान्स कंपनीने केली प्लँटिना फिक्स डिपाँझिट योजना सुरू :

 

उज्जिवन स्माँल फायनान्स कंपनीकडुन प्लँटिना फिक्स डिपाँझिट ही योजना लाँच करण्यात आली आहे.

प्लँटिना फिक्स डिपाँझिट हे एस एफ बी(small finance bank) कडुन प्रदान करण्यात आलेल्या रेग्युलर डिपाँझिट दरापेक्षा 15 बेस पाँईण्ट इतके अधिक व्याज आपणास देते.

प्लँटिना फिक्स डिपाँझिट ही एक non callable depoit आहे.जिथे आशिंक आणि मुदतीच्या आधी पैसे काढणे लागु होत नसते.

यात व्याजाची रक्कम आपणास मासिक,त्रैमासिक तसेच मँच्युरीटी पिरीयडच्या शेवटी मिळत असते.

See also  चालु घडामोडी मराठी - 15 मे 2022 Current affairs in Marathi

प्लँटिना फिक्स डिपाँझिटविषयी काही महत्वाच्या बाबी:

990 दिवसांच्या टाईम पिरीयडसाठी सर्वसाधारण एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 6.75 % आणि सिनिअर सिटीजनसाठी 7.50 % इतके व्याज प्राप्त होते.

आणि प्लँटिना एफडीवर सामान्य नागरीकांस 6.90 % आणि सिनिअर सिटीजनला 7.65 % इतके व्याज दर प्राप्त होते.

*लडाख टीमने जिंकली नववी महिला राष्टीय महिला आईस हाँकी चँम्पियनशिप 2022 :

लडाख येथील महिला टीमने हिमाचल प्रदेश येथील नववी महिला राष्टीय आईस हाँकी चँम्पियनशिप जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

हिमाचल प्रदेश येथील लाहोल स्पीत नामक जिल्हयात असलेल्या काझा ह्या क्षेत्रात भारतीय आईस हाँकी असोसिएशनतर्फे चँम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

ज्यात दिल्ली,हिमाचल प्रदेश,लडाख,चंदीगढ,तेलंगाणा,इंडो तिबेट बाँर्डर पोलिस इत्यादी ठिकाणच्या टीमने सहभाग घेतला होता.

*ढाका इंटरनँशनल चित्रपट महोत्सवामध्ये भारतातील कुझंगलला प्राप्त झाला सर्वोकृष्ठ चित्रपटाचा सम्मान :

भारतातील कूझंगल चित्रपट ज्याचे दिग्दर्शन पीएस विनोदराज यांनी केले आहे.

या चित्रपटाला विसाव्या ढाका इंटरनँशनल चित्रपट महोत्सवामध्ये एशियाई चित्रपट स्पर्धा विभागामध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट बनण्याचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

बांग्लादेश देशाचे माहीती आणि प्रसारण मंत्र्यांकडुन बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका नँशनल म्युझियमच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारोप सत्रात मुख्य अतिथी म्हणुन पुरस्काराचे वितरण केले गेले.

*प्रसिदध पुराणत्व शास्त्रज्ञ थिरू आर नागास्वामी यांचा मृत्यु :

तामिळनाडु येथील प्रसिदध भारतीय इतिहासकार आणि पुराणतत्व शास्त्रज्ञ म्हणुन ओळखले जाणारे रामचंद्रन नागास्वामी यांचा मृत्यू झाला आहे.

रामचंद्रन नागास्वामी तामिळनाडु येथील पुराणतत्व विभागाचे प्रथम संचालक देखील होते.मंदिरातील शिलालेखांच्या आणि तामिळनाडु येथील कला ऐतिहासिक कार्यांसाठी रामचंद्रन नागास्वामी प्रचलित होते.

2018 सालात रामचंद्रन नागास्वामी यांना पदमभुषण ह्या पुरस्काराने सम्मानित देखील केले गेले होते.तसेच भारताचा सर्वोच्च देखील त्यांना दिला गेला होता.

रामचंद्रन नागास्वामी हे एक चांगले लेखक देखील होते त्यांनी आत्तापर्यत शंभरपेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.सेंथाझिम नाडुम पांडबम हे त्यांचे पुस्तक नुकतेच 2022 मध्ये प्रकाशित देखील झाले होते.

*जयभिम आणि मरक्कर यांची 2022 च्या आँस्करसाठी करण्यात आली निवड :

भारतीय चित्रपट जयभिम आणि मरक्कर अरबी कादलिंते सिंहम यांची 2022 साठी निवड करण्यात आली आहे.

See also  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची अता WhatsApp बँकिंग सेवा । कसे वापरावी येथे वाचा

मदर इंडिया,सलाम बाँब्बे आणि लगान यानंतर आँस्करसाठी निवडण्यात आलेला जयभिम हा चवथा भारतातील चित्रपट आहे.

मरक्कर अरबी कादलिंते सिहमला global community आँस्कर किताबाकरीता 2021मध्ये नामांकित करण्यात आले आहे.

अकँडमी आँफ मोशन पिक्चर आर्ट अँण्ड सायन्सने यावर्षी पुरस्कारांसाठी पात्र ठरत असलेल्या 276 चित्रपटांच्या नावांची यादी प्रकाशित केली आहे.

जयभिम आणि मरक्कर याचसोबत रायटिंग विद फायर (दलित स्त्रियांकडुन चालवल्या जात असलेल्या वृतपत्रावर आधारीत असा चित्रपट आहे) हा चित्रपट देखील सर्वोत्कृष्ठ माहीतपट श्रेणीत निवडण्यात आला आहे.

नाँमिनेशनसाठी वोटिंग जानेवारी महिन्यापासुन सुरू होणार आहे.आणि नाँमिनीचे नाव घोषित 8 फेब्रुवारीला केला जाणार आहे.94 वा अकादमी पुरस्कार देखील 27 मार्च रोजी पार पडणार आहे.

*फुलरटन इंडियाने केली पेटीएमसोबत भागीदारी :

फुलरटन इंडिया आणि one 97 communication ltd यांच्याकडे पेटीएम कंपनीचा ब्रँड आहे.यांनी बिझनेस पार्टनरशिप आणि कस्टमरला लोन देणारे प्रोडक्टस प्रदान करता यावे याकरिता पार्टनरशिपची घोषणा केली आहे.

भागीदारीसोबत दोन स्थापण करण्यात आलेल्या संस्था,क्रेडिट युझरला क्रेडिट प्राप्त करून देण्याकरीता डेटा ड्रिव्हन इनसाईटस आणि वाईड रिचचा लाभ घेतील.

भ्रष्टाचार बोध निर्देशांकात भारत 85 व्या स्थानावर :

25 जानेवारी 2022 रोजी इंटरनँशनल नाँन काँर्परेटिव्ह आँरगनाइझेशनद्वारे जाहीर करण्यात आलेल्या भ्रष्टाचार बोध निर्देशांक 2021 च्या यादीत भारताचा 180 देशांमध्ये 85 वा क्रमांक आहे.

2020 मध्ये ह्याच यादीत भारत देश 180 देशांमध्ये 86 व्या क्रमांकावर होता.

भ्रष्टाचार बोध निर्देशांकात विविध 180 देशातील विशेषज्ञ इन्व्हेस्टर द्वारे त्या देशातील भ्रष्टाचाराच्याबाबद जो सल्ला तसेच मत व्यक्त केले जात असते त्यानुसार त्या देशाला भ्रष्टाचार बोध निर्देशांकात रक दिली जात असते.

ह्या निर्देशांकात 0 ते 100 पर्यतच्या स्तराचे पँटर्न वापरले जाते.ज्यात झिरो चा अर्थ सर्वात जास्त भ्रष्टाचार असा होतो तर 100 चा अर्थ सर्वात अधिक भ्रष्टाचार असा होत असतो.

आय एम एफने घोषित केला वल्ड इकाँनाँमिक आऊटलूक अहवाल :

25 जानेवारी 2022 रोजी आय एम एफने (international mudra coach)जागतिक आर्थिक आऊटलुकची घोषणा केली आहे.

या दिलेल्या अहवालानुसार जागतिक आर्थिक विकास आधीच्या अंदाजापेक्षा अर्धा टक्के कमी होणार आहे.
2021मध्ये वृदधी 5.9 टक्के पेक्षा कमी होऊन 2022मध्ये 4.4 टक्के इतकी होणार आहे.

आणि हीच टक्केवारी 2023 मध्ये अजुन कमी होऊन 3.8 टक्के इतकी होणार आहे.

पुष्प कुमार जोशी बनले हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेडचे नवीन चेअरमन :

पुष्प कुमार जोशी यांची भारतातील आँईल मार्केटिंग कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियम काँर्परेशनच्या नवीन चेअरमनपदी नियुक्ती झाली आहे.

सध्या पुष्प कुमार जोशी कंपनीत एच आर डायरेक्टर म्हणुन कार्य करीत आहे.लवकरच ते मुकेश कुमार सुराणा यांची जागा घेणार आहे.जे 30 एप्रिल 2022 रोजी निवृत होणार आहे.

पुष्प कुमार जोशी यांची दोन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती होणार आहे.