ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

ब्लॉकचेन म्हणजे काय?

हे एक डिजिटल स्वरूपातील व्यवहारांचा सामायिक,पारदर्शक व सर्वांकरता वितरित केले गेलेले एक लेखाजोखा किंवा खातावही (open ledger) असते ज्यात जे आर्थिक व्यवहार होतात ते कालक्रमानुसार मांडले जातात किंवा स्टोअर केले जातात.

(थोडक्यात भारतात दुकानदार कींवा व्या्वसायिक जे लालचोपडीत आर्थिक व्यवहार मांडून ठेवत असतो त्याचाच हा नावीन्यपूर्ण, क्रांतिकारक व काळारूपाणूसार आधुनिक प्रकार)

ब्लॉकचेन  हे आर्थिक व्यवहारांच्या ब्लॉकची  एक चेन,साखळी असते आणि प्रत्येक ब्लॉक मध्ये नव्याने होत जाणाऱ्या व्यहवारांचा माहितीचा संच संग्रहित,साठवले जातात.

आता प्रश्न पडतो की हे ब्लॉक कोण ठरवत किंवा ब्लॉक पूर्ण झाला हे कोण प्रमाणित करत किंवा ह्याला कोण मान्यता देत.

तर हे काम केले जाते संगणक कडून किंवा आपण नाव ऐकलं असेल miners त्या मायनिंग करणाऱ्यांनाकडून,त्यांनी एकदा ह्या व्यवहारावर शिक्कामोर्तब केलं किंवा मान्यता दिली की  हा मान्यताप्राप्त ब्लॉक पुढच्या ब्लॉक ला जोडला जातो आणि अशी ब्लॉक चेन ची साखळी  तयार होत जाते.

आता प्रश्न येतो ब्लॉकचेन विकेंद्रीकरण का केलं गेलं?

ब्लॉकचेन हे लाखो संगणकाच्या जाळ्यावर आधारित  आहे, म्हणजे हे सर्व संगणकावर उपलब्ध असते  आणि अर्थातच हे  सर्व सार्वजनिक आणि पारदर्शीही असून आणि   एक विकेंद्रीत पद्धत अवलंबिली जाते  ज्यात माहिती ही जगभरातल्या  संगणकावर साठवलेली असते आणि वर म्हटल्याप्रमाणे ह्यावर कुणा बँकेचे किंवा एकाद्या कुणा व्यक्ती, किंवा कुण्या ही पदधिकारी ची सत्ता नसते किंवा ह्याला कुणी नियंत्रित करू शकत नाहीआणि हयालाच विकेंद्रीकरन म्हटलं जाते

थोडं उदाहरणं सहित समजाऊन घेऊयात..

समजा की चार मित्र अजित, प्रकाश ,दीपक आणि राजेश ह्या चौघांना एकमेकांना पैसे पाठवायचे आहेत. मग आपल्या नेहमीच्या पद्धती नुसार आपन बँके ला सूचना देणार बँक आपल्या खात्यात रक्कम आहे की नाही ते तपासून आपल्या सुचने नुसार पैसे हवे त्या खात्यात जमा करणार.

जसे की,,

  • अजित ला प्रकाश ला 10,000 रुपये पाठवायचे आहेत.
  • अजित बँके ला सूचना देईल
  • बँक अजित चया खात्यात पैसे आहे की नाही चेक करेन
  • असतील तर प्रकाश च्या खात्यात जमा करेल
See also  व्हाट्सएप बिझनेसचे 'बूस्ट स्टेटस' फिअचर काय आहे? कसे वापरावे?

आता आपण हाच व्यवहार ब्लॉक चेन अंतर्गत कसा होईल ते पाहुयात.आपल्याला ह्यात आता ब्लॉकचेन ची प्रोसिजर फॉलो करायची आहे।

आता वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉकचेन मध्ये कुणी मध्यस्थ नसते ,बँक किंवा कुणी अधिकारी नसते म्हणजे आता बँक ह्यातुन बाहेर आणि फक्त चार मित्र एकमेकां समोर असून व्यवहार पार पाडायचा आहे.

आता समोरा समोर चार मित्र बसलेले आहेत पण पुढे व्यवहार करायाच्या आधी आपण ब्लॉकचेन मध्ये असते तसे काही सुरक्षिततेचे आणि सावधगिरी ची नियमवाली ठरवून घेतली पाहिजे.

पारदर्शी खाते वही किंवा  रेकॉर्ड लेजर-  एक  खाते वही  आहे त्यात  सर्व व्यवहार नोंदणी केली जाते.म्हणजे पैसे एका कडून दुसऱ्या कडे गेलेत की लगेच तशी नोंद केली गेली जाते आणि हे करण्याकरता कुणी तरी नोंद करणार असावं लागतं.

नोंदी  जश्या की

  • पैसे कुणी पाठवलेत?
  • किती पैसे पाठवलेत?
  • पैसे कुणाला मिळालेत?

आता सर्व जे चार सदस्य आहेत ते सर्व हे स्वतंत्र पणे ह्या व्यवहार ची आपल्या जवळ नोंद करतात. बाकी लोक हे व्यवहार सुरळीत आणि खरे आहेत कां चेक करू शकतात. सर्व सुरळीत असेल  सर्व मित्रांची खात्री पटली तर ह्या व्यवहार ची माहिती खातेवाहित पहिल्या पानावर ठेवली जाते आणि अश्या प्रकारे ही सर्व प्रक्रिया पारदर्शी पणे पार पडते.

ब्लॉकचेन म्हणजे काय Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती

ब्लॉकचेन मध्ये सर्व व्यवहारांची नोंद ठेवली जाते

आता आपल्या उदाहरणात-अजित प्रकाश ला 10000 रुपये पाठवणार आहे.म्हणून ह्या व्यव्हारला  सुरवात झाली आहे  सर्व जण हा व्यव्हार पाहू शकतात,चेक करू शकतात , चूक की बरोबर ह्या बाबतीत आपलं मत नोंदवू  शकतात. आणि सर्व सुरळीत झालं की हा व्यवहार यशस्वी म्हणून नोंद केली जाते आणि प्रत्येक जण आपल्या नोंद वहीत म्हणजेच ओपेन लेजर मध्ये तशी नोंद करतो.

आता प्रकाश कडे  10000 रुपये आहेत, आणि अर्थातच अजित कडे तेवढे 10000 रुपये कमी आहेत.ह्या माहितीचा उपयोग पुढे होणाऱ्या व्यवहार बाबत चेकिंग करताना होत असतो.

प्रकाश त्याच्या 10000 रुपयांपैकी 6000 दीपक आणि 3000 राजेश ला देण्याकरिता नवीन व्यहार सुरू करू शकतो, पुन्हा वरील ब्लॉकचेन प्रक्रिये नुसार सर्व सदस्य हा व्यहवारांचा तपास करतील आणि सर्व नियमानुसार असेल तर ह्या व्यहवाराची नोंद खाते वही किंवा ओपन लेजर ला केली जाईन.

  • ओपन लेजर वर असलेली माहिती
  • अजित -0000
  • प्रकाश -01000
  • दिपक -06000
  • राजेश -03000
See also  Java 8 ची वैशिष्टये - Java 8 Features In Marathi

ब्लॉकचेन मध्ये फसवुणुकीला वाव नसतो

उदाहरण- प्रकाश ला समजा 2000 रुपये मदत अजित ला परस्पर परत द्यायचे असतील तर असा व्यहवार हा ब्लॉकचेन मार्फ़त होवु शकत नाही.

कारण खाते वहीत प्रकाश च्या खात्यात फक्त आता 01000 रुपये बाकी आहेत म्हणून असा व्यवहार होऊ शकत नाही आणि खाते वहीत म्हणजे ब्लॉकचेन लेजर वर नोंद केली जाणार नाही.

तसेच अजित पैसे नाहीत म्हणून समजा रागात त्याने ही खातेवही किंवा लेजर च नष्ट केलं तर?

काहीही  अडचणी येणार नाहीत कारण वर दिलेल्या नियमावली नुसार प्रत्येक मित्राकडे ह्या खाते वही किंवा ओपन लेजर ची एक प्रत असणार आहे. अश्या नियमामुळे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि सर्व व्यवहार हे पारदर्शक रित्या पार पाडले जातात.

अश्या पारदर्शकते मुळे सर्व ब्लॉकचेन सदस्य एकमेकांना वर विश्वास ठेवतात व बँक सारख्या तटस्थ संस्थेची ब्लॉकचेन मध्ये गरज पडत नाही.

आपण वर अगदी बेसिक माहिती पहिली जी अगदी नवख्या किंवा ब्लॉक चेन बद्दल काहीच माहीत नसलेले पण उत्सुकता असलेल्या लोकं करता तोंड ओळख होती

आता आपण प्रत्यक्षात ब्लॉक चेन तंत्रज्ञान कसे काम करते तर पाहुयात

अजित ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नुसार ५००० Bitcoin बिट कोंईन यूनिट प्रकाश ला पाठवायचे आहेत.

आता हा व्यवहार सुरू केला गेलाय आणि ब्लॉकचेन मध्ये नोंद होण्याकरता तो व्यवहार  waiting room मध्ये  रांगेत आहे म्हणजेच  ज्याला ब्लॉकचेन भाषेत मेमेपुल म्हणतात त्यात आहे.

  • आता miners जे असतात त्यांची जी ही जबाबदारी असते किंवा ते ही जबाबदारी घेतात आणि  ह्या व्यवहाराला रांगेतुन बाहेर काढून वेरीफाय ,चेक करतात की अजित कडे खरच ५००० युनिट आहेत, नोंद करतात की अजित च्या खात्यातील ५००० युनिट हे प्रकाश च्या खात्यात टाकले गेलेत आणि हे सर्व बाबी ते एका पेपर वर नोंद करतात. इथं हा पेपर म्हणजेच ब्लॉकचेन चा ब्लॉक होय.
  • प्रत्येक ब्लॉक मध्ये किती नोंद करता येते ह्याची मर्यादा असते व जेव्हा मर्यादा संपते तेव्हा पुन्हा नाविन ब्लॉक ऍड केला जतो, जोडला जातो जेणेकरून पुढील व्यहवारांची नोंद करता यावी
  • आता सर्वात महत्वाचा मुद्दा, जेव्हा हा नवीन ब्लॉक miners ला ब्लॉकचेन मध्ये ऍड करायचा असतो तेव्हा मात्र miners ना प्रूफ ऑफ वर्क देणं गरजेचं असत. ह्यालाच गणिती प्रश्न अस म्हणतात हा प्रश्न वरील प्रकाश आणि आजितच्या व्यवहार वर आधारित असते.हे गणित solve केलं किंवा सोडवल तरच तो ब्लॉक ऍड केला जातो. हे गणिती प्रश्न सोडवल्यानंतर  एक  कोड तयार होतो तो कोड ह्या ब्लॉक मध्ये नोंदला जातो आणि ह्याच  पद्धतीने असे ब्लॉक पुढेही   तयार होत जातात आणि ते एकमेकांशी एका कोड च्या साखळी द्वारे जोडले जातात
  • आता प्रश्न येतो हे गणिती प्रश्न कोण सोडवत?  जसे KBC कार्यक्रमात मुख्य स्पर्धक निवडण्याकरता 20 सेकंद ची वेळ असते तसेच miners मध्ये ही स्पर्धा असते की  मेमेपुल weating room मध्ये  असलेला व्यवहार ची ब्लॉवक वर सर्वात आधी कोण नोंद करेल जसे की,,
  • अजित कडचा बॅलन्स चेक करून प्रमाणित करणे
  • अजित कडचे पैसे  काढून प्रकाश च्या खात्यात टाकणे ,नोंद करणे
  • ह्या सर्व नोंदी ब्लॉक मध्ये नोंद करणे
  • गणिती प्रश्न सोडवने
  • आणि नंतर हा ब्लॉक ब्लॉकचेन नेटवर्क ला जोडणे
See also  आपला Android फोन सुरक्षित कसा ठेवावा ? Best mobile security tips in Marathi

आता ही नोंद कुणी केली आणि कोण विजेता किंवा जिंकला हे तपासला जात फुलनोड्स कडून, हे नोड्स म्हणजे अवाढव्य गणिती सुपरपॉवर असलेलं संगणक असतात . ह्या नोड्स नि एकदा तपासलं आणि कन्फर्म केलं की सोडवलेलं गणित बरोबर आहे तेव्हा ह्या miners ना काही बक्षीस मिळत ,हे बक्षीस म्हणनजेच बिटकॉईन होय. बक्षीस मिळालं की  ब्लॉक मधील नोंद ची सर्वांकडून दखल घेतली जाते, ह्या नोंदी ची सर्वांकडे कडे एक एक प्रत सांभाळली जाते ,प्रत्येक जण आपल्या रेकॉड ला ह्या व्यवहाराचीप्रत ठेवतो. अश्याप्रकारे प्रत्येकाकडे प्रत्येक व्यहवाराची प्रत असते.

आता लक्षात आलं असेल की कुणी ही miner कुणाची फसवणुक करू शकत नाही कारण त्याला क्लिष्ठ  गणिती प्रश्न सोडून प्रूफ द्यावं लागतं तसेच तो जुन्या व्यहवारा त ही बदल करु शकत नाही कारण त्याला  त्या करता नेटवर्क मध्ये असलेल्या सर्वांच्या  प्रतीत बदल करावे लागतील आणि वरील एकंदरीत प्रक्रिया पाहता असे करणं अशक्यप्राय आहे.

वर दिलेली ब्लॉकचेन बद्दल माहिती सारांश.

  • बँकेचे व्यहार हे केंद्रीय व्यवस्थेचा भाग असतो आणि बँक आपल्या आर्थिक व्यवहारांचं नियमन करत असते ,असे व्यवहार सक्षम नसतात आणि फसवणुक होण्याचं प्रमाण जास्त असते
  • विकेंद्रीकरण पद्धतीचे व्यहार हे बँक सारख्या असक्षम संस्था ना ब्लॉकचेन प्रीक्रियेत बाहेर करतात.
  • ब्लॉकचेन खातेवहित नोंद असलेलं व्यहवार हे खात्री पूर्वक प्रमाणित केलेले असतात
  • ब्लॉकचेन खातेवही किंवा ओपन लेजर असल्यामुळे सर्व सदस्य व्यवहार कधी ही चेक करू शकतात
  • पारदर्शकता हाच सर्वात मोठा गुण ब्लॉकचेन तंत्रज्ञान असून ह्यावरच  ब्लॉकचेन तंत्र पूर्ण अवलंबून आहे.


Affiliate marketing Books at Amzon


Best Affiliate Niche in Marathi

Best Affiliate Niche in Marathi

With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,

1 thought on “ब्लॉकचेन म्हणजे काय? Blockchain तंत्रज्ञान मराठी माहिती”

Comments are closed.