भारतातील सर्वात मोठया धरणांविषयी माहीती -India largest Dam information in Marathi

भारतातील सर्वात मोठया धरण – Indias largest dam information in Marathi

आपल्या भारत देशात अनेक धरणे आहेत.मध्यम अणि मोठया अशा दोघे स्वरूपाची एकुण ३२०० धरणे आपल्या भारत देशात असलेली आपणास दिसून येतात.

आज ह्या सर्व धरणांमधील आपण काही अशा धरणांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्यांचा जलसाठा सर्वाधिक प्रमाणात आहे.अणि ज्यांचा भारतातील सर्वात सर्वात उंच धरण अणि जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीत लागतो.

१) भाक्रा धरण-

भाक्रा धरण हे आपल्या भारत देशात हिमाचल प्रदेश ह्या राज्यामध्ये असलेले आपणास दिसून येते.हिमाचल प्रदेश मध्ये विलासपुर ह्या जिल्ह्यात हे धरण आहे.

भाक्रा हे धरण भारतातील हिमाचल प्रदेशात सतलज नदीच्या काठावर बांधण्यात आले आहे.भाक्रा हे धरण सतलज नदीच्या काठी १९४८ ते १९६३ या कालावधीमध्ये बांधले गेले होते.

भाक्रा धरणाची उंची ही २२४ मीटर इतकी आहे.म्हणजे सुमारे ७३९ फुट आहे.भाक्रा धरणाची एकुण लांबी ही ५२५ मीटर म्हणजे १७०५ फुट इतकी आहे.

भाक्रा धरण- Indias largest dam information in Marathi

भाक्रा धरणाचा एकुण जलसाठा हा ३३०.८५ टीएमसी इतका आहे.हया जलसाठयास गोविंद सागर असे देखील म्हटले जाते.भाक्रा धरणाची वीजनिर्मिती क्षमता १३२५ मेगा वॅट इतकी आहे.भाक्रा धरणाचा वीज निर्मिती मध्ये संपूर्ण भारतात सहावा नंबर लागतो.

भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीत भाक्रा धरणाचा दुसरा क्रमांक लागतो.भाक्रा धरणाला विसर्गा करीता प्रमुख चार दरवाजे आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरियाणा पंजाब राज्यांमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली भाक्रा नांगल ह्या प्रकल्पाच्या कामाला आरंभ केला गेला होता.

भाक्रा हे धरण हिमाचल प्रदेशात आहे पण याचा विसर्ग पंजाब मध्ये होतो म्हणून याचे पाणी पंजाब हरियाणा राज्यात जाते.

२)नांगल धरण –

भाक्राच्या धरणाच्या पुढच्या नदीपात्रात नांगल हे धरण आहे.

हे धरण बांधण्यात येण्याचे मुख्य कारण भाक्रा धरणातील प्रचंड पाणीसाठा आहे.म्हणजेच भाक्रा धरणातील सोडल्या जाणाऱ्या विसर्गावर नियंत्रण राहावे यातुन सुटलेल्या पाण्यामुळे आजूबाजुच्या परिसराचे नुकसान होऊ नये यासाठी भाक्रा धरणाच्या पुढील पात्रात नांगल धरण बांधण्यात आले आहे.

See also  Hanuman Chalisa- हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

नांगल धरणाच्या मध्यातुन दोन कॅनाॅल जातात ह्या कॅनाॅल द्वारे हरियाणा पंजाब राजस्थान ह्या तीन राज्यात पाठीपुरवठा करण्यात येतो.

आपल्या प्रचंड पाणीसाठा मुळे नांगल हे धरण भारतातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

३) सरदार सरोवर धरण –

सदरार सरोवर धरण हे आपल्या भारत देशातील गुजरात ह्या राज्यात आहे.गुजरात मध्ये हे धरण नावागाम शेजारी आहे.

सरदार सरोवर हे धरण १९८७ ते २०१७ या कालावधीमध्ये नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे.सरदार सरोवर या धरणाची १६२ मीटर म्हणजे ५३४ फुट इतकी आहे.

सरदार सरोवर ह्या धरणाची एकुण लांबी ही १ हजार २१० मीटर म्हणजे ३ हजार ९७० फुट एवढी आहे.ह्या धरणाचा जलसाठा ३३५.४१ टीएमसी एवढा आहे.

सरदार सरोवर ह्या धरणाची वीजनिर्मिती क्षमता ही १ हजार ४५५ मेगा वॅट इतकी आहे.

विसर्गाकरीता ह्या धरणास मुख्य तीस दरवाजे आहेत.या धरणामधुन महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान ह्या राज्यात पाणी अणि वीजेचा पुरवठा करण्यात येतो.

सरदार सरोवर ह्या धरणावर वीजेची निर्मिती करण्यासाठी २०० मेगावॅट असलेले सहा अणि ५० मेगा वॅट असलेले पाच असे एकुण अकरा टरबाईन बसवण्यात आले आहे.

हे सर्व अकरा टरबाईनस मिळुन १४५० मेगा वॅट एवढ्या वीजेची निर्मिती करतात.

सर्वात जास्त वीज निर्मिती करण्यामध्ये भारतात सरदार सरोवर ह्या धरणाचा पाचवा क्रमांक लागतो.या धरणाच्या पाण्यामुळ एकुण १७ हजार ९२० चौकिमी क्षेत्र हे ओलिता खाली आलेले दिसुन येते.

यात बारा जिल्हे ६२ तालुके अणि ३९३ गाव समाविष्ट आहेत.

सरदार सरोवर ह्या धरणाची उंची टप्याटप्याने वाढवण्यात आली आहे.१९९९ मध्ये ह्या धरणाची उंची ८८ मीटर इतकी होती पुढे जाऊन ती २०१७ मध्ये १६३ मीटर ५३५ फुट इतकी वाढविण्यात आली होती.

ह्या धरणाच्या साठयामध्ये खुप जणांचे नुकसान झाले म्हणून अनेकांनी या धरणाविरूदध आंदोलन केले.म्हणुन हे धरण टप्याटप्याने थोडेथोडे बा़ंधले गेले होते.

See also  नरेंद्र मोदी स्टेडियम विषयी काही रोचक तथ्ये - Amazing facts about Narendra Modi stadium in Marathi

नरेंद्र मोदी हे भारत देशातील पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या कामात विशेष लक्ष दिले अणि हे काम राहिलेले काम पुर्ण करून घेतले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यु आॅफ युनिटी हा याच धरणाच्या पुढच्या बाजूला नर्मदा नदीपात्रात तयार करण्यात आला होता.

४) रिहंद धरण –

रिहंद धरण हे भारतातील सर्वांत जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीत तिसरा क्रमांक लागणारे महत्वाचे धरण आहे.

रिहंद धरण हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे सोनभद्र नावाच्या जिल्ह्यात आहे.

रिहंद धरणाचे अधिकृत नाव गोविंद वल्लभ पंत आहे.या धरणाचे नाव उत्तर प्रदेश राज्यामधील पहिले मंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून ठेवले गेले आहे.

रिहंद धरण हे रिहंद नदीवर १९५४ ते १९६२ या कालावधीत बांधण्यात आले आहे.या धरणाचे भुमिपुजन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.

रिहंद धरणाची उंची ९१.४५ मीटर इतकी म्हणजे ३०० फुट आहे.तर लांबी ९३४.४५ मीटर इतकी आहे म्हणजे तीन हजार ६६ फुट इतकी आहे.

रिहंद धरणाचा जलसाठा ३७४.३४ टीएमसी इतका आहे.रिहंद धरणाला विसर्गा करीता १३ मुख्य दरवाजे सुद्धा आहेत.

रिहंद धरणाची वीजनिर्मिती क्षमता ३०० मेगा वॅट इतकी आहे.

५) नागार्जुन सागर धरण –

नागार्जुन धरण हे देशातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीत हे धरण दितीय क्रमांकावर आहे.

नागार्जुन सागर धरण हे भारतातील तेलंगणा ह्या राज्यातील नालगोंडा ह्या जिल्ह्यामध्ये आहे.

नागार्जुन सागर धरण हे कृष्णा नदीवर १९५५ ते १९६७ दरम्यान बांधण्यात आले आहे.हे धरण सर्वात मोठया दगड आणि विट यांचा उपयोग करून बांधण्यात आले आहे.

नागार्जुन सागर ह्या धरणाची उंची १२४ मीटर म्हणजे ४०७ फुट एवढी आहे.तर लांबी १५५० मीटर म्हणजे ५०८५ फुट इतकी आहे.

नागार्जुन सागर धरणाचा एकुण जलसाठा ४०५ टीएमसी इतका आहे.या धरणात ८०६ मेगा वॅट इतकी वीज निर्मिती क्षमता आहे.

See also  गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ता साँग लिरिक्स - Ganpati aarti sukhkarta dukhharta song lyrics in Marathi

या धरणाचे भुमीपुजन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.या धरणावर एकुण आठ वीजनिर्मिती टरबाईनस बसविण्यात आले आहे.

११० चा एक अणि १००.८ चे सात असे एकुण आठ टरबाईनस ८०६ मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करतात.या धरणाला विसर्गा करीता २६ मुख्य दरवाजे आहेत.

धरणातुन दोन कॅनोल जातात त्यातील डाव्या कॅनाॅलचे नाव लाल बहादूर शास्त्री असे आहे.हा कॅनाॅल सुमारे १७९ किलोमीटर इतका वाहत जातो.

उजव्या कॅनाॅलचे नाव जवाहर कॅनाॅल असे आहे.हा कॅनाॅल सुमारे २०३ किलोमीटर इतका वाहत जातो.

६) इंदिरा सागर धरण –

इंदिरा सागर धरण याचा जलसाठा ४३०.८५ टीएमसी इतका आहे.म्हणुन हे धरण भारतातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

हे धरण भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे.मध्य प्रदेश मध्ये हे मुंडी नावाच्या गावाशेजारी आहे.

इंदिरा सागर धरण हे नर्मदा नदीवर १९८३ ते २००५ दरम्यान बांधण्यात आले आहे.या धरणाची उंची ९२ मीटर म्हणजे ३०१ फुट इतकी आहे.

या धरणाची एकुण लांबी ६५३ मीटर म्हणजे २१४१ फुट इतकी आहे.या धरणाचा जलसाठा ४३०.८५ टीएमसी इतका आहे.

या धरणाची वीजनिर्मिती क्षमता एक हजार मेगावॉट इतकी आहे.इंदिरा सागर धरणावर वीजनिर्मिती करण्यासाठी एकुण आठ टरबाईनस बसविण्यात आले आहेत.

या धरणावर प्रत्येकी १२५ असे एकुण आठ टरबाईनस हजार मेगा वॅट इतकी वीज निर्माण करतात.या धरणाला विसर्गा करीता मुख्य वीस दरवाजे सुद्धा आहेत.