श्री गणेशाची ३२ रूप
- बाळ गणपती – भगवा वर्ण असलेला विनायकसंदेश महात्म्य – लहान मुले कशी प्रत्येक वेळी सावधान असतात, तसे आपण आयुष्यात येणाऱ्या संकटांना सावधानतेने सामोरे गेले पाहिजे.
- तरुण गणपती – या रूपामध्ये उर्जावन गणपतीचे शरीर लाल रंगाने चमकत आहे.ह्या रूपामध्ये गणपतीला 8 हाथ आहेत आणि तरुण गणपती ला ताऱ्याण्याचे प्रतीक समजले जाते. संदेश महात्म्य – जीवनामध्ये नेहमी संधीच्या शोधात असले पाहिजे.
- भक्त गणेश – हे गणपतीचे शांत रूप आहे.संदेश महात्म्य या रूपामध्ये गणपतीला चार हात आहेत आणि ते चार हात धन,धर्म,कर्म आणि मोक्ष यांचे प्रतीक आहेत.
- वीर गणपती – वीर गणपती हे गणपती बाप्पाचे योध्याचे रूप आहे आणि यामध्ये गणपती बाप्पाला 10 हात आहेत.ह्या रूपाची पूजा केल्यानंतर तुम्हाला धाडस करण्याची शक्ती मिळते.संदेश महात्म्य – वीर गणपती तुम्हाला कधीही हार न मानण्याचा संदेश महात्म्य देतो.
- शक्ती गणपती – चार हात असणार सिंधुर धारी गणपती एका हाताने भक्तांना आशीर्वाद देतो,दुसऱ्या हातामशे शस्त्र आहेत,तिसऱ्या हातामध्ये माळा आहेत तर चोथ्या हातामध्ये शंख आहे.संदेश महात्म्य – हे रुप मानवाच्या आतील शक्तीला ओळखण्याचे संदेश महात्म्य देते.
- द्विज गणपती – ह्या रूपामध्ये गणपतीला चार हात आहेत.हे रूप वेद आणि शास्त्राचे प्रतीक आहे. संदेश महात्म्य – आपण आपल्या वेदांचा अभ्यास केला पाहिजे.
- सिद्धी गणपती – ह्या रूपामध्ये गणपतीला 4 हात आहेत आणि गणपती चा रंग पिवळा आहे.ह्या रूपातील हात सिद्धीचे आणि सफलतेचे प्रतीक आहेत.संदेश महात्म्य – हे रूप कोणत्याही कामामध्ये सिद्धी प्राप्त करम्याचा संदेश महात्म्य देते.
- उच्छिष्ट गणपती – ह्या रूपामध्ये गणपती निळ्या रंगाचा आहे आणि ऐश्वर्य आणि मोक्ष हे ह्या रूपाचे प्रतीक आहे. संदेश महात्म्य – हे रूप ऐश्वर्य आणि मोक्ष यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रेरित करते.
- विघ्न गणपती – या रूपामध्ये गणपतीला 8 हात आहेत आणि हातामध्ये शंख आणि चक्र आहे.हे अडचणींना सामोरे जाण्यासाठी प्रेरित करते.संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला संदेश महात्म्य देते की,नकारात्मक विचारांना दूर सारून नेहमी सकारात्मक विचार करायला हवा
- क्षिप्र गणेश – ह्या रूपातील गणपती लवकर प्रसन्न होतात.ह्या रूपामध्ये गणपतीच्या एका हातामध्ये कल्पवृक्ष आहे. संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा देते.
- हेरंब गणपती – गणपतीचे हे रूप वाघावर सवार आहे आणि ह्या रुपात गणपतीला आठ हात आहेत. संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रेरित करते.
- लक्ष्मी गणपती – दहा हात असणारे हे रूप बुद्धी आणि सिद्धीचे प्रतीक आहे.संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्ट बनण्यासाठी प्रेरित करते.
- विजय गणपती – पुण्यातील अष्टविनायक मंदिरात लाल रंगाचा विजय गणपती विराजमान आहे आणि हा गणपती भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतो,असे म्हणतात.
- नृत्य गणपती – ह्या गणपतीची मूर्ती तमिळनाडू मध्ये विराजमान आहे आणि ही गणपतीची मूर्ती कल्पवृक्षाच्या खाली नृत्य केल्याची आहे.संदेश महात्म्य – गणपतीचे हे रूप कलांना प्रोत्साहन देते.
- एकाक्षर गणपती – लाल रंग असलेल्या या गणपतीची पूजा केल्याने मनाला शांती भेटते.कर्नाटक मधील हंपीमध्ये या रूपातील गणपतीची मूर्ती आहे. संदेश महात्म्य – गणपतीचे ह रूप कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी प्रेरित करते.
- वर गणेश – लाल रंगाच्या या गणपतीला 4 हात आहेत आणि हे गणपतीच्या रूपाची मूर्ती कर्नाटक मध्ये विराजमान आहे. संदेश महात्म्य – यश मिळवण्या करता समर्पण भाव असावा
- त्र्यक्षर गणपती – हे गणपतीचे रूप ब्रम्हा,विष्णू आणि महेश यांचे मिळून बनलेले आहे आणि ह्या रूपाचा गणपती कर्नाटक मध्ये स्थित आहे. संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला अध्यात्मिक कडे जाण्यासाठी प्रेरित करते.
- शिवप्रसाद गणपती – मैसूर येथे विराजमान असलेले हे गणपतीचे रूप चूक झाल्यानंतर शिक्षा देते. संदेश महात्म्य – गणपतीचे हे रूप प्रत्येक गोष्ट शांततेने करण्याचा संदेश महात्म्य देते.
- हरिद्र गणपती – उजैन मध्ये स्थित असलेले गणपतीचे रूप हळदीने बनवलेले आहे आणि हा गणपती भकांच्या हाकेला लगेच धावून येतो.. संदेश महात्म्य – आपण आयुष्यात निरोगी राहिले पाहिजे.
- सृष्टी गणपती – लाल रंग आणि 4 हात असेलेला हा गणपती तमीनळाडू मधील स्वामिनाथन मंदिरामध्ये विराजमान आहे.संदेश महात्म्य -गणपतीचे हे रूप चांगले-वाईट आणि खरे-खोटे या मध्ये फरक ओळखण्याची बुद्धी देते.
- एकदंत गणपती – ह्या रूपातील गणपतीचे पोट खूप जास्त आहे आणि हा गणपती भक्तांच्या आयुष्यातील अडचणींना दूर सारतो.संदेश महात्म्य -ह्या गणपतीचे रूप आपल्याला आपल्यामधील असणाऱ्या चुकांना सुधारण्याची प्रेरणा देते.
- उद्देन्ड गणपती – कर्नाटक मध्ये विराजमान असेलेल्या या गणपतीच्या रुपाला 12 हात आहेत.ह्या मंदिरामध्ये गणपतीच्या 32 विविध रूपाच्या मूर्त्या आहेत.संदेश महात्म्य – हे रूप मोहातून दूर जाण्यासाठी प्रेरित करते.
- ऋण मोचन गणपती – गणपतीचे हे रूप भक्तांना मोक्षाचा रस्ता दाखवते.तिरवन्त पुरम मध्ये गणपतीचे हे रूप विराजमान आहे. संदेश महात्म्य -ह्या रूपामध्ये गणपती आपल्याला आपल्या गुरू,आई-बाबा यांच्या प्रति असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रेरित करते.
- ढुंढी राज गणपती – चार हात असणाऱ्या या रूपामध्ये गणपतीच्या एका हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे.संदेश महात्म्य – गणपतीचे हे रूप आपल्याला अध्यात्मिक आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करते
- द्विमुख गणपती -ह्या रूपामध्ये गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन तोंडे आहेत आणि ह्या रूपामध्ये गणपतीला चार हात आहेत आणि हे रूप हिरव्या रंगाचे आहे.संदेश महात्म्य -हे रूप आपल्याला मनातून आणि बाहेरून दुनियेला ओळखण्यासाठी प्रेरित करते.
- त्रिमुख गणपती – ह्या रूपामध्ये गणपतीला तीन तोंडे आणि सहा हात आहेत. संदेश महात्म्य -हे रूप आपल्याला भूतकाळ ,भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ यामध्ये ध्यान देऊन कर्म करत राहण्याची प्रेरणा देते.
- सिंह गणपती – गणपतीचे हे रूप सिंहासमान आहे आणि या रूपामध्ये गणपतीला आठ हात आहेत.संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करते.
- योग गणपती – ह्या रूपामध्ये गणपतीला चार हात आहेत आणि हे रूप मंत्राचा जप करत आहे.ह्या गणपतीची पूजा केल्याने मनाला शांती भेटते.संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला आपली आतील शक्ती ओळखण्यासाठी प्रेरित करते.
- दुर्गा गणपती – ह्या रूपातील गणपतीचा रंग सोनेरी आहे.ह्या रूपामध्ये अदृश्य देवी लाल वस्त्र धारण करून उभी आहे.सोनेरी रंग ऊर्जेचे प्रतीक आहे. संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला जिकण्याच्या वाटेतील अडचणींना दूर करण्यासाठी प्रेरित करते.
- संकष्ट हर गणेश – ह्या रूपातील गणपतीचा रंग लाल आहे आणि हे रूप आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी आपल्याला मदत करते. संदेश महात्म्य – हे रुप आपल्याला संकटांना सामोरे जाण्यासाठी शक्ती देते.
- महागणपती – ह्या रूपातील गणपतीचा रंग लाल आहे आणि ह्या रूपातील गणपतीला 10 हात आहेत.हे रूप द्वारका मध्ये विराजमान आहे,ज्याची भगवान श्री कृष्णाने पूजा केली होती. संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला भ्रमात न पडण्यासाठी प्रेरित करते.
- उधर्व गणपती -ह्या रूपातील गणपतीला सात हात आहेत आणि त्यातील एका हातामध्ये तुटलेला दात पकडलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळाचे फुल आहे.संदेश महात्म्य – हे रूप आपल्याला आपल्या वर्तमान स्थितीतून वर उठण्यासाठी प्रेरित करते.