भावार्थ ज्ञानेश्वरी- Dnyaneshwari In Marathi
जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांपैकी श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. त्यात परमार्थ तर आहेच. पण परमार्थाची खरी सुरूवात मनुष्य जन्म उत्कृष्टपणे जगण्यातून होते. कसे जगावे याचे उत्कृष्ट विवेचन सुंदर रितीने ज्ञानेश्वरीत केले आहे.
प्रत्येक मराठी माणसाने वाचलेच पाहिजेत असे ग्रंथ म्हणजे छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि श्री ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी प्रत्येक मराठी माणूस बाचतोच असे नाही. कारण १२९१ साली प्रचलित असलेल्या प्राकृतबहुल मराठीत लिहीलेली ज्ञानेश्वरी आजच्या तरुणांना समजायला कठीण जाते. अनेकजण प्रयतून करतात पण नंतर सोडून
देतात. कारण प्राकृत भाषा आजच्या तरूणाच्या ओळखीची राहिलेली नाही.
अशा वेळी ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे २१व्या शतकातील सोप्या मराठीत ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरी, श्री विजय पांढरे यांनी अत्यंत सोप्या भाषेत आणि २१व्या शतकातील तरुणांना समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वरीचे केलेले रुपांतर आपल्याला आवडेलच. कारण मूळ ज्ञानेश्वरीतील गोडवा त्यांनी जसाचा तसा जपला आहे. रोज केवळ अर्धा तास, असे फ़क्त एकोणतीस दिवस वाचन करून आपण ज्ञानेश्वरीचे पूर्ण पारायण करू शकता.
श्री विजय पांढरे जिखित २१व्या शतकासाठी सध्याच्या मराठीत ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरीची भेट आम्ही
आज ई साहित्य प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून सादर करीत आहोत. ही ज्ञानेश्वरी मूळ ज्ञानेश्वरीप्रमाणेचे ओवीबद्ध असून समजायला खूपच सोपी झाली आहे. मूळ प्राकृत ज्ञातेश्वरीइतकीच रसाळ. या ज्ञानेश्वरी सोबत मूळ ज्ञातेश्वरीचीही ई प्रत विनामूल्य उपलब्ध आहे.
॥जेथे जेथे मराठी माणूस, तेथे तेथे ज्ञानेश्वरी॥
सर्वत्र वेद यज्ञाचा घाटोअन् सुविद्धेचा झडझडाट ।
वारा सत्वगुणाचा सोसाट। वाहू लागे॥
अशी सुसाट सुगंधी वाऱ्यासारखी ज्ञानेश्वरी सर्वत्र पसरवावी. जगातील प्रत्येक मराठी माणसाने त्याचा आनंद घ्यावा व अवघे जन सुखी व्हावे अशी ज्वलंत आणि तीव्र ईच्छाशक्ती असणाऱ्या सर्व वयाच्या वाचकांनी आमच्याशी संपर्क साधावा.
आपण जर अजून एकापर्यंत ही ज्ञानेश्वरी पोहोचवू शकत असलात तरी ते एक महत्त्वाचे काम होईल. सहस्त्र वाहू, लक्ष मते या कार्यात लागले तर हा गोवर्धन सहज उचलू शकतील. आपल्या संपर्कात काही प्रसार माध्यम असेल तर हे काम अधिकच सोपे होईल.
आपल्या हाती जे असेल ते साधन बापरून आपण या ज्ञानियांच्या राजाच्या ज्ञानानुभवाचा प्रसार करूया.
ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश सर्व जगात सुगंधासारखा पसरो आणि सर्व जीव सुखी होवोत अशी प्रार्थना करून या
कामाला सुरूवात करूया.
संपूर्ण ज्ञानेश्वरीसाठी भेट द्या :
या शिवाय या ज्ञानेश्वरीचे तीस तासांचे सांगीतिक पारायण उपलबध असून प्रसार माध्यमासाठी हवे असल्यास संपर्क साधावा. हे सांगितिक ई पारायण लवकरच स्वरनेटाक्षरी या ई साहित्य प्रतिष्ठानच्या ऑडिओ वेबसाईटवर उपलब्ध होईल.
श्री विजय पांढरे यांची ओळख
श्री विजय बळवंत पांढरे हे मुख्य अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,नाशिक येथे अधीक्षक अभियंता व सहसंचालक या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, भगवद्गीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आधुनिक प्रचलीत मराठीत सुलभ असे ओवीबद्ध रुपांतर केले अनुवाद केले आहेत. सदर ओवीबद्ध ग्रंथ ऑडिओ स्वरुपात व छापील स्वरूपातही उपलब्ध आहेत.
त्यांनी तुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ओवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा , चित्तशुद्धीचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरू, सर्व ग्रंथ या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टीकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात. (दूरभाष : ९८२२९९२५७८)
भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥ १ ॥।
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रभु अर्जुनेंसी ॥ २ ॥।
तेचि ज्ञानेश्वरी वाचे बदतां सांचें। भय कळिकाळाचें नाहीं तया ॥ ३ ॥।
एका जनार्दनीं संशय सांडोनी । हृढ धरीं मनीं ज्ञानेश्वरी ॥ ४ ।।
श्रीभगवंतांनी आपल्या अवताराची प्रयोजने साधूंचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन व धर्मसंस्थापन ही तीनच जरी सांगितली असली, तरी अन्य अनेक कारणांसाठी भगवंत अवतार घेतात आणि त्यावेळी त्यांच्या या विश्वाच्या कल्याणाची अनेक कार्ये करतात. हेच पहा ना !
अर्जुनाला निमित्त करूनजगाला गीता सांगण्यासाठी ते जगद्गुरू बनले. ही गीता संस्कृत भाषेत व काहीशी सूत्रमय आहे.
कालांतराने तिचा बोध सामान्य जनांना होणे कठीण आहे, असे पाहून अनेकांना ‘ बुद्धियोग’ देऊन त्यावर भाष्ये करण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. इतकेच नव्हे, तर स्वत:च * ज्ञानदेब’ रूपाने अवतरून तीच गीता भावार्थदीपिकेच्या रूपात, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी, मराठीत सुंदर सुंदर उदाहरणे देऊन प्रतिपादन केली. या ज्ञानेश्वरीची, श्रीएकनाथमहाराजांसारख्या पंडित संताने केलेली भलावण वरील अभंगात आलेली आहे.
सर्वांनी वाचावी
धन्यवाद