आरोग्यसाठी चांगले असणारे 6 तेल
जेवणात तेलाचा वापर जास्त केल्याने आपल्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत असतो, हे खरेही आहे;पंरतु तुम्ही तुमच्या जेवनामध्ये योग्य तेलाचा वापर केला तर ते तेल तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.आपण या लेखामध्ये अशाच आरोग्यदायी असणाऱ्या सहा तेलांविषयी माहिती पाहणार आहोत.
जेवनामध्ये घातलेल्या तेलामुळे जेवण शिजण्यास आणि जेवणाला चव येण्यास मदत होते.जेवनामध्ये जर जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो;परंतु तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्याने आपण स्वस्थ राहतो आणि महत्वाचे म्हणजे योग्य तेलाचा वापर करणे गरजेचे आहे.
चांगल्या तेलाच्या वापराने कोलेस्ट्रॉल, हृदय संबंधी आजार ,ब्लॉकेज या आजारांपासून आपले रक्षण होते.योग्य प्रमाणात वापरलेले तेल आपल्या शरीरामध्ये फॅटी ऍसिड बनवण्यामध्ये मदत करतात.Poly unsaturated आणि mono unsaturated या पदार्थांचा तेलामध्ये समावेश असतो,ज्यांना गुड फॅट्स मानले जाते.
आपल्या आरोग्यसाठी चांगले असणारे 6 तेल – Best Cooking Oils Marathi
मोहरीचे तेल
- तुम्ही उत्तर भारतामध्ये राहत असाल तर तिकडे जास्त करून मोहिरच्या तेलाचा वापर केला जातो.मोहरीच्या तेलाचा वापर पदार्थ तळण्यामध्ये,पदार्थाना चव आणण्यामध्ये केला जातो.
- मोहरी तेलाचा वापर चटणी आणि लोणचे बनवण्यामध्ये देखील केला जातो.डायजेशन आणि सर्क्युलेशन योग्य रीतीने घडण्यासाठी तुम्ही ह्या मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता.
- त्वचेच्या रक्षणासाठी देखील या तेलाचा वापर केला जातो.वायरस ला रोखण्यासाठी किंवा शरीरातील वायरस ला मारण्यासाठी मोहरीचे तेल वापरले जाते.तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करत असाल तर तुम्हाला शक्यतो फंगल इन्फेक्शन होत नाही.
नारळाचे तेल –
- तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये राहत असाल तर तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर नक्की केला असेल.
- तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर पदार्थ बनवताना तव्या ला लावून आणि बटर म्हणून देखील करू शकता.
- नारळाचे तेल शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यामध्ये मदत करते.तुमचे जर वजन जास्त असेल आणि तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही जेवनामध्ये नारळाच्या तेलाचा वापर करणे चालू करा
- .काही दिवसातच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.नियमित आहारामध्ये नारळाच्या तेलाचा वापर केल्याने तुमच्या शरीरातील रक्तामधील लिपिड चे प्रमाण वाढते आणि हृदयाच्या आजारांपासून तुमचे रक्षण होईल.
ऑलिव्ह ऑइल – Best Cooking Oils Marathi
- ऑलिव्ह तेलामध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असते.जे अँटी ऑक्सिडेंट सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी मदत करतात.
- ऑलिव्ह ऑइल तीन व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे.एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ,प्युर ऑलिव्ह ऑइल आणि ऑलिव्ह पोमेस ऑइल.एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल हे ऑलिव्ह ऑइल मध्ये सर्वात चांगले मानले जाते.ह्याचा वापर ऍसिडिटी चे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
- ऑलिव्ह पोलिन ऑइल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल मध्ये सारखी ऍसिडिटी लेव्हल असते;परन्तु ऑलिव्ह पोमेस ऑइल हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल पेक्षा कमी पोषक असते.पोमेस ऑइल ला चविष्ट बनवण्यासाठी पोमेस ऑइल मध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल एड केले जाते ,मिक्स केले जाते.
- ह्या तेलाचा वापर सलाड मध्ये आणि भाज्या बनवण्यामध्ये केला जातो.कॅन्सर आजाराने पीडित असणाऱ्या लोकांसाठी ऑलिव्ह तेलाचा वापर करणे फायद्याचे ठरते.ऑलिव्ह ऑइल चा वापर केल्याने हृदय संबंधी आजार होण्याचा धोका कमी होतो.
भुईमुगाच्या शेंगांचे तेल –
- भुईमुगाच्या तेलाचा वापर फ्लेवर आणण्यामध्ये केला जातो.हे तेल सुगंधित असते.भुईमुगाच्या शेंगांच्या तेलाचा वापर आपण सलाड मध्ये करू शकतो.
- .ह्या तेलामध्ये असणारे पोषक घटक आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.भुईमुगाच्या तेलाचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केला जातो.
- भुईमुगाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते आणि ह्यामध्ये poly unsaturated फॅटी ऍसिड असते,जे की सांधे दुखीला कमी करण्यासाठी मदत करते.
- तिळाचे तेल हे तिळाच्या बिया मधून काढलेले असते.चायना,दक्षिण आशिया यांसारख्या भागामध्ये या तेलाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.हे तेल डायबेटीस आणि सर्क्युलेशन साठी चांगले मानले जाते.ह्याचा वापर पदार्थामध्ये फ्लेवर आणण्यासाठी केला जातो.
- ह्या तेलाची चव फारशी चांगली नसते,त्यामुळे ह्या तेलाचा वापर बेकिंग मध्ये केला जातो.तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन इ ,कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांचा समावेश असतो,त्यामुळे ह्याचा वापर हाडे मजबूत बनवण्यासाठी केला जातो.
- ह्या तेलामध्ये अँटी ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा वापर वायरस,बॅक्टरीया पासून वाचण्यासाठी केला जातो.ह्या तेलामध्ये उष्णता जास्त असते,म्हणून या तेलाचा सर्वाधिक वापर हिवाळ्यात केला जातो.
सोयाबीन चे तेल –
- सोयाबीन चे तेल स्वस्त आणि आरोग्यासाठी चांगले असते.या तेलाचा वापर पदार्थ तळण्यासाठी केला जातो.ह्याचा वापर सलाड मध्ये देखील केला जातो.सोयाबीन चे तेल सुगंधी नसल्यामुळे याचा वापर बेकिंग मध्ये केला जातो.
- ह्या तेलामध्ये व्हिटॅमिन के असते जे की आपली हाडे मजबूत बनवण्यासाठी कामी येते.ह्या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते,जे की शरीरातील रक्ताची लेव्हल वाढवण्यामध्ये कामी येते.
वाचा –उपयोगी तेलबिया
[related_post]