CV म्हणजे काय? Curriculum Vitae – CV full form in Marathi

CV full form in Marathi –

आपण या लेखामध्ये CV चा फुल फॉर्म पाहणार आहोत.तुमच्या पैकी बऱ्याच जणांना CV आणि resume हे दोन्ही एकच आहे असे वाटत असेल; परंतु CV आणि resume दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत .
आपण या लेखामध्ये CV आणि Resume मधील अंतर पाहणार आहोत.चला तर मग आर्टिकल ला सुरवात करूयात.
आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपल्या सर्वांचे एकच स्वन असते की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चांगला जॉब मिळावा.जेव्हा आपले शिक्षण पूर्ण होते आणि आपण ऑनलाइन जॉब शोधतो तेव्हा आपल्याला चांगला जॉब मिळावा या साठी चांगल्या CV आणि resume ची आवश्यकता असते.
काही मुलांकडे ज्ञान तर भरपूर असते ,परंतु त्याचा CV आणि Resume चांगला नसतो,त्यामुळे त्यांना चांगला जॉब मिळावा.यावरून आपल्याला समजते की चांगल्या ज्ञाना सोबत आपल्याकडे चांगला CV आणि Resume असणे गरजेचे आहे.

तुम्ही जेव्हा ऑनलाइन वेबसाईट वर तुमचा CV आणि Resume अपलोड करता तेव्हा तुमच्या resume मधील भरलेल्या माहिती वरून तुम्हाला पुढील राऊंड साठी सिलेक्ट केले जाते.त्यानंतर मुलाखत राऊंड असतो आणि या मुलाखत राऊंड मधे जे सिलेक्ट होतात त्यांना तो जॉब मिळतो.
Resume मधे आपल्याला आपली शैक्षणिक माहिती भरायची असते ,तर CV मध्ये आपल्याला आपली पर्सनल माहिती भरायची असते.

CV फुल्ल फॉर्म इन मराठी –

CV चा फुल्ल फॉर्म ‘curriculum vitae’ असा होतो.CV मधे आपल्याला आपली वयक्तिक माहिती भरायची असते.यामधे आपल्याला आपले नाव,मोबाईल नंबर,ईमेल आयडी,योग्यता,शैक्षनिक माहिती,स्किल,छंद,रिझल्ट , वैवाहिक स्थिती याची माहिती भरायची असते.
यारून कंपनीला कंपनीमध्ये आपल्याला हव्या त्या जागेसाठी कोणता व्यक्ती पात्र आहे हे समजते आणि त्यावरून कंपनी पुढची प्रोसेस करते.
CV शब्दाचा अर्थ –‘curriculum vitae’ हा लॅटिन शब्द आहे आणि याचा इंग्लिश अर्थ ‘कोर्स ऑफ लाईफ ‘ असा होतो.resume मधे आपण आपली खूप संक्षिप्त मधे माहिती भरतो ,परंतु CV मधे आपल्याला आपली वयक्तिक माहिती भरावी लागते.

See also  10th,12 The Pass Candidate Recruitment - सीमा सुरक्षा दलामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सु

कंपनी मधे जॉब साठी सिलेक्ट करणारे कधीही सगळ्यां पेक्षा वेगळा असलेला Cv आणि resume सिलेक्ट करतात आणि सिलेक्ट केलेल्या लोकांना पुढील राऊंड साठी पाठवतात.

Bio data,Cv आणि Resume मधील फरक –

बायो डेटा

Bio data चा फुल्ल फॉर्म biographical data असा होतो.यामधे आपली वैयक्तिक माहिती जसे की नाव ,वडिलांचे नाव, शिक्षण ,धर्म ,जात यांची माहिती असते.भारतामधे बायो डेटा जास्त करून लग्न करण्याच्या अगोदर मुलगा किंवा मुलगी बघताना करतात.काही सरकारी नोकरी मधे तुम्हाला bio data भरावा लागतो.

Resume

Resume मधे आपण आपली माहिती संक्षित्प रुपात लिहितो.चांगला resume आपल्याला मुलाखत राऊंड पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो आणि CV हा मुलाखती दरम्यान मुलाखत घेणारा वाचतो.

CV

जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करता आणि त्तुमची सर्व माहिती एका रुपात भरायची असते त्याला आपण Cv म्हणतो.
तुम्ही खालील गोष्टी ध्यानात घेऊन चांगला Cv बनवू शकता.

१) Cv चा उदेश्य – तुम्हाला समजले पाहिजे की आपण कोणत्या पोस्ट साठी जॉब शोधत आहे आणि त्यानुसार आपण आपला CV तयार केला पाहिजे.समजा तुम्हाला Data scientist बनायचे आहे तर तुम्हाला तुमच्या CV मधे तुम्हीच data scientist पोस्ट साठी योग्य candidate आहात हे सिद्ध करता आले पाहिजे.यामधे तुम्ही CV मधे तुमचे data science सबंधित असलेले स्किल लिहू शकता.
२) तुम्ही Cv मधे आतापर्यंत च्या करियर मधे काय काय केले याची सर्व माहिती लिहा आणि तुमचे पुढे करियर मधे कोणते ध्येय आहे याची देखील संक्षिप्त माहिती लिहा.
३) शैक्षणीक योग्यता – Cv मध्ये आता पर्यंत काय काय शिकले आहे ,कोणती डिग्री मिळवली आहे याची माहिती लिहा.
४) अनुभव – हा जॉब शोधण्या पूर्वी तुम्ही अगोदर कुठे तरी काम करत असाल ते अगोदर जिथे काम करत होता त्याची माहिती आपल्या Cv मधे लिहा.आणि तुम्ही तुमच्या मागच्या जॉब मधून कोणकोणत्या गोष्टी शिकल्या याची देखील माहिती तुम्ही Cv मधे लिहा.

See also  Top 10 Toughest Exams in India - सर्वात कठीण 10 परीक्षा भारतात कोणत्या आहेत ?

2 thoughts on “CV म्हणजे काय? Curriculum Vitae – CV full form in Marathi”

  1. GOOD INFORMATION BUT WRITER MADE ONE MISTAKE IN MARATHI LANGUAGE ESCUSE ME FOR THAT I MENTION IN BRACKET ( आपल्याला चांगला जॉब भेटावा-येथे जॉब मिळावा असा शब्द पाहिजे )

Comments are closed.