घरेलु कामगार योजना २०२३ विषयी माहिती – Domestic labor scheme 2023 in Marathi

Table of Contents

घरेलु कामगार योजना २०२३ विषयी माहिती – Domestic labor scheme 2023 in Marathi

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असे मोठमोठ्या घरातील अनेक श्रीमंत व्यक्ती आपल्या घरातील धुणे/भांडी स्वयंपाक झाडझुड इत्यादी अशी रोजच्या दैनंदिन जीवनातील घरकाम आवरण्यासाठी एक बाई म्हणजेच मोलकरीण लावून घेत असतात.

जिला आपण सोप्या भाषेत घरेलु कामगार देखील म्हणू शकतो.

आपल्या घरात रोज सकाळी येऊन धुणे भांडी झाडझुड स्वयंपाक इत्यादी काम करणारया हया महिलेला देखील स्वताचे एक कुटुंब असते मुलबाळ असतात.ज्यांच्या संगोपनाची जबाबदारी देखील तिच्यावर असते

आपल्या मुलांचे शिक्षणाचा तसेच इतर आवश्यक खर्च देखील तिला बघावा लागत असतो.अणि अशातच घरेलु काम करणारया महिलेला रोज दुसरयांच्या घरात धुणे भांडी स्वयंपाक झाडझुड करून वेतन देखील खुप कमी मिळत असते.

ज्यात तिला महागाईच्या ह्या काळात स्वताचा उदरनिर्वाह करणे देखील कठिण होत असते.अशात मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च करणे तर खुपच दुरची गोष्ट असते.

म्हणुन शासनाने अशा महिलांना आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी यांना आर्थिक हातभार प्राप्त करून देण्यासाठी घरेलु कामगार योजना सुरू केली होती.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका शासन निर्णयानुसार घरेलु काम करणारया ३० टक्के इतक्या महिलांना शासनाकडुन १० हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

See also  मेनोपाॅज म्हणजे काय?menopause meaning in marathi

आजच्या लेखात आपण ह्याच घरेलु कामगार योजना विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून घरेलु कामगारांना शासनाकडुन दिल्या जात असलेल्या हया योजनेचा लाभ हया महिलांना कसा घ्यायचा हे त्यांना जाणुन घेता येईल.

घरेलु कामगार योजना काय आहे?

घरेलु कामगार योजना ही सरकारने घरगुती काम करणारया महिलांसाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे.

घरेलु कामगार योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

घरेलु कामगार योजनेचा लाभ धुणे भांडी स्वयंपाक झाडझुड घराची साफसफाई,इत्यादी घरकाम करणारया महिलांना शासनाकडुन दिला जातो.

घरेलु कामगार महिलांना ह्या योजनेचा लाभ कधी होईल?

जेव्हा घरेलु कामगार महिला ह्या योजनेमध्ये घरेलु कामगार म्हणुन आपली नावनोंदणी करतील तेव्हा घरेलु कामगार योजनेचे लाभार्थी म्हणून घरेलु कामगार महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाईल.अन्यथा नाही.

घरेलु कामगार योजना कोणाकडुन राबविली जाते?

घरेलु कामगार योजना ही घरगुती काम करणारया महिला कामगारांसाठी घरेलु कामगार मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारी महत्वाची योजना आहे.

घरेलू कामगार म्हणून नावनोंदणी करण्यासाठी कोणकोणते महत्वाचे कागदपत्रे लागतात?

  1. आधार कार्ड
  2. रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदान कार्ड,वीज बील आधार कार्ड इत्यादी
  3. बॅक खाते पासबुक
  4. पासपोर्ट साईज दोन फोटो
  5. घरेलु कामगार महिला जिथे काम करत असेल तेथील मालकाचे ती त्याच्याकडे घरेलु कामगार म्हणुन कामाला आहे असे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
  6. घरेलु कामगाराच्या वयाचा दाखला
  7. घरेलू कामगार म्हणून नोंदणी कुठे अणि कशी करायची?

घरेलू कामगार नोंदणी अर्ज प्रक्रिया ही आॅफलाईन पदधतीने पार पडत असते यात आपणास आॅफलाईन पद्धतीने विशिष्ट नमुन्यात देण्यात आलेला हा नोंदणी अर्ज भरायचा असतो.अणि आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन जमा करायचा असतो.

नोंदणीसाठी अर्ज जमा केल्यानंतर १५ ते २० दिवसात कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयातुन आपणास पडताळणीसाठी फोन केला जातो.मग घरेलु कामगारास कामगार मंडळाच्या कार्यालयात नमुद केलेली आवश्यक कागदपत्रे घेऊन जायचे आहे.

काही नोंदणी शुल्क भरल्यानंतर आपणास पावती दिली जाते.ही पावती भेटल्यावर आपण नोंदणीकृत घरेल कामगार बनत असतो.

See also  भारतातील सर्वात प्रभावी प्रेरणादायी वक्ते कोण आहेत ?-  Top 10 motivational speakers in India

घरेलू कामगार यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नोंदणीकृत घरेलु कामगार आहे असा पुरावा द्यावा लागतो.यासाठी ही नोंदणीकृत पावती आवश्यक असते.

नोंदणी पुर्ण झाल्यावर ह्या योजनेअंतर्गत दिल्या जात असलेल्या सर्व योजनांचा लाभ घरगुती कामगारास घेता येत असतो.

घरेलु कामगाराला ओळखपत्र देखील दिले जाते.याचे ३० रूपये अणि मंडळाच्या सभासदत्वाचे ६० रूपये घरेलू कामगार यांना भरायचे असतात.

नोंदणी झालेल्या घरेलु कामगारांना सदस्यत्व नुतनीकरण करण्यासाठी दरवर्षी ६० रूपये देखील भरावे लागत असतात.

घरेलु कामगार म्हणुन नोंदणीसाठी पात्रतेच्या अटी –

ज्या घरेलु कामगाराचे वय अठरा पुर्ण आहे पण साठ पेक्षा कमी आहे अशा प्रत्येक घरेलु कामगाराला घरेलु कामगार म्हणुन आपली नाव नोंदणी करता येत असते.

घरेलु कामगार मंडळाच्या वतीने कोणकोणत्या योजना राबविण्यात येत असतात?

घरेलु कामगार महामंडळाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात.

  • कलम १० नुसार घरेलु कामगार यांच्या करीता काही कल्याणकारी योजनांची तरतुद करण्यात आली आहे.
  • अपघात घडुन आलेल्या लाभार्थी व्यक्ती म्हणजे घरेलु कामगार महिलेला तत्काल मदत केली जाईल.
  • घरेलु कामगार योजनेच्या लाभार्थीस मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे.
  • घरेलु कामगारांना त्यांच्यावरील आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्च दिला जाईल किंवा घरेलु कामगारावर अवलंबून असलेले तिच्या कुटुंबातील इतर व्यक्ती जसे की मुलबाळ यांच्या आजारवरील उपचारासाठी देखील वैद्यकीय खर्च दिला जाईल.
  • घरेलु कामगारांना प्रसुती लाभ देखील प्रदान करण्यात येईल.
  • घरेलु कामगार महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या कायदेशीर वारसदाराला म्हणजेच मुलाला मुलीला घरेलु कामगाराच्या अंत्यविधी करीता ठाराविक रक्कम देखील प्रदान केली जाईल.

घरेलु कामगार मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती?

घरेलु कामगार मंडळाची २०१४-२०१५ मध्ये करण्यात आली होती.

घरेलु कामगार मंडळाच्या वतीने घरेलु कामगार योजनेच्या लाभार्थीना कोणकोणते महत्वाचे लाभ दिले जातात?

  • घरेलु कामगारांना लाभाच्या स्वरूपात जनश्री विमा योजना लागू करण्यात येत असते.हया योजनेअंतर्गत घरेलु कामगारांना पुढीलप्रमाणे विविध लाभ प्रदान केले जात असतात.
  • जर जनश्री विमा योजनेच्या लाभार्थी सभासदाचा नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला तर तिच्या वारसदाराला ३० हजार रुपये इतकी आर्थिक मदत प्रदान केली जाते.
  • जनश्री योजनेच्या सभासदाचा जर अपघातात मृत्यू वगैरे झाला तर तिच्या वारसदाराला ७५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाते.
  • जनश्री योजनेच्या सभासदाला जर अपघातामुळे कायमस्वरूपी स्वरूपाचे अपंगत्व आले तर त्याला ७५ हजार रुपये अणि अंशत अपंगत्व आल्यास ३७ हजार पाचशे रुपये मदत म्हणून दिले जातात.
  • जनश्री योजनेच्या सभासदांच्या मुलांना शिक्षा सहयोग योजने अंतर्गत नववी ते बारावी शिक्षण करण्यासाठी तसेच एखादा आयटीया कोर्स करण्यासाठी (दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास) ही रक्कम दरवर्षी तिमाही तीनशे रुपये इतकी रक्कम दिली जाते.ही रक्कम जास्तीत जास्त दोन मुलांना दिली जाते.
  • घरेलु कामगारांना अंत्यविधी साहाय्य देखील प्रदान केले जाते.म्हणजे समजा घरेलु कामगाराचा किंवा तिच्या घरातील एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधी करीता दोन हजार रूपये इतकी रक्कम दिली जाते.घरेलु कामगाराचा मृत्यू झाला असल्यास ही रक्कम तिच्या कायदेशीर वारसदाराला दिली जाते.पण ही मदतीची रक्कम घरेलु कामगारांच्या घरातील दोन व्यक्तींना दिली जाते.
  • घरेलु कामगाराच्या प्रसुतीसाठी शासनाकडुन प्रत्येकी दोन अपत्यांकरीता प्रत्येकी पाच हजार रुपये दिले जातात.हा ठराव घरेलु कामगार मंडळाच्या २९/९/२०१२ मध्ये झालेल्या एका बैठकीत मांडला गेला होता.
See also  मुंबईत नवीन ॲपल स्टोअर ची १० वैशिष्ट्ये - Apple BKC first store in India.

कौशल्य विकास कार्यक्रम ह्या अंतर्गत घरेलु कामगारांना व त्यांच्या मुलांना शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण देखील प्रदान केले जाते.याचसोबत यांना माॅडयुलर स्कीम अंतर्गत प्रशिक्षण सुदधा देण्यात येत असते.सदर योजना ही व्यवसाय शिक्षण अणि प्रशिक्षण संचालय राबवित असते.हया योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कामगार कल्याण मंडळात जाऊन योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक असते.

याचसोबत यात विदेशी भाषा प्रशिक्षण सुदधा दिले जाते.महाराष्ट राज्य कल्याण मंडळाच्या वतीने हे विदेशी भाषा शिकण्याचे वर्ग घेण्यात येत असतात.घरेलु कामगारांच्या पाल्यांना देखील इतर मुलांप्रमाणे विदेशी भाषेचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ही संधी घरेलु कामगाराच्या मुलांना देण्यात आली आहे.घरेलु कामगाराच्या मुलांना विदेशी भाषा शिकण्यासाठी होत असलेला सर्व खर्च प्रशिक्षण खर्च कामगार कल्याण मंडळ करीत असते.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत घरेलु कामगारांना घरेलु कामगार पदविका अभ्यासक्रम दिला जातो तसेच यशवंत राव चव्हाण महाराष्ट्र मुक्त अभ्यासक्रम मार्फत घरेलु कामगार अणि त्यांच्या पाल्यांना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो.यात ज्या घरेलु महिला कामगाराचे शिक्षण अपुर्ण राहीले असेल तिला आपले शिक्षण यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत पुर्ण देखील करता येणार आहे.पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मंडळाकडून पुर्वतयारी करण्यासाठी ९०० रूपये अणि ६५० रूपये शिक्षण क्रमाकरीता दिले जात असतात

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ – लाभार्थीं नोंदणी साठी अर्ज pdf download